A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionde75bec94f7888a4fa70c806fcf0925f1cd60eaf69cd4025948e9e974c7fe5874e59f628): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Mich mazi shilpkar part 2
Oct 21, 2020
स्पर्धा

मीच माझी शिल्पकार भाग २

Read Later
मीच माझी शिल्पकार भाग २

मीच माझी शिल्पकार भाग 2
पूर्व भाग थोडक्यात--
रसिका महेशची एकुलती एक बहीण.शब्दांचा गैरसमज होऊन प्रतापरावांसोबत वाद घालते.उलगडा झाल्यावर गैरसमज दूर होतो.प्रतापराव तिचे होणारे यजमान.रसिका हरहुन्नरी,उत्साही,आत्मसम्मानी एक स्वत्त्व जपणारी...........
भाग २
विवाहाचा दिवस उजाडला प्रतापरावांची आई करुणा बाईंचा स्वभाव जरा चिकित्सक होता.परिस्थिती सर्वसाधारणच पण प्रतिष्ठेचा आव मोठा होता बाईंना. त्यामुळे आधीच रसिकाच्या भावाला आवर्जून सांगितले होते त्यांनी की "मानपान योग्य साजेसा व्हायला हवा एकुलत्या एक मुलाचे लग्न आहे माझ्या" म्हणून महेश ने आपल्यापरीने सर्व तयारी केले होती .

लग्न विधींना सुरुवात झाली, साखरपुड्यात  सासरच्यांकडून गरजेपुरते दागिने आले जास्त काही हौसेने केले आहे असे वाटले नाही.नणंदबाई आणि सोबतच्या बायकांचा योग्य मानपान झाला. हळद लागली. शेवंती पूजनास वऱ्हाडी बायकांना गजरे कमी दिले म्हणून थोडा वाद झाला.थोडया फार कुरबुरीत लग्न लागले.जेवणावळी सुरू झाल्या प्रतापच्या पानास महेशने पाच हजार एक रुपयाचे टेकन लावले....बस एवढेच म्हणून शहाण्या बायकांकडून नाक मुरडले गेले. पानांवर कुरडई-पापडच नाही म्हणून पुन्हा कुरबुर झाली.

शेवटी मुलगी पाठवण्याच्या वेळी रसिकाच्या आई ला करुणा बाईने तोऱ्यात म्हटलं" तुम्ही काही योग्य मनासारखा आमचा  मानपान केला नाही. पण निश्चिन्त असा तुमची मुलगी सून म्हणून नाही तर आमची मुलगी म्हणून घेऊन जातोय आमच्याकडे" 

माप ओलांडून रसिकाचा गृहप्रवेश झाला एक-दोन दिवस देवदर्शन,सत्यनारायण पूजेची लगबगीत गेले. हळूहळू घरातली पाहुणेही आपापल्या घरी परतले आणि खऱ्या अर्थाने रसिका प्रतापचा संसार सुरू झाला.
असेच गप्पा मारीत असताना प्रताप रसिकाला म्हणाला "फिरायला जाणं जमणार नाही, पुढे कधीतरी पाहूया, लग्नासाठी बराच खर्च झाला आहे त्यामुळे जरा…...." पुढचे बोलू न देताच रसिका म्हणाली "ठीक आहे हो मी समजू शकते.फिरायला सम्पूर्णआयुष्य पडलंय."मनातल्या मनात तिला स्वतःचं कौतुक वाटलं दादा जवळ प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट धरून बसणारी मी असही करू शकते. कारण खरे तर तिची मनापासून इच्छा होती की कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात या सुरुवातीचे सहजीवनाचे आनंदाचे क्षण अनुभवावे पण लग्न म्हटले की तडजोड आलीच आणि त्याची सुरुवात झाली होती.दोघं एकमेकांना स्वतःच्या परीने एकमेकांना जपण्याचा प्रयत्न करीत होती.

पाहुणे असेपर्यंत करुणाबाईंनी कुठल्याही कामास रसिकाला हात लावू दिला नाही,जिभेवर साखर आणि डोळ्यातील मायेने सर्व चालू होते पण पाहुणे गेले आणि करुणाबाईंचे बदलते रूप सानिकाला जाणवले.नवीन घरात,नवीन माणसात सामावण्याचा तिचा अटोकाट प्रयत्न चालू झाला.रसिकाला बऱ्यापैकी स्वयंपाक येत होता पण घर बदलले की पद्धती बदलतात हे ती जाणून होती म्हणून आधी सारे समजून घेऊ मग त्यानुसार आपण करू म्हणून करुणाबाईंना ती म्हणायची" तुम्ही करून दाखवा मग मी तसा प्रयत्न करते". करुणाबाई मनात असले तर सांगायच्या अहं डोकावला की म्हणायच्या" शिकवले असेल की आईने तुला?कर तसेच ......चालेल.

आज रविवार असल्याने सगळे सोबतच जेवणाला बसले होते.पहिला घास घेताच करुणा बाई हात झटकत बोलू लागल्या"रसिका हे काय आज भाजीत मीठ टाकले नाही का? किती पाणचट लागतेय? काही चवच नाही या भाजीला! 
"आहो करुणाबाई बिना मिठाची भाजी कशी लागते बरं? आम्हास ठाऊक आहे हं.भाजीत मीठ फक्त थोडं कमी झाले आहे.तसही मिठाचं प्रमाण कमीच असावं .आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते.नाहीतर डॉक्टर सांगतात मग नंतर दिवसभरात फक्त अमुक-अमुक ग्रॅमच मीठ चालेल म्हणून... जकातदार साहेब उद्गारले.

"मला माहित आहे तुम्ही तुमच्या लाडक्या सूनेचीच बाजू घ्याल म्हणजे मी जे म्हणते ते चुकीचे आहे का?"

"तसे नाही हो! बरं का सुनबाई एक आमच्या तरुणपणाची गंमत सांगतो तुम्हास.अशीच एकदा करुणाबाईंना स्वयंपाक घरात एकटेच पाहिलं आणि आम्ही गेलो लुडबूड करायला स्वयंपाकघरात.आमच्या लुडबुडीत करुणाबाई भाजीत मीठ टाकायलाच विसरल्या आणि त्या दिवशी आमचा मित्र जेवणास येणार होता .पहिल्या घासातच कळले भाजीत मीठ नाही पण मित्रासमोर बायकोस कसे सांगावे?तो ही न बोलता आनंदाने जेवत होता मग मी पण शांतपणे घशाखाली उतरत नसताना कसेबसे जेवून घेतले. त्याच्या समोर गेला की मला ते अळणी जेवणचीच आठवण येई .बर्‍याच दिवसांनी मला उलगडा झाला की डॉक्टरांनी माझ्या त्या मित्राला विना मिठाचेच जेवण खायला सांगितले आहे.मग मात्र माझा जीव भांड्यात पडला. 
 जेवणाच्या टेबलावरचे गंभीर वातावरण जरा हास्यमय झाले पण रसिका मात्र करून करुणाबाईंच्या बोलण्याने दुखावली गेली. आपण काहीही कितीही चांगला स्वयंपाक केला तरी सासूबाईंना आवडत का नसावा.घरी येणाऱ्या जाणाऱ्यांना माझ्या हातचे पदार्थ आवडतात यांना का आवडत नसावे. किती मनापासून बनवण्याचा प्रयत्न करतो आपण? त्यांना काहीतरी कमी जाणवतेच आपल्यातच काहीतरी कमतरता असावी बहुतेक म्हणून ती स्वतःलाच कोसत होती.

"झाले का ग रसिका कपडे वाळत घालून?"
"हो झाले मी घरातच येतच होते"
" हे कसे कपडे वाळत घातलेस तू ?बारीक कपडे भिंतीच्या कडेने घालावे आणि त्यापुढच्या बाजूस जाड कपडे टाकले की वाळतात. रसिकाने वाळत घातलेले कपडे काढून करुणाबाईंनी मनाप्रमाणे कपड्यांच्या जागा बदलल्या. 
कुठंही घातले तरी ते वाळणारच ना?सगळ्या कपड्यावर ऊन तर आहेच.रसिकाच्या डोक्यात साधासा विचार येऊन गेला.हं म्हणत रसिकाने कपडे वाळत घालायची त्यांची पद्धत समजून घेतली.

 दुसऱ्या दिवशी करुणाबाईंनी सांगितल्याप्रमाणेच धुतलेले कपडे वाळत घातले तिला वाटले आज सासूबाईंना आवडेलच ...करुणाबाईंचे लक्ष होतेच रसिका घरात गेली पाहून त्यांनी भिंतीच्या कडेने जाड कपडे वाळत घालून जागा बदल केल्या तोच रुमाल वाळत घालायला आलेल्या रसिकाला पाहून म्हणाल्या "अगं भिंतीच्या कडेच्या तारेवरून बारीक कपडे हवेने उडून जातात."आता आपले काय चुकले?रसिकाला समजेनासे झाले. 

असा हा रोजचा क्रम सुरू झाला रसिकाने कपडे वाळत घालावे आणि करुणा बाईंनी जाऊन जागा बदलाव्यात, रसिकाने भांडे घासून धुऊन ठेवलेले भांडेसिंक परत बाहेर काढून रचावे.तिने घातलेल्या कपड्यांच्या घड्या मोडून परत त्यांनी घालाव्यात. रसिकाने घराला झाडू मारत असताना मागे उभे राहून सांगावे इथुन तिथुन घे ,या खालून घे,त्या खालून घे.तरी थोड्याच वेळात स्वतः पुन्हा घराला झाडू मारत बसावे.रसिकाने निवडलेली भाजी पुन्हा निवडावी.कुठे बाहेर जातांना रसिकाने एखादी साडी नेसली तर म्हणावं ती का नाही नेसली? अशा एक ना अनेक गोष्टीत असे होऊ लागले.स्वतःच काम कमी झाले की दुसऱ्याच्या कामात उणिवा दिसू लागतात तसे करुणा बाईंचे झाले होते.

गोष्टी लहान सहानच पण यामुळे पण प्रचंड मानसिक त्रास देणाऱ्या होत्या.काय म्हणावं याला सुशिक्षित घरातला जाणूनबुजून चा सासुरवास की अजून काही?बाहेरून कोणाला वाटणारही नाही की काय चालले आहे इतका सफाईदारपणे केलेलं खच्चीकरण. नेमकं काय साध्य करायचंय?उमगण्या पलीकडेच सारे...नातेवाईकांच्या सुनेच भरभरून कौतुक करणारी,त्यांना समजून घेणारी हीच का ती व्यक्ती?रसिकाला प्रश्न पडायचा.

आता असे काही राहिले नाही अशी समजूत होती रसिकाची कारण तिच्या माहेरी पण सून होतीच की.आईचे आणि वहिनीचे खेळीमेळीचे नाते तिने पाहिलेले होते.

आता मात्र रसिका स्वतःला दोष देत होती की आपल्याला खरंच काही जमत नसेल का?खरेच आपण ही जबाबदरी सांभाळण्यास असमर्थ आहोत वाटते.हळूहळू तिचा आत्मविश्वास डगमगू लागला.कुठे हरवली ती सर्व कामे लिलया हातावेगळी करणारी हरहुन्नरी रसिका?

कोणी नातेवाईक घरी आले की करुणा बाईंनी ठसक्यात सांगावं की "आमच्या सुनेला काम जमत नाही घरातली...
मी शिकवतेय तिला." सासूबाईचे हे उद्गार ऐकल्यावर रसिका मात्र खरंच आपण किती मंद आहोत,आपल्याला मुळी काही जमतच नाही असे म्हणून दिवसेंदिवस नैराश्य तिला घेरत होते. साधे साधे काम करण्यातही तिला आता भीती वाटू लागली.आशा तऱ्हेवाईक वागण्याने तिच्या हृदयाला पीळ पडायचा.काहीना काही कारणाने रोज डोळ्यात अश्रू येऊ लागले.स्वतःच्याच घरात जीव गुदमरू लागला.

प्रतापला तिची तगमग समजत होती पण आईसमोर तो बोलू शकला नाही.मी बोललो तर उगाच वाद होतील या विचाराने तो शांत असे.आई आपल्याला किती जीव लावते मग रसिका च्या बाबतीत असं का वागत असावी?
अशीच दिवसा मागून दिवस रसिकाचे सगळ्यात गुरफटत  पार पडत होते.

 काही दिवसातच रसिकाने गोड बातमी दिली.घरात आनंदी आनंद पसरला.करुणाबाईंच्या वागण्यात थोडासा बदल झाला पण स्वभावाला औषध नसतेच.झोपलेल्या माणसाला जागी करणं सोपे असते पण झोपेचं सोंग करणाऱ्याला उठवणे अवघडच. 
रसिका चे बाळंतपण आपल्याकडेच होणार असा प्रतापने हट्ट धरला.आपले बाळ आहे म्हणून ते आपल्याच घरी जन्माला येईल.करुणा बाईंनी बडबड केली पण प्रताप आपल्या निर्णयावर ठाम होता.रसिकाला गोंडस मुलगा झाला.बाळंतपणानंतर बारा दिवस रसिकाची आई तिच्याजवळ थांबली.बाळाच थाटात बारसे झाले.बाळाच्या आत्याने मंदार असे नाव ठेवले.

रसिकाच्या दादा वहिनीने बाळास त्यांच्या ऐपतीप्रमाणे बाळास पाच ग्रॅमचा दागिना,रसिकाला साडीचोळी,बाकी घरातल्यांना कपडे, दहा किलो शुद्ध खव्याचे पेढे देऊन मानपान केला.पण समाधानी राहतील त्या करुणा बाई कसल्या "आम्ही तर बाई आमच्या नातवाला दोन तोळ्याचे साखळी केली होती.तरी सगळे सोपस्कार खर्च आमच्या मुलानेच केले हो ! प्रतापच्या लग्नाची जरा घाईच झाली त्यावेळीही आम्ही करून घेतले सगळे.तेव्हा आमचा व्यवसाय फारसा चालत नव्हता पण आज काय नाही आमच्याकडे?नाहीतर रग्गड मान-पान देणारी मुलगी मिळाली असती हो प्रतापला!"

करुणा बाईंचे शब्द ऐकून रसिकाच्या दादा वहिनींना वाईट वाटले पण परिस्थितीपुढे काय करणार.... रसिकाच्या डोळ्यात टचकन पाणी आले मनातच म्हटली उगाचच आपणास मातृत्व लाभले.

" रसिका मालिश चे तेल कोमट करून आण ग, मालिश करते माझ्या नातवाची आणि हो लगेच गरम पाणी काढ साबण ,रुमाल न्हाणी घरात नेऊन ठेव .पलंगावर झबले, टोपी,पावडर ,काजळ,दुपटे ठेवून देशील लगेच तयारी करून देते बाळाची.धुनीसाठी गौरी ठेव पेटत ओव्याची धुनी देऊया आज. लगेच बाळघुटी उगाळून ठेव.एकदा दिली बाळाला म्हणजे शांत झोपेल.करुणाबाई बसल्या जागी अशाच रोज सूचना देत असायच्या सर्व वस्तू हातात हव्या असायच्या त्यांना.
स्वयंपाक करता करता आजही रसिका सगळ्या वस्तू हातात पुरवत होती." झाला का डबा तयार? प्रतापने विचारले.
"नाही हो तिकडे बाळाची अंघोळपण चालू आहे, त्यामुळे पोळ्या राहिल्या आहेत.थोडं थांबा लगेचच करून देते." "नको राहू दे मला आधीच खूप उशीर झालाय आज बाहेरच खाईल काहीतरी."
"अरे थांब काय घाई आहे एवढी? तुझे बाबापण आज जेवणाचा डबा न घेताच गेले.रसिकाला पटापट काम जमणार आहेत का कधी?तरी मी सगळं करते हो बाळाचं.त्यातच सगळा वेळ जातो माझा नाहीतर मी करून दिला असता डबा."करुणा बाई स्वतःचीच फुशारकी मारत बोलल्या.
"असू दे ग आई आजचा दिवस मी बाहेरच खाईल म्हटल ना. "असाच काहीसा नेहमीच संवाद घरात होऊ लागला.

 "अहो माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले आहे.जायची खूप इच्छा आहे पण मी गेल्यावर बाळाची आंघोळ,बाकी सारे कोण करेल?"करूणाबाई जकातदार साहेबांना सांगत होत्या. 
"बस एवढंच ना बिनधास्त जा तुम्ही लग्नाला. आम्हाला आमच्या सुनबाईची पूर्ण खात्री आहे करतील त्या सगळे व्यवस्थित. नाही तरी त्याच करत असतात सगळे तुम्ही फक्त बसल्याजागी आदेश सोडतात" नंतरचे वाक्य जकातदार साहेब हळूच बोलले.

करुणाबाई लग्नास गेल्यावर रसिकाने जरा भीत भीतीच मंदारला आंघोळ घातली,छानशी अंगाई गाऊन झोपवलेही आज डबा वेळेवर म्हणजे जरा लवकरच तयार झाला.त्यामुळे तिला थोडा आत्मविश्वास वाटला की आपण बाळाचे सर्व करू शकतो.
करुणा बाई गावाहून परत आल्या तरी रसिका बाळाचे,घरातले कामे सगळे व्यवस्थीत आवरू लागली. करुणा बाईंच्या दुपट्टी बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागली. त्या करीत असलेल्या कामातुन बाजूला होऊ लागली कारण त्यांना आपले काम आवडणार नाही हे ती आता जाणून होती. म्हणून तिने मदत करणे सोडून दिले.

मंदारच्या बाललीलांमध्ये रसिका रमू लागली.हळूहळू मंदार मोठा होऊ लागला थोडा मस्तीखोरच होता त्याला सांभाळून घरातली काम,स्वयंपाक अशी तारेवरची कसरत सुरू झाली.नेमके कामाच्या, स्वयंपाकाचा वेळ कधी फोन, कधी मंदिरात, कधी मैत्रिणींकडे ,कधी भजनी मंडळात, तर कधी नातेवाईकांकडे करुणा बाईंचे दौरे ठरलेले असायचे म्हणून नातवास सांभाळणेही नको आणि घरातली कामे ही नको असा नवीनच दिनक्रम चालू झाला.

मंदार शाळेत जाऊ लागला तसा आजी-आजोबांकडे हट्ट करू लागला मला छान छान गोष्टी सांगा ,माझ्यासोबत खेळा.आजोबांची सोबत मस्त गट्टी जमली पण आजीचा लळा त्यास लागला नाही.रसिका घरातल्याच कर्तव्यात गुरफटून गेली.प्रताप जोमाने कामाला लागला होता. व्यवसायात स्वतःला अखंड बुडवून घेतले होते म्हणून त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागली.

असंच आज करुणाबाईंच्या मैत्रिणी घरी जमल्या होत्या. रसिकाला पाहून एक मैत्रीण सहज म्हणाली,
" नोकरी करते का ग तुझी सून"?चांगली शिकलेली आहे ना म्हणून विचारते ग."
 "नाही ग तीला घरातलीच काम जमत नाही तर बाहेरची काय जमतील ?आणि मलाही बाहेर फिरावेसे वाटतच की मंदारला सांभाळत बसले तर कशी बाहेर पडू शकेल मी? मधून मधून लेकीकडे ही जावे लागते. तिलाही गरज असते माझी. इथेच अडकले तर कशी जाऊ शकेल लेकीकडे ? नाही तरी आता आम्हाला काही पैशांची कमी नाही" करुणाबाईंनी अस्पष्टपणे का होईना रसिकाच्या नोकरीस नकारच दर्शवला.

पण हे बोलणे रसिकास मनात खूप लागले.ती खडबडून जागी झाली खरेच आपली हीच महत्वाकांक्षा होती का...............?यांची कामे नीट व्हावी म्हणून आपण घरालाच वाहून घेतले पण त्याच कोणाला काही नाही....... ती स्वतःशीच संवाद साधू लागली..........
क्रमशः

आपल्या परिचयाच्या 
गायत्री चौधरी.
गाठभेट
सस्नेह वाचक,
तुम्हास काय वाटते रसिका यातून बाहेर पडू शकेल का?काय करावे तिने?आज बहुतांश घरात असेच कितीतरी स्वप्न घराभोवती फिरताना दिसतील...
आजचा भाग आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या.
भेटू पुन्हा....