मीच का? भाग 2

मीच का माझ्या बाबतीत अस का
मीच का? भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.......

आई बरेच दिवस दुःखात होती. पण बाबांनी तिला समजावलं. "आपली मुलगी छान आणि हुशार आहे. आपण कशाला दुःखात रहा. असेल तिच्या नशिबात ते होईल. ती काही आपल्याला जड नाही. तू काळजी करू नकोस. "

प्रियाला बरोबरीच्या मुलीं सारख नॉर्मल आयुष्य हव होत. त्या मुली एकमेकींशी पाळी दरम्यान होणारे त्रास बद्दल बोलायच्या. त्यात प्रियाला काही समजतच नव्हत की नक्की काय होत असेल. मुली पण म्हणायच्या हिच्या समोर काय बोलताय. तीला काय माहिती या बद्दल. त्या मुलींना पाळीच्या वेळी होणार्‍या त्रासाने नको नको झाल होत. तर प्रियाला वाटायच मला पाळी यायला हवी. होऊ दे किती ही त्रास मी सहन करेन. मला नॉर्मल आयुष्य हव आहे.

बरेच उपाय करून झाले. बाबांना माहिती होत यातून काही होणार नाही. पण आई साठी प्रिया सगळं करत होती. शेवटी आईने नाद सोडला. देवाच्या मनात असेल ते होईल.

प्रिया साठी मधे एक दोन स्थळ आले होते. बाबांनी खर सांगितल. त्यांनी नकार दिला.

हळूहळू सगळीकडे प्रियाची बातमी पसरली. तिला आता स्थळ येण बंद झालं होतं. बरोबरीच्या मैत्रिणींचे एक एक करून लग्न होत होते. त्यांना मूलबाळ पण झाले होते. तिथे प्रियाने जाण बंद करून टाकल. नको उगीच चर्चा.
तिने आता लग्नाची आशा सोडून दिली होती.

तिचे गुण कोणाला दिसत नव्हते फक्त जे नाही त्या बद्दल सगळे बोलत होते.

आता प्रियाने हा विषय डोक्यातून काढून टाकला होता. ती छान शिकली आणि गावातच शाळेत टीचर म्हणून जॉईन झाली. मुळातच हुशार प्रिया एक चांगली टीचर होती. आपल काम ती मनापासून करत होती.

त्याच दरम्यान शाळेत विक्रांतने टीचर म्हणून नोकरी जॉईन केली. रुबाबदार विक्रांत खूपच प्रभावी होता. प्रत्येकाला मदतीला नेहमी पुढे असायचा. त्याचा विषय खूप छान शिकवायचा. शाळेत सगळ्यांशी त्याच छान जमायच.

प्रिया आणि विक्रांतची ओळख वाढली. अतिशय हुशार आणि समजूतदार प्रिया विक्रांतला पसंत पडली. दोघांच एका प्रोजेक्ट वर काम सुरू होत. त्यांचे विचार खूप चांगले जुळत होते. अगदी तासंनतास दोघे एखाद्या विषयावर गप्पा मारत होते. तोडीस तोड होते ते.

एक दिवस स्टाफ रूम मध्ये ऑफ पिरेड मधे प्रिया पेपर चेक करत बसली होती. विक्रांत सरांचा पण पिरेड ऑफ होता. ते आले. प्रिया मला असं वाटत आहे की आपण दोघांनी लग्न कराव.

प्रिया आश्चर्याने बघत होती. तस दोघांचे मन जुळले होते. तिला ही त्याच्या बद्दल मनातून वाटत होत. पण हे शक्य नाही.

"मला तुमच्याशी लग्न करता येणार नाही विक्रांत. "

" का काही प्रॉब्लेम आहे का? मी आवडत नाही का? "

नाही अस नाही. माझा प्रॉब्लेम आहे. प्रियाने सगळं जे खर आहे ते विक्रांतला सांगितलं. तुम्ही दुसर स्थळ बघा.


🎭 Series Post

View all