मी काट्यांतुन चालून थकले... भाग 17

किती छान विचार करते आहेस तू सविता, तसं पाहिलं तर तुला रमेश चा सपोर्ट आहे, तरीसुद्धा तू त्याच्यावर अवलंबून न राहता स्वतः च्या कामाचा विचार करते आहेस, मला आवडला तुझा विचार, अशीच छान प्रगती कर",... सागर



मी काट्यांतुन चालून थकले... भाग 17

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
...........


सतीश घरी आला बराच वेळ तो शांत बसुन होता, घालवून बसलो मी सगळ, आईने माझ्या कडे यायला नकार दिला, सविता किती बोलली मला, सगळ्यांच ऐकुन घ्याव लागत आहे मला, ऑफिसची काय कट कट आहे, कधी होईल हा प्रॉब्लेम नीट, अगदी नको नको झाल आहे, पुढच पूर्ण आयुष्य कस होणार अस एकट्याने, त्याने ने सचिनला फोन केला

"सर माझी एक रिक्वेस्ट होती, मला मी कंपनी स्वतः हून सोडली अस लेटर हव होत, प्लीज तुम्ही मला काढला अस लेटर नका देवू, माझ खूप नुकसान होत आहे सर, मला पुढची नौकरी मिळणार नाही अश्याने, झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो तुमची, प्लीज सर ",... सतीश

"ठीक आहे बघु, तू पुढे कसा वागतोय त्यावर अवलंबून आहे हे, जर तू या पुढे घरच्यांना त्रास देणार नसशील तर देईन मी तुला अस लेटर ",.. सचिन

" नाही देणार मी त्रास ",.. सतीश

" मनु च्या शिक्षणाचा खर्च उचल तू, तस लिहून दे",.. सचिन

" ठीक आहे सर पण त्या साठी मला नौकरी हवी ना ",.. सतीश

" सोमवारी येवून घेवून जा ते पत्र",.. सचिन

" सर मी माफी मागतो तुमची, ती केस मागे घ्या ना ",.. सतीश

"आता मी बिझी आहे नंतर बोलू ",.. सचिन साहेबांनी फोन ठेवून दिला

चला एक काम तर झाल आता नवीन नौकरी शोधावी लागेल, माझे डॉक्युमेंट कुठे आहेत, सगळ सविता ला माहिती असायच, किती नीट ठेवायची ती सगळ, बघतो आता कपाटात, कपडे किती घाण झाले 5-6 दिवस झाले धुतलेले नाहीत, इस्त्री नाही, घरात बरच काम असत ह, बापरे कधी आवरणार माझ्या कडून सगळ

पूर्वी अस इंटरव्यू ला जायचं होतं मला एकदा एका ठिकाणी, पांढरा शर्ट हवा होता मला, धुतला होता तो सविताने पण एका जागी थोडा भाजीचा डाग राहून गेला होता, तिच्या सात पिढ्यांचा उद्धार मी केला होता तेव्हा, नाही नाही ते बोललो होतो तेव्हा मी तिला, नवीन शर्ट चे पैसे काय तुझा बाप देणार आहे का? दिवसभर काय करत असते तू घरात? साधे कपडे धुता येत नाहीत का? नसेल होत काम तर निघायच इथून, माझ्या काहीही कामाची नाही आहे ही....

आता सविता खरंच नाही आहे घरी, आपल्यालाच कराव लागेल कपड्याचं काम, सतीश कामाला लागला..
.............

दुपारी लंच ब्रेक मध्ये रूपाचा फोन आला.. "मी येते आहे संध्याकाळी घरी, चालेल ना?",..

"हो मग का नाही चालणार?, रूपा जेवायला ये, सचिन सर यांनाही घेऊन ये",.. सविता

" मी विचारते सचिनला पण मी तर नक्कीच येणार आहे, भेटू मग आपण संध्याकाळी",.. रूपा

" चालेल ",.. सविता

चार वाजता सविता निघाली बुटीक हुन, तिने घरी जाता जाता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी सामान घेतलं, मस्तपैकी पुरी बटाट्याची भाजी, मसाले भात, कोशिंबीर, बासुंदी असा बेत करणार होती ती, घरी आली आधी घर आवरलं,

"आई आज रूपा आणि सचिन सर जेवायला येणार आहेत, मी लागते स्वयंपाकाला, म्हणजे ते लोक आल्यावर जरा बसून बोलता येईल" ,.. सविता

रूपाने फोन केला,..." सचिनही येतो आहे, पण तो उशिरा येईल, तू थांब माझ्या साठी मी करू लागेल स्वयंपाक, तेवढ मला दोन पदार्थ शिकायला मिळतील ",

" हो चालेल तू ये लवकर रूपा",.... सविता

रूपा येईपर्यंत सविताचा स्वयंपाक झाला होता, फक्त पुऱ्या करायचे बाकी होत्या,

मनू आली क्लास हुन,... "कोणी येणार आहे का आई आज घरी, मस्त वास येतो काय बेत आहे ",

" हो सचिन सर आणि रूपा मॅडम त्या येणार आहेत, आम्ही दोघी मिळून बुटीक च काम सुरू करणार आहे ना त्या संदर्भात बोलायला त्या येणार होत्या तर मीच म्हटलं की घरी या मस्त जेवायला",.. सविता

" अरे वाह छान, ते सर मॅडम खूप छान आहेत ",.. मनु

संध्याकाळी रूपा आली,..." घर खूपच छान आहे सविता, आणि घरात खूप छान वास येतो आहे, माझ्यासाठी का नाही थांबली स्वयंपाक करायला? आपण पार्टनर आहोत ना ",

" अगं रूपा तुला आवडतो ना माझ्या हातचा स्वयंपाक म्हणून करून घेतला स्वयंपाक आता आपल्याला छान बोलता येईल, आणि पुर्‍या करायच्या बाकी आहे तेव्हा तू मदत कर",.. सविता

दोघीजणी पुढच्या खोलीत येऊन बसल्या, रूपाने मनू साठी छान ड्रेस आणला होता गिफ्ट, मनुला खूप आवडला ड्रेस, सुलभाताई बाहेर येऊन बसल्या, छान वातावरण झाल होत सगळीकडे

" आता कसं करू या आपण सविता? तू ऑल रेडी बुटीक मध्ये काम करते ना? ",.. रुपा

"हो.. आपल जेव्हा बुटीक सुरू होईल तेव्हा मी ते काम बंद करेल, आता मी अनुभव घेते आहे तिकडे",.. सविता

" ठीक आहे, ते ही गरजेच आहे, कसं करूया आपण सचिनच्या ओळखीने चांगल्या एरियात एक गाळा मिळतो आहे भाड्याने, इथून जवळ आहे, सध्या तरी तो घेऊ आपण, काही रेडीमेड ड्रेस ठेवू, काही ड्रेस मटेरियल ठेवू, एक दोन मशीन आणून घेऊ, एक-दोन टेलर लागतील,.. रूपा

" मी आहे ना शिवण काम करायला",.. सविता

" तू ड्रेस डिझाईन करणार आहेस, कसं काम करायचं ते तू त्या टेलर असतील त्यांना दाखवून द्यायचं, उगीच तु कपडे शिवत दमत बसण्यापेक्षा वेगवेगळ्या डिझाईन तयार करू शकते",.. रूपा

" मी असा विचार केलाच नव्हता कधी रूपा, हाच फरक असतो, तू शिकलेली आहे, खूप हुशार आहेस, साधारण किती खर्च येईल या सगळ्या गोष्टी ला",... सविता

" आता तू खर्चाचा विचार करत बसू नको सविता",.. रूपा

"जो खर्च होईल तो आपण अर्धा वाटून घेऊ",... सविता

" हो बघू पुढच्या पुढे सविता, आतापासून त्याचं टेन्शन नको, सध्या तू आता डिझाईन तयार करायच काम कर, वही घेऊन छान डिझाईन काढून ठेव, सध्या लेटेस्ट काय ट्रेंड आहे त्याचा अभ्यास कर ",.. रूपा

" मला एक बोलायचं आहे, तुम्ही तुमच्या बुटीक मध्ये ज्वेलरी पण ठेवा इतर एसेसरीज पर्स वगैरे पण ठेवा, छान चालतील",.. मनू

" मनु बघितलं का म्हणून किती हुशार आहे ते, तिला बरोबर माहिती आहे लेटेस्ट ट्रेंड, तुझी मदत होईल आम्हाला ",... रूपा

सविता, सुलभा ताई मनु कडे कौतुकाने बघत होत्या

रूपा आणि मनु ची गट्टी जमली होती, जरा वेळाने सचिन आला, त्याने मिठाई आणली होती सोबत

सविता ने पाणी दिल

" मला माफ कर सविता माझ्या मुळे तुला सतीश कडून बरच काही ऐकाव लागल, मी येत राहणार इथे तुमच्यात, कोणी काही बोलाल तरी मला फरक पडत नाही ",.. सचिन

" माफी तर आम्ही मागायला हवी, खूप विचित्र आहे सतीश, नशीब काही गैरसमज झाला नाही ",.. सविता

"मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे, पण आपले संबंध खराब नको व्हायला आपण भेटत राहू",.. सचिन

"हो नक्की एवढे हुशार मित्र मैत्रिणी हवे आहेत मला, तुमचा दोघांचा आधार वाटतो ",.. सविता

सुलभा ताई तिथे बसल्या होत्या, सचिन जावून त्यांना भेटला,

सुलभा ताईंनी हात जोडले,..." माफ करा सचिन साहेब तुमच्यावर सतीशने काही पण आरोप ठेवले ",

" काकू सगळ विसरायचं आता, आणि तुमचा काय दोष तुम्ही का माफी मागताय, मी हे बोलायला इथे आलो नाही तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका, आणि मला सचिन बोला, आपण सगळे छान आनंदाने नवीन प्रोजेक्ट बद्दल ठरवायला जमलो आहोत, कुठलाच विचार करायचं नाही",..सचिन

" बरोबर आहे आपण आता प्रगतीचा विचार करायला पाहिजे, आणि काकू आम्हाला आहो वगैरे म्हणू नका ",.. रूपा

सगळे जेवायला बसले

," सविता किती छान बेत झाला आहे आज ही, सविता सोबत खर तर हॉटेल चेन टाकायला पाहिजे" ,... रूपा

"खरं आहे हाताला काय चव आहे सविता तुझ्या, एका व्यक्तीत किती गुण आहेत ",.. सचिन

" काहीही ह किती माझी तारीफ तुम्ही लोक उगीचच मला हरभर्याच्या झाडावर चढवत आहात",... सविता

" नाही ग सविता एकदम शंभर टक्के खरे आहे हे,जर तुला हे सगळं खोट वाटलं तर तू मनु ला सुलभा काकूंना विचार",.. रूपा

सविता छान हसत होती, एखाद्या व्यक्तीला माझ्यात सगळे गुण दिसतात आणि एखाद्या व्यक्तीला माझे सगळे दुर्गुण दिसतात, जी व्यक्ती जवळची असते तीच आपल्याला नीट ओळखू शकत नाही, खरं तर हे प्रेम आणि कौतुक सतीश कडुन अपेक्षित होतं, पण ते त्याने कधी मला दिलच नाही आणि हे जे बाहेरचे लोक आहेत ते किती चांगले आहेत अगदी जगण्याला उभारी देतात, त्यांच्यासोबत राहून असं वाटतं खरंच आपण हुशार आहोत, चांगली साथ मिळाली आहे मला या दोघांची, मी पण आता चांगलाच विचार करणार, सतीश चा विचार सोडून द्यायला पाहिजे, त्यात काही प्रगती नाही

छान जेवण झालं, सगळे गप्पा मारत बसले,

" कुठे पर्यंत आला आहे तुमचा प्लॅन?",.. सचिन

रूपाने सगळा प्लॅन सांगितला

" खूप छान आहे विचार, सुरुवातीला सविता तुला जास्त वेळ थांबावं लागेल बुटीक ला, नंतर आपण तिथे एखादा मॅनेजर नेमु",... रूपा

हो चालेल...

"आपण पुढच्या आठवड्यात ही सगळी कामं सुरू करू",.. रूपा

" हो आणि पैशाचं काय आहे ते पण मला सांग" ,... सविता

" हो नक्की सांगू सविता मी तोपर्यंत ते डिझाईन अन ते सगळे रेडी कर",.. रूपा

सचिन आणि रूपा निघाले घरातुन, सविता बाहेर पर्यंत जाऊन त्यांना सोडून आली, घरी सुलभाताई मनु ला ही खूप आनंद झाला होता, छान सगळ ठरत होतं बुटीकच, सविताला एक छान प्रकारचा आत्मविश्वास येत होता, आपलेही काम आता सुरू होत आहे, तिला पूर्ण माहिती होतं की सचिन आणि रूपा तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, आपणही आता यात व्यवस्थित काम करून प्रगती करून दाखवायची, आपल्यालाही मन रमवायला जागा पाहिजे कुठे आणि घर चालला पाहिजे, पुढे जाऊन मनूचा खर्च वाढणार आहे, त्याची सोय आत्तापासूनच करायला पाहिजे,

सविता ने आत मध्ये येऊन फोन बघितला तर सागर चा मेसेज आलेला होता

" आज दिवसभर काही फोन नाही मेसेज नाही काय चाललं आहे",.. सागर

उगीच मेसेज करण्यापेक्षा तिने सागर ला फोन लावला

"काय चाललं आहे सविता आज खूप बिझी वाटतं मॅडम",.. सागर

" आज आमच्या कडे रूपा मॅडम आणि सचिन सर आले होते, माझ्या बुटीक च काम जवळजवळ ठरलेलंच आहे, मला खूप आनंद होतो आहे सागर, म्हणून मी तुला फोन केला ",... सविता

"अरे वा तुझं खूप अभिनंदन, कुठे घेतल आहे शॉप, चला आता आमच्या मॅडम एकदम बिझी असणार आहेत, मजा आहे बुवा ",.. सागर

" काहीही काय रे सागर",.... सविता छान हसत होती, अजून गाळा भाड्याने घेणार आहोत, तस काही ठरलं नाही आमच , रूपा बघते आहे, तिने एक-दोन ब्रोकर्स ला कॉन्टॅक्ट केला आहे, लवकरच सुरू होईल आमचं काम, सागर आज मला खूप आनंद होत आहे, काहीही करून मला पटकन काम सुरू करायचं होतं, मनु आता दहावीत आहे, पुढच्या वर्षापासून तिचा खर्च सुरू होईल, आता जर काम सुरू केलं तेव्हा एक दोन वर्षात जम बसेल",

" किती छान विचार करते आहेस तू सविता, तसं पाहिलं तर तुला रमेश चा सपोर्ट आहे, तरीसुद्धा तू त्याच्यावर अवलंबून न राहता स्वतः च्या कामाचा विचार करते आहेस, मला आवडला तुझा विचार, अशीच छान प्रगती कर",... सागर

" अरे रमेश दादा ला पण त्याचा संसार आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, किती दिवस मी त्यांना त्रास देणार आणि हे बुटीकच काम माझ्या आवडीचं काम आहे",.. सविता

"काही लागलं तर सांग मी मदत करीन तुला",... सागर

"हो नक्की, तू एक तर आहेस तुला माझ्या मनातल्या गोष्टी सांगू शकते मी सागर ",.. सविता

" मी आहे तुझ्यासाठी, मी करेन मदत पण नंतर तुला माझे पैसे व्याजासकट परत करावे लागतील",... सागर छान हसत होता

" हो रे सागर काही लागलं तर नक्की सांगेन आणि तुझी फि किती ते आधी सांग, ते पैसे तू अजून घेतले नाहीयेस अजून ",.. सविता

" घेणार आहे मी तेही पैसे, रमेश ला सांगितली आहे मी फी तू विचारून घे, तू आधी मला जेवायला कधी बोलवते आहेस ते सांग, सगळे बोलतात छान स्वयंपाक करतेस तू ",.. सागर

" नक्की ये तुला जेव्हा यायचं तेव्हा घर तुझंच आहे",.. सविता

" आपली केस पण लवकरच उभी राहणार आहे कोर्टात, तारीख एक-दोन दिवसात आहे त्या केस संदर्भातच मला तुला भेटायचं आहे आपण उद्या भेटूया का ",.. सागर

" चालेल काही हरकत नाही, उद्या भेटू या ",.. सविता

सागरला तसा मनातून खूप आनंद होत होता, सविताला कधी भेटू असं झालं होतं त्याला, आज बर्‍याच दिवसांनी त्याच्या एकट्या घरात तो खुश होता,....
...


काय असेल सविता च्या मनात, एकदम जवळचा वाटतो आहे तिला सागर, बघू पुढे काय होतय ते....

🎭 Series Post

View all