मीच माझा शिल्पकार ...

मीच माझा शिल्पकार
शीर्षक = मीच माझा शिल्पकार
विषय =मीच माझा शिल्पकार
राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी 2

का तू छाटावे पर पुन्हा पुन्हा
मज आयुष्य दिले जर देवाने
मी फुलणार रे पुन्हा पुन्हा
ठरणार मीच माझा शिल्पकार...

इच्छा अंकुरण्याची पुन्हापुन्हा
पानोपानी बहर येईल नव्याने
मी उमलणार रे पुन्हा पुन्हा
ठरणार मीच माझा शिल्पकार...

का वाट पहावी पुन्हा पुन्हा
पक्षी किलबिलती थव्याने
घेऊनी भरारी रे पुन्हा पुन्हा
ठरणार मीच माझा शिल्पकार...

कळ्यांचा ऋतू होई पुन्हा पुन्हा
फुलांवर भुंगे घालती पिंगा
फळं येतील रे पुन्हा पुन्हा
ठरणार मीच माझा शिल्पकार...

निसर्ग चक्र फिरे पुन्हा पुन्हा
का कुणाच्या भरोशावर मी रहावे
इच्छा मज रे फळफळण्याची
ठरणार मीच माझा शिल्पकार...


©®प्रज्ञा फिरके ( Veena )
टीम =अहमदनगर