मी मानिनी ! मी मर्दिनी ! भाग 9

सुंदराच्या रूपाने त्या काळातील महाराष्ट्राने भोगलेले दुःखच व्यक्त होतंय



(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

मागील भागात आपण पाहिले की अखेर खविसखानाने सुंदराला गाठलं. आता समोर जाऊन सामना करणे एवढा एकच पर्याय होता. पण या संघर्षात आपल्या जिवाभावाच्या माणसांची दैना होऊ नये यासाठी सुंदराचा जीव जळत होता. सुंदराने मनाशी काहीतरी निश्चय केला. काय ठरवले होते सुंदराने पाहूया आजच्या भागात.


सुंदरा महिपतिमामाकडे गेली,
" मामा मला थोडं बोलायचं होत." "पोरी गनीम डोक्यावर आहे,काय बोलायचं आता."मामा हताश स्वरात म्हणाले.


सुंदरा निर्धाराने म्हणाली,"मामा तुम्ही या सगळ्यांना घेऊन निघून जा,मी खानाला सामोरी जाते."


हे ऐकताच तारा आणि सुनंदा बोलल्या,"आक्के,पळून जायचं असत तर इथवर आलो नसतो,आता जे काय व्हईल ते तुझ्यासंग."

मामा तर तलवार परजत होते,"पोरी हैबतीला दिलेलं वचन मोडू? मग जगून काय करणार मी?"


हैबतीची बाकीची माणसं सुद्धा ऐकत नव्हती. सुंदरा परत शांतपणे म्हणाली,"मामा,मी हा नरक भोगलाय, हैबती पाटील आयुष्यात आले आणि सुख आलं. नशिबात एवढंच होत. या पोरींना घेऊन जा मामा."


हे ऐकून तारा म्हणाली,"आक्का अस समज की तू आम्हाला वाचवलंच नाहीस,तेव्हा काय झालं असत? आता आम्ही लढून मरू."

सुंदरा समजावून थकली. मात्र सगळ्यांनी तिला साथ देणार अस ठामपणे सांगितल्यावर सगळे तयार झाले. ठिकठिकाणी झाडावर गलोली घेऊन काहीजण लपले. काहीजण झाडात लपून राहिले.


खविसखान जवळ आला. डोंगरावर असलेलं भैरोबच देऊळ आणि भोवतीच्या दाट झाडीला पाहून तो संतापला,"ये कैसा मुलुख है। चारो तरफ पहाड और पेड।"जितने के लिए सबसे मुश्किल। पर यहा के लोग इस दौलती जैसे लालची और आपसी झगडेमे उलझे है।"



खानाने डोंगराला वेढा दिला आणि एक तुकडी घेऊन तो वर निघाला. थोडं अंतर गेला असेल एवढ्यात चारी बाजूनी दगड बरसू लागले. सैनिकांची डोकी फुटू लागली. त्यात झाडी एवढी दाट की समोरच काही दिसत नव्हतं. एका ठिकाणी लावलेल्या फासात खानाचा घोडा अडकला आणि खान खाली पडला.


आता तर तो प्रचंड संतापला. अर्धा डोंगर चढून येईपर्यंत दिवस मावळतीला आला. दौलती जवळ आला,"हुजूर रात झाली. आता आपण पुढं जाऊ नये. यहा जानवर भी है।"खानाने विचार केला आणि तो मागे तळावर परतला.



खान खाली तळावर आला. सरळ जनान्यात घुसला.काल जत्रेत पकडलेल्या पोरींना मरेस्तोवर मारलं. त्यांना विवस्त्र बाहेर आणलं.



जोरात हसत म्हणाला,"मजे करो। जो भी हमारे खिलाफ जायेगा ईससे बरा हाल होगा।"


त्या पोरींचे हाल पाहुनसुद्धा मुर्दाड माणस गप्प होती आणि रडत होता सह्याद्री.


सुंदरा परत तारा आणि सुनंदाकडे आली,"तारा,सुनंदा माझं ऐका, तुम्ही इथून जा. माझ्या महादेवाला आई नाही किमान मावश्या असू द्या. मी हा नरक पाहिलाय पोरींनो. तुम्हाला माझी आणि छोट्या महादेवाची शपथ आहे."


महिपतिमामा सगळं ऐकत होते. पुढे येऊन ते म्हणाले,"पोरींनो तीच ऐका, वेडेपणा करू नका."


महादेवाची शपथ घातल्याने तारा आणि सुनंदा जायला तयार झाल्या. विश्वासू दोन शिपाई घेऊन त्यांना मामांनी निरोप दिला.

इकडे दौलतीने खानाला भडकवलं,"खानसाहेब त्या सुंदराला तिच्या गावी नेऊन धिंड काढा चांगली. म्हणजे दुसरं कोणी परत अस करणार नाय."



परक्याचं जाऊ द्या पण आपलीच लोक अशी लालचेने लाचार होत होती. खविसखान चांगला संतापला होता. सकाळ होताच हल्ला करायचा आणि सुंदराला बंदी बनवायचं. इकडे मामांचा निरोप घेऊन स्वार हैबतीपर्यंत पोहोचला. मामांनी पत्रात सगळं लिहिलं होतं. सुंदरा धोक्यात आहे.


हैबतीने सगळे विश्वासू दोस्त बोलावले,"गडयानो गाव आणि माझी सुंदरा दोन्हीनी धोक्यात आहे. सगळं संपायच्या आत पोचायला हवं."


सर्वांनी ठरवलं रात्रीतून तळ सोडायचा आणि गावाकडं कूच करायचं.

सकाळ होताच खानाने हुकूम दिला,"चलो आज ये किस्सा खतम करते है।"


सैन्य डोंगरावर चढू लागलं. आता आरपार लढ्याला सुरुवात झाली. मामांनी पेरलेले स्वार ठिकठिकाणी हल्ला करत होते. डोकी फुटत होती. सैनिक कोसळत होते. तरीसुद्धा खान न थांबता पुढे चालत होता. थोड्याच वेळात खानाने देवळभोवती वेढा टाकला.


खान ओरडून म्हणाला,"सुंदराला आमच्या हवाली करा,फिर बाकी सब जा सकते है।"


हे ऐकताच मामांनी उत्तर दिलं,"पोटच्या पोरीवानी हाय मला सुंदरा. मी जित्ता हाये अजून."


तेव्हा दौलती हसत म्हणाला,"मामा आवो तमाशात नाचलीय ती,आता बी तेच करील. कशाला तिच्यापायी जीव देताय."


मामा चिडून म्हणाले,"पोरीबाळी ईकायला तुझ्यासारखा दलाल न्हाई मी. येळ पडली तर स्वतःच्या आई बहिणीला विकशील तू."


हे ऐकताच दौलती चिडला,"म्हाताऱ्या आता भोग आपल्या कर्माची फळ."

चकमक सुरू झाली. या वयातसुद्धा मामा भारी पडत होते. सुंदरा स्वतः वाघिणीसारखी लढत होती. चारही बाजूने गनीम असूनही ही जीवाला जीव देणारी माणसं लढत होती.


स्वाभिमानाच्या ह्या ठिणग्या महाराष्ट्रभूमीत अजूनही ठिकठिकाणी उडत होत्या. जवळपास दोन तास लढाई चालूनही सुंदरा हाती येत नव्हती. दिवस कलायला लागला होता. अंधार पडू लागतात खानाने इशारा केला. चारही बाजुंनी सैन्य धावले. दौलतीने सुंदरावर वार करताच दांडपट्टा फिरला आणि दुसऱ्या हातातील बिचव्याने डोळा उडाला.



सुंदरा त्याच्या तोंडावर थुंकत म्हणाली,"याच डोळ्यांनी घाणेरडी नजर ठेवली माझ्यावर."


शेवटी माणूसबळ जिंकलं आणि आणखी एक वाघीण कैद झाली.


खविसखान पुढं झाला,"सालीको यही ..."


तेवढ्यात रक्त हाताने दाबत दौलती उठला,"सरकार इसे गाव लेकर चलो,सबको सबक सीखाओ। आणि तीच लेकरू पण ठेचा."


ते ऐकताच सुंदरा चवताळून उठली पण नाईलाज होता. खानाने हुकूम दिला,"चलो! इनको लेकर।"

इकडे हैबती आणि त्याचे स्वार अखंड दौड करत होते.काहीही झालं तरी माणसं वाचली पाहिजे. खान सुंदराला आणि सर्वांना बंदी बनवून निघाला. जत्रेत पकडलेल्या तीन पोरी हालहाल होऊन मेल्या. खानाने त्यांचे देह तसेच उघड्यावर टाकले,कोल्ह्या कुत्र्यांना खायला.


ते पाहून सुंदरा कळवळून म्हणाली,"महादेवा!धाव !अजून किती अंत पाहणार आहेस.संपव या राक्षसांना."


वाटेत येणारी गावे लुटत खान पुढे जात होता. त्या दिवशी संध्याकाळी खानाने तळ दिला.


दौलतीला बोलावलं,"कल आपण पोहोचू,काय करायचं इसके साथ."


दौलतीने क्रूर हास्य केलं,"सरकार पुरे गाव के सामने लुटो इसे,आणि त्या म्हाताऱ्याच मुंडक कापून वेशीवर लावू.फिर इसको बेच दो या मार डालो।"



ही सैतानी योजना ऐकून भूमीसुद्धा शहारली. सुंदरा विचार करत होती ही रात्र संपल्यावर आपले भविष्य काय? आपल्या बाळाचं काय होईल? विचारांच्या ग्लानीत तिला कधी झोप लागली समजलेच नाही.


दुसऱ्या दिवशी खविसखान पुढे निघाला. इकडे गावात तारा व सुनंदा पोहोचल्या होत्या. त्यांनी तडक पाटील वाडा गाठला.


हैबतीच्या म्हाताऱ्या आई वडिलांना आणि तान्ह्या महादेवाला घेऊन त्या गावातून बाहेर पडल्या.खविसखान गावाच्या वेशीवर आला. त्याने गावाला चारही बाजुंनी घेरलं.


महिपतिमामाला खानाने पुढे बोलावलं,"देख अभिभी एक संधी देतो. इसका बच्चा लाकर दे।"


तसा महिपतिमामा चवताळला,"शैताना!आरे जीव गेला तरी हे काम करायचो न्हाई मी."


खान माग फिरला,"हाबशाना सांगितलं जावं सबको गिरफतार कर के यहा लेकर आव।"


हबशी गावात घुसले,घराघरांत शिरून बायका ,पोर,म्हातारे,तरुण सगळ्यांना पकडून आणू लागले. दौलतीला आता मात्र भीती वाटू लागली.

बघता बघता सगळं गाव रिकामं झालं. तरीही हैबतीच बाळ आणि आईबाप सापडले नाहीत. गावातल्या बायांना पुढं उभं करून एकेकीला विवस्त्र करत होते.


एवढ्यात दौलती ओरडला,"खानसाब!ये काय करताय,आवो ही माझी बहिण आहे,पोटुशी हाये."


खान माग फिरला त्यानं इशारा करताक्षणी दौलती कैद झाला,"इतनी हसीन चिज छुपा रहे थे। इसे ले जावं अंदर।"


दौलतीने उसळून तलवारीला हात घातला पण....काही कळायच्या आत हात छाटला गेला. महिपतिमामा समोर खान उभा राहिला. इस बुढे को मार डालो और सर काटके लटका दो। हुकूम व्हायचा अवकाश मामांच्या देहाचे तुकडे झाले.


सुंदराचा विलाप पाहून धरती थरारली. आता खान सुंदराकडे वळला.


दौलतीकडे पहात म्हणाला,"अब इसे यही पे नंगा करता हु।" खानाने तिथेच सुंदराला चोळामोळा केलं.

खान मागे वळला,"इन सबको कैद करो,मजे करो। जो पसंद हो रखलो बाकी भेच दो!"


खान आख्ख्या गावाचा विध्वंस करून निघून गेला.मागे उरली म्हातारी आणि पळून गेल्या त्या वाचलेल्या बायका. मामांचं कलेवर वेशीवर टांगल होत. दौलती हात कापलेल्या अवस्थेत कुत्र्यासारखा पडून होता.


तेवढ्यात दौलतीच्या अंगावर कोणीतरी पाणी ओतलं.वाचवा!!!तो ओरडत जागा झाला. समोर पहातच राहिला.

कोण असेल समोर? सुंदराचे पुढे काय होईल?

क्रमशः

🎭 Series Post

View all