मी काट्यांतुन चालून थकले... भाग 15

आई आता काही प्रॉब्लेम नाही, मी सांगितलं खाली वॉचमनला, बाबांनाही सांगितला आईच्या परमिशन शिवाय तुम्ही आजीला भेटू शकत नाही, तू काहीच काळजी करू नको, तू जावून ये आजी कडे,


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 15

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
...........

सविता ने स्वयंपाक करून घेतला, सुलभा ताई आत आल्या फोन घेवून

"झाल का बोलण?, आई काय म्हटले सतीश? ",.. सविता

" मी त्याला नाही सांगितल, मी जाणार नाही तिकडे रहायला, मला तुझ्या सोबत.. मनु सोबत रहायच आहे ",.. सुलभा ताई

"आई तुम्ही नाराज नाही ना",.. सविता

"नाही ग सविता, माझ्या मुलाने मला कधी प्रेम दिल नाही, माझी काळजी घेतली नाही, तूच माझ सगळ करते, मी तुझ्या जवळ राहणार ",.. सुलभा ताई

सुलभा ताई पुढे जावून बसल्या, सविता आवरत होती

मनु आली किचन मध्ये,.. "आई काय केली भाजी आज?",..

"तुझी आवडती भाजी आहे , मेथी ची",.. सविता

"आई आज क्लास मध्ये परीक्षा होती ",.. मनु

" कसा गेला पेपर ",.. सविता

"चांगला गेला आई, आता माझा नवीन घरात चांगला अभ्यास होतो, छान शांतता आहे इथे",.. मनु

"मनु मला तुझ्याशी बोलायचं आहे थोड",.. सविता

"बोल ना आई ",.. मनु

" बेटा बाबा काय म्हणत होते? ",.. सविता

" ते म्हणत होते की काही तरी त्यांना माफीनामा हवा आहे, विचारत होते तुम्ही मामा कडे राहतात तर इतक्या लांब कशी आली शाळेत ",.. मनु

"हे बघ ते तुझे बाबा आहेत मला असं सांगणं योग्य नाही, पण मला असं वाटत आहे की तू जरा सांभाळून बोल त्यांच्याशी, दूर रहा त्यांच्यापासून, उगीच आपली माहिती देवू नकोस ",.. सविता

" हो आई मला माहिती आहे बाबा सेल्फिश आहेत, मलाही त्यांच्याबरोबर विशेष आवडत नाही आणि ते त्यांच्या कामापुरतेच माझ्याशी व्यवस्थित वागत होते काल, त्या आधी कधी नीट बोलले ते माझ्याशी, तू अजिबात काळजी करू नकोस, मलाही आता थोडे थोडे लोक कळतात",.. मनु

" तूला राग तर नाही आला ना मनु",.. सविता

" नाही आई मला कसला राग येईल, मला माहिती आहे तू किती सहन केलेल आहे, किती राग राग करायचे बाबा आपला, एकदा सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर हसू बघितलं नाहीये मी त्या घरात, तुला माझी काळजी वाटणारच",.. मनु

"बाबा भेटले तर सांग कि आई माफीनामा लिहून देणार नाही आणि मला परत भेटू नका",.. सविता

" हो आई मी तेच ठरवलं होतं, बाबांच वागण माफ करण्यासारख नाही आहे मुळी ",.. मनु

" कुठे जाऊ नको त्यांच्या सोबत ",.. सविता

नाही...

" मनु अजून एक, तू मोठी आहेस म्हणुन सांगते मी तुझ्या बाबांशी घटस्फोट घेते आहे, आज सागर आला होता तो ही केस बघतो आहे",.. सविता

" तू बरोबर करतेस आई, तुला त्रास होतो, तुझी लाइफ आहे, तुला नाही राहायच बाबांसोबत ठीक आहे तू निर्णय घे, मी कायम तुझ्या सोबत असेन, आणि आधीपेक्षा आपण आता खुश आहोत ",.. मनु

सकाळी मनु आवरून शाळेत गेली, सविता बुटिकला गेली, अकरा साडे अकरा झाले असतील सतीशच्या घराचा दरवाजा वाजला, त्याला कोर्टाकडून नोटीस आलेली होती, खाली सविताची सही होती, घटस्फोटाचे पेपर होते ते, सतीश डोकं धरुन बसला, त्याने सविताला फोन लावून बघितला, नेहमीप्रमाणे तिने फोन उचलला नाही,

त्याला जुनी गोष्ट आठवली, मी दुपारी सविताला ऑफिस मधून फोन करायचो, तिने जर दोन बेल मध्ये फोन नाही उचलला तर किती आकांडतांडव करायचो मी, नाही नाही ते बोलायचो तिला, त्यामुळे सविता घाबरून नेहमी फोन सोबत ठेवायची, तिला माझा इतका तिटकारा आला आहे आता की ती सगळ्या गोष्टींचा बदला घेणार, आता सविता माझा फोन घेतच नाही, काय करणार आहे मी आता काहीच नाही, प्रत्येकाची वेळ येते, सतीश ला पश्चाताप होत होता,

जरा वेळाने अजून एक नोटीस आली सचिन साहेबांकडून मानहानीचा दावा केला होता त्यांनी, हरलो तर मोठी रक्कम द्यावी लागेल त्यांना, का चिडलो मी इतका तेव्हा, मूर्खपणा झाला, सतीश ने वकिलांना फोन केला,... "आत्ताच मला दोन नोटीस मिळालेल्या आहेत, काय करता येईल? , आपण भेटायच का",

"ठीक आहे तुम्ही थोड्या वेळाने या माझ्या ऑफिस मध्ये, सविता मॅडम ची केसचा काही प्रॉब्लेम नाही, आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट होऊन जाईल, पण सचिन साहेबांनी जो तुमच्यावर मानहानीचा दावा केला आहे तो थोडा जड जाऊ शकतो तुम्हाला, तुम्ही त्यांची माफी मागा, केस मागे घ्यायची रिक्वेस्ट करा, काहीही करा पण ही केस त्यांनी मागे घ्यायला पाहिजे",.. वकील

" अहो ते ऐकत नाहीत माझं, फक्त सविताने जर सांगितला तर ते ऐकतील, मला नाही वाटत सविता आता माझ्या साठी हे काम करेल",.. सतीश

" ठीक आहे बघू काय करता येईल, याला उत्तर द्यावं लागेल, मी करतो तुम्हाला फोन, तेवढी फी अकाऊंटला जमा करा ",.. वकील

सतीश विचारात होता काय करता येईल? काही करून बोलल पाहिजे सविताशी मनुशी, मनु ची शाळा सुटेल आता, जायचं का शाळेजवळ? विचारून बघतो तिला की सविता काय म्हटली? , बघु कुठे राहतात ते

सतीश शाळेजवळ गेला मनूची शाळा सुटली, मनू बाहेर आली, यावेळी तिची मैत्रीणही होती सोबत, मनुने या वेळी मैत्रिणीला पुढे जाऊ दिले नाही

"बोला बाबा, आईने तुम्हाला माफीनामा द्यायला नकार दिला आहे",.. मनु

"का पण? अग माझी नौकरी जाईल, माझे हाल हाल होतील चालेल का तुम्हाला?",.. सतीश

"तुम्ही पूर्वी आईचे माझे हाल हाल करत होता तेव्हा बाबा? पंधरा वर्ष कशी राहिली असेल ती तुमच्या सोबत? , एक माणूस म्हणून तरी नीट वागला असता तिच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलला असता तर आयुष्यभर ती तुमच्या सोबत राहिली असती ",.. मनु

"अस नको बोलू मनु प्लीज मला मदत कर",... सतीश

" हे जे तुम्हाला दुःख होत आहे ना ते तात्पुरत आहे बाबा, मला तुमच्याशी काहीही बोलायच नाही, आणि तुम्ही प्लीज यापुढे मला भेटायला येत जाऊ नका, माझ्याशी तुमचं काहीही काम नाही, उगीच माझ्याशी बोलायचं प्रयत्न करू नका आणि अस शाळेजवळ अजिबात यायच नाही ",.. मनु

"मनु बेटा ऐक तरी मी काय म्हणतो आहे ते, आजी सविता तू मी परत एकत्र राहू ना ",.. सतीश

" नको बाबा आम्ही नवीन घरी छान आहोत, माझा तिथे छान अभ्यास होतो, आई आजी ही खुश असतात, बाबा तुम्हाला आता आमच्याकडे काम आहे म्हणून तुम्ही आमच्याशी गोड बोलत आहात, मला माहिती आहे तुमची आयडिया, परत एकत्र आलो आपण की तुम्ही आई ला त्रास द्याल, मला घरी जायचं आहे मला क्लासला जायला उशीर होतो आहे ",... मनु

" तुमच्या घरचा पत्ता तरी सांग मनु ",.. सतीश

" नाही बाबा, प्लीज आम्हाला त्रास देवू नका ",.. मनु

मनु पुढे निघून गेली, सतीश हळूहळू तिच्या मागून जात होता, मनूला समजू नये अशा पद्धतीने, पुढे गेल्यानंतर मनू एका पाॅश बिल्डिंगमध्ये शिरली, सतीश तिच्या मागेच होता,..." अच्छा इथे राहते का सविता? एवढी भारी बिल्डिंग? , घर भाडे देणे परवडत आहे का तिला? ",.

वॉचमनने त्याला टोकलं,.. "कोण पाहिजे आहे, आत कुठे चालले तुम्ही ?",

"आता ही मुलगी गेली ती कुठल्या घरात राहते?",.. सतीश

"हे बघा साहेब आम्हाला अशी माहिती देता येणार नाही, तुम्ही तिचा पिच्छा करत आहात का? ",.. वॉचमन

" मी काही कोणी बदमाश नाही, मी तिचे वडील आहे",.. सतीश

" तुम्ही कधी दिसले नाही त्यांच्या सोबत? तिथे त्या मॅडम त्यांची आई मुलगी राहतात, ते काही का असेना मला अशी माहिती देता येणार नाही, तुम्ही निघा ",.. वॉचमन

मनु ने ऐकलं बाहेर काहीतरी गोंधळ सुरू आहे, ती बाहेर आली,.." बाबा तुम्ही का आले आहात इथे माझ्यामागे? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं माझं पिच्छा करू नका, जा बर तुम्ही ",.

" मनु अग मला आजीला भेटायचं आहे, मला पाच मिनिटं येउदे ना वरती",.. सतीश

" नाही बाबा आईला विचारल्याशिवाय मी तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही आणि आजीला सुद्धा तुम्हाला भेटायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही आता जा, मी आईशी बोलते, आई जर हो बोलली तर मी आणि आजी उद्या सकाळी तुमच्याकडे येउ भेटायला, मी स्वतः घेऊन येईल आजीला, पण मम्मी हो बोलायला पाहिजे",... मनु

सतीशचा सगळ्या बाजूनेच नाईलाज झाला होता, दोन कोर्ट केस माथी आल्या होत्या, फॅमिली सुद्धा कोणी विचारत नव्हतं, घरात करणार कोणी नाही, जेवणाचे सुद्धा हाल होत आहेत काय करू मी आता, मला कधी वाटलंच नव्हत अस होईल, वाटल सविता माझ्यावर अवलंबून आहे ती काय करू शकते, मी तिला घराबाहेर काढलं तर तिचे खूप हाल होतील, ती अगदी रडतस माझी माफी मागेल, वापस येईल एक दोन दिवसात, पण इथे झालं उलट त्या सगळ्या सुखात आहे आणि माझीच परवड होते आहे, कर्म मग काय म्हणतात ते हेच आहे बहुदा, आता केस लढण्या शिवाय दुसरा उपाय नाही, जे होईल ते होईल सविताची केस करू व्यवस्थित हॅण्डल, सचिन साहेबांच्या केस साठी जरा पैसे खर्च होईल, किती आहे माझा बँक बॅलन्स ते बघावा लागेल, नवीन नोकरी शोधावी लागेल, चालू ऑफिस मधल पत्र घ्यावा लागेल, चला आता पुरे झालं हे, आपण आपली नवीन नोकरी शोधायला पाहिजे
............

"मॅडम मी आज एक तास लवकर घरी जाऊ का? ",.. सविता

"ठीक आहे सविता नाहीतरी तू तुला दिल्या पेक्षा जास्त काम करते, आजचा ड्रेस किती छान डिझाईन केला आहे तू, नक्कीच तश्या जास्त ऑर्डर येतील, त्याचे मेजरमेंट लिहून ठेवले आहेत ना सगळे",... मॅडम

"हो मॅडम झाल आहे ते काम",.. सविता

" आई कशी आहे ग तुझी? ",.. मॅडम

" ठीक आहे, काल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला, आता तिलाच भेटायला जाते आहे मी, संध्याकाळपर्यंत घरी वापस यायच आहे मला ",.. सविता

" ठीक आहे मग लवकर टॅक्सीने जा",.. मॅडम

" हो मॅडम",.. सविता निघाली तिने टॅक्सीतून घरी फोन केला, मनू आली होती शाळेतुन ती जेवत होती

" आई मी आता जेवून क्लासला जाणार आहे, तुला माहिती आहे का काय झालं? बाबा आले होते परत शाळेत, मी त्यांना सांगितलं की आई माफीनामा देणार नाही, तर ते माझ्या पाठीमागे आपल्या बिल्डिंग पर्यंत आले, वॉचमनची भांडत होते बोलले आजीला भेटायचं आहे, आत जावू द्या",.. मनु

" मी येऊ का मनु आता घरी? काय झालं आहे? ठीक आहे ना आता सगळं तिकडे?, बापरे काय डेंजर मनुष्य आहे हा सतीश ",.. सविता

" आई आता काही प्रॉब्लेम नाही, मी सांगितलं खाली वॉचमनला, बाबांनाही सांगितला आईच्या परमिशन शिवाय तुम्ही आजीला भेटू शकत नाही, तू काहीच काळजी करू नको, तू जावून ये आजी कडे, मी सगळं व्यवस्थित हॅण्डल केल",.. मनु

" मला काळजी वाटते आहे मनु क्लासला जाताना ही लक्ष दे, नाहीतर आजच्या दिवस जाऊ नको ",.. सविता

"नाही आई काळजी सारख काही नाही, माझ्या दोन तीन मैत्रिणी आहे सोबत, त्या येणार आहेत मला बोलवायला, सोबत जाऊ आम्ही",... मनु

"ठीक आहे क्लासहुन आल्यावर मला फोन कर, आजीला सांग नीट दार लावून घे, कोणाला उघडू नका म्हणा दार",... सविता

सविता माहेरी आली आईला सविता ला भेटून खूप आनंद झाला, दोघीजणी खूप गप्पा मारत बसल्या,

" मनू आणि सुलभाताईंना का नाही घेऊन आलीस? ",.. आई

"आई अग मनुला क्लास आहे, क्लास मध्ये परीक्षा असतात आणि आई घरी आहेत, पुढच्या वेळी नक्की येतील त्या, तू बर हो बर आता आणि चल थोडे दिवस माझ्या कडे ",.. सविता

" हो येणार आहे मी",.. आई

सविता ला भेटून बाबाही खूप खूष होते, सविता, बाबा, रमेश दादा, वहिनी बाहेरच्या रूम मध्ये येऊन बसले, त्यांना आईसमोर कुठलाही विषय बोलायचा नव्हता,

" कुठपर्यंत आली आहे तुमची कोर्ट केस",.. बाबा

" काल सागर आला होता भेटायला, त्याला माझी सही हवी होती केस पेपर वर, आज सतीश ला बहुतेक नोटीस दिली असेल, कारण थोड्या पूर्वी त्याचा मला फोन आला होता",.. सविता

" काय म्हणत होता तो",.. बाबा

"मी नाही फोन घेत त्याचा आता हल्ली आणि सचिन साहेबांनी सुद्धा सतीश वर मानहानीचा दावा केला आहे ती पण एक केस सतीश वर लागली आहे ",... सविता

"बरं झालं, चांगलं झालं मीसुद्धा करणार होतो मानहानीचा दावा सतीश वर",.. रमेश दादा

" सागर ची फी द्यायची तेव्हा सांग ",.. बाबा

" हो बाबा तो सांगत नाही किती आहे फी ते, चला मी निघते, मला उशीर होतो आहे, मनु आई एकट्या आहेत",.. सविता

"अग थांब ना",.. रमेश दादा

"नको तिकडे सतीश गोंधळ घालतो आहे, आज आमच्या बिल्डींग पर्यंत आला तो मनुच्या मागे ",.. सविता

" बापरे त्याची ही हिम्मत, मी येवू का सोबत बघतो जरा त्याच्या कडे ",.. बाबा

" नको बाबा आमचा प्रॉब्लेम आम्ही सोडवतो, किती दिवस तुम्ही तरी त्रास घ्याल, मनु आज खूप बोलली त्यांना बहुतेक येणार नाही आता ते परत ",.. सविता

" काळजी घे ग",.. बाबा

हो...

सविता परत आत आईला भेटायला आली,.." आई निघते ग मी, आराम कर आणि मला रोज फोन कर",.

" नीट जा ग, ते लाडू केलेले घेवून जा ",.. आई

" दिले आहेत वाहिनीने, आई आमची काळजी थांबव आता आराम कर ",.. सविता

सविता घरी आली बिल्डिंग बाहेर सतीश उभा होता
........

काय होणार पुढे, सतीश सविता कडून घेईन का माफीनामा

🎭 Series Post

View all