मी काट्यांतुन चालून थकले... भाग 21

आता सतीश ला जसं आवडतं तस वागणार आहोत का कायम आम्ही? त्यात त्याला राग यायचा काही प्रश्न नाही, पहिली गोष्ट त्याने आमच्या मागे यायचं काही कामच नव्हतं, उगाच तिथे हॉटेलमध्ये त्यांनी तमाशा केला,



मी काट्यांतुन चालून थकले... भाग 21

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
...........

सतीश बाहेर आला, त्याने त्याच्या वकील फोन लावला, "आता येवू का ऑफिस मध्ये? मला महत्वाच बोलायच होत",..

"हो या ना",.. वकील

सतीश तिकडे त्यांच्या ऑफिस मध्ये गेला,..

" मला आउट आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायची नाही व्यवस्थित केस लढाईची आहे, झालं तर मला सविताला डिवोर्स द्यायचा नाही ",.. सतीश

"काय झाला आहे? तुम्ही एवढे का चिडले आहात?, असा कसा निर्णय बदलला तुम्ही अचानक? ",... वकील

" आत्ताच मी सविता ला भेटायला तिच्या बुटीक जवळ गेलो होतो तर ती तिच्या वकीलां बरोबर आरामशीर कॉफी प्यायला निघून गेली",.. सतीश

" बर मग, त्यात काय झाल? ",.. वकील

"म्हणजे काय तिचं माझ्याकडे लक्ष सुद्धा नव्हतं ते आरामशीर कॉफी शॉप मध्ये बसून गप्पा मारत होते :,.. सतीश

" ठीक आहे, यात एवढा राग येण्यासारखं काय आहे? आता नाही तरी तुम्ही दोघं घटस्फोटास घेत आहात, सविता मॅडम काय करतील याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही, नसेल द्यायचा तर नका देऊ घटस्पोट यात तुमचं नुकसान आहे, रहा तसेच आयुष्यभर, त्यांना काय फरक पडतो आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागले आहात याची पुरावे असतील त्यांच्याकडे, फोन मधले मेसेज, तुमची आई, मुलगी, सविता मॅडम च्या माहेरचे लोक, कोणीही तुमच्या विरुद्ध साक्ष देईल आणि आता ते सचिन सर ते ही सांगू शकतात, त्यांच्याकडे असतील तुमचे मेसेजेस, तुमची केस दोन मिनीट टिकणार नाही, घटस्फोट द्यावा लागेल तुम्हाला ",.. वकील

सतीश विचार करत होता काय कराव?.... " तुमचा काय सल्ला आहे आता काय करायला पाहिजे",..

" देऊन टाका त्यांना घटस्फोट, केस मधून मोकळे होऊन जा, नाहीतर त्या सविता मॅडमला घटस्फोट हवाच आहे, तुम्ही जर तो सहजासहजी घटस्फोट दिला नाही तर ते केस लढवतील, उगीच त्यांचा राग करण्यात काही अर्थ नाही, मुळातच तुम्ही त्यांच्या मागे का गेले होते? त्या त्यांच्या वकिलांसोबत जात होत्या तर जाऊ द्यायचं ना, तुम्ही नाही का आले आहात मला भेटायला, असेल काही काम ",.. वकील

" पण तो सागर जरा जास्तच काळजी घेतो सविताची, आणि ते पूर्वी पासून ओळखतात एकमेकांना ",.. सतीश

" जेंटलमॅन असेल तो, घेऊ द्या काळजी, तुम्हाला आता त्रास व्हायचं कारण नाही, स्पष्टच बोलतो आहे राग नका मानू, तुम्ही आधी सविता मॅडमला सांभाळत नाही आणि आता का चिडता आहात त्यांच्यावर, एवढंच त्यांच्यावर प्रेम होतं तर ही वेळ आलीच कशी? आता यापुढे त्यांच्या आयुष्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका, त्या कोणा बरोबर ही फिरुदे तुम्हाला काय फरक पडतो आणि जरी तुम्ही म्हटले की मला घटस्फोट नको आहे तरी त्या ऐकतील का? त्यांना नकोच आहात आता तुम्ही त्यांच्या आयुष्यात, उगीच वेळ वाया घालवू नका, मला उद्या सकाळ पर्यंत सांगा काय करायचं आहे ते",.. वकील

सतीश विचार करत होता जाऊ देत घटस्फोट देऊन टाकू उगीच कटकट नको, पण निदान आई तरी यायला पाहिजे माझ्याकडे रहायला

"वकील साहेब आई येईल का माझ्याकडे राहायला? तिची इच्छा नाही माझ्याकडे यायची, तिला सविता सोबतच राहायचं आहे, मी कोर्टात असं सांगू शकतो का की मला आई पाहिजे तरच मी घटस्फोटीत देईन",.. सतीश

" नाही तुम्ही असं नाही सांगू शकत, आई काही लहान नाही आहेत, त्यांच डिसिजन त्या घेऊ शकतात, त्यांची इच्छा असेल तर त्या येतील, तुम्ही राहता ते घर कोणाच्या नावावर आहे ",.. वकील

" माझ्या नावावर आहे",.. सतीश

" हे एक बर आहे जर ते घर तुमच्या आईच्या नावावर असतं तर ते म्हटले असते तर तुम्हाला घर खाली करावा लागेल असतं, आई-वडिलांची प्रॉपर्टी किती आहे",.. वकील

"गावी घर शेत आहे, आईचे काही दागिने असतील, काही बँक बॅलन्स असेल, ते आईलाच माहिती मी तिला कधीच विचारलं नाही तिला ",.. सतीश

" त्यातल तुम्हाला काही हव आहे का? पैसा वगैरे",... वकील

" नाही, मला काही नको आहे, मला आता या सगळ्या गोष्टी नको नको झाल्या आहेत, मी उगीच चिडलो आज त्या सविता वर, शांततेत घ्यायला हव होत मी ",.. सतीश

सतीश निघाला तिथून

काय करत होती सविता त्या सागर सोबत तिकडे रेस्टॉरंट मध्ये? , बहुतेक केस बद्दल बोलायला जमले असतिल ते, मला का आला पण एवढा राग? काहीही करू दे आता सविता,मला चिडायची गरज नव्हती, सविता आणि सागर लहानपणी पासून मित्र आहेत, पसंत करत असतिल का ते एकमेकांना? , काहीही करू दे ते, मी त्यांच्या मागे जायला नको होत, उगीच गोंधळ घातला मी ,

सविता त्या सागर समोर किती बोलली मला, तो सागर किती काळजी करत होता सविता ची, मला अजिबात आवडल नाही, जाऊ दे आता काहीही करू दे, आता घटस्फोट होईलच, आता आपण चिडायचे नाही, नवीन नौकरी शोधायची आहे

आधी मला काही वाटलं नाही सविता सोबत, तेव्हा ती मला नेहमी मूर्ख चुकीची वाटली, आज ते दोघ प्रेमाने बोलत होते, तर मला राग आला, सविता माझी आहे अस वाटल, आधी मी सविता सोबत कधीच नीट बोललो नाही, नेहमी तिचा अपमान केला, किती वेळा सविता बोलली असेल बाहेर जाऊ या का जेवायला, अहो आपण दोघ फिरून येवू या का?, कधीही मी तीच ऐकल नाही, उलट तिच्या साध्या मागण्या मी पूर्ण केल्या नाही, सगळी माझी मर्जी होती तिथे, आता मला तेच वाटल मी गेलो की सविता घाबरेल, उठून माझ्याशी बोलेल, पण तस काही झाल नाही, त्यांनी मला तिथून घालवल, तिला सागर आवडतो वाटत, असो आता का मला राग आला आहे, सविता त्या सागर सोबत होती खरंच काही असेल का त्यांच्यामध्ये काही? ते काही का असेना पण आता आपण मध्ये मध्ये करायचं नाही
......

सविता बुटीकला वापस आली, आज जरा गोंधळ झाला आहे, उगीच भेटला तिकडे सतीश, पण सतीश ला एवढा राग का आला? मी सागर सोबत होती तर, ती तिच्या विचारात होती

बुटींग मॅडम आल्या,... "सविता कुठपर्यंत आलं तुझं बुटीक च काम?" ,

सविताने आधीच बुटीक मध्ये सांगितलं होतं ती आणि रूपा बुटिक सुरू करणार आहेत त्यानंतर तिथला जॉब सोडणार होती

"आत्ताशी गाळा भाड्याने बघितला आहे",.. सविता

"तुला टेलर लागत आहेत का",.. मॅडम

" हो लागत आहेत मॅडम",.. सविता

"हे आपले टेलर काका आहेत ना त्यांचा भाऊ हे काम करू शकतो तू त्यांच्याशी बोलून बघ",.. मॅडम

"हो चालेल मॅडम",.. एक मोठा प्रश्न मार्गी लागलेला होता सविताने रूपाला फोन करून टेलर बद्दल सांगितलं

" तु फिक्स करून टाक त्यांना सविता",... रूपा

"चालेल मी बोलून घेते त्यांच्याशी मग कळवते तुला",..सविता

" ठीक आहे",. रूपा

सविताने टेलर काकांशी बोलून घेतलं, त्यांच्या भावाचा नंबर होत, त्यांनी लगेच भावाला फोन लावला, त्यांच्याशी पण बोलणं झालं,

"आम्ही सांगू तेव्हा तुम्ही तुमचे शिवण्याचे पॅटर्न डिझाईन घेऊन भेटायला याल का? ",.. सविता

त्यांनी होकार दिला...

टेलर काकांच हि ठरल होत आता, सविताने सगळे डिटेल्स रूपाला पाठवून दिले

सविता घरी आली तिचा चेहरा उतरलेला होता, आई बाबा सुलभाताई पुढे बसून गप्पा मारत होते, सविताने आल्यावर लगेच चहा ठेवला, चहा घेऊन ती पुढे आली

" काय झालं ग सविता एकदम शांत वाटते आहेस",.. बाबा

" काही नाही बाबा",.. सविता

"काही बोलायचं आहे का तुला आमच्याशी मोकळ्या पणा ने सांग ",.. बाबा

" हो बोलायचं आहे बाबा",.. सविता

"काय झालं? काही झालंय का तिकडे बुटीक ला",... बाबा

" आई-बाबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे",.. सविता

सुलभाताई ऐकत होत्या, आईंना माहिती आहे, मनू आली तेवढ्यात क्लास हुन, ती आत जात होती, सविताने मनूला ही बोलवुन घेतलं,

"आई-बाबा मनु मी आत्ता तुम्हाला जे सांगते ते तुम्हाला काही वेळेस पटणार नाही, तर तुमचं जे मत असेल ते तुम्ही मला स्पष्ट सांगा उगाच, मला जे आवडेल तेच तुम्ही बोलू नका",.. सविता

" ठीक आहे बोल तर खरी आधि काय झालं आहे ते",.. बाबा

" बाबा सागरने मला लग्नासाठी विचारलं आहे त्याच विचारात आहे मी काय करू ",.. सविता

" एवढंच ना या गोष्टीसाठी टेन्शन घ्यायची गरज नाही मला तर वाटलंच होत आधीपासून की सागर नक्की तुला लग्नाबद्दल विचारलं सागर चांगला मुलगा आहे काही हरकत नाही पुढे जायला",.. बाबा

सविता आईकडे बघत होते आईच्या डोळ्यात खूप आनंद होता,.." सागरला लहानपणापासून बघितला आहे ग मी पण तो आधी काही बोलला नाही, नाहीतर आपण तेच स्थळ केलं असतं",..

मग आईच्या लक्षात आलं सुलभाताई तिथेच होत्या..

" मला माफ करा सुलभाताई मी आत्ता असं बोलायला नको होतं",.. आई

" तुम्ही कशाला त्रास करून घेत आहात ताई कुठल्याही आईला असं वाटेल की आपली मुलगी सुखी राहावी, त्यात मला काही वाईट वाटलं नाही ",... सुलभा ताई

" तुम्ही अशा कशा आहात ताई खूप चांगल्या" ,..आई

"हो ना मला पण तेच आश्चर्य वाटतं की माझा मुलगा सतीश असा का निघाला, आमचे हे ही खूप समजूतदार आणि चांगले होते ",.. सुलभा ताई

सविता ला आईबाबांचा तर होकार होता, ती आता मनु कडे बघत होती मनूने पुढे होऊन आईला मिठी मारली

" आई मला सागर काका आवडतो, काही हरकत नाही, तुला जर सागर काका सोबत राहायचं असेल तर, तुलाही खूश राहण्याचा अधिकार आहे, त्यात एवढं का टेन्शन घेतलं होत, त्यादिवशी सागर काका आला होता ना त्या दिवशीच मला तो आवडला होता, किती चांगला स्वभाव आहे त्याचा, खूप आनंदी राहशील तू त्याच्या सोबत ",... मनु

एवढी छोटीशी मनु किती समजूतदार पणे घेत आहे सगळ सविताच्या डोळ्यात पाणी होतं

" काय झालं आहे सविता आता ",... आई

" किती चांगल्या पद्धतीने समजून घेतले तुम्ही सगळ्यांनी मला, आज मी सागर ला भेटले होते आम्ही दोघ कॉफी घ्यायला गेलो होतो, सतीश तिथे आमच्या मागे आला आमचं खूप भांडण झाले तिथे सतीश आता म्हणतो आहे की तो मला सहजासहजी घटस्फोट देणार नाही ",... सविता

" सगळ्यांचे चेहरे उतरले,असा काय करतो आहे सतीश, आधी तर त्याने तुला घराबाहेर काढलं ना",... सुलभाताई

" हो ना आई आधी त्यांनाच मी नको होते, आता जेव्हा मी माझ्या मनाने माझा जीवन साथी निवडते आहे तर तेही त्यांना आवडत नाही काय करू मी",... सविता

" तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको येऊ नको एवढं एक छान काम कर ",... सुलभा ताई

" पण मग घटस्फोटाच्या केसचा काय होईल",.. सविता

" देईल तो घटस्फोट, आता रागात असेल",... सुलभा ताई

"पण मला या सतीश च्या वागण्याचा खूप त्रास होतो आहे आता",.. सविता

होणारच त्रास..

सगळ्यांशी बोलून सविताला बरं वाटत होतं आता जे होईल ते होईल सगळ्यांना तर सांगितला आहे सागर बद्दल आणि सगळ्यांना सागर आवडतो त्यामुळे फार मोठा प्रश्न सुटला

सतीश च्या वकिलांनी सागरला फोन केला,..." आम्ही तयार आहोत आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट साठी, लवकरात लवकर ही केस संपवू आपण",..

"एकदा तुम्ही त्या सतीश ला विचारून घ्या ना वकीलसाहेब, आज दुपारीच भांडण झालं आमच, तर तो नाही म्हणतो आहे आता सहजासहजी घटस्फोट घ्यायला",... सागर

" त्यानंतरच बोलणं झाला आहे आमचं, त्यांनी तुम्हाला आणि सविता मॅडम सोबत बघितलं त्यामुळे ते चिडले होते",... वकील

" आता सतीश ला जसं आवडतं तस वागणार आहोत का कायम आम्ही? त्यात त्याला राग यायचा काही प्रश्न नाही, पहिली गोष्ट त्याने आमच्या मागे यायचं काही कामच नव्हतं, उगाच तिथे हॉटेलमध्ये त्यांनी तमाशा केला, यापुढे जर सतीश ने आम्हाला डिस्टर्ब केलं तर आम्ही त्याची रीतसर पोलीस कम्प्लेंट करू, हे तुम्ही सतीश ला सांगून द्या ही फर्स्ट अँड लास्ट वेळ होती",... सागर

" ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका मी त्यांना समजावून सांगतो ",... वकील

" कधी ची तारीख ठेवायची आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट साठी? ",... सागर

" दोन-तीन दिवसात तारीख ठेवु या का",... वकील

" ठीक आहे, सध्या तरी या केस पेक्षा काहीही महत्वाच नाही", ... सागर

सागर ने सविताला फोन करून सांगितलं,..." लगेच दोन-तीन दिवसात आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट साठी डिव्होर्स केसची तारीख निघाली आहे, ठीक आहे ना लवकर साॅल्व्ह होईल केस ",

" पण सतीश रागावलेला होता ना? तो तर बोलला ना कि मी तुला सहजासहजी घटस्फोट देणार नाही?, मग कसा काय तयार झाला",... सविता

"तो फक्त तुझ्या समोर मोठ्याने बोलतो, बाकी इतर लोक भेटले की तो नॉर्मल असतो, दहा मिनिटात नीट झाला तो, आणि आपण अजून टेन्शन घेतो आहोत, हेच सांगतो आहे मी सविता तू तुझा विचार कर, इतर टेंशन घेवू नकोस ",.... सागर

" चांगला आहे चला आता होऊन जाईल घटस्फोट",.. सविता

"तू आता कुठल्याही गोष्टीचा टेन्शन घेऊ नको सविता आपल्याला वाटतात तेवढे प्रॉब्लेम मोठे नसतात",..सागर

" ते तुमच्यासाठी पुरुषांसाठी बायकांसाठी प्रत्येक नियम वेगळे असतात, पुरुषांशी बोलताना सगळेजण घाबरून बोलतात तेच बायकांचा नंबर आला की प्रत्येकाला वरचढ बनायचं असतं ",.. सविता

" तुम्हीपण बोला कि मग वर आवाजात, अश्या खराब माणसांना अशी त्यांची जागा दाखवायची असते ",.. सागर

" किती आणि कोणा कोणाशी आम्ही बोलणार आहोत वर आवाजात, सगळ्यांनाच आम्हाला कमी समजायचं असतं, सागर तुझ्यासारखे खूप कमी पुरुष असतात ज्यांना अजिबात अहंकार नसतो, दुसऱ्यांना द्यायचं असतं ते फक्त प्रेम, बाकी तर इतर पुरुषांना नेहमी दुसऱ्यांना पायाखाली चीरडायचं असतं, जाऊ दे, पण तू खूप छान बातमी दिली आहेस, आज दुपारी तर मला असं वाटलं होतं माझा आता घटस्फोट होतो की नाही",... सविता

" असा कसा झाला नसता घटस्फोट, मी बघितलं असतं ना त्या सतीश कडे चांगलं ",.. सागर

" माझं तरी बर आहे की मला सपोर्ट ला तू आहे बाकीच्या स्त्रियांचा काय होत असेल ज्यांचे कोर्टकेस सुरु असेल अगदी नको-नको झालं असेल त्यांना",.. सविता

" बर काय काय सांगायच आहे कोर्टात? आपण बोललो नाही दुपारी, त्या सतीश ने गोंधळ घातला ",.. सागर

" सतीश ने सही केलेले पत्र आहे माझ्या कडे की तो मनूच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे, हे पत्र कोर्टात द्यायच आहे ",.. सविता

" हे पत्र कस मिळाल ",.. सागर

"सचिन सरांनी लिहून घेतल ते सतीश कडून, मग त्याला ऑफिस च लेटर दिल ",.. सविता

" हे काम फार छान झाल, सतीश ला थोडा सुद्धा त्रास नको का",.. सागर

" बरोबर आहे भरपूर आहे सेव्हिंग सतीश च ",.. सविता

" आपण आहोत खंबीर मनु साठी तस, त्या सतीश ची काही गरज नाही ",.. सागर

" हो ते आहेच, तरी करू दे सतीश ला खर्च ",.. सविता

सागर ने फोन ठेवला

चला आता बर्‍याच गोष्टी झाल्या होत्या, आता घटस्फोट ही होईल, सविता विचार करत होती काय कराव सागर च? आमच्या लग्नाच? , खरं वाटत नाही मला की माझ लग्न होणार आहे, सविता खुशीत होती....

🎭 Series Post

View all