मी काट्यांतुन चालून थकले... भाग 13
आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....
©️®️शिल्पा सुतार
.............
.............
किती छान आणि शांत वाटत आहे ना घरात, किती छान घर आहे हे, काही टेन्शन नाही, त्रास नाही, मनात धाकधूक नाही, कोणीही कोणाला काहीही बोलत नाही, अपमान नाही, मारहाण नाही, कोणाच्या कोणाकडूनही काहीही अपेक्षा नाही, हे असच हव आयुष्य, मुळातच आपण कोणाकडून अपेक्षा नाही ठेवली तरच आपण सुखी राहतो, केला तर आहे मी प्रयत्न सतीश पासून दूर व्हायचं किती जमतंय काय माहिती, मी सतीश मनु आई असे का नाही राहू शकलो? सुखात, आनंदात, जाऊ दे आता परत तोच विचार नाही करायचा.
सविता किचनमध्ये स्वयंपाक करत होती, सुलभाताई आल्या मदतीला,
"घर खूपच छान मिळाला आहे आपल्याला, छान वाटत आहे ना आज घरात, पण एक सांग मला तू सविता, एवढी शांत का आहेस तू आज? काही झालं आहे का",.. सुलभा ताई
सविताने बघितलं मनु नाही ना आसपास, तिला मनु ला काही समजू द्यायच नव्हत, उगीच का तिच्या डोक्यात कचरा भरा, आता काय उपयोग आहे, सगळ संपल, एकमेकांनवर खालच्या पातळीवर जावुन आरोप सुरू आहेत, नाही तरी मनु समोर काहीही बोलायला नाही पाहिजे , तीच महत्वाच वर्ष आहे, तिने अभ्यासात लक्ष दिल पाहिजे
" आई आज मी सतीश वर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, सकाळी मी रमेश दादा घर बघायला गेलो होतो ना, घर बघितल्यानंतर दादांने गाडी पोलीस स्टेशन कडे वळवली, तो बोलला की तुला सतीश वर कंप्लेंट करायला पाहिजे, आता केस सुरू करायला पाहिजे, आणि मलाही ते योग्य वाटलं, आता लवकरात लवकर मला या सगळ्यातुन बाहेर पडायचं आहे, आई तुम्हाला राग तर नाही आला ना",.. सविता
" नाही ग मला कशाला राग येईल, मला माहिती आहे ना तिकडे घरी काय सुरू होत, तुला किती त्रास होता सतीशचा, सतीश कशा पद्धतीने सगळ्यांशी वागत होता, तू काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, काय झालं मग पुढे तिकडे ",.. सुलभा ताई
" आमचं खूप भांडण झालं तिकडे, खूप आरोप-प्रत्यारोप झाले, केस उभी झाली तिकडे आणि तुम्हाला माहिती आहे का आई सतीश बोलले माझं आणि सचिन साहेबांचं काहीतरी लफडं आहे आणि मी दोन दिवस त्यांच्या घरीच होती त्यांच्या सोबत",.. सविता
" अरे बापरे अतिशय घाणेरड आणि चुकीचं बोलतो आहे सतीश, आता काय कराव? आता याला माहिती नाही का नक्की काय झाल ते, आपण कश्या आहोत ते ही माहिती आहे त्याला, आपण कुठल्या परिस्थितीत होतो दोन-तीन दिवस आपल्याला माहिती, याला असं बोलायला जिभ कशी रेटते",.. सुलभा ताई
" हो, तरी तुम्ही माझ्यासोबत आहात, नाही तर अजून काय बोलले असते ते मला काय माहिती? , सगळंच कठीण होऊन बसलं आहे",.. सविता
" तू अजिबात काळजी करू नकोस सविता आपण चांगलं आहोत, आपल्या बाबतीत चांगलंच होईल",.. सुलभा ताई
"पण मला खूप वाईट वाटत आहे आई, इतके वर्ष मी यांच्यासोबत राहिली त्यांना अजूनही समजले नाही का मी कशी आहे ते, माझ्या कोण ओळखीचे आहेत, मी कोणाशी बोलते ",.. सविता
" समजूनच घ्यायचं नाही आहे अगं त्याला, एवढच त्याला समजल असत तर किती छान झाल असत, तो समजून घेणारा असता तर तुला असं घराबाहेर काढलं असतं का? पण आता तू अजिबात काळजी करू नको तुझ्या आजूबाजूला आता चांगली माणसं आहेत, तुझं चांगलं होणार आहे, आता अजिबात वाईट वाटून घेऊ नको",.. सुलभा ताई
हो आई..
" माझी आठवण काढत होता का तो ",.. सुलभा ताई
" नाही आई तुमची, मनुची अजिबात आठवण काढली नाही त्यांनी, त्यांना फक्त त्यांचं पडलं आहे, माझा त्रास माझी नोकरी, सगळ स्वतःच बघतात ते, तुम्हाला आता फक्त मीच आहे असा विचार करा तुम्ही, त्यांचा विचार सोडून द्या, मला नाही वाटत ते तुमचा विचार करतील किंवा तुम्हाला भेटायला येतील, उलट त्यांना तुमचा राग येत असेल की तुम्ही माझ्यासोबत आहात",.. सविता
" जाऊदे माझं दुर्भाग्य असं म्हणायचं की माझा मुलगा माझ्याकडे लक्ष देत नाही, पण एक चांगलं आहे की मी तुझ्यासोबत आहे सविता, आपल्याला माहिती आहे ना आपण कसे आहोत ते, लक्ष देऊ नकोस, पोलीस केस म्हणजे या गोष्टी होणारच, इथे माणूस चुकीचा आहे, माझा मुलगा असून सुद्धा मला त्याचा फारच राग येतो आहे",.. सुलभा ताई
तिघींचा जेवण झालं, मनु अभ्यास करत होती
सतीश घरात एकटाच बसलेला होता, जे झालं ते फारच हे वाईट झालं आहे, सगळेच माझ्या बाजूने उलटता आहेत, एकदा मला सविता भेटली तर मी तिच्याकडुन माफीनामा लिहून घेईल आणि तिला सांगेल की तू त्या सचिन साहेबांना फोन कर आणि सांग की मी असं काहीही म्हटलं नाही की सविताच आणी सचिन साहेबांचं काहीतरी आहे, मग तिचा एकून सचिन साहेब मला परत नोकरीवर ठेवतील, काय कराव पण? सविता माझा फोन अजिबात उचलत नाही, तिच्या माहेरी जावं ते लोक डेंजर आहेत, एक काम करतो मी उद्या सकाळी जाऊन सविताच्या बुटीक जवळ उभा राहतो, बहुतेक सविता येईल उद्या कामाला तिकडे, मग आपल्याला बोलता येईल तिच्याशी, काय माहिती पण ती बोलते की नाही माझ्याशी? थोडीशी आशा वाटत होती सतीश ला, सचिन साहेबांनी अतिच केला आहे पण डायरेक्ट माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहेत म्हणजे काय? अजून एक कोर्टाची केस मागे लागली आता, वकील साहेबांना सांगावं लागेल फोन करून त्याची फी वाढतच चालली आहे, वैतागच आला आहे सगळ्या गोष्टींचा, त्यात जेवायला काही नाही, कधीच असच इकडतिकडच खात आहे मी, जाऊन आईला घेऊन येऊ का माझ्याकडे? निदान ती स्वयंपाक तरी करेल, पण येईल का आई? मी फोन करून बघू का? जाऊदे उद्या बघू आपण, सविता भेटेल मग बोलून बघून तिच्याशी.
सकाळी सविताने मनूला डबा करून दिला, मनू आवरून शाळेत गेली, सुलभाताई आणि सविताने मिळुन नाष्टा केला,
"आई स्वयंपाक तयार आहे मी बुटीकला जाऊन येते, आज मला थोडा उशीर होईल, दोन-तीन दिवसापासूनच काम पेंडिंग आहे, तुम्ही दुपारी जेवून घ्या, मनू येईलच तिला नंतर क्लासला पाठवून द्या" ,... सविता
" तू तुझा डबा घेतला आहेस का ग? ",.. सुलभा ताई
" हो घेतला आहे मी ",.. सविता
" नीट जा हो",.. सुलभा ताई
सविता घरून निघाली, ती बुटीक जवळ पोहोचली, बुटिकच्या एका बाजूला सतीश उभा होता, सविता तिथून जात होती,
सतीश ने तिला हाक मारली, सविता... सविता....
सविता थांबली तिने बघितलं सतीश उभा आहे,.. "सविता एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं आहे",..
सविता सतीश जवळ गेली,.. "हे बघा सतीश हे माझं कामाचं ठिकाण आहे आणि इथे मला तमाशा नको आहे, आपलं जे काही बोलणं झालं ते काल पोलीस स्टेशनला झालेल आहे, मला आता तुमच्याशी काहीही बोलायचं नाही",..
"सविता मी इथे भांडायला आलेलो नाही, सगळ्या बाजूने अडकलो आहे ग मी, मला तुझ्या मदतीची गरज आहे, तुझी हरकत नसेल तर आपण थोडं कॉफी प्यायला जायचं का? तिथे बसून बोलू आपण ",.. सतीश
" नाही मला नाही जमणार, मला उशीर होतो आहे, जे काही बोलायचं आहे ते इथेच बोला",.. सविता
" मला तू माफीनामा लिहून देशील का? मला तो ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे, माझी नोकरी पण जाऊ शकते आणि तू सचिन साहेबांना फोन करून सांगशील का? कि मी तुझ्याबद्दल आणि सचिन साहेबांनबद्दल असं काहीही बोललं नाही",.. सतीश
" पण तुम्ही बोलले आहात माझ्या बद्दल आणि सचिन बद्दल , आणि माफीनामा का? तुम्हाला तर मनातून काहीही वाटत नाही ना, मग कश्याला नाटक ",.. सविता
" ते मी रागाने बोललो होतो सविता, तुला माहिती आहे मला राग आला की माझा कंट्रोल रहात नाही ",.. सतीश
"असा कसा कंट्रोल राहत नाही, स्वतःला का बर तुम्ही अशावेळी इजा जा करून घेत नाहीत, आम्हालाच बरे बोलतात राग आल्यावर, तुम्ही जा बरं इथून मला अजिबातच तुमच्याशी बोलायचं नाही, मी माफीनामा लिहून देणार नाही, आणि मी सचिन साहेबांशी फोन करून बोलणार नाही, तुमचं जे काही नुकसान होत आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने करून घेतलेल आहे, यापुढे मला भेटायची गरज नाही, नाहीतर मी परत एक पोलिस कंप्लेंट करेल तुमच्याबद्दल आणि माझ्या मनात तुमच्याविषयी अजिबातच प्रेम दया भावना काहीही नाही, तुम्ही गेलात तरी चालेल, यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नका आणि माझ्या आयुष्यात कोणीही असेल यापुढे तुमचा त्याच्याशी काही देणं-घेणं नाही ",... सविता
" सविता ऐक जरा एवढी चिडु नकोस, आईला पाठवून देतेस का घरी तू जरा, माझी गैरसोय होत आहे ग",.. सतीश
" आई काही नौकर नाही तुमच्या घरच्या, आधी नको होत तर घराबाहेर काढल, आता गैरसोय होते तर आई हवी का घरकामाला? , अतिशय घाण विचार आहेत तुमचे ",.. सविता
" नाही मला आईची खूप आठवण येते, तू कुठे राहतेस मला आई ला भेटायच आहे ",.. सतीश
"नाही आई माझ्या सोबतच राहतील, हा त्यांचा निर्णय आहे, तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही संध्याकाळी मला फोन करा आणि आईंची स्वतः बोलून घ्या त्यांना वाटत असेल तुमच्याकडे राहायचं तर मी पाठवून देईल",.. सतीश
सविता आत मध्ये निघून गेली, डोक्यातील सगळे विचार झटकून तिने कामाला सुरुवात केली, सतीश चा विचार करून उपयोग नाही, आपल्याला आपल बघितल पाहिजे
जरा वेळाने रमेश दादाचा फोन आला,..," आईला घरी सोडल आहे, आता आम्ही आईला घेऊन घरी जातो आहे",.
"अरे वा छान झालं, काय म्हटले डॉक्टर?",.. सविता
" पुढच्या आठवड्यात चेकअप ला बोलवलं आहे",.. रमेश
" ठीक आहे",.. सविता
" तू बुटीक मध्ये आहेस का? ",.. रमेश
"हो दादा आज मी कामाला आली आहे",.. सविता
" ठीक आहे मग नंतर बोलू आपण",.. रमेश
सविता गेल्यानंतर सतीश बराच वेळ बाहेर उभा होता, तो विचार करत होता आता काय करता येईल? माझी नोकरी तर गेल्यातच जमा आहे, वरून दोन पोलीस केस होतील, सविता ऐकायला तयार नाही, आई पण बहुतेक येणार नाही माझ्याकडे, मनु आत्ता शाळेत असेल, तिला जाऊन भेटू का? तिची शाळा एक वाजता सुटते तिला भेटतो आणि तिला सांगून बघतो की तू बोल आईशी, सतीश मनूच्या शाळेकडे निघाला..
सविता काम करत होती, तिचा फोन वाजला, बघितलं तर सागर हा फोन होता होता, तिने फोन उचलला
सविता मी कोर्टात आहे मी काही डिटेल्स हवे आहेत, सागर ने बरेच प्रश्न विचारले, सविताने सगळे उत्तर दिले,
"तुझी फॉर्मवर सही लागेल? आता कुठे आहेस तू?",.. सागर
" मीआता बुटीकला आहे",.. सविता
"किती वाजता होईल सुट्टी",.. सागर
" चार वाजता" ,.. सविता
"तुला मला भेटायला जमेल का",.. सागर
" हो चालेल ना कुठे येऊ मी कोर्टात येऊ का? ",.. सविता
"नाही मी सांगतो तुला फोन करून किंवा मीच येतो तिकडे बुटीक जवळ ",.. सागर
" ठीक आहे चालेल",. सविता
.........
सतीश मनुच्या शाळेजवळ आला शाळा सुटणारच होती आता, सगळे मुलं बाहेर येत होते, सतीश वाट बघत तिथेच एका झाडाखाली थांबला, समोरून मनु येतांना दिसली, तसा तो नीट उभा राहिला, मनु मैत्रिणींसोबत येत होती, मनु... मनु
मनु अति आश्चर्याने सतीश कडे बघत होती, ती सतीश जवळ आली,.. "बाबा तुम्ही काय करत आहात इथे? तुम्हाला माहिती आहे का ही माझी शाळा आहे, आज बहुतेक पूर्ण आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा माझ्या शाळेत आला आहात",.
"मनू कशी आहेस तू?",.. सतीश
" मी ठीक आहे बाबा",.. मनु
"हे घे चॉकलेट तुला",.. सतीश
मनु ने चॉकलेट घेतलं..
" मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं मनु, चल आपण हॉटेलमध्ये बसून बोलायचं का, की घरी येतेस तू आपल्या",.. सतीश
" नाही बाबा मला तुमच्याशी बोलता येणार नाही, आईने सांगितलं आहे बाबा भेटले तर बोलायचं नाही, मला ही भीती वाटते तुम्ही मला मारल तर",.. मनु
"ऐक जरा मनु मला माफ कर बेटा, मी एवढा वाईट नाही ग ते त्या दिवशी रागाच्या भरात झाल, मी काय म्हणतो आहे मनु असं नको करूस ग फक्त पाच मिनिट बोल माझ्याशी , तुला इडली आवडते ना आपण इडली खायची का? तू आधी हट्ट करायची ना मला की आपण हॉटेलमध्ये जाऊ या इडली खायला",.. सतीश
" नको बाबा मी नाही येणार,आई आणते नाही तर बनवते रोज इडली, तिला माहिती आहे मला इडली आवडते, जे काही बोलायचं असेल ते इथेच बोला, माझा क्लास आहे उशीर होतो आहे मला ",.. मनु
" तू तुझ्या मामा कुठे राहते तर इतक्या लांब कशी काय आलीस शाळेत",.. सतीश
" बाबा आम्ही इथेच राहतो बुटीक जवळ, आईचं काम येथेच आहे ना, मामा च्या घरापासून लांब पडतं इकडे येण, खूप छान घर आहे आमच ",.. मनु
" कुठे ग तुमच्या पत्ता सांग नाही ",.. सतीश
" बाबा मी नाही सांगणार आणि माझ्या मागे यायचं नाही नंतर ",.. मनू
" हे बघ मनु तू आईशी बोलून बघ ना थोडं, मी खूप अडचणीत आहे, बाकी काही नाही पण तिला म्हणा कि माफीनामा लिहून दे, तुझ्याजवळ दे उद्या मी येतो यावेळी शाळेच्या जवळ मग तू मला दे ",.. सतीश
ठीक आहे बाबा मी सांगून बघेल आईला, पण हा आईचाच निर्णय असेल",.. मनु
" आजी कशी आहे",.. सतीश
" ठीक आहे मजेत आहे",.. मनु
"मी आजीला नेवु का माझ्यासोबत",.. सतीश
" मला नाही वाटत आजी येईल तुमच्यासोबत बाबा, ती आमच्या सोबत खूप खुश आहे",.. मनु
"चल मी तुला सोडतो घरापर्यंत",.. सतीश
" नाही बाबा मी जाईल माझी माझी, माझ्या मैत्रिणी आहेत सोबत ",.. मनु
"ठीक आहे मनु मग मी उद्या तुझी इथे वाट बघतो ",.. सतीश
" ठीक आहे बाबा ",.. मनू पुढे गेली आणि वापस आली,.." बाबा तुम्ही पूर्वी का नाही असे माझ्याशी छान वागत होता, आज तुम्ही चांगले बाबा आहात",..
मनु चालली गेली, सतीश विचार करत होता, खरंच आपण वागायला चुकलो आहोत का? अजूनही वेळ गेलेली नाही, माफी मागू का मी या सगळ्यांची, सगळंच भेटून जाईल सविता वापस घरी येईल, आई मनु येतील, मग मी कोणाशीच भांडणार नाही, माझ्यावरच्या पोलीस केस मागे जातील, सचिन साहेब ऑफिसमध्ये परत घेतील.... काय करू....
.........
घरची लक्ष्मी घर सोडून गेल्यावर खूप हाल होतात हे बहुतेक सतीशला थोड तरी पटलं असेल, पण आता खूप उशीर झाला होता.......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा