मी लाट अंतरीची... तू किनारा प्रेमाचा!

एका लग्नाची गोड लवस्टोरी!?
"मधु अगं चल ना.....
किती वेळ लावणार आहेस अजून....
उशीर होतोय, चल..."

"आले गं, काजळ सापडत न्हवतं मला..."

"कोण बघत गं रोजरोज हा तुझा नट्टापट्टा? जे एवढी तयार होत असतेस..."

"कोणी बघु दे, नाहीतर नको बघु दे.. मला तयार होयला आवडत, मी होणार..."

"बरं चल आता लवकर..."

"हो...
आई येते गं मी..."

"मधू, काकू कधीच नाही का गं मा..."

"ए, थांब, थांब, थांब...."

"काय...
काय झालं..."

"अगं त्या बघ माझ्या शाळेतल्या बाई... मी आलेच हा भेटून... दोन मिनिटात आले..."

"काय म्हणावं या मुलीला, उशीर झालंय तरी सगळ्यांना भेटायचं आहे...""आह्ह... आई गं... विठ्ठला..."

"काकू... काय होतंय तुम्हाला..."

"उन्हाने... चक्कर..."

"ठीके, ठीके... सावलीत या इथे...
इथेच थांबा हा... मी आलेच पाणी घेऊन..."

"हो..."


"काय गं, काय झालं...
ह्या कोण..."

"अगं ह्यांना उन्हाने चक्कर येत होती... म्ह्णून पाणी देतेय...
दवाखान्यात नेऊ का गं..."

"ह्म्म्म... उन्हाळ्याचे दिवस आहेत... अजून त्रास नको, घेऊन जा...."

"पोरींनो नको दवाखाना... बरं वाटतंय मला... जाईन मी...
एवढं पाणी दिलत मला... अजून काही नको... इथे जवळच जायचं आहे मला..."

"नाही, नको... जाऊ आपण दवाखान्यात...
मधू तू एक काम कर, गाडी घेऊन पुढे जा... मी ह्यांना सोडून मग रिक्षाने येईन..."

"ठीके, चालेल..."


"रिक्षा... रिक्षा...
वसुंधरा हॉस्पिटल..."

"कशाला गं मुली तुला एवढा त्रास..."

"काकू त्रास कसला... बरं, तुम्हाला आता ठीक वाटतंय..."

"हो, उन्हाने जरा डोकं गरगरतंय फक्त..."

"हो, पोहोचू आपण आता... मग औषध घेऊन घरी जाऊन आराम करा..."

"हो,... नाव नाही सांगितलंस बाळा तुझं..."

"उम्म्म हो... अरे हे बघा आलो पण आपण...
काका किती झाले पैसे..."

"23रु. मॅडम..."

"हे घ्या..."


"डॉक्टर आहेत, अपॉइंटमेंट घ्यायची होती..."

"हो आहेत, बोला ना...
कोणाला दाखवायचंय?"

"ह्या काकूंना... काकू तुमचं नाव..."

" काकू तुम्ही...", ती रिसेप्शनवरची मुलगी पटकन उभी राहत होती आणि तशीच खाली बसली.

"नाव सांगा तुमचं...काकू", ती नजरेने खानाखुणा करून विचारत होती.

"वसुंधरा... वसुंधरा नाईक"

"काकू ह्या दवाखान्याचं नाव पण वसुंधरा आहे...
भारी ना..."

हे ऐकून ती रिसेप्शनवरची मुलगी न राहवून हसू लागली...

"काय झालं... मी काही चुकीचं बोलले का... तुम्ही ओळखता का यांना "

"नाही गं बाळा... लोकांना काय जातंय हसायला... हसू दे...
अय्या हो गं, सारखीच आहेत कि गं नाव आमची..."

"हो... डॉक्टर कधी येतील..."

"सर राऊंडवर गेलेत येतीलच...
हे बघा, आलेच..."

"जा तुम्ही केबिनमध्ये..."

"काकू चला..."


"आत येऊ डॉक्टर..."

"आ...", तो पुढे बोलणारंच होता आणि गप्प बसला.

"डॉक्टर, ह्या काकूंना उन्हामुळे चक्कर होती...
एकट्याच निघाल्या होत्या त्या म्हणून घेऊन आले...", त्या आवाजाने त्याने मागून येणाऱ्या तिला बघितलं...

श्रावणाची सर तू...
रातराणीचा बहर तू...
चंद्राची कोर तू...
नजरेचा वार तू....

"शुक शुक....
बघताय काय असे... चेक करा त्यांना..."

"हं... हो!
बसा ना..."

"बोला...
काय होतंय..."

"सांगितलं ना आता उन्हामुळे चक्कर येतेय..."

"पेशंट कोण आहे, त्यांना सांगू द्या..."

"म्हणजे मी खोटं सांगतेय का..."

"मी असं म्हणलं का..."

"गप्पा बसा दोघेही... काय चाललंय...
दवाखाना आहे ना हा..."

"तुला काय गरज होती मग उन्हात चालत यायची...
विसरला असता एक दिवस डबा तर काय बिघडलं असतं..."

"ओ... असं का बोलताय त्यांच्याशी... आणि तुम्हाला काय माहिती ते डबा वैगेरे..."

"अगं अगं... मुलगा आहे तो माझा... डॉ. चिन्मय देसाई...", हे ऐकून ती लगेच उठून राहिली....

"अगं बस खाली... एवढं काही नाही... त्याला आणि सईला डबा द्यायला येत होते, तर चक्कर आली जरा...
सई म्हणजे बाहेर रिसेप्शनवर बसलेली ती... माझी मुलगी आहे, म्हणून हसायला आलं तिला...
सकाळी मस्तीमध्ये विसरून गेले दोघं... रिक्षा काही मिळाली नाही, म्हणून मग चालत निघाले..."

"आई पण अगं कशाला एवढ्या उन्हात यायचं... उपाशी न्हवती ठेवणार मी तुझ्या सईला..."

"सॉरी...", ती मान खाली घालून म्हणाली....

"अगं सॉरी कशासाठी वेडे... माझी एवढी मदत केलीस... उलट मीच थँक्यू... एवढी गोड हसतेस... कशाला ते डोळ्यातून पाणी काढायचं..."

"बरं चला येते मी... भेटू पुन्हा...", एक कटाक्ष चिन्मयकडे टाकत ती म्हणाली...

"नीट जा हो... चल येते मी बाहेर सोडायला तुला..."

"नको काकू... जाते मी, तुम्ही आराम करा..."

"अगं ठीके, एवढं माझ्यासाठी आलीस इथर्यंत... आणि मी एवढ्यावर येऊ नको होय... चल..."

"थांब आई, एकटी नको... मी येतो...", तो हळूच मान खाली घालून म्हणाला."सई... चल डबा खायला... काय ग आणि हसलीस हिला मगाशी...
बाळ एवढं घेऊन आलं मला दवाखान्यात चक्कर आली म्हणून..."

"नाही काकू ठीके... एवढं काही नाही..."

"सॉरी हा अगं पण आई ती एवढ्या गोड आवाजात म्हणाली... मग मला रहावलं नाही... आणि खरंच थँक्यू..."

"नाही ठीके... चला मी निघते... थोडा उशीर झालाय...", ती काकूंच्या पाया पडत म्हणाली.

"अगं नाव तर सांगितलच नाही...."

"मंजिरीsssssss"STAY TUNED!?


🎭 Series Post

View all