Oct 25, 2020
स्पर्धा

मीच माझी शिल्पकार भाग ३

Read Later
 मीच माझी शिल्पकार भाग ३

मीच माझी शिल्पकार भाग ३
पूर्व भाग 
मैत्रिणीच्या बोलण्यावर करुणा बाईंनी दिलेले उत्तर ऐकून रसिका स्वतःच्याच विचारात गुंग होते ....हीच होती का माझी महत्वाकांक्षा .........

भाग ३
रसिका स्वतःलाच विचारू लागते आज मी जे जगत आहे तेच होते का माझे स्वप्न?विविध कार्यक्रमांचे व्यासपीठ गाजवणारी धडाडीचे रसिका आज घरातल्यांच्या ताटाखालचे मांजर कसे झाले? प्राध्यापकांच्या मित्र-मैत्रिणींच्या नजरेत दिसणारे भावी प्रगतिशील रसिका हीच का ती? घरातल्या बाकीच्यांच्या गोष्टी बाजूला सारून रसिका आज स्वतःवरच चिंतन करू लागली.चिंतन केले की मनातल्या अशांना धुमारे फुटतात आणि स्वतःलाच पडलेले कोडे अलगद सुटत जातात.

मनात काहीतरी करण्याचा विचार जागृत झाला. काहीतरी म्हणजे नेमके काय करावे? हे कळत नव्हते. स्वतःसाठी पण जगायचे एवढा ठाम निश्चय मनाशी झाला. स्वतःहून आपल्या मनाने ठरविले की हेच करायचे आहे तर जगातली कुठलीही गोष्ट, कोणीही ती गोष्ट करण्यापासून आपल्याला रोखू शकत नाही एवढी ताकद ठाम निश्चयात असते.
रसिकाला असे स्वतःमध्येच रमलेले पाहून प्रतापने विचारले"काय झाले आमच्या राणी साहेबांना? आज तर आईच्या मैत्रिणींची गप्पांची मैफिल होती ना घरात?"

"हो होती ना!"
"असे काय बोलताय तुम्ही राणीसाहेब? तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हास कळणार आहे का ?मंदारने आज जास्तच त्रास दिला का? पोरगा आपल्या बापा वरच गेलाय असं म्हणायचंय का आपणास?प्रताप त्याच्या स्वभावाप्रमाणे नेहमीसारखा थट्टेत बोलला"

"इथे तुम्हाला थट्टा सुचते आहे, जळलं मेलं लक्षण माझं, कुठून दुर्बुद्धी सुचली मला आणि जकातदारानच्या घरात येऊन पडले.माझं नशीबच फुटक."

"बापरे एकदम नशिबा वरच घसरलात म्हणजे गंभीर दिसतेय बोला काय म्हणायचे आहे जकातदारांच्या
सुनबाईना....."?

रसिकाने सासूबाई आणि त्यांच्या मैत्रिणीतील संवादाचे इतिवृत्त सांगितले."अहो किती स्वप्नं होती माझी... मला ही माझी स्वतःची अशी ओळख निर्माण करावीशी वाटते.... स्वप्नांना कर्तृत्वाचे पंख लावून यशाची शिखरे गाठावसे वाटते.... छानसा परिवार, समजूतदार नवरा,गोंडस बाळ हे सगळे तर प्रामुख्याने होतंच मनात आणि तेही माझंच आहे पण त्यापलीकडेही माझं स्वतःचं असं काही जग होतं जे मला स्वतःच्या हिमतीवर उभं करायचं होतं पण हे सर्व या जन्मी तरी शक्य नाही असे दिसतेय".

"मग पुढच्या जन्मी तरी कसं शक्य होईल?कारण जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमा पूजन करून आरक्षित करून ठेवलेत तुम्ही मला"मंदार हसतच बोलला.

"तेही खरेच आहे म्हणा.मंदार माझाच काळजाचा तुकडा आहे मी त्याला स्वतःसाठी असं वाऱ्यावर नाही सोडू शकत आणि सासूबाई त्याला व्यवस्थित सांभाळतील असं वाटत नाही कारण त्या नुसत्या स्वयंपाकाच्या वेळी एक दोन तास सांभाळू शकत नाही आणि आज त्या स्पष्टच बोलल्या मंदारला सांभाळत बसले तर अडकून जाईल म्हणून असं जर मी म्हटलं तर त्यांना तुमच्या उतारवयात मीपण तुम्हाला सांभाळणार नाही, तुमचं काहीही करणार नाही तर?"

रसिकाच्या बोलण्याने प्रताप गंभीर झाला कारण रसिका पहिल्यांदा असे काही वेगळे बोलली होती एरवी कितीही त्रास झाला तरी एक शब्दही तोंडातून न काढणारी आपल्या बायकोच्या मनात असे काही येऊ शकते म्हणजे नक्कीच हिने मनावर घेतलेले दिसते आहे.त्याने ही घरा व्यतिरिक्त रसिकाच्या महत्वाकांक्षाचा विचार कधी केलाच नव्हता.त्याचेही मत होते सगळे हाती असताना कशाला तिने बाहेर पडावे.वरवर पाहता आनंदी सुखी आहे असे त्याला वाटत होत.मला वाटले होते  जिथे परिस्थितीतच्या अडचणी असतात तिथेच स्त्रीया नोकरी करतात. आपल्याकडे तर काही कमी नाही. तिच्या मनात दडलेली सल तिच्या तोंडून आज बाहेर पडली म्हणून तिच्या दुसऱ्या अस्तित्वाची जाणीव झाली. पण आपण याबद्दल काहीही करू शकत नाही.

प्रतापच्या नजरेतही हतबलता दिसत होती."हे पहा रसिका अशा निराश होऊ नका,मंदार मोठा झाला की तुम्हाला हवे ते करा."
मंदार मोठा होईपर्यंत फक्त माझी बुद्धी आणि शक्ती शाबूत राहिली पाहिजे हो.तिला क्षणभर वाटून गेले की प्रतापरावांना पण याबद्दल काही वाटत नसावे.कधी ते या विषयावर बोललेच नाही. कधी कुठल्या गोष्टीला प्रोत्साहन ही दिले नाही, मला माझ्याबद्दलचे कौतुक-अभिमान त्यांच्या नजरेत अपेक्षित आहे ते कधी आहे मला दिसलेच नाही.

संवादाच्या विषय बदलावा म्हणून रसिकांसाठी आणले तीन चार पुस्तके प्रतापरावांनी पुढे केली" हे घ्या तुमची खास भेटवस्तू कंपनी साठी लागणारी स्टेशनरी घ्यायला गेलो होतो तर तिथूनच तुमच्यासाठी आवर्जून ही तीन चार पुस्तके आणली आहेत बघा आवडतात का? किती दिवसात वाचुन सपंतील?मुद्दाम हसत विचारले....

पुस्तक पाहून रसिकाला आनंद झाला.अरे वा मस्तच सुधा मूर्ती यांची पुस्तके.... वाचायची कधीचीच इच्छा होतीे हो. एक दोन दिवसात वाचुन सपंतील.हसतच रसिकाने  प्रतापरावांना उत्तर दिले.

एकदा का कुठलं पुस्तक वर्तमानपत्र अथवा वाचनीय असं आहे तिच्या हातात पडले कि ते संपूर्ण वाचून काढल्या शिवाय तिला चैन पडत नसे.तिची वाचानाची गती घोड दौडी सारखीच होती.भराभरा झपाटल्यासारखे एका दमात सगळं वाचून काढायची.सर्व काही विसरून वाचनात रमून जायची.ही तिची एक आवड मात्र प्रतापरावांनी पहिल्यापासून जपली होती. शहरात कुठेही पुस्तकांचे प्रदर्शन भरलेले असले तर आवर्जून तिथे रसिकाला घेऊन जाणे त्यातून आवडलेले पाच सहा पुस्तके तरी घरी येत असत तिला वाचायला मिळावं म्हणून नवनवीन पुस्तकांच्या शोधात प्रतापराव सतत असत.

रसीकाचे कपाट साड्यांनी नाही तर नाना तऱ्हेच्या पुस्तक ग्रंथांनी भरलेले होते. वाचनाची गोडी ती बालपणापासूनच चाखत आली होती .कथेतील पात्रात स्वतःला ठेवून अनुभवून घ्यायची.वाचनात पडणाऱ्या शब्द पावसात स्वतः चिंब भिजून घ्यायची. तर कधी हळवी व्हायची.

प्रतापरावांनी आणलेल्या पुस्तकावरून उत्सुकतेने हात फिरवत असताना.तिला स्वतःमधीलच एका गोष्टीची अनामिक जाणीव झाली. स्वतःमध्ये दडलेल्या त्या गोष्टीने स्वतःचंच असं काही अस्तित्व निर्माण करू शकणार होती. अरेच्या ....जे मी शिधते आहे ते आपल्यातच आहे असं म्हणून ती विचार करू लागली....कस्तुरीमय शहामृगासारखी रसीकाची गत झाली.
कस्तुरीच्या शोधात मी 
वणवण भटकलो.
पण तो काखेतलाच कळसा,
अंतिमतः जाणलो.
-------क्रमशः-------
काय बरं सुचले असावे रसिकाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी?...........
©®
आपल्या परिचयाच्याच
गायत्री चौधरी.
आपल्या प्रतिक्रिया आमच्या लेखणीत उत्साह भरत असतात. कथेचा भाग आवडल्यास प्रतिक्रिया आवर्जून द्या. धन्यवाद.
पुन्हा भेटूच........