मी काट्यांतुन चालून थकले... भाग 22 अंतिम

खूप सुंदर लाईट ग्रीन कलर ची साडी सागर ने सविता साठी प्रेझेंट म्हणून आणली होती त्याने सविताला नेसायला सांगितली, छान लाईट मेकअप, मॅचिंग ज्वेलरी, सविता खूपच सुंदर दिसत होती, सागर ने ही तिला मॅचिंग असे कपडे घातले होते



मी काट्यांतुन चालून थकले... भाग 22 अंतिम

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
...........

आज आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट ची कोर्टाची तारीख होती, सविता सकाळी उठली अंघोळ करून तिने देवपूजा केली, सगळं सुरळीत होऊ दे देवा, येऊन तिने सुलभाताईंच्या पाया पडल्या,

आई बाबा काल रात्री घरी गेले होते, जरा वेळाने रमेश दादा वहिनी येणार होते, ते दोघ सविता सोबत कोर्टात जाणार होते, जरा वेळाने रमेश दादा आणि वहिनी आले, सविताने त्या दोघांना चहा दिला, सविता वेगळीच गप्प झाली होती, काय करणार ती एवढ्या वर्षाच्या संसार, आज घटस्पोट आहे, पण एक गोष्ट चांगली झाली होती की लगेच तिच्या आयुष्यात सागर आला होता त्यामुळे ती बऱ्यापैकी सावरली होती

"आई आम्ही निघतो कोर्टात जाऊन येतो",.. सविता

" सविता इकडे ये, हे बघ कुठल्याही गोष्टीच टेन्शन घेऊ नकोस",.. सुलभा ताई

"आई यांनी कोर्टात सांगितलं की आईला माझ्याकडे पाठव तर मी नाही सांगेन",.. सविता

" हो सविता मलाही जायचं नाहीये सतीश कडे",... सुलभा ताई ,

" जर तुम्हाला पोलिस स्टेशन मध्ये बोलवलं तर तिथे सांगायचं की मी सविता जवळच राहणार आहे",.. सविता

" हो नक्कीच मी तुला आणि मनु ला सोडून राहू शकत नाही, मला नाही जायचं सतीश जवळ ",.. सुलभा ताई

सविता रमेश दादा वहिनी निघाले कोर्टात जायला, तिथे सागर भेटला, तो सविता कडे बघत होता,

" सविता चेहरा काय उतरवून घेतला आहेस, एवढ टेन्शन घेऊ नकोस, तुझा निर्णय फिक्स आहे ना ",.. सागर

"हो माझा निर्णय एकदम फिक्स आहे, मला आनंद व्हायला पाहिजे खरं पण मला आता काहीच वाटत नाही ना आनंद ना दुःख",... सविता

" चला आत जाऊन बसू आपण, नंबर लावावा लागेल",... सागर

जरा वेळाने सतीश आणि त्यांचे वकील आले...

एक छोट्या खोलीत सगळे बसलेले होते दोन्ही बाजूंच म्हणणं जज साहेबांनी आधी ऐकून घेतलं, तुम्हा दोघांना थोडे दिवस एकत्र राहून बघायचं आहे का?, की तुमचा निर्णय झाला आहे

नाही दोघं म्हटले, आता अजून वाट बघण्यात काही अर्थ नाही..

सविताने सतीश मनु च्या ची शाळेचा खर्च करेल हा पेपर कोर्टात दिला, तो तिला सचिन साहेबांनी दिला होता, तुम्हाला सविता यांना दर महिन्यात एक ठराविक रक्कम त्यांच्या बँक अकाउंट मध्ये टाकावी लागेल, ही रक्कम सविता तुमच्या आईसाठी वापरतील, किती ते सांगतो मी...

सगळ्यांचा होकार झाला सह्या झाल्या

सगळे बाहेर आले...

सतीश ने सविताला ला हाक मारली, सविता थांबली, रमेश दादा वहिनी सागर लांब जाऊन थांबले

"सविता आपण चहा घ्यायचा का सोबत, मला बोलायच आहे थोड",.. सतीश

"नाही सतीश आता खूप उशीर झाला त्या गोष्टीला",.. सविता

" मला कधी वाटलं तर मी आईला भेटायला येऊ शकतो का?",.. सतीश

" तुम्हाला जेव्हा वाटेल आईला भेटायचं तेव्हा सांगा मी मनु आईला पाठवून देईल",.. सविता

" ठीक आहे, पंधरा वर्षाचा आपला संसार माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत हे मला माहिती आहे, जर शक्य असेल तर मला माफ कर",.. सतीश

" ठीक आहे सतीश, खूप उशिरा लक्ष्यात आल तुमच्या, आता या गोष्टीला काही अर्थ नाही, मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही",... सविता

" मला खूप वाईट वाटत आहे सविता",.. सतीश

" खरं सांगू का सतीश मला वाईटही वाटत नाही आणि आनंद ही होत नाही, आता मी अगदी ब्लँक झाली आहे",...सविता

" तू भेटायला येशील का मला सविता",... सतीश

" तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही मनु आणि आईंना भेटू शकता, पण मी भेटेल अशी अपेक्षा बाळगू नका",.. सविता

सविता रमेश दादा वहिनी सागर उभे होते तिथे आली, सगळे घरी आले,

सुलभा ताईंनी डोळ्यांनीच विचारलं झाल्या का सह्या

वहिनीने हो सांगितलं

सविता आत गेली बाथरूम मध्ये, तिला खूप रडायला येत होतं, ति बऱ्याच वेळ बाथरूम मध्ये बसून होती, बाहेर सगळे तिची वाट बघत होते, वहिनी उठली आत जायला

" वहिनी एक मिनिट मी जाऊ का आत मध्ये",... सागर आत गेला

"सविता दार उघड, काय झाला आहे, मोकळा बोल",..सागर

सविताने दार उघडलं, रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते, ती येऊन कॉटवर बसली, सागर येऊन बाजूला बसला, त्याने तिचा हात हातात घेतला,... "सविता एवढा त्रास का करून घ्यायचा पण मी म्हणतो",

"झालं, आता यापुढे नाही करून घेणार त्रास, माझ्या मनात खूप साठवून राहिलं होतं खूप रडू येत होतं म्हणून मी आत मध्ये आली",.. सविता

" बाहेर रमेश दादा चा चेहरा कसा तरी झाला आहे, बाहेर येऊन बस, काय असेल ते मोकळं बोल",.. सागर

सविता सागर दोघे बाहेर आले, रमेश दादा खूपच काळजीत होता, वहिनीने सगळ्यांसाठी चहा ठेवला, सुलभा ताईंनी उठून सगळ्यांना चिवडा दिला, मनू आली तेवढ्यात क्लास हुन तिला बघताच सविताला परत रडायला येत होतं

" आई अगं असा किती त्रास करून घेणार आहेस तू",.. मनु

" तुझ्या मनाप्रमाणे झाला आहे ना सगळं, मग आता डोळे पूस बरं यापुढे अजिबात रडायचं नाही",.. रमेश

आई बाबांचा फोन आला रमेश दादाच्या फोनवर, त्यांनी विचारलं काय झालं? झाल्या का सह्या?, रमेश दादांनी सगळं सांगितलं, व्यवस्थित सह्या झाल्या काही प्रॉब्लेम झाला नाही, आम्ही येतो जरा वेळाने घरी, जर सविता आली तर तिलाही घेऊन येतो

" मी आता येत नाही तिकडे मी एकदम ठीक आहे उद्या बुटीक च काम आहे",.. सविता

"पण तू ठीक आहेस ना",.. रमेश दादा

"हो मी एकदम ठीक आहे",.. सविता

जरा वेळाने रमेश दादा वहिनी गेले, सागर थांबलेला होता , त्याने बाहेरून तिघींसाठी जेवण मागवला

"मी निघतो आता सविता",.. सागर

" थांब ना सागर जेवून जा ",... सविता

" मी येईन उद्या, आता एक क्लायंट मीटिंग आहे ",.. सागर

सागर निघाला

आता घरात सविता मनु सुलभाताई तीघी होत्या, सविता परत रडायला लागली, सुलभा ताईंच्या डोळ्यातही पाणी होतं,

"आता तुम्ही दोघी जणी रडणं बंद कराल का? काय करत आहात अस, आई आजी पुरे आता",... मनु

" सतीश बोलला का गं कोर्टात आई माझ्याजवळ राहील अस ",.. सुलभा ताई

" कोर्टात नाही पण नंतर बोलले ते माझ्याशी मी सांगितलं तुम्हाला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा मनू आणि आई येऊन जातील तुमच्याकडे",.. सविता

" पुरे झाला आता, चला विषय बदला, आता मी ताट करते आहे" ,.. मनु

सविता सुलभाताई उठल्या, त्यांनी जेवून घेतलं, यापुढे डोळ्यात पाणी आणायचं नाही असं सविताने ठरवलं, मग मनू पण घाबरून जाते सुलभाताई ही सोबत रडतात, सविता आरामात जेवत होत होती हे बघून सुलभाताई आणि मनूला बरं वाटलं


सहा महिन्यांनी.....


प्रसन्न अश्या सकाळी सविता उठली, बाजूला बघितलं तिने सागर झोपलेला होता, तिने त्याच्या अंगावरचा ब्लॅंकेट एक सारखं केलं, सागरच्या बंगल्यातली वरची बेडरूम त्यांची होती,

खालची बेडरूम मनु सुलभा ताई यांची होती, खाली किचन देवघर होत, मोठ गार्डन होत आजुबाजूला, सिक्युरिटी गार्ड, घरात कामाला लोक, सगळ मस्त होत

सुलभा ताई, मनु, रमेश दादा कडे होत्या, कारण आता 15 दिवसा पुर्वी सविता सागर च लग्न झाल होत

घटस्फोट झाल्यावर सविता ने वेळ मागितला सागर ला, तिने सहा महिन्याने होकार दिला, रजिस्टर पद्धतीने त्यांच् लग्न झाल, मध्ये एक दोनदा मनु आणि सुलभाताई जाऊन सतीश ला भेटून आल्या, आता बऱ्यापैकी शांत झाला होता सतीश, तो एकटाच होता, मनू ही दहावी पास झाली होती, तिने सायन्स ला ऍडमिशन घेतली होती, सागर च्या घरापासून तिचं कॉलेज जवळ होतं,

सविता रुपा ने बुटीक सुरू केल, चार महिने झाले आणि ते बुटीक खूप छान चालत होत, सविता ने अगदी मनापासून मेहनत घेतली होती, दिवसातले 8-10 तास ती काम करत होती, सगळीकडे त्यांच्या डिझाईन प्रसिद्ध झाल्या होत्या,

लग्नानंतर सागर सविता मस्त फिरायला गेले होते, सागर सोबत सविता खूप खुलली होती, काल ते वापस आले होते, आज सविताच्या आई कडे जावून मनु सुलभा ताईंना घेवून येणार होते

सागर उठला, सविता नुकतीच आंघोळ करून वापस आली होती, खूप सुंदर फ्रेश दिसत होती ती, सुंदर असा व्हाइट गुलाबी चुडीदार घातला होता, हातात सोन्याच्या बांगड्या, गळ्यात डायमंड मंगळसूत्र, मॅचिंग कानातले छोटीशी टिकली,

सागर तिच्या कडे बघत बसला,

"उठ सागर उशीर होतो आहे, मला दुपार नंतर बुटीक कडे चक्कर टाकावी लागेल, रूपा एकटी किती दिवस काम बघेल, तिला तिचा जॉब आहे, तुही पंधरा दिवस झाले सुट्टी घेतली आहेस, जरा ऑफिसला जाऊन बघ",.... सविता

सागर ने पुढे होऊन सविताला जवळ घेतलं,.. "काय अस मी नाही उठणार, तू ही झोप जरा वेळ ",.

"काय हे सागर, सोड बघू मला" ,... सविता चा फोन वाजत होता, रूपाचा फोन होता

" आले का तुम्ही लोक फिरून",.. रूपा

" हो आता आम्ही आईकडे जातो आहोत मनू आणि सुलभा ताईंना घरी घेऊन येऊ मग येते मी दुपारून बुटीक ला",.. सविता

" आज नको येऊस बुटीक ला सोमवार पासून ये ",.. रूपा

" काय रूपा तू कधीपासून एकटीच काम करते आहेस तू ",.. सविता

"मी कुठे काय करते आहे आपला मॅनेजर काम करतो आहे, एक काम करा आज संध्याकाळी आमच्याकडे जेवायला या तुम्ही सगळ्यांनी, सगळे म्हणजे अगदी सगळे सुलभा काकू, मनु, तू, सागर तुझे आई बाबा, रमेश दादा, वहिनी, प्रथम, सगळ्यांनी यायचं, मी आत्ता फोन केला होता रमेश दादाला, तो हो म्हटला आहे ",.. रूपा

"अगं काय रूपा किती करतेस तू माझ्यासाठी",.. सविता

सागर सविता रमेश दादाकडे आले, मनू पुढे पळत येऊन सविताला भेटली, आईने दोघांवरून भाकरी तुकडा ओवाळला, बाबा खूप खुश होते, वहिनी पळत आली सविताला भेटली,

" मी खूप खुश आहे सविता तुझ्या साठी ",... रमेश दादा

" अरे काय सगळीकडे सविता च कौतुक सुरू आहे माझं कौतुक कोणीच करत नाही",.. सागर

सगळे हसायला लागले रमेश दादा मी पुढे घेऊन सागरला आत नेल

वहिनी किचनमध्ये चहा ठेवत होती, सविता तिला जाऊन भेटली

"चेहऱ्यावर तर खूपच ग्लो आहे सविता ताई तुमच्या ",..वहिनी

"काहीही काय ग वहिनी तु पण मला का चिडवते ",.. सविता

सविता खूपच खुश वाटत होती, सागर खरच खूप चांगला आहे, सतीश ची वागणूक बघून प्रेमावरचा माझा विश्वास उडाला होता, रमेश दादा, वहिनी, आई बाबांनी किती मदत केली, अजून सुरू आहे त्यांच, मनु सुलभा ताईंची भक्कम साथ, सचिन सर रुपा हक्काचे मित्र मैत्रिण, सविता खुश होती..

जेव्हा सतीश ने मला घरा बाहेर काढल मनु आईंना घेवून निघाले तर मी खर पण तेव्हा माहिती नव्हत काय करणार आहे मी पुढे? कस होईल? , पण म्हणता ना कोणाच कोणा शिवाय अडत नाही, सगळ नीट झाल, आता तर अजून चांगल झाल, आता कसल टेंशन नाही, माझ्या कडे काम आहे, घर आहे, स्वतःची माणस आहेत,....

जेवणाचा छान बेत तयार केला होता वहिनीने, दोन भाज्या वरण भात पुरण पोळी भजी,

"एवढे पदार्थ कश्याला केले वहिनी",.. सविता

"सगळे पदार्थ सविता च्या आवडीचे आहेत",... आई

मस्त जेवण झालं दुपारी,

" संध्याकाळी येणार आहात ना तुम्ही सगळे सचिन सरांकडे",.. सविता

"हो आम्ही येणार आहोत",... वहिनी

सुलभाताई मनु सविता सागर घरी आले, सुलभाताई आणि मनुला त्याची रुम खुप आवडली, बंगला खूपच छान होता सागर चा,

" संध्याकाळी सचिन साहेबांकडे जायचं आहे जेवायला सात वाजता निघू आपण सगळ्यांनी आराम करा तो पर्यंत",... सविता

सविता सागर रूममध्ये आले, खूप खुश होती सविता

"संध्याकाळी कोणती साडी घालू",.. सविता

खूप सुंदर लाईट ग्रीन कलर ची साडी सागर ने सविता साठी प्रेझेंट म्हणून आणली होती त्याने सविताला नेसायला सांगितली, छान लाईट मेकअप, मॅचिंग ज्वेलरी, सविता खूपच सुंदर दिसत होती, सागर ने ही तिला मॅचिंग असे कपडे घातले होते

मनु अनारकली ड्रेस मध्ये सुंदर दिसत होती, सुलभाताई ही टापटीप दिसत होत्या

ते सचिन रुपा च्या घरी पोहचले, रमेश दादा वहिनी आई-बाबाही आलेले होते, सचिन सर आणि रूपा यांच्या घराच्या लाॅनमध्ये त्यांनी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती सागर आणि सविता साठी....

सविता खूप खुश झाली सरप्राईज दिलं होतं तिला रूपाने, बाकी कोणीच नव्हते सगळे घरचे लोक होते, भरपूर जेवणाचे पदार्थ होते, खूप गप्पा मारल्या सगळ्यांनी,

"सागर सविता आम्ही तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहोत, तुमच खूप अभिनंदन, सविता सारखी हुशार मैत्रीण मिळाली, सागर तर प्रसिद्ध वकील आहे, खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आला त्या बद्दल",.... रूपा

जेवण झालं, चला आता आम्हाला निघावे लागेल, सविता जाऊन रुपाला भेटली,... "तुझ्या रूपात मला एक बहीण भेटली आहे, खूप थँक्यू ",

बहीण बोलते आणि थँक्यू म्हणते,.... रूपा

आई बाबा घरी गेले, सविता, सागर, सुलभाताई, मनू घरी आले, सागर बराच वेळ सुलभाताई आणि मनु सोबत बोलत बसला

" सविता इकडे ये" ,... सविता आली सागर ने तिघींना समोर बसवलं

"थँक यु सो मच तुम्ही तिघी माझ्या आयुष्यात आल्या, माझ्या एवढा आनंदी आता कोणीच नाही, माझी अशीच साथ द्या",... सागर

सुलभा ताईंच्या डोळ्यात पाणी होतं,

"आमचे काय आभार मानतो, आम्ही तर खरं तुझे आभार मानायला पाहिजे सागर, तू सविताला खूप छान आधार दिला",.. सुलभा ताई

" मी कसला आधार देतो आहे आई, उलट इथे हा सगळा व्याप सांभाळायला कोणी नव्हतं, सविताने आधार दिला आहे मला",... सागर

सागर सविता रूम मध्ये आले, सविताने सागरला मिठी मारली,..." खूप मोठं मन आहे तुझं सागर, मी खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस",

" पुरे झाल आता एकमेकांचं कौतुक ",... सागर

सागर ने सविताला घट्ट मिठीत घेतलं, सविता ही त्याच्या प्रेमात विरघळून गेली होती, अतिशय सुंदर अशा सहजीवनाची सुरुवात झाली होती, जिथे भांडण आणि गैरसमजाला अजिबात जागा नव्हती.... सविता ला तीच सुख मिळाल होत....
.......

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार, खूप प्रेम दिल तुम्ही....

🎭 Series Post

View all