मी लाट अंतरीची... तू किनारा प्रेमाचा! (भाग -३)

एका लग्नाची गोड लवस्टोरी!?
"मंजू अजून किती दिवस हट्टीपणा करणार आहेस... ये ना घरी राहायला..."

"नको ग... आधीच माझ्यामुळे काकूंना खूप त्रास झालंय... अजून नको... आणि रूम काय मिळेलच ना... बघू आपण करू प्रयत्न..."

"हम्म... तू काय ऐकणार नाहीस..."

"अगं तस नाही... माहितेय तुला सगळ... नको हट्ट करुस...
चल उतर... आलो आपण..."

' अनघा बेकरी ??'

"आज खरंच खूप उशीर झाला आहे मधु... आता येतीलच कुलकर्णी काका ऑर्डर घ्यायला... भरभर हात चालवं बरं..."

"मंजू यार नको एवढी गडबड करू.... चील... अजून दोन तास आहेत ते यायला..."

"हो... ते बघ कस्टमर आलेत वाटतं... जा त्यांना बघ काय हवंय..."

"हो आलेच..."


"बोला... व्हॉट कॅन आय सर्व्ह यू..."

"अम्म... फ्रेश काही आहे का..."

"हो, पनीर पफ आहेत आणि हे कपकेक आहेत. चिकन पफ होयला अजून १० मिनिटं तरी लागतील. अजून हे क्रीम रोल..."

"एक फ्रेश स्माईल मिळेल...", त्याने डोळ्यात डोळे घालून विचारलं....

"हां....", मधु भांबावून हुंकरली आणि त्याच्या डोळ्यात गुंतली.

"शुक शुक... एक फ्रेश कपकेक मिळेल?", त्याने टेबल वर नॉक करून विचारलं.

"हं... हो हो.. 2 मिनट...!", असे म्हणून मधूने एक फ्रेश कपकेक त्याला सर्व्ह केला.

"अजून काही सर..."

"अद्वैत..."

"हं...", मधु पुन्हा गोंधळून म्हणाली.

"हं नाही... माझं नाव अद्वैत... हाय!"

"हाय... म्हणजे नाही... बाय...", असे म्हणून मधु तिथून सटकली.

"हुश्श्श... काय होतंय हे... कोण होता तो... अद्वैत... मला का नाव सांगितलं..."

"मधुsss....."

"हां... आले आले... कोण कोण भेटतं देव जाणे..."

"अगं त्या कुलकर्णींच्या नातवाच नाव काय आहे..."

"अद्वैत...", मधुला अद्वैत काऊंटरकडे येताना दिसला.

"कोण अद्वैत.... त्याचं नाव तर काहीतरी वेगळं होतं ना..."

"हो हो म्हणजे... अद्वैत सारखच होतं काहीतरी.... हां... वेदांत होतं... वेदांत..."

"अगं बरी आहेस ना... अशी काय करतेस..."

"काही नाही ग... ते असच आपल सहजच... अय्या, किती मस्त केक बनवला आहेस... जी करता है तेरे येह हात चुम लू..."

"गप, नाटकी कुठली!... जा हे सेट करायला फ्रिजमध्ये ठेव...", मंजिरी हसून म्हणाली.

"हो हो आलेच...""आई काय ग... अशी कशी चक्कर आली तुला... नको ना अशी उन्हात बाहेर पडत जाऊस... डबा नाही म्हणून काय उपाशी राहणार होतो का..."

"तस नाही रे... पण मी पण घरी बसून कंटाळले... म्हणून आले जरा... आणि काय रे, बाहेरच्या मुलीशी असं बोलतात का... बिचारी मला एवढी काळजीने इथे घेऊन आली... आणि तिच्याशी भांडायला लागलास... आधी ही सई हसली तिला... आणि आत आल्यावर तू... सॉरी पण म्हणला नाहीस तिला..."

"शॉक झालेलो ग मी जरा तुला असं बघुन आणि त्यात मग जरा चिडचिड तुझ्यावर झाली..."

"दादा... ते सर्व ठीक आहे, पण शॉक नक्की आईला बघुन झालेलास की मंजिरीला बघुन झालेलास...", सई हसत म्हणली आणि दोघी एकमेकींना टाळी देऊन हसल्या.

"गप्प बस... असं काही नाहीये... उगाच आपल काहीतरी!", चिन्मय चिडून म्हणाला खरा पण तो राग वरवरचा होता हे सगळ्यांनाच माहिती होतं!

"मंजिरी... तुझं नाव ऐकल की उगाच धडधड वाढल्यासारखं होतंय..."

"बरं चला, निघते मी... रात्री दोघं या लवकर घरी... आणि चिन्मय येताना केक घेऊन ये रे..."

"हो ग... आहे लक्षात... माझ्याही बाबांचा वाढदिवस आहे..."

" तू काय हसतेस ग... जा पळ कामाला...", चिन्मय सईच्या डोक्यात टपली मारून उठला.

"जाते जाते... पण आपल्याला तर आवडली हा मंजिरी... कोणाला हवं असेल तर नंबर घेऊ शकते मी..."

"तुला तर ना..."

"मारू नको... चील... त्यापेक्षा मी काय म्हणते... आज असंही केक घ्यायचाच आहे ना... त्यांच्याच बेकरीतून घेऊया... पाहिजे असेल तर नाव सांगू शकते मी... म्हणजे तेवढच अजून भेटता येईल..."

"काही गरज नाहीये... घेऊन माझा मी केक..."

"ठीके...", असे म्हणून सई केबिनच्या दरवाजापर्यंत गेली आणि पुन्हा मागे फिरली.

"दादाsssss... वहिनी दर्जा आहे हा पण! एक नंबर चॉईस...", असे मोठ्याने ओरडुन पळून गेली.

"सईssssss...", चिन्मय ओरडुन उठला पण तोपर्यंत ती पसार झाली होती.

Stay tuned!?

🎭 Series Post

View all