मीच का? भाग 1
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
कॉलेज सुटल प्रिया घाईने घरी आली. "आई माझा हिरवा ड्रेस कुठे आहे?"
"काय धावपळ असते तुझी प्रिया. कुठे चालली आहेस?"
"आई आज सुरेखाच्या बहिणीची मेहंदी आहे. मी सकाळी सांगितल होत ना. तिकडे आमचा डान्स आहे. उशीर होतो आहे. " एक आठवड्या पासून त्यांची प्रॅक्टिस सुरू होती.
"जेवून घे मग जा." आई ताट करत होती.
प्रियाने भरकन एक पोळी खाल्ली. तो पर्यंत मैत्रिणी आल्या होत्या.
" लवकर ये ग. उशीर झाला तर एकटी येवू नकोस. फोन कर. बाबा येतील घ्यायला. "
पण ती ऐकायला थांबली नाही.
आई घरात आली. प्रियाने केलेला पसारा ती आवरत होती. तिच्या डोळ्यात पाणी होत. प्रियाचे बाबा यायची वेळ झाली होती. त्यांनी चहा ठेवला. ते आले. आतून आवरून आले. "प्रिया कुठे गेली गेली आहे? "
" सुरेखा कडे. तिच्या बहिणीचा मेहेंदीचा कार्यक्रम आहे. " ते पण एकदम शांत झाले होते . आपल्या कडे असा कार्यक्रम कधीच होणार नाही दोघांना माहिती होत.
प्रोग्राम खूप छान झाला प्रिया आणि मैत्रिणींनी खूप एन्जॉय केल. प्रियाने दोघी हातावर मेहेंदी काढली होती . ती वापस आली. आई शेजारी काकूं सोबत बोलत बसलेली होती. प्रिया त्यांच्यात जावून बसली.
"मेहंदी लावलेली तुझे हात किती सुंदर दिसता आहेत प्रिया. अशी सुंदर मेहंदी लवकरच तुझ्या हाताला लागो." काकूंनी तिला भरभरून आशीर्वाद दिले.
तशी प्रिया आईकडे बघायला लागली. आईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. प्रिया उठून आत चालली गेली. कसं होणार आहे माझ्या मुलीचं काय माहिती? आम्ही आई वडील किती दिवस पुरणार आहोत. स्वतः चा संसार हवाच.
त्या रात्री प्रिया आणि आई दोघी नीट झोपल्या नाही.
देवाने का केलं माझ्यासोबत असं. रूप रंग दिला तो काय कामाचा. जर मला जोडीदार मिळणार नाही. ती रडत होती.
प्रिया एकुलती एक होती . तिच्या आई बाबांना लग्ना नंतर दहा वर्षानी झाली. अतिशय गोड सुस्वरूपी मुलगी. खूप लाडात वाढलेली .
बरोबरीच्या मुली सगळ्या मोठ्या झाल्या. त्यांना व्यवस्थित पाळी वगैरे यायला लागली. प्रियाच अजून कशातच काही नव्हतं. आई वाट बघत होती. दहावी झाल्यावर शेवटी दोघी डॉक्टर कडे गेल्या. डॉक्टरांनी चेक केलं आणि सांगितलं की प्रियाला गर्भाशय नाही . त्यामुळे तिला कधीच पाळी येऊ शकत नाही. ती लग्न करू शकते पण आई होवू शकत नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा