मी स्वतः माझ्यासाठी ... भाग 2

मीना कामाला लागली, रमेशचा फोन आला होता, त्याला सांगितलं मी रात्री फोन करते इथे ऑडिटचं काम आहे, आज मी बोलणारच आहे रमेशशी



मी स्वतः माझ्यासाठी ... भाग 2

स्वतः साठी स्टँड घेतला पाहिजे.

©️®️शिल्पा सुतार
..............

गावाकडे छान होतं त्यांचं, छान शांत आयुष्य, मस्त रमेश सोबत रहायच, मला आवडत तिकडे, तर ते सुद्धा मला नोकरी सोडू देत नाही, ते म्हणतात मागे पुढे माझी शहरात बदली झाली तर आपल्या दोघांची नोकरी असेल, दोघांचा हातभार लागेल, लवकरच घर वगैरे घेता येईल ,

त्यांच्यासोबत मी दोन-तीन दिवस असते तिकडे गावाकडे तेव्हा किती छान वाटतं, आम्ही दोघ खुश असतो, सगळं चांगलं आहे तिकडे, काय गरज आहे माझ्या नोकरीची, मी राहील ना त्यांच्याबरोबर , तिकडे करेल काहीतरी,

इथे तसा ही मला खूप कमी पगार आहे, येण्या जाण्यात किती खर्च होतो, पण नाही,.. माझा ऐकायचं नाही त्यांना , उगीच या धावपळीत चांगले दिवस उगीच वाया जाताय एकट राहून, मला आहे का ओढा तिकडे जायचा? यांना नाही का वाटत काही? ,... मीना विचार करत होती,

तेवढ्यात आधीच पूर्ण भरलेली बस आली त्यात कशीतरी मीना चढली, दोन-चार जणांचे हात लागले तिला इकडे तिकडे, खूपच अंगावर शहारा आला.

काय हे अस? , आज बोलणार आहे मी रमेश सोबत, अगदी कंटाळा आला आहे आता सहन होत नाही हा त्रास, लोक मुद्दामून गैरफायदा घेतात, रोजच झाल आहे हे, घरच्यांना रमेशला सांगून सुद्धा उपयोग नाही, त्यांना वाटतं की मी अति करते प्रत्येक गोष्ट, सुभाष चांगला आहे,

कशी तरी ती ऑफिसमध्ये आली, खूपच काम होतं कारण ऑडिट होतं, अगदी दुपारच्या जेवणाला सुद्धा वेळ मिळाला नाही, खूप उशीर झाला , कशीतरी ती आणि तिची मैत्रीण आशा तीन वाजता कॅन्टीन मध्ये गेली,

"खूप थकलो आज",.. मीना

"हो ना माझ तर डोक दुखत आहे कॅल्क्युलेशन करून",.. आशा

डबा उघडून खाणार तेवढ्यात बाजूचा टेबलवरून तीन-चार ऑफिस मधले लोकांचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला, कुठलातरी व्हिडिओ ते मोबाईलवर बघून हसत होते,

" सुरू झालं यांचं, काय लोक आहेत हे , बरोबर यांना कसे आपल्या बायकांचेच विषय मिळतात हसायला आणि जोक करायला आणि रिलॅक्स व्हायला, काही समजत नाही" ,... मीना

"हो ना यांच जेवण झाल असेल तर जाव ना यांनी आत",.. आशा

"ते नको सांगू शक्य तोवर टाइम पास करतात हे",.. मीना

त्यातले एक दोन जण या दोघींकडेच बघत होते,.. "आज उशीर झाला का जेवायला? ",.. मुद्दामूनच बोलण्याचा प्रयत्न करत होते ते,

" हो तुम्हाला माहिती आहे ना आज ऑडिटचे काम सुरू आहे, काम असतात आम्हाला ",.. मीना

" अरे बापरे,.. फूल अॅटिट्युड.. मुलींना कसले आले एवढे कामे? तुम्हाला तर काय बाबा खूप अॅडव्हान्टेज असतात, काहीही कारण सांगून तुमचं काम आमच्या माथी मारतात तुम्ही ",..

" खरं आहे का हे बोलणं? काहीही बोलता का तुम्ही, आम्ही ऑफिसमध्ये काहीच काम करत नाही का? उलट ऑफिस मधले बरेच मुलं पूर्ण वेळ टाईमपास करत राहतात आणि ऑफिसमधल्या मुली खूप सिरीअसली काम करत असतात, हे दिसत नाही का तुम्हाला? वाटेल तेच बोलायचं प्रत्येक वेळी म्हणजे",.. मीना चिडली

" चिल एवढं काय चिडते आहेस ग मी असंच गमतीने म्हटलं, चहा द्या यांना काका ",.. बाकीचे मुल अजून हसत होते.

खूपच राग आला होता मीनाला आणि आशाला सदोदीत आपल्याला कमी समजायचं म्हणजे काय, काहीच काम करत नाही हे मुल, खरं बघितलं तर ऑफिसमधलं साठ ते सत्तर टक्के काम फक्त बायकाच करतात, हे पुरुष आता एक दीड तास झाले लंच टाईम सुरू आहे तरी त्यांना आत जायची इच्छा होत नाही, बॉसने रागावले तरी त्याचे बोलणे ऐकून घेतात, अगदीच कोडगे झाले आहेत हे लोक, आणि सदोदित आपल्यालाच बोलायला मोकळे.

मीना कामाला लागली, रमेशचा फोन आला होता, त्याला सांगितलं मी रात्री फोन करते इथे ऑडिटचं काम आहे, आज मी बोलणारच आहे रमेशशी की मी इथे नोकरी करणार नाही मला तिकडे तुमच्याकडे यायचं आहे, आता मीनाला बर वाटत होत

चार वाजता आतून बोलवण आलं, ती फाईल घेऊन आत मध्ये गेली

"झालं का तुम्हाला दिलं होतं ते काम? मागच्यावेळी फाईल मध्ये दोन-तीन चुका होत्या",.. बॉस

"हो सर पण ते ग्रुप मध्ये केलेलं काम होतं, माझं काम शक्यतो परफेक्ट असत",.. मीना

" हो माहिती आहे म्हणूनच तुम्हाला दिलं आहे हे काम, ही फाईल ऑडिटर कडे नेऊन द्या" ... बॉस

मीना फाईल घेऊन आत मध्ये गेली, तीन-चार लोकं बसलेले होते, ते तिच्याकडेच बघत होते, बरीच माहिती विचारली त्यांनी मीना बद्दल , कसंतरी काम संपवून ती बाहेर आली, बरं झालं आपले बॉस तरी चांगले आहेत, तसेही सगळेच लोक खराब नसतात,

आज हे ऑडिटचे लोक चालले गेले तर उद्यापासून बरं वाटेल जरा ऑफिस मधे.

🎭 Series Post

View all