"दादाsssss... वहिनी दर्जा आहे हा पण! एक नंबर चॉईस...", असे मोठ्याने ओरडुन पळून गेली.
"सईssssss...", चिन्मय ओरडुन उठला पण तोपर्यंत ती पसार झाली होती.
"काहीही बोलत असते वेडी… उगाच आपलं काहीतरी…"
संध्याकाळी आवरून सई घरी निघून गेली, तर चिन्मय केक आणायला निघाला.
"काय करू… विचारू का सईला नाव… पण नको, उगाच ती चिडवत बसेल… जाऊया नेहमीच्याच बेकरीत… पण आईने सांगितलं तिला सॉरी म्हण… खरंच सकाळी जरा जास्तच बोललो वाटतं मी… मंजिरी…", गाडी थांबवून सिग्नलला उभा असलेला चिन्मय बाजूच्या गाडीच्या हॉर्नने भानावर आला.
त्याने पुढे जाऊन गाडी थांबवली आणि सईला कॉल केला.
"हॅलो…हा दादा बोल, काय झालं…", सईने गाडी थांबवून कॉल उचलला.
"अगं ते हे आपलं… ते आपलं नेहमीच केक शॉप आहे ना ते जरा बंद आहे… तर मला एखाद्या बेकरीचा ॲड्रेस देते का…"
"बेकारीचा ॲड्रेस होय… गुगल मॅप वर बघ की… आणि असं कसं केक शॉप बंद झालं रे अचानक…"
" आता मला का माहित असेल आणि गुगल मॅप वर बघायला नेट नाहीये माझ्याकडे…"
"अच्छा असं होय… ठीके… कुठे आहेस तू…"
"गवळी रोड…"
"बरं तिथून पुढे गेलास ना उजवा टर्न घे… 'निमो केक शॉप' म्हणून माझ्या मित्राचं केक शॉप आहे… तिथे जा, उघडं असेल ते…"
"कोणता मित्र आहे हा तुझा… मला कसं माहित नाही…"
"दादा ते महत्त्वाचं आहे का आता… की तुला गप्पा माराच्यात का माझ्याशी… की अजुन काही वेगळी माहिती हवी आहे..?", सईला समजत होतं की त्याला मंजिरीच्या बेकारीचा ॲड्रेस हवा आहे… पण समोरचा जर सरळ सरळ मागत नाहीये, तर आपण तरी कशाला सांगा ना… आणि ती तर सई आहे… अवखळ!
"हे बघ… मला नाही जायचं त्या निमो का फिमो मध्ये…. तू बसं सांग मला…"
"अरे सांगितलं की… आता अजून काय वेगळं सांगू दादा… डोकं खाऊ नकोस बरं… नीट विचार जे विचारायच आहे ते!"
"ते हे आपलं… मगाशी म्हणत होतीस ना कोणाचीतरी बेकरी आहे वैगेरे…"
"कोणाचीतरी…?"
"हा म्हणजे ते सकाळी ती आलेली मंजिरी तिची… असं काहीतरी सांगत होतीस ना मला…"
"अच्छा ती होय… सरळ विचारायच ना मग तस्… उगाच कशाला वाईमार्गे सातारा करतोयस… आणि मी मगाशी सांगत होते तर मला मारायला उठलास ना… जा आता नसते सांगत मी…", सई त्याची मज्जा घेत म्हणाली.
"तुझ्याशी ना बोलणंच चुकीचं आहे… नाव सांगायला काय घेणार…"
"आता कसं… बरोबर मुद्याचं बोललास… हा तर नाव पाहिजे असेल, तर मला ट्रेकला जायची परमिशन हवी आहे… बोल देणार?"
"आजिबात नाही…!"
"ठीके मग नाव पण विसर बेकरीच.."
"किती हट्टी आहेस ग… सांगितलेलं ऐक ना…"
"तुझीच बहीण आहे दादा…"
"तुला तर ना.. घरी भेट मग सांगतो… आता पटकन नाव सांग चाल… १५ मिनिट खाल्ली माझी एक नाव सांगायला…"
"अनघा बेकारी… पुढून लेफ्टला वळलास की पहिलीच आहे बघ…", चिन्मय हलका चिडला तसं सईने पटकन सांगून टाकले.
"गुड… चल येतो केक घेऊन… बाय!"
"बाय… वेडा!"
चिन्मय बोर्ड बघुन आत आला. छोटीशी पण छान अशी ती बेकरी होती. मंजिरीने नुकताच रेडिओ लावला होता आणि गुणगुणत ती फोन घेऊन काऊंटर वर बसली होती. आजच्या दिवसातल्या सर्व ऑर्डर देऊन झाल्या होत्या.
ये क्या बात है आज की चाँदनी में…
के हम खो गए प्यार की रागिनी में….
ये बाहों में बाहें…
ये बहकी निगाहें…
लो आने लगा ज़िन्दगी का मज़ा…
ये रातें ये मौसम…
नदी का किनारा…
ये चंचल हवा…!
के हम खो गए प्यार की रागिनी में….
ये बाहों में बाहें…
ये बहकी निगाहें…
लो आने लगा ज़िन्दगी का मज़ा…
ये रातें ये मौसम…
नदी का किनारा…
ये चंचल हवा…!
चिन्मय हलक हसत आत आला आणि तिला बघू लागला. किती छान दिसत होती ती… शांत राधाचं जणू!
त्याने टेबलवर टकटक करून तिचं लक्ष वेधून घेतलं. मंजिरीने मान वर करून त्याला बघितलं आणि क्षणभर भांबावून गेली.
"हाय…"
"हां…", मंजिरी अजून गोंधळून तशीच उभी होती.
"ते मला एक केक हवा होता… फ्रेश आहे?"
"हां.. आहे ना… हा चॉकलेट आणि मिक्स फ्रूट आहे…"
"उम्म… चॉकलेट दे…"
"ओके… नाव?"
"बाबा एवढंच लिही…"
"ओके…"
"किती झाले…"
"ते म्हणजे हे… नको पैसे…", आधीच त्याला बघुन गोंधळलेली ती त्याच्याकडे बघतसुद्धा न्हवती.
"का… पैसे का नको… फुकट केक देता तुम्ही सगळ्यांना…", चिन्मयला कळेना ही अशी का वागतेय म्हणून!
"ते म्हणजे नको… तुमच्या बाबांचा वाढदिवस आहे ना…"
"म्हणून फुकट केक…? मला सईने इथला ॲड्रेस दिला म्हणून मी आलो… न्हवत यायला हवं का…"
"असं का म्हणताय… मला छान वाटल तुम्हाला इथे बघुन…", मंजिरी पटकन म्हणाली.
"खरंच…", चिन्मय जड आवाजात थोड तिच्याकडे
झुकत म्हणाला.
झुकत म्हणाला.
"ते म्हणजे… तसं न्हवत म्हणायचं मला…"
"मगं कसं…"
"कसं नाही…", मंजिरी हलकेच लाजून म्हणाली.
"ठीके… केकचे पैसे तरी सांगा…"
"नाही..."
"का पण… पैसे का नाही घेत आहात तुम्ही…?"
"नको पैसे… काकुंसाठी नको… "
"अच्छा… असं आहे तर…", असं म्हणून चिन्मयने फोन काढला.
मंजिरी न कळून त्याच्याकडे बघत होती.
"हॅलो आई…", त्याने हे म्हणताच मंजिरी भांबावून त्याच्याकडे बघु लागली आणि त्याच्याकडे बघून 'नाही'चा इशारा करू लागली.
"आई अगं मी इथे बेकारीमध्ये आलो आहे. ती सकाळी तुला दवाखान्यात घेऊन आलेली ना मंजिरी तिच्या… आणि मी केक घेतला तर मला ती केकचे पैसे सांगत नाहीये… म्हणतेय की तुझ्यासाठी नको… धर बोल तिच्याशी!", चिन्मयने धडाधड सगळ आईला सांगितलं आणि मंजिरिकडे फोन दिला.
"हॅलो… हा काकू…"
"काय ग… पैसे का घेत नाहीयेस त्याच्याकडून… पैसे घे आणि आता तो आलाच आहे तर घरी ये त्याच्यासोबत… छान जेवायचा बेत केला आहे… मधूला पण आण हवं तर…"
"काकू ऐका ना… पैसे घेते मी पण घरी नको… उशीर झाला आहे हो… पुन्हा कधीतरी येते ना…"
"नाही… नाही ऐकणारे मी तुझ… तू घरी येत आहेस… हवं तर मी बोलते तुझ्या घरी आणि हो तुझ्या काकांचा वाढदिवस आहे… ते पण बोलावत आहे… आता त्याचं मन मोडणार आहेस का…?"
"काकू काय बोलू आता मी…"
"काही बोलू नकोस…. घरी ये, मी वाट बघतेय… चिन्मयकडे फोन दे…", तिने गुपचूप त्याच्याकडे फोन दिला.
"हॅलो, हा आई…"
"हा सांगितलं मी तिला… घेईल ती पैसै… आणि घरी घेऊन ये तिला… नीट या दोघं…"
"ओके… बाय, आलोच.."
ती तोंड बारीक करुन चिन्मयकडे बघत होती…
"माझ्याकडे बघू नको असं… आता तुझ्या लाडक्या काकूंनी सांगितलय… मी काही नाही केलं…"
त्याचं बोलणं ऐकून ती हलक तोंड वाकडं करुन आतमध्ये गेली आणि चिन्मय हसू लागला…
Stay tuned!?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा