राज्यस्तरीय करंडक स्पर्धा कविता फेरी
विषय : मीच माझा शिल्पकार
कवितेचे नाव : मी माझा शिल्पकार
संस्काराने झालो समृद्ध मी नित्य
शोधतो माझ्या मनात मी सत्य
गुरुजनांनी दिली शिक्षणाची दिशा
जिद्दीने निर्माण केली जीवनात आशा
शिक्षणाबरोबर शेतीचा लागला लळा
कष्टाच्या सोसल्या निर्धाराने झळा
दुग्दव्यवसायाची सापडली लगेच लय
नियोजनात कधीच केली नाही हयगय
प्रामाणिकपणे केली नोकरीत सेवा
सहकार्य हाच जीवनाचा अमुल्य ठेवा
वाचन आणि लेखन छंद जपले
सकारात्मक विचाराने मन घडले
नेहमीच मदतीचा देतो मी हात
गरीबांना असते कायम साथ
कुटुंबाला मी जीवापाड जपतो
कौटुंबिक आनंंद खूप मिळतो
प्रेरणा देणे हेच माझे जीवनाचे ब्रिद
हीच माझ्या मनाची खरी जिद्द
चांगल्या गुणानी दिला आकार
मी माझा झालो शिल्पकार
नामदेव पाटील ,
जिल्हा - कोल्हापूर