मी सक्षम आहे

Love and give chance to Your Hidden power

हेमा रात्रीची कामं आवरत होती, उद्या डब्यासाठी भाजी निवडत होती. तितक्यात, हेमाला तिच्या मैत्रीण सुजाताचा  फोन आला ,अग उद्या येते आहे ना तू?चार वाजता मुलांचे शाळेत कार्यक्रम आहेत ..तुझ्या समीरने पण भाग घेतलाय...हेमाला अजिबात कल्पना न्हवती की समीरने भाग घेतला आहे हे तिला माहीतच न्हवत, तरी पण ती सुजाताला बोलली हो हो येते ना.
तेवढ्यात समीर आला ,तिने त्याला विचारले ,समीर उद्या शाळेत कार्यक्रम आहे ,तू मला सांगितले नाही. आईच्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कचरत होता तो. नाराजीच्या सुरात बोलला हो आई  उद्या ना शाळेत गॅदरिंग आहे ,परेन्टसला पण बोलावले आहे. कॅम्पलसरी,मी बाबांना घेऊन जाईल तू नको येऊ.मी टीचरला संगीतले आहे की तुझी तब्येत बरी नाही.

हे ऐकून हेमाला खरच वाईट वाटले,

मी नको येऊ ,पण का

नको येऊ आई .तुला बघून माझे फ्रेंड्स मला चिडवतात. बोलतात तुझी मम्मा किती भेनजी आहे,कधीच वेस्टर्न कपडे घालत नाही..तुला तर इंग्लिश बोलायला पण नाही येत.. माझ्या फ्रेंड्सचे परेन्ट्स किती फाडफाड इंग्लिश बोलतात आणि तुला एक साधे वाक्य पण नाही येत बोलायला मग मला सगळे चिडवतात.आई तू का नाही त्यांच्यासारखी .  मी उद्या पप्पाला घेऊन जाणार आहे .हे बोलून समीर निघून गेला.

हेमाला कल्पना न्हवती की आपल्या मुलाला आपली एवढी लाज वाटते.तिच्या मनाला लागले मुलाचे शब्द.तिला आधीचे दिवस आठवले .शाळा ,कॉलेज मध्ये  किती ऍक्टिव्ह होती ..खेळामध्ये,नृत्यामध्ये,वक्तृत्व.. किती तरी मेडल मिळवले होते,कॉलेजमध्ये तर ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जायची..वेगळीच छबी होती तिची ,तिने आरशात स्वतःला न्याहाळले  खरच ती स्वतः बरोबर बोलू लागली..

तिच्यातली हरवलेली जुनी हेमा जणू काही संवाद साधत होती तिच्याशी.काय हेमू ,स्वतःची अवस्था करून घेतली आहे, काय होती तू एकेकाळी ..आणि आज  किती गुंतवून घेतलय स्वतःला ,सून, पत्नी आणि बायकोचे कर्तव्य निभावताना कुठे तरी स्वतःची स्वतंत्र ओळख असलेल्या हेमु वर अन्याय केला,सर्वच स्वतःहुन ओढवून घेतलं की अंगावर, २४ तासात तुझ्यासाठी एक तास तरी आहे का?सकाळी लवकर उठतेस, डबा, नाष्टा, साफसफाई, मुलाचा अभ्यास, सासू सासाऱ्यांपाठी धावपळ.. आल्या गेल्याचा पाहुणचार ,सण,समारंभ ..किती मान मोडून घेतली आहेस.. कुठे हरवली तुझ्यातली ती हेमा जिच्यात आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.. कुठे हरवली संसारात??कुठे आहे ती हेमा जी सर्वच बाबतीत सक्षम होती?

आता मात्र हेमाच्या अंगात वेगळीच ऊर्जा आली, तो क्षण तिला काही तरी मार्ग देऊन गेला. मनाशीच काही तरी ठरवून झोपली.. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून जिमला गेली.. भांडी ,लादी साठी तिने कामवाली लावली. सकाळी तिने सर्वांनाच सांगून ठेवले, उद्यापासून सर्वांनी एकाच वेळेला जेवायला,नाश्त्याला बसायचे..खरं तर ह्यामुळे तिचा वेळ वाचनार होता, कारण जो तो स्वतःच्या वेळेला उठायचा आणि मग हिला पुढच्या कामाला उशीर व्हायचा.. तिने समीरला आणि तिच्या नवरा अमितला घरातली कामे वाटून दिली जसे मशीनला कपडे लावणे, पसारा आवरणे ,भांडी रॅक मध्ये लावणे, आता मात्र समीर, अमित आणि सासू सासरे आश्चर्य चकित झाले ,एवढ्या दिवस स्वतः जबाबदारी घेत होती आणि आता असं अचानक,खरं तर हेमाच्या या one man army सारख्या स्वभावामुळे घरातले सगळे आळशी बनले होते , सासूला सुद्धा तिने भाजी निवडायचे काम दिले,सासार्यांला घरातली समान आणायचे काम दिले, तेवढेच त्यांचे चालने व्ह्ययचे.सुरवतील सगळे टंगळ मंगळ करत होते पण नंतर  सर्वांना सवय लागली .तिने स्पष्ट सांगितले सर्वांनी मला घरातल्या कामात थोडा हातभात लावा,आता थोडा मला माझ्यासाठीही वेळ हवा..तिने इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला,इंग्लिश समजायचे  तिला पण बोलताना तिला फार भीती वाटायची . तिला नृत्यात आवड होती म्हणून तिने क्लास लावला.कमालीचा बदल झाला होता तिच्यात .तिच्यात झालेला बदल पाहून सर्वांनाच बरे वाटत होते, खास करून तिच्या नवऱ्याला ,कारण किती  वेळा तो सांगायचा तिला लक्ष दे स्वतःकडेही,वेळ दे स्वतःला पण हेमुने स्वतःला घरातल्या कामात गुंतवून घेतले होते की ,ती तिला वेळच न्हवती देत.. तिला महत्वाचे न्हवते वाटत..पण आता मात्र एक वेगळीच ठिणगी पडली होती मनावर.. त्याठिणगीने खूप मोठा बदल केला होता तिच्या विचारावर आणि वागण्यावर.
वर्षभरात तिच्यात खूप बदल झाला होता. तिच्या चेऱ्यावर तेज आले होते ,पुरेशी झोप,सकस आहार, मेडिटेशन, योगा ह्या गोष्टींचे पालन तीने  मनापासुन केले होते .शरीराचा आकार आता पूर्ववत झाला होता मग आता ती वेस्टर्न कपडे सुद्धा बिंदास घालत होती,काय कमालीचा बदल झाला होता तिच्यात एक वर्षात,ओळखुच न्हवती येत ती..खरंच जे काही झाले होते ते तिने केलेल्या मेहनतीचे फळ होते,आणि स्वतःसाठी वेळ दिला होता तिने हेच मुख्य कारण होते तिच्या यशापाठी.
एक दिवस तीच्या मेहनतील पोचपावती भेटली होती, एका dance च्या शो  मध्ये ती पहिल्या क्रमांकाने जिंकली होती.अगदी टेलिव्हिजणमध्ये झळकली. तिचे वृत्तपत्रात नाव झळकले.. खरच हेमाला जे काही मिळाले होते ते फक्त आणि फक्त तिच्यातल्या विश्वासाने.. आणि मुख्य तिने स्वतःला वेळ दिला...
तिच्या या यशामुळे समीरच्या शाळेत समीरची कॉलर टाइट झाली होती.. आणि तिच्या नावऱ्याचेही ऑफिसमधले फ्रेंड्स कौतुक करत होते. सासू सासरे ही फार खुश झाले सुनेवर, जिथे जिथे ते जायचे फक्त हेमाचे कौतुक. अजून काय  हवे होते हेमाला..
समीरचे वार्षिक स्नेहसंमेलन होते, ह्यावेळी मात्र समीरने आईला आवर्जुन नेहले होते,कारण त्यांच्या मित्रांना भेटायचे होते तिला. समीर,हेमाबरोबर बसला होता,सर्वच तिची स्वाक्षरी घेत होते,तिच्यासोबत सेल्फी काढत होते, समीरला फार कौतुक वाटत होते आईचे... अभिमान वाटत होता आज त्याला त्याच्या आईवर.
प्रोग्राम सुरू झाला  अचानक आनाउन्समेंट झाली, आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत हेमा पाटील,आम्ही विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावे आणि स्वतःच्या हाताने विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावे.. हे ऐकताच समीरचे डोळे चमकले, त्याची आई आज प्रमुख पाहुनी म्हणून आली होती त्याच्या शाळेत हे त्यालाच न्हवते माहीत, त्याने आईला घट्ट मिठी मारली.
हेमाला मुख्याध्यापिकांनी दोन शब्द बोलायला सांगितले,हेमाने माईक हातात घेतला आणि बोलली,प्रत्येक व्यक्ती सक्षम असते, फक्त तिने स्वतःला वेळ दिला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. आणि मी ही तेच केले,संसारात पडल्यावर स्वतःला विसरले पण माझ्या मुलाने समीरने मला जाणीव करून दिली की मी कुठे तरी कमी पडतेय, तेव्हा मी ठरवलं आता स्वतःसाठी ही जगायचे. स्वतः मधली कला जोपासायची, स्वतःला परिपूर्ण बनवायचे. माझी स्वतंत्र ओळख बनवायची. आणि आज मी बनवली खूप छान वाटतंय मला आज कारण माझ्या परिवाराला माझ्या वर अभिमान आहे,धन्यवाद.

सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला...संमेलन संपले..हेमु समीरला थँक्स बोलली,कदाचित त्यादिवशी ,समीरने जाणीव नसती करून दिली की ती कुठे तरी मागे पडतेय..तर कदाचित हे यश ती पाहू शकली नसती...

आवडली का हेमाची कथा, असेच होते ना अनेक सखीच्या आयुष्यात ,एकदा संसारात पडल्यावर स्वतःला विसरून जातात ,स्वतःला काय आवडते, स्वतःचे छंद ,कला सर्वच विसरतात फक्त आणि फक्त परिवरसाठीच जगतात, तिने स्वतःला सुद्धा जपलं पाहिजे, स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे ,स्वतःचा आनंद तिने शोधला पाहिजे, फक्त आणि फक्त एकदा स्वतःला वेळ द्या ,नक्कीच यश तुम्हाला भेटेल.. कारण प्रत्येक स्त्री सक्षम असते फक्त तिच्या शक्तीची जाणीव तिला झाली पाहिजे.

अश्विनी पाखरे ओगले✍️
❤️मनातलं मनापासून❤️
लेख आवडल्यास like ,comment आणि नावसाहितच share करा.मला नक्की फॉलो करा.