या मानसिकतेचा पराभव करणार

Mi Prabhv Krnaar
मी पराभव करणार
मी पराभव करणार

कोणी सहज म्हणाले तिला
अग हा तुझा प्रांतच नाही
इथे तुला काहीच जमणार नाही
तू नको ह्या खेळात पडू
तू नको ह्या खेळाचा खेळ करू
तुला जमणार नाही हे पक्के
तू लांबून बघ अग सखे
तू स्त्री आहेस तू जिद्द सोड
राणी तू हे मैदान सोड

तिने काय करायचे हे त्यांनी ठरवले
तिची मर्यादा काय हे तिला सांगितले
तिच्या कुवतीची उडवली खिल्ली
तिला सांगितले तू नाही इथली
तुला जमेल फक्त पोळी भाकरी
तू फक्त शोभेची भाऊली
घरात सुंदर दिसते रमलेली

तिने ही ठरवले पराभव तर पराभव
पण मी जिद्द नाही माझी सोडणार
मी माझ्यासाठी नाही लढणार
मी त्यांच्या प्रभावसाठी ह्या मैदानात उतरणार
मी ह्या मानसिकतेचा पराभव करणार


©®अनुराधा आंधळे पालवे