"सई... चल डबा खायला... काय ग आणि हसलीस हिला मगाशी...
बाळ एवढं घेऊन आलं मला दवाखान्यात चक्कर आली म्हणून..."
"नाही काकू ठीके... एवढं काही नाही..."
"सॉरी हा अगं पण आई ती एवढ्या गोड आवाजात म्हणाली... मग मला रहावलं नाही... आणि खरंच थँक्यू..."
"नाही ठीके... चला मी निघते... थोडा उशीर झालाय...", ती काकूंच्या पाया पडत म्हणाली.
"अगं नाव तर सांगितलच नाही...."
"मंजिरीsssssss"
"अगं काय... काय झालं... का एवढी पळत पळत आलेयस..."
"तुझा फोन... माझ्याकडेच राहिला... प्रभुणे सरांचा कॉल येत होता सारखा म्हणून द्यायला आले... मला वाटलंच इथे घेऊन आली असशील काकूंना म्हणून... म्हणून लगेच आले इथे... काकू बरं वाटतंय...?"
"हो... पण तु बस जरा... किती दम लागलाय..."
"काकू मी आलेच हा दोन मिनिटे... कॉल बॅक करून आले... आले हा मी मधू"
"काकू... औषध घेतलीत...?", असं म्हणत तिने तोंडावरचा स्कार्फ काढला.
"हो घेतली... सई बाळा पाणी दे तिला...."
"सईssssss.... तू....."
"मधु तू....."
"किती दिवसांनी कशी आहेस....."
"मी मस्त... तू...."
"तुला बघुन खूप छान..."
"आई अगं ही मधु... ट्रेकिंगला भेटलेली बघ... तुला सांगितलेलं मी... किती वर्ष झाली ग..."
"हो ना.... कशी आहेस... एक मिनिट, आई म्हणजे तुमची मुलगी..."
"हो आणि हा माझा मुलगा चिन्मय..."
"ओह... हाय!"
"हाय..."
"सई तुला सांगू खूप भारी वाटतंय... कशी अशी अचानक भेटलीस ग..."
"अगं हे आमचंच हॉस्पिटल आहे.... आणि आता या वेळी भेटली आहेस तर नंबर देऊन जा... पुन्हा नको ताटातूट...", सई तिला घट्ट मिठी मारत म्हणाली.
"तुम्ही ओळखता एकमेकींना?", नुकत्याच आलेल्या मंजिरीने विचारले.
"हो... मंजू ही माझी मैत्रीण ट्रेक ला भेटलेली... तुला सांगितलंल बघ ती..."
"ओह... भारी..."
"आय मस्ट से हा मधू... ही खूप जास्त गोड आहे...", सई हळूच खुदकन हसत म्हणाली.
"नको ना ... ते मी असं पटकन लक्षात आलं म्हणून म्हणाले..."
"हो ग... मस्करी केली... आणि तू कशाला अहो जावो करतेस मला... आता माझ्या मैत्रिणीची मैत्रीण म्हणजे माझीपण मैत्रीणच की...", हे बोलताना तिने हळूच एक कटाक्ष चिन्मय कडे टाकला जो कधीपासून भान हरपून मंजिरीकडे बघत होता.
"बरं चला, निघतो आम्ही... काकू येतो... आधीच खूप उशीर झाल आहे..."
"हो हो नीट जा दोघी... आणि घरी पण जेवायला येऊन जा एकदा..."
"हो हो... चला बाय...", एक ओझरती नजर चिन्मयकडे टाकून मंजिरी निघाली. कधीपासून त्याच अस एकटक बघत जाणवत होत तिला...
"शी बाई, अशी कशी वेंधळी मी... काय वाटल असेल काकूंना... त्यांच्या समोरच त्यांच्या मुलाला एवढं बोलले... मी आले तेव्हा कसे एकदम एकटक बघत होते... पोटात गोळाच आला बाई एकदम... छान आहेत पण... काय विचारतेय मी पण... अहं, त्याला कुठे...
सई आणि काकू छान आहेत... म्हणजे तो नाहीये का..."
"मंजू... अगं ए मंजू... मंजिरीsssss"
"हा... हा... आहे, केवढ्याने ओरडलीस..."
"अगं मग कधीची आवाज देतेय... लक्ष कुठे आहे..."
"नाही ग, म्हणजे आहे... बोल ना... हेल्मेटमुळे ऐकू नाही आलं..."
"हा हा ठीके... अगं सर काय म्हणत होते..."
"सर म्हणाले की पुढच्या महिन्यात phd चं थिसिस सबमिट करायचं आहे तर लवकरात लवकर करून घे..."
"अच्छा ओके..."
"टेंशन आलंय ग थोड... कसं मॅनेज करायचं सगळ... पुढच्या महिन्यात तर फ्लॅटपण रिकामा करायचं आहे... अजून रूम नाही मिळालेय..."
"मंजू अजून किती दिवस हट्टीपणा करणार आहेस... ये ना घरी राहायला..."
"नको ग... आधीच माझ्यामुळे काकूंना खूप त्रास झालंय... अजून नको... आणि रूम काय मिळेलच ना... बघू आपण करू प्रयत्न..."
"हम्म... तू काय ऐकणार नाहीस..."
"अगं तस नाही... माहितेय तुला सगळ... नको हट्ट करुस...
चल उतर... आलो आपण..."
चल उतर... आलो आपण..."
Stay tuned!?