A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionb9b8467089128da5e5941c8f519dcefdec2f750c22b8b6c0224e4666586eb4223b07f889): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Mich mazi shilpkar part 4
Oct 27, 2020
स्पर्धा

मीच माझी शिल्पकार भाग ४

Read Later
मीच माझी शिल्पकार भाग ४

मीच माझी शिल्पकार भाग ४
पूर्वभाग थोडक्यात.
प्रतापरावांनी आणलेल्या पुस्तकावरून हात फिरवत असताना रसिकाला स्वतः तीलच गुणांची आठवण होते आणि तिला स्वतः ची ओळख निर्माण करण्याचा मार्ग सुचला.

भाग ४
जे आपण ठरवले आहे ते प्रतापरावांना यशस्वी झाल्यावरच सांगायचे म्हणजे मला जे कौतुक अभिमान त्यांच्या नजरेत अपेक्षित आहे त्याचा आनंद भरभरून अनुभवता येईल म्हणून ही गोष्ट गुपितच ठेवायची असे रसिकाने मनोमन ठरवले.

मंदार शाळेत गेला की सगळे काम आटोपल्यावर रसिकाला थोडा मोकळा वेळ मिळत असे त्या वेळेचा सदुपयोग रसिकाने करायचा ठरवला.आत्मिक आनंदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.पहिलं पाऊल प्रत्येकाला दुसऱ्या पावलाशी जोडत असतच.येणारा प्रत्येक दिवस कदाचित चांगला नसेलही पण त्या दिवशी काहीतरी चांगलं घडत असतं ते फक्त आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं.

रसिका कर्तबगारी आणि आपल्या निर्णयावर ठाम राहणारी होती फक्त संसारातील जबाबदारऱ्यांनी गुरफटल्याने थोडी भरकटली होती आता तीचा स्वतः उंच स्वत्व निर्माणा च्या दिशेने प्रयत्न सुरू झाला होता.अशी प्रत्येकच्या जीवनात आयुष्यात जडण-घडणीत भावनांच्या कर्तव्याचे भरती ओहटी येतच असते फक्त त्या भरतीओहोटी ला आपण कशा प्रकारे सादर होतो त्यावर स्वतःचा आनंद अवलंबून असतो.

घरातील आजपर्यंतच्या अनुभवावरून रसिका विचार करत होती आपणास घरातील कोणाचेही याबाबतीत प्रोत्साहन मिळणार नाही. आपणच आपले आणि प्रेरणा व्हायला हवे आता हे नवे शिखर कोणाच्याही प्रोत्साहनाशिवाय स्वतःला सिद्ध करायचेच.आपल्यात आत्मविश्वास आहेच तोच आपला सोबती मानून धाडसाने जगासमोर एक वेगळ्या रूपात यायचे.मी माझा आनंद शोधण्यात,मिळविण्यात समर्थ आहे.गरज ही शोधाची जननी आहे शोध नवनिर्मितीचा रस्ता आहे.प्रत्येकात काहीतरी वेगळेपण असतं ते आपण आपलच शोधावं लागतं.ते शोधून देण्यासाठी दुसरं कोणी येत नाही.

मंदारला शाळेत सोडल्यावर रसिकाचे पाय दैनिक वृत्तपत्र कार्यालयाकडे वळले.प्रेरणात्मक लेखमाला सुरु करायचा मानस वृत्तपत्र कार्यालय प्रमुखाकडे तिने व्यक्त केला. रसिकाची काही लिखिते त्यांनी वाचले त्यावरून त्यांनी वृत्तपत्र प्रकाशित करण्याचा होकार दिला मात्र एक ठेवून पहिल्या दोन लेखमालेच्या वाचक प्रतिसादवर पुढचे प्रकाशन अवलंबून राहील.

लहानपणापासून वाचन चिंतन त्यातूनच निर्माण झालेली लेखनाची आवड छंद तेच आज तीच पॅशन झालं होतं.

          दिल हे छोटासा छोटीसी आशा........

एक छोटीशी आशा घेऊन की स्वतःच्या निर्माण केलेल्या वाटेवर निघाली.कोणतीही वाट निवडा अडथळे असतातच .वेळात वेळ काढून रसिकाने लिखाण सुरू केले.रसिका स्वभावाने हळवी, समोरच्याच्या वेदना समजून घेणारी असल्याने बरेचसे ज्वलंत विषय तिला आपोआप सुचू लागले .तिच्या लेखणीला विषयाचे बंधन नव्हते.

आपल्या प्रतिभेतून,वाचनाने आलेल्या विचारांच्या प्रगल्भतेतून ,विषयाची नीटनेटकी मांडण्याची कल्पकता, सर्जनशीलतेतून रसिकाची लेखणी शब्द रुपात पाझरू लागली.एक प्रकारचे लेखनाची धुंदी चढली.अगदी चालता-बोलता व्यक्त होण्यासाठी शब्द सुचु लागले. ज्ञानाने मिळालेल्या शब्दांचा गोपाळकाला तिला लेखणीतून कण कण वाटायचा होता.

  धुंद जाहले मी आज शब्द लिहिता ।
  न विझणारा दिवा,ज्ञानाचा तो पेटला ।
  संपली रात्र आज ,सूर्य मज भेटला.।।

असेच आज दुपारच्यावेळी लिहीत बसलेली असताना करुणाबाईंनी पाहिले.त्यांना काय झाले कुणास ठाऊक. एकदम शांत स्वरात म्हणाल्या आपल्याला आता काय पुन्हा बिगरी शिकायची आहे काय.हे असे लिहीत बसने म्हणजे भिकार पणाचे लक्षण आहेत.स्त्री चे विचार चार भिंतीतच असायला हवे ते बाहेर निघाले तर रामायण, महाभारत घडते.एवढे बोलून त्या पाय आपटत आत निघून गेल्या.

लोकांतील असाही एक प्रकार असतो.स्वतः तर काही करायचे नाही पण दुसरं कोणी करतय तर कौतुक करायचं सोडून फक्त टोकत रहायचे.हीच ती विचारसरणी रसिकाला बदलायची होती.लेख लिहिणे म्हणजे भिकार पणाचे लक्षण नसते तर ते विचार करायला लावणारे ज्ञानामृत असते.आजही रामायण महाभारताचा अर्थ एक स्त्रीने घडवून आणलेला वाद असाच बरेच जण असाच मानताना दिसतात. किती वाईट दयनीय विचारसरणी आहे खरेतर रामायण महाभारत म्हणजे असत्यावर,दुराचारावर सत्याने केलेला विजय होय.हेच सकारात्मक विचार जगासमोर आणायचे आहे त्यात कितीही अडथळे आले तरी स्वतःसाठी आता सज्ज आहे.हे असे व्हायचेच आता
मनाची तयारी ठेवावीच लागेल.
  काट्यांशिवाय वाट कसली
  अडथळयांशिवाय यशाची
  चव गोड लागेल कसली.


पहिला लेख दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित झाला.रसिकाचे विचार जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचले.तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण काही माणसे खेकड्याच्या जातीचे असतात पुढे जाणाऱ्या ला मागे खेचणारे. वृत्तपत्रात रसिका चा लेख सासूबाईंनी सकाळीच वाचला होता पण स्वतःच्या तोंडातून कौतुकाचे दोन शब्द तेही स्वतःच्या सुनेसाठी निघतील तर आपला सासू पणा अहं कमी नाही का होणार!याची जाणीव रसिकाला होतीच तिला त्याचे काही वाटले नाही. यापेक्षा आपले विचार कोणी वाचताय याचाच आनंद होता. 

रसिकाच्या शिरोपेचात लेखिका असा मानाचा तुरा रोवला गेला.स्वतःची अशी स्वकर्तृत्ववातुन ओळख मिळाली होती आज तिला जकातदारांची सून,प्रतापरावांची बायको, अथवा मंदरची आई असे न ओळखतात एक प्रगल्भ लेखिका अशी नवीन ओळख मिळाली होती.ती निर्माण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व स्वतःवरील दृढ विश्वासाने तिने स्वतःला सिद्ध केले होते.

पहिल्या लेखाचे मानधन हाती आले तेव्हा रसिकाला मनस्वी आनंद झाला.पैसाच सारे जग आहे असे नाही पण जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा त्यासोबतच पैसा आज-काल मूलभूत गरज झाली आहे.हा विचार करून मी माझी मूलभूत गरज स्वतः आत्मनिर्भर होऊन भागवू शकते याचा अभिमान तिला वाटला....आणि ठरविलेले दुसरे पाऊल उचलण्यास सज्ज झाली......

काय असेल बरे रसिकांचे दुसरे पाऊल?.........
     क्रमशः.......
©®
गायत्री चौधरी
आपल्या प्रतिक्रिया लेखणीत उत्साह भरीत असतात. म्हणून हा भाग आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या.धन्यवाद.


पुन्हा भेटू.