मीच का? भाग 3 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
"प्रिया माझ तुझ्यावर प्रेम आहे. तुला मुल होऊ शकत नाही त्याने काहीही फरक पडत नाही. मुलंच हवं ते आपण अनाथाश्रमातुन सुद्धा घेऊ शकतो. तू तुझा विचार करून सांग. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. "
प्रिया लाजली हा अनुभव तिच्या साठी नवीन होता. कोणाला तरी ती हवीशी होती. नाहीतर तिच्या बद्दल समजल्यावर सगळे फक्त सहानुभूती दाखवत होते. तिच्या मनात विक्रांत विषयी अजून आदर वाढला. हे खर प्रेम आहे. आपला जोडीदार जसा आहे तसा स्विकारायला हवा.
ती आनंदाने घरी आली. आई-बाबांना विक्रांत विषयी सांगितलं. आई-बाबाही खूप आनंदात होते.
त्यांनी दुसऱ्या दिवशी विक्रांतला घरी बोलवल. त्याचे आई बाबा ही आले होते सोबत. त्यांनाही सत्य परिस्थिती सांगितली. त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. आमचा मुलगा लग्नाला तयार झाला हीच मोठी गोष्ट आहे आमच्या साठी.
एक चांगला मुहूर्त लग्नासाठी निश्चित केला.
सुरेख अशा संध्याकाळी अतिशय मंगल वातावरण होतं. प्रियाचे आई बाबा अतिशय आनंदात होते. प्रियाला मैत्रिणींनी तिला घेराव घातला होता. सुरेख अशी मेहंदी तिच्या हातावर काढली जात होती. खूप छान कार्यक्रम सुरू होता.
मेहंदी जेवढी जास्त रंगते तेवढ पतीच प्रेम जास्त असतं. प्रिया तिच्या सुंदर रंगलेल्या हाताकडे बघत होती.
दुसर्या दिवशी हळद लागली.
लग्नाच्या दिवशी. प्रिया खूप छान तयार झाली होती. अंगावर लाल शालू शोभत होता. मुळात खूप सुंदर होती ती. प्रियाची मेहंदी खूप छान रंगली होती. त्यावरून चिडवाचिडवी सुरू होती. मैत्रिणी तिची मजा घेत होत्या. प्रिया खुश होती.
बर्याच लग्नात जेव्हा बाकीचे मैत्रिणींना चिडवायचे तेव्हा तिला त्यांचा हेवा वाटायचा. माझ कधीच लग्न होणार नाही मी कधीच उत्सव मूर्ती नसेल . काय अस. आज तो गोड क्षण तिच्या वाटेल आला होता. ती एन्जॉय करत होती.
विक्रांतच सगळं लक्ष प्रिया कडे होत. प्रियाला ही ते समजलं होतं. तिच्या गालावर गोड लाली पसरली होती.
लग्न लागलं. हातात हात घेवून सप्तपदी झाली. प्रिया विक्रांतच्या साथीने मोहरून गेली होती. तिला खूप चांगल सासर मिळालं होतं . दोघ खूप खुश होते. प्रिया सासरी आली.
आणि ती पहिली रात्र आली. सुरेख अशा अशा सजवलेल्या पलंगावर प्रिया बसली होती. विक्रांत आत आला. तिच्या जवळ बसला. तिचे नाजूक सुंदर हात हातात घेतले. तुझ्या सुंदर हातांवर मेहंदी खूप छान दिसते प्रिया. मी आज तुला वचन देतो या मेहंदी सारखच आपल्या प्रेमाचा रंग हे कधीच कमी होणार नाही. "
" मला इतका आदर प्रेम दिल्या बद्दल खूप थँक्यू विक्रांत. तुम्ही माझ्या साठी काय केल हे मी कधीच विसरणार नाही."
" पुरे आता आज पासून आपण आपल्या सहजीवनाला सुरुवात करत आहोत. असाच वेळ घालवणार का?" त्याने प्रियाला जवळ ओढून घेतल.
ज्या गोष्टी आपल्या कडे आहेत ना त्या वरदान आहेत. त्या आपल्याला नकोश्या होतात. ज्यांच्या कडे नाही त्यांना विचारा त्याची किम्मत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा