Jan 19, 2022
नारीवादी

मीच आई......मीच बाबा

Read Later
मीच आई......मीच बाबा

#एक संघर्षमय मातृत्व

सत्य घटना......(ही कथा सत्य कथा आहे, प्रिया हे पात्र आहे ते ओळखीचे आहे अन तिच्या जीवनात तिच्या मामा सोबत जी घटना झाली त्याचे वर्णन आहे, प्रियाच्या नजरेतून)

आपल्या साठी आजोळ म्हणजे काय तर आपले दुसरे घर  त्यातली माणसेही मोठ्या मनाची , आपुलकी जपणारी , प्रेमाची मायेची उब देणारी, आई सारखे प्रेम करणारी मावशी, लाड करणारे मामा, खाऊ देणारे आजोबा, मस्ती करणारी भावंडे........असच प्रेमाचे घर म्हणजे आजोळ!!

प्रियाची दोन भावंड आणि आई बाबा असे कुटुंब पण प्रिया कायमआजोळी होती, एकुलती एक लेक आणि लहान दोन भाऊ,पण त्यात लाडकी होती पिया आई बाबांची, भाऊ फारच लहान होते. आई एकटी त्या तिघांचे करत असे. घरची परिस्थिती बेताची आणि त्यात पण तीन मुलांचे करणे त्रासदायक जात असे आईला. म्हणूंन प्रियला आजोळी पाठवले तसही प्रियाला जास्त आजोळी आवडत असे.

तिच्या साठी आजोळ म्हणजे प्रेमाचा जिव्हाळा, अखंड वाहता झरा,मायेची ऊब देणारे आजी-आजोबा व लाड करणारे मामा-मामी , आणि मावशी , त्यांची मुलं यांनी बहरलेलं आजोळ ! प्रियाला आजोळच्या घराबद्दल लहानपणापासून खूप कुतूहल तर होतच, तेवढीच ओढ , आपुलकी, आपलेपणा , जिव्हाळा होता......... कारण तिचे लाड तिथं होत.

आजी आजोबा, तिचे चार मामा, मामी आणि एक मावशी या सगळ्यांत तिला फार आवडत होते.तिला तिचे मामा खूप लाड करत, घरात ती आणि तीन लहान भाऊ मामांची मूल असे घर भरलेलं होत, प्रिया सगळ्या मामांची लाडकी भाची होती, तिला कशाची कमी नव्हती, लहान भावंड, प्रेम करणारी मामी, आजोबा आणि आजी.......मामा तर प्रियाला जीव की प्राण करायचे कारण होतीच तशी प्रिया लाघवी, बोलकी अशी होती, चुलबुली प्रिया????

प्रिया शाळेत होती, तिचा अभ्यास मोठी मामी घेत होती कारण ती टिचर होती, छोटी मामी तिची शाळेची तयारी करून देत असे, जस डब्बा, तिच्या वेण्या बांधणे, बाकी सारी तयारी .....होतीच तशी ना सगळ्यांची लाडकी....
त्यांच्या घरात प्रत्येकजण मिळून आणि प्रेमाने वागत असता, घरातील वातावरण खेळी मेळी चे होते. अभ्यास खेळ असे सगळे प्रिया अगदी आवडीने करत होती. तशी ती अभ्यासात हुशार पण होती, लहान भावंड म्हणजे तिचा जीव होता, ती तितकीच प्रेमाने तिची काळजी घेत असे, जसे तिला तिचे मामा मुली सारखे करत, तशी ती लहानपणापासून प्रेमळ होती, सगळ्यांशी आत्मीयतेने बोलणे, लहान मोठे या सगळ्यांना आदर करणे, कधीच कोणाला त्रास ना देणे, मोठ्यांचा आदर.........या सगळ्या ची शिकवण आई, आजी आणि मामी या सगळ्यांनी तिला दिली होती......

प्रियासाठी तिचे आजोळ म्हणजे निर्व्याज प्रेम करणारी तिची आजी-आजोबा,मामा,मामी, लहान मावशी व तीची लहान भावंड म्हणजे हक्काचे दुसरे घर होते, कारण तिथे कधीच परकेपणाची जाणीव नव्ह्ती. मामाचे घर म्हणजे  तिच्या साठी आई सारख निष्पाप प्रेम करणारे तिचे मामा, सुगरण मामीच्या हातची मेजवानी.. आजीचा प्रेमळ हात.. आणि आजोबांचा धाक.भावंडांची साथ........असे होते
प्रिया आणि तिची भांवड या सगळयांना आजी रोज नवीन गोष्टी ऐकवत असे, मग गोष्टी ऐकून मूल झोपी जात असत, तर कधी मामा भुतांच्या गोष्टी ऐकवायचा त्या ऐकताना बापरे.......भीतीच वाटत असे सगळ्यांना, प्रिया तर आजीच्या कुशीत कायम झोपायची. सकाळी मामी च्या हातचा नाश्ता, दुपारी सगळ्यांच्या आवडीचे जेवण, मामी तर कधी लाडाने तिला हाताने भरवत असे...

घरी आनंदाचे वातावरण झाले होते कारण छोटी मामी आई होणार होती, मामा तर जाम खुश होता, पण या सगळ्यात माामा व  मामीने तिचे लाड करणे कधीच नाही थांबवले, पाहता पाहता मामी ने छोट्या परीला जन्म दिला, आजी खुश झाली, आजोबा,मामा आणि मावशी. प्रिया तर भलतीच खुश झाली कारण तिला आता छोटी बहीण मिळाली होती,  एके दिवशी तिला घरी आणले, मामा ने छोट्या परीचे नाव आस्था ठेवले, घरातील आनंद द्विगुणित झाला होता.
आस्था सोबत प्रियाचे बालपण मजेत जात होते आणि सोबतीला इतर लहान भावंडे धमाल करत, घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाने प्रिया वर असलेले सगळ्यांचे प्रेम कधीच कमी नाही झाले, मामा आणि मामी तसेच तिच्यावर प्रेम करत जस की आस्था वर करत.

दिवाळी चे कपडे, खेळणी सारे लाड आणि प्रेम सगळ्या भांवंडांना सारखे होते, घरातील सगळे खुश होते,दिवस जात होते तशी प्रिया पण मोठी होत होती आणि छोटी आस्था बघता बघता सहा वर्ष्याची झाली होती, घर कस भरलेले गोकुळ होत आणि म्हणूनच की काय मामीला परत दिवस गेले होते, मामाची आता जवाबदारी अजून वाढणार होती, तो नव्या ऑफिसमध्ये जाऊ लागला तिथे त्याला जास्त करून मुंबई बाहेर जावे लागत असे, असे बरेच वेळा तो जात असे, किमान दहा दिवस बाहेर राहून परत घरी यायचा, मग तो आला की वातावरण बदलून जात असे, तो घरत सगळ्यांचा लाडका, आजीचा लाडोबा, आईचा लाडका भाऊ, आणि मुलांचा लाडका मामा असा होता, जो गोष्टीतल्या चांदोबा पेक्षा प्रेमळ आणि लाडका होता.
तो जेव्हा  बाहेरून यायचा तेव्हा सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू आणि प्रियासाठी आवडीचे चॉकलेट आणत असे. असा छोटा मामा प्रियाचा लाडका मामा होता.

एक दिवस मामीला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि या वेळी प्रियाला आणि आस्थाला अजून एक भाऊ मिळाला होता.....नीरज असे त्याचे नाव मामाने मोठ्या प्रेमाने ठेवले होते,अजून एक नवीन भाऊ मिळाला आम्हाला म्हणून प्रिया, आस्था खुश झाल्या होत्या. बालपण असेच सुखात चालू होते ..................पण ती एक घटना आणि घरातील सगळयांचे जीवन बदलून गेले.

साधारण नीरज अगदी सात महिन्यांचा असेल तेव्हाची गोष्ट मामा असेच काही ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावी जावे लागले होते, तो दिवस प्रिया आणि इतर घरच्यांसाठी सगळ्यात वाईट दिवस होता, मामा गुजरात मध्ये भुज या ठिकाणी गेला होता, 26  Jan चा दिवस होता, मामा पहाटे लवकर उठून परतीच्या प्रवासाची तयारी करत होता, सकाळची वेळ होती, ज्या हॉटेलमध्ये तो थांबला होता तिथे सौम्य भूकंपाचे झटके जाणवले, तेव्हा तो व इतर सहकारी घाबरले,आधी सौम्य जाणवणारे झटके क्षणात 7.3 rishtar.scale इतका मोठा झटका आणि क्षणात ते हॉटेल पत्त्यासारखे कोसळले, ज्यात प्रियाचा लाडका मामा होता.........????

इथे प्रिया व तिच्या आजी व मामी ला जराही कल्पना नव्हती कि मामा सोबत असे काही अघटीत घडले असेल, आणि त्या वेळी मोबाईल नव्हते, घरात लँडलाईन होता, पहाटे सात वाजून वीस मिनिटे झाली, तसाच भूकंपाचा झटका त्यांना पण जाणवला, प्रजासत्ताक दिन होता, सारे लवकर उठले होते, बरोबर अकरा वाजता घरचा फोन वाजला आणि तो मामीने उचलला समोर फक्त तिला इतके सांगण्यात आले आम्ही BSF मधून बोलतोय तुमचे मिस्टर आता हयात नाहीत, भूकंपामुळे जे हॉटेल कोसळले होते त्यात त्यांचे निधन झाले, आम्ही त्यांची हिंदू धर्माच्या पद्धतीने अंतिम संस्कार केले आहेत, त्यांच्या अस्थी तुम्हाला मिळून जातील, कृपया येऊन घेऊन जावे. आम्हाला ला त्याचे आय कार्ड सापडले तिथे हा नंबर होता,हे एक वाक्य आणि ती जोरात ओरडली, तिचे आयुष्य या भूकंपात उद्धवस्त झालं होत, आस्था आणि नीरज चे बापाचे छत्र डोक्यावरून गेलं होतं, घरातील सगळे हे ऐकून क्षणभर एकाच जागी थांबले, आजी आजोबा धाय मोकलून रडू लागले, बाकी चे मामा, मावशी आणि प्रिया खूप खूप रडू लागली, हसत खेळत घर जणू नजर लागली तसे निष्प्राण झाले. त्या अस्थी आणायला प्रियाचे बाबा व मामा गेले. तिथे फारच भयानक परिस्थिती होती, बाबा आणि मामा थोडे घाबरून गेले,एका क्षणात होत्याच नव्ह्तं झालं...........???????????????? एक हसत खेळत कुटुंब दुःखात बुडाले????


काही घटना आपल्या आयुष्यात घडतात आणि आपले आयुष्य बदलते, कधी घडते तर कधी उध्दवस्त होते, 26Jan  चा तो भूकंप आणि प्रियाचा लाडका मामा तिच्या आणि इतर सगळ्यांपासून कायमचा दूर गेला???????? होता.
एका आईने तिचा मुलगा गमावला, एका बहिणीने तिचा भाऊ, एका बायकोने तिचा पती पण या सगळ्यात त्या दोन  निष्पाप जीवांनी त्यांचे वडील गमावले होते.

नीरज तर इतका लहान होता कि त्याला बाबा शब्द समजायच्या आता त्याचा बाबा त्याला कायमचा सोडून गेला, आस्था जिला बाबांचा हात धरून खेळायचे दिवस होते अश्या वेळी तिचा बाबा तिला सोडून गेला ते ही कायमचा.........प्रियाला पण मानसिक धक्का बसला.......ती आजारी पडू लागली, सतत आपल्या सोबत मस्ती करणारा, लाड करणारा, हट्ट पुरे करणारा तिचा मामा आता तिला कधीच नाही दिसणार होता???????? या घटने नंतर  बडबणारी प्रिया आता अबोल राहू लागली????......... सारे घर जणू निर्जीव झाले...... प्रियाचा तो मामा या घराचा प्राण होता.........अजूनही घरात तो नाही या गोष्टी वर आजीचा विश्वास नाही तिचे डोळे आज ही त्याची वाट बघत आहेत.........बिचारी प्रिया आपला लाडका मामा आपल्याला दिसणार नाही ह्या विचारांनी आज ही त्याच्या आठवणीत  रडते कारण कुठे तरी आज ही तीच मन त्याच नसलेलं अस्तित्व मान्य करत नाही आहे.

आयुष्यात ही झालेली ही घटना ...........पण या सगळ्यात मामीने हे दुःख सहन केल, ती हरली नाही, पुन्हा नव्याने उभी राहिली आपल्या दोन छोट्या पिल्लांसाठी........  ती त्यांची आई तर होतीच पण तिला त्यांचा बाबा पण व्हावे लागले, दुःखाचा डोंगर सगळ्यांवर कोसळला होता.  पण जास्त वाईट सगळ्यांना आस्था आणि नीरज साठी वाटत होते, नियतीने त्यांच्या डोक्यावरन बापाचे छत्र हिरावून घेतले होते,आज या घटनेला खूप काळ लोटला.....मामी तिच्या दोन मुलांसाठी खंबीर झाली, ती मामच्या ऑफिसमध्ये कामाला जाऊ लागली, शिक्षण चांगले झाले होते म्हणून तिला आज नोकरी करता आली.
आणि आजी आजोबा आणि मावशी , तसेच इतर  सगळ्यांनी तिला खंबीर साथ आणि पाठिंबा दिला........तिच्या लहान पिल्लांना आजीने प्रेमाने आणि मायेने वाढवले, घरच्यांची साथ होती म्हणून तिने या दोघांना चांगले शिक्षण दिले आणि एक योग्य शिकवण दिली ती म्हणजे मामा सारखी प्रेमाने वागा, माणुसकी जपा, कायम प्रत्येक नाती जपा.......... निस्वार्थ भाव मनी ठेवा....... मामीने प्रियाला कधीच अंतर नाही दिले, कायम तिला मामा सारखे प्रेम दिले.........????

आज मामीला घरच्यांची साथ होती म्हणून ती एक आई आणि बाबा ह्या दोन्ही जवाबदारी नीट आणि कणखरपणे सांभाळू शकली....... प्रियाच्या आजी ने मामीला कायम मुली सारखी वागणून दिली एक सून असून सुद्धा.........
जेव्हा आपल्या सोबत घरच्यांची साथ असते तेव्हा कितीही मोठे संकट येऊ दे आपण कायम strong  असतो..

अशी ही प्रियाची मामी जिने तिचे सौभाग्य गमावून सुद्धा एक आई आणि बाबा या दोन्ही जवाबदारी सांभाळून आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन नवे जीवन दिले,एकटे मातृत्व सांभाळणे म्हणजे खरच मोठी परीक्षा असते. प्रियाची मामी आज आस्था व नीरज साठी आई आणि बाबा अशी दुहेरी भूमिका बजावत होती, कारण तिला ठाऊक होते मुलांना आई आणि बाबा दोघांची गरज असते, पण त्या पैकी जर कोण आपला जोडीदार नसेल तर एकटे आईपण किती कठीण आणि वेगळवेगळ्या संकटांनी भरलेले असते ह्याची कल्पना मामीला होती... ...........
पण जर संकटे आली असतील आणि त्यात आपल्या माणसांची साथ असेल तर कोणतेच संकट आपले काहीच वाकडे करू शकत नाही!!!!

आजही अश्या किती स्त्रिया असतील ज्यांना एकटे मातृत्व स्वीकारावे लागत असेल??  ज्यांना कधी एकटेपण अनुभवावे लागत असेल? अनेक संकटाना सामोरे जावे लागत असेल? खूप प्रश्न आहेत  स्त्रियांसाठी?? एक स्त्री ही मस्करीचा किंवा कुत्साहित बुद्धी दाखवण्याचा विषय नाही!! अश्या कितीतरी स्त्रिया आपल्या समाजात असतील ज्यांना एक संघर्षमय मातृत्व जगावे लागते असेल?

अश्या काही घटना आणि आयुष्य बदलून जात असेल? घरच्यांचे पाठबळ आणि खंबीर साथ यामुळे.........माणूस कोणत्याही संकटांवर मात करू शकतो........!! खरच एक स्त्रीच्या जीवनात असलेल्या या वेगळ्या वेगळ्या छटा आपण रोज पाहतो.... आजी, आई, मुलगी, बहीण मग बायको, सून, वहिनी, कोणासाठी काकी,कोणाची मामी,परत तिच्या मुलांची आई...........

स्त्री जीवन हे विविध रंगानी भरलेले जणू इंद्रधनू आहे,
निरनिराळ्या छटांनी भरलेले एक सुंदर चित्र आहे
एक स्त्री म्हणजे शक्तीस्थान, एक प्रेरणा स्थान आहे
स्त्री म्हणजे सप्त स्वरूप,  मायेचे दुसरे रूप आहे
स्त्री ही निस्वार्थ कर्तव्याची प्रेमळ गाथा आहे
स्त्री ही विधात्याने घडवलेली एक अनमोल कलाकृती आहे
स्त्रीचे हृदय अथांग आणि विशाल प्रेमाचे सागर आहे
स्त्री आहे म्हणून आपली ओळख आहे
स्त्री नाही तर या जीवनी काळोख आहे
स्त्री म्हणजे आपल्या भक्कम समाजाचा पाया आहे!!

स्त्री जीवन हे अनेक नात्यांच्या रंगानी भरलेले असते,
अन नात्यांनी गच्च भरलेल्या या आभाळात तिच्याच निरनिराळ्या छटांचे दर्शन घडत असते!!????????

#माझेलेखन
#स्त्रीजीवनातीलछटा........

माझा लेख कसा वाटला? जरूर कळवा!!
तुमचा अभिप्राय द्या.

@श्रावणी देशपांडे
गोष्टी मनातल्या♥️

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Hemant Deshpande

Service

मी श्रावणी, मला कविता, लेखन करायला खूप आवडतात, गोष्टी मनातल्या♥️मनापर्यंत पोचवायला आवडतात!!