मीच माझा शिल्पकार

Kavita
विषय..मीच माझा शिल्पकार
शिर्षक - आकार

राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा फेरी - 2


शिल्पकार आहे मीच माझा
देतो जीवनाला आकार
जागतो मी माझा स्वाभिमान
कायम ठेऊनी सदाचार....१

जगतांना दररोज आयुष्यात
वागणूक सदैव माणुसकीची
दिली आयुष्यभर पुरणारी
जन्मदात्यांनी संस्कारांची....२

क्षणभंगूर या दुनियेत
येतात निरनिराळे अनुभव
जगण्याची उमेद देतात
संकटसमयीचे स्वानुभव....३

मोहमायेच्या स्वार्थी जगात
जपतो मी माझा स्वतःला
काळजी घेतो अविरतपणे
जपण्या ऋणानुबंधाला.....४

बघतो आरश्यात प्रतिमा
कळतो स्वतःचा विकास
क्षणिक सुखाचा होतो
प्रत्येक क्षणाला आभास....५

आकार देतो जीवनाला
प्रयत्न कष्ट व मेहनतीने
मीच माझा शिल्पकार
जगतो जीवन अत्यानंदाने....६

©®श्री सुहास मिश्रीकोटकर, संभाजीनगर (औरंगाबाद)