"अहो ताई राहुद्या, तुम्हाला काम करण्यासाठी बोलावलंय का?"
"असुद्या हो, लेकीच्या घरी काम करतांना अजिबात थकवा येत नाही..ते जाऊद्या, तुम्ही व्हा पुढे..वरमायांची वरात गेलीये पुढे"
वसुधा काकूंची विहिण लगेच निघाली..इकडे सुषमा काकू आपल्या बहिणीला हसत होत्या..
"दोन दोन मुली तुला...किती गं बाई राबणार तू?? खरं नाही.."
आता मात्र वसुधा काकूंना आपल्या बहिणीचा राग आला,
"सुषमा हे बघ तेव्हा सगळी पाहुनी मंडळी समोर होती म्हणून काही बोलले नाही मी...पण तुझं काय हे नेहमीचं? तुला मुली आहेत मला मुलं आहेत म्हणून??"
"आता जे सत्य आहे ते बोलते बाई मी..आता मला बघ, उद्या माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली की दोन सुना येणार मला, मग मी फक्त बसून आयती ऑर्डर सोडणार....तुझं तसं नाही...जाऊदे...तुला झोंबत असेल तर नाही बोलत, राहिलं.."
वसुधा काकू निमूटपणे आपापलं काम करू लागल्या..
काही वर्षे उलटली. सुषमा काकूंच्या दोन्ही मुलांची लग्न झाली. वसुधा काकूंना वाटलं की बरेच दिवस आपल्या बहिणीला भेटलो नाही तर एकदा भेटून यावं...
त्यांनी जेव्हा आपल्या बहिणीला पाहिलं तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. बहिणीची तब्येत फारच खराब झालेली, चेहरा काळवंडला होता...अतिशय असहाय दिसत होती..
"काय गं काय झालं?"
"काही नाही गं... थकवा आलाय.."
"दोन दोन सुना असतांना कसला थकवा?"
******
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा