मिजास 1

हेहे तुला तर दोन्ही मुलीच आहेत..
"बघ, लेकीच्या घरी असं राबावं लागतं.. आणि लोकं म्हणतात मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे.."

सुषमा काकू कुत्सितपणे हसत त्यांच्या बहिणीला बोलत होत्या. बहिणीला राग आला खरा, पण इतके सगळे पाहुणे समोर असतांना शोभा नको म्हणून त्या गप राहिल्या.

सुषमा काकूंची बहीण, म्हणजेच वसुधा.. त्यांना दोन मुली आणि सुषमा काकूंना दोन्ही मुलंच. सुषमा काकू लहानपणापासून विचित्र स्वभावाच्या, कुठे काय आणि कसं बोलावं याचं त्यांना भान नसायचं. आपल्याला दोन्ही मुलंच आहेत या मिजाशीत त्या आपल्या बहिणीला कितीतरी वेळा कमी दाखवत.

वसुधा काकूंच्या मुलीचं लग्न झालं होतं. मुलीच्या धाकल्या दिराचं लग्न ठरलेलं असल्याने सर्वजण मुक्कामाला लग्नघरी थांबलेले. वसुधा काकूंची मुलगी लग्नघरातील सर्व पाहुण्यांकडे बघत होती आणि वसुधा काकू तिला सगळी मदत करत होत्या. झाडझुड, पसारा आवरणं, चहापाणी करणं हे त्या पुढे होऊन सगळं करत होत्या. सुषमा काकू मात्र कशालाही हात न लावता पाहुण्यासारख्या बसून होत्या.

वरमाईचा कार्यक्रम असल्याने सर्व वरमाया वाजत गाजत दुसऱ्या घरी नेण्यात आल्या होत्या. घरी मोजकीच पाहुनी थांबलेली त्यात वसुधा काकू आणि सुषमा काकू दोघी बहिणी बसलेल्या.

वसुधा काकू शांत न बसता घरातलं एकेक आवरत होत्या. पाहुण्यांच्या चहा पाण्याचे कप, ओट्यावरचा पसारा, सोफ्यावरचा पसारा एकेक करून आवरत होत्या. त्यांच्या विहिणीने हे पाहिलं आणि म्हणाल्या,

🎭 Series Post

View all