Feb 24, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

मीच माझी शिल्पकार..!

Read Later
मीच माझी शिल्पकार..!

राज्यस्तरिय कवितालेखन स्पर्धा फेरी -2

विषय -मीच माझा शिल्पकार..

शिर्षक-मीच माझी शिल्पकार...


घाव झेलून वेदनेचे,
आयुष्य घेते आकार
परिपक्वतेची शाल पांघरून,
जीवन होते साकार...!!१!!

अडचणी रोजच्या वाटेवर,
शोध असतो नव्या आशेचा ,
ठेच बसली म्हणुन का?थांबावे,
मार्ग निघतोच नव्या दिशेचा...!!२!!

कोण घडवेल आयुष्य माझे,
मीच माझी शिल्पकार,
कठिण समयास नाही घाबरत,
हिम्मतीने करते स्वप्न साकार...!!३!!

वाटेवरती काटे बहु पण,
रणरागिणीची मी अवतार,
थिजवून अश्रू नयनात माझ्या,
वेदनेला क्षमवते क्षणात...!!४!!

अपेक्षा नाही उरी माझ्या,
कष्टाची परिभाषा मनी आहे ,
यशाची शिखरे नसे दुर बहु,
लढाई रोजची सुरू आहे....!!५!!

वर्ण ते दुःखाचे जरी
सुख ओंजळीत येत आहे,
कर्तृत्वाच्या तलवारीला
धार सुखाची चढत आहे.....!!६!!

दोष नाही विधात्याचा,
सटवाईने लिहिला टाक,
नशिबाचे भोग कठिण
परिक्षेचा असतो काही काळ....!!७!!

लढुन लढाई आयुष्याची,
व्यक्तिमत्व घडले आहे धारदार,
जीवनाची देणं जरी विधात्याची,
मीच आहे माझी शिल्पकार.....!!८!!®वैशाली देवरे

जिहा -नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//