मी काट्यांतुन चालून थकले... भाग 16

सविता अजून त्याच विचारात होती सतीश ला आत नव्हत येवू द्यायला हव होत, या पुढे अशी चूक करायची नाही, आई मनु घाबरून गेल्या होत्यामी काट्यांतुन चालून थकले... भाग 16

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
...........

सविता आई कडून आली, आईला बर वाटत होत, सतीश खाली उभा होता, आता हा का आला आहे इथे? उगीच सगळ्यांसमोर तमाशा ?

सविता गेट जवळ आली, सतीश आला तिच्याशी बोलायला,.. "सविता मी एक मिनिट आत येवू का? मला आई ला भेटायच आहे",..

सविता काही बोलली नाही, सतीश सविता आत आले, सुलभा ताई सतीशला बघून दचकल्या, सविता आत गेली तिने पाणी आणल, सतीश एवढ छान घर स्तब्ध होवुन बघत होता, हे घर आपल्या घरापेक्षा किती छान आहे, मोठ ही पॉश एकदम, कुठून आणला असेल एवढा पैसा, रमेश ने केली का मदत?, आधी तर काही पाच रुपयाची ही कधी मला मदत केली नाही त्याने

"चहा करू का ",.. सविता

" हो कर",.. सतीश

" जे बोलायच असेल आईंशी ते लवकर बोला आणि निघा",.. सविता आत चालली गेली,

पुढच्या खोलीत सतीश सुलभा ताई दोघ होते,... "आई घरी येतेस का माझ्याकडे?, चल ना घरी, फोन वर का एवढी चिडली होतीस तू माझ्या वर ",

"मी तुला या आधी नाही सांगितल आहे, मी येणार नाही, मी सविता.. मनु जवळ राहीन",.. सुलभा ताई

"आई काय अशी करतेस? , माझ्या कडे बघ किती हाल आहेत माझे, घरात कोणी नाही, घर खायला उठत ग",... सतीश

"हे सगळ तुझ्या मनाप्रमाणे सुरू आहे ना, तू स्वतः करुन घेतले आहेत तुला हव तस, आम्हाला घराबाहेर काढून, आता तू आनंदी असायला हव ",.. सुलभा ताई

" राग सोड आई, अस करु नकोस",... सतीश

" तू इथुन जा सतीश, या पुढे इकडे येवू नकोस मला भेटायला ",... सुलभा ताई

सविता चहा घेवून आली..

सतीश तिच्याशी बोलणार तेवढ्यात ती परत आत निघून गेली

सतीश ने चहा घेतला

" किती आहे घरभाडे या घराच? सविता ला एवढा आहे का पगार?, कोण करतंय मदत ",.. सतीश

" तुला त्याच्याशी काही देण घेण नाही सतीश, आता तरी स्वभाव बदल, आम्ही काहीही करू तुझा काय संबध, आणि तू सविता वर घाणेरडे आरोप केले होते, शोभत का तुला अस वागण? , तुला माहिती नाही का सविता कशी आहे ते, ती तुझा योग्य तो मान ठेवते तू मात्र तिचा अपमान करतोस, तू जा बर वापस एकदा जरी तू भेटला तरी चिडचिड होते माझी ",.. सुलभा ताई

मनु आली क्लासहून,...." अरे वा बाबा शेवटी तुम्ही घरात आत यायला सक्सेसफुल झालात, भेटली का आजी? ",

" मनु अगं तू तरी आजीला समजाव की माझ्याबरोबर चल घरी ",.. सतीश

" काय करेल आजी तुमच्या घरी येऊन? तुम्हाला काय माहिती आहे आजीबद्दल? आजीला कसला त्रास आहे? आजीला काय आवडतं जेवायला? तिला कुठल्या गोळ्या सुरू आहेत? किती वेळा आजी गोळ्या घेते? कशी काळजी घेणार आहात तुम्ही आजीची? डॉक्टर कडे कधी असते विझीट? हे सगळ आईला माहिती आहे, आजीला येथेच राहू द्या बाबा तुम्ही, तुम्हाला नाही जमणार आजीची काळजी घ्यायला",.मनु

सतीश उठला, मी निघतो आता,

सविता बाहेर आली नाही

" सविता मला तुझ्याशी बोलायचं आहे",.. सतीश आवाज देत होता

सविता सतीश बाल्कनी आले

" पुरे झाल सविता आता भांडण, आपण सगळ विसरून एकत्र नाही का येवू शकत",.. सतीश

" नाही खूप उशीर झाला आता या सगळ्या गोष्टीला, मला माहिती आहे यात ही तुमचा काही तरी स्वार्थ आहे ",.. सविता

" नाही मी अगदी मनापासून बोलतो आहे, सगळ आपल्या हातात आहे आपण म्हणू तर केस तयार होईल, आपण म्हणून तर केस कॅन्सल करून एकत्र राहू शकतो",.. सतीश

" नाही सतीश मला आता असं काहीही करायचं नाही, एकदा माझा डिसिजन झाला आहे परत त्याच त्याच भांडणात मला पडायचं नाही",... सविता

" कशावरून पुढे जाऊन भांडण होतील सविता, माझा विचार कर जरा, मी कसा राहतो आहे आई मनु तुझ्या शिवाय ",.. सतीश

" कशावरून आपण नीट राहू सतीश, आता मला तुमच्याशी कोणते ही संबंध ठेवायचे नाहीत समजून घ्या आणि जा बर इथून ",.. सविता

" मी शब्द देतो तुला सविता, यापुढे तू म्हणशील तेच करू आपण, मी बदललोय ग ",.. सतीश

" ते जमणार नाही सतीश, अस माणूस दोन दिवसात बदलू शकत नाही, आम्ही सुखी आहोत इथे, तुम्ही येऊ शकता यापुढे मला भेटले नाही तरी चालेल ",.. सविता

" ते एकदाच माफीनामा लिहून दे ना, मला खूप पस्तावा होतं आहे झाल्या प्रकाराचा, मी अस नव्हत बोलायला पाहिजे होत तुला",.. सतीश

" नाही मला ते जमणार नाही, मी माफीनामा लिहून देणार नाही, तुम्ही या आता नाही तर मी वॉचमन ला बोलवु का ",.. सविता

" सविता तुला समजत नाही का माझी नोकरी जाऊ शकते",... सतीश मोठ्याने ओरडत होता, मनु सुलभा ताई दोघी घाबरल्या

या वेळी सविता शांत होती,.. "मग बोलण्याच्या आधी विचार करायचा, किती त्रास दिला तुम्ही आम्हाला, आताही किती मोठ्याने ओरडता आहात तुम्ही, होऊ द्या ना तुम्हाला पण थोडा त्रास, निघा आता, तुम्हाला घरात बोलवून चूक केली मी",.

" तुला काहीच वाटत नाही का माझ्याविषयी",.. सतीश

"नाही वाटत",.. सविता

"म्हणजे तुझ माझ्यावर कधी प्रेम नव्हत ",.. सतीश

" तुम्हाला जे समजायचा ते समजा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाही",... सविता

" मी माफीनामा घेतल्या शिवाय इथून जाणार नाही",.. सतीश

" ठीक आहे मग मी पोलिसांनी फोन करते आहे की आमच्या मना विरुद्ध तुम्ही आमच्या घरात घुसला आहात, आणि इथे गोंधळ घालता आहात ",.. सविता ,

सतीश रागाने सविता कडे बघत होता...

" आता अस रागाने बघून काही उपयोग नाही, कोणीही घाबरणारा नाही तुम्हाला, तस पूर्वी ही घाबरत नव्हते मी, पण अस वाटायचं घरात शांती हवी म्हणून आम्ही माघार घ्यायचो, आणि पत्ता माहिती आहे म्हणून सारख इकडे आलात तर पुढच्या वेळी मी सोडणार नाही तुम्हाला, सरळ पोलिसात देईल, इकडे येवू नका या पुढे ",.. सविता

सतीश गेला मनु ने हे दार लावून घेतलं...

सतीश विचार करत होता साधारण सहा महिन्यापूर्वी अस झाल होत, किती चिडलो होतो मी सविता वर, मी सांगितलेल ऐकत नव्हती सविता, काहीतरी काम होत, किती हट्टाने गरज नसतांना तिच्या कडून मी ते काम करून घेतल होत, किती बोललो होतो मी तिला वर दोन दणके ही ठेवून दिले होते, किती विनवण्या करत होती ती की अस करु नका हो, मी माझ्या रूबाबात होतो, अजूनही थोड मना विरुद्ध झाल की माझा कंट्रोल जातो चीड चीड होते माझी, आता सविता ऐकणार नाही, मला एकट रहाव लागेल बहुतेक, विचार करत सतीश घरी आला
...........

"आई तू यापुढे बाबांना घरात नको बोलवत जाऊ, मला वाटल आजही भांडण होत की काय, भीती वाटते ग",.. मनु

" हो बरोबर बोलते आहेस तू मनु, माझी चुकी झाली, यावेळी मला असं वाटलं होतं की यांना आईंना भेटायचं असेल, पण यांचा वेगळाच रुबाब सुरू झाला, यापुढे नकोच ते घरात",.. सविता

" हो सविता अजिबात सतीश ला घरात घेत जाऊ नकोस",.. सुलभा ताई

" तुमच्या साठी विचार केला होता मी आई",.. सविता

" मला वाटल तर भेटून येईन मी त्याला तिकडे जावून तू काळजी करू नकोस",.. सुलभा ताई

..........

रमेशने सागरला फोन केला,.. "झाली वाटतं ना केस फाईल कोर्टात",

"हो झाली आहे, आज त्या सतीशला नोटीसही गेलीत असेल, सविता आली होती का तिकडे?",. सागर

"हो आईला भेटायला आली होती ती, तिने ने सांगितलं मला, अजून एक या केसचे किती पैसे झाले, किती आहे फी ते बोललो नाही आपण, मला सांग, सविताला सांगू नको, मी देईन फी " ,.. रमेश

"हो रे फी फी करू नका तुम्ही भाऊ बहीण, तुला काही सांगणार नाही सविताला ही सांगणार नाही",..सागर

" का रे बाबा असं करतोस, नको का तुला पैसे, छान च की ",.. रमेश

" आपण बालपणीचे मित्र आहोत, तुमच्याशी काय व्यवहार करायचा",.. सागर

" अरे वा छान झालं की मग हे बिना पैशात इतका चांगला नामांकित वकील मिळाला, तुला तुझ्या ऑफिसच्या स्टाफला पेमेंट द्यायचा नाही वाटत ",.. रमेश

" नाही रे, माझ ही काही काम आहे तुमच्याकडे, माझा स्वार्थ आहे त्यात ",.. सागर

"काय सांग ना ",.. रमेश

" वेळ आल्यावर सांगेन",.. सागर

" अरे आत्ताच बोल काही प्रॉब्लेम आहे का? ",.. रमेश

" तुझा फोन कोणी ऐकत नाही ना ",.. सागर

" नाही थांब एक मिनिट मी बाहेर येतो ",.. रमेश

"बोल रे आता मी बाहेर आलो आहे काय झालं एवढं",.. रमेश

" घाबरण्यासारखं काही नाही, मला तुझ्याशी थोडं सविता बद्दल बोलायचं आहे ",.. सागर

" काय झालं",.. रमेश

" तुला तर माहिती आहे सविता आणि मी एका वर्गात होतो, मला आधीपासून सविता विषयी काही वाटत होतं, मला आवडते ती ",.. सागर

" हो मला तू पुर्वी पण बोलला होता" ,.. रमेश

" आता सविता परत भेटली, मला खूप आनंद झाला आहे, तिचा घटस्फोट झाल्यानंतर मी बोलू का तिच्याशी परत, तुझं काय मत आहे, तुला राग तर येत नाही ना मी तुझ्या बहिणीबद्दल तुझ्याशी असं बोलतो ",.. सागर

" नाही सागर राग कसला येणार आहे मला, मी विचार करतो आहे असं झालं तर किती चांगलं होईल, तुम्ही दोघ आधीपासून एकमेकांना ओळखतात, माझ्या बहिणीला तिच्या आयुष्यात कधीच प्रेम मिळालं नाही, सतीशने नेहमी तिचा छळ केला आहे, जर तिच्या आयुष्यात इतका चांगला मनुष्य येत असेल तर माझी काय हरकत आहे, माझी बहिण खुश असेल तर मी आनंदी राहील, आणि मी ओळखतो तुला तू छान आहेस सागर ",.. रमेश

" तुला काय वाटतं आहे सविता हो म्हणेल का? ",.. सागर

" माहिती नाही मला पण तुमच्या दोघांच ठरल तर मला खूप आनंद होईल ",.. रमेश

" मी करतो आहे यावर विचार, काय करता येईल ते बघू , सविता ला ही राग नको यायला ती आणि मी खुश रहायला पाहिजे ",.. सागर

" पुढे कस करणार कधी बोलणार तू सविता शी",.. रमेश

" बघतो माझी हिम्मत होत नाही, तू मदत करशील का रमेश ",.. सागर

" ठरवू काय करता येईल ते, कोणाला बोलू नकोस तू ",.. सागर

" नाही ",.. रमेश

सागर ने फोन ठेवला..

रमेश आनंदात होता, सविता खुश रहायला पाहिजे, तिचा जोडीदार सागर सारखा समजूतदार मुलगा असला की किती छान होईल, पूर्वी बोलला असता सागर तर किती बर झाल असत, सविताच्या आयुष्यात सतीश सारखा खराब माणूस आला नसता, केवढा मोठा बंगला आहे सागर चा , ऑफिस ही पॉश, किती लोक आहेत त्याच्याकडे कामाला, स्वभावाने चांगला आहे तो सविता खुश राहतील सोबत मनुला माया मिळेल, नंतर बाबांशी बोलून बघतो मी
......

सविता अजून त्याच विचारात होती सतीश ला आत नव्हत येवू द्यायला हव होत, या पुढे अशी चूक करायची नाही, आई मनु घाबरून गेल्या होत्या, मनु च्या अभ्यासावर परिणाम नको व्हायला, आईंच्याही तब्येतीची काळजी घ्यायला हवी, आज मस्त पाव भाजी करू मनु साठी, तिचा मूड चांगला होईल

रात्री रूपाचा फोन आला,.. "कशी आहेस सविता, सुलभा काकू, मनु कसे आहेत?",.

"आम्ही मजेत आहोत रुपा, झाल का जेवण ",.. सविता

"हो झाल, काकू कश्या आहेत, मिळाला का डिस्चार्ज ",..रूपा

" हो आईला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला, मी गेली होती मी तिकडे घरी, भेटून आली",.. सविता

"आपण उद्या भेटू या का ",.. रूपा

हो चालेल...

" तुझ बुटीक किती वाजेपर्यंत असत ",.. रूपा

" दुपारी चार वाजेपर्यंत ",.. सविता

" ठीक आहे मग संध्याकाळी भेटू, मी कळवते तुला ठिकाण, आणि वेळ ",... रूपा

" हो चालेल... घरी ये नाहीतर रुपा पत्ता देते मी",.. सविता

" ठीक आहे, मी सांगते तुला तस, आम्ही ही सतीश वर केस केली आहे मिळाली असेल बहुतेक त्याला नोटिस",.. रूपा

" करायलाच हवी खूप चुकीच वागले ते, बोलतांना विचार करायला हवा होता त्यांनी ",.. सविता

" ठीक आहे मग भेटू उद्या ",.. रूपा

हो.. बाय
....

दुसर्‍या दिवशी सविता तयार होती,.." आई मी निघते, आज बहुतेक रुपा आपल्या घरी येणार आहे , ती येणार असेल तर खायला काहीतरी छान करू

"अरे वाह आपल्या कडे आले होते ते साहेब त्या मॅडम तेच ना",.. सुलभा ताई

" हो आई आम्ही दोघी मिळून बहुतेक काम सुरू करणार आहोत",.. सविता

"हो तिला तू शिवलेले ब्लाऊज तेव्हा खूप आवडले होते, चांगले आहेत ते लोक, करा सुरू छान काहीतरी ",.. सुलभा ताईंनी आशीर्वाद दिला
.......

सविता आता हळू हळू सेटल होते आहे, जर तिला सागर ची साथ मिळाली तर अजून सुखी होईल ती, काय वाटतय? , सविताने परत लग्न कराव का? तिला कधी सुखी संसार मिळाला नाही, प्रेम मिळाल नाही, आता तरी आनंदी राहायचा अधिकार आहे का तिला??

🎭 Series Post

View all