मी काट्यांतुन चालून थकले... भाग 12

बरोबर करतो आहेस तु सचिन, अशा लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे, त्याच्या अश्या बोलण्याने काहीही होवु शकत, आपल्या संसाराला धोका आहे असा,


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 12

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

सविताने रूपा मॅडमला फोन लावला, त्यांना सगळं माहितीच पाहिजे काय होत आहे इकडे, कारण त्यात सतीश ने सचिन साहेबांच नाव घेतलं आहे, उगीच नंतर कोणी सांगितल तर कस वाटेल?.

"बोल ग सविता कशी आहेस तू?",.. रूपा

"मी ठीक आहे",.. सविता

"मला समजल सचिनने सांगितलं सगळं, कसे लोक आहेत या जगात, अगदी विश्वास बसत नाही, कोणी एवढ खराब वागू शकत, कुठे आहेस तू सध्या? ",.. रूपा

" मी आत्ता माझ्या आई कडे आहे मॅडम",.. सविता

"हे बघ सविता मला रूपाच बोल, त्यादिवशी पण बोलली होती ना मी, आपण मैत्रिणी आहोत ग",.. रूपा

" ठीक आहे रूपा",.. सविता

" राहण्याची काही सोय झाली का? ",.. रूपा

" मी एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे, जरा वेळाने जाईन मी तिकडे, आता आईकडे आहे मी, सासुबाई आणि मनू माझ्या सोबत आहेत",.. सविता

" तू खूपच धीराची आहे सविता, सचिन बोलला मला सतीश वाईट वागतो आहे, लक्षात आहे ना आपल्याला मिळून बुटीक सुरू करायच आहे, लवकरच आपण त्याची सुरुवात करू",.. रूपा

"हो मी त्यासाठीच फोन केला होता तुला, कसं करायचं आहे आता?, मला हे बुटीकच काम लगेच सुरू करायचं आहे",.. सविता

" तुला वेळ आहे ना आता? की कोर्टाच काम आहे तुला? त्याला ही वेळ लागतोच ",.. रूपा

" लगेच सुरू करू शकतो आपण बुटीक, मला लवकरात लवकर पायावर उभं राहायचं आहे रुपा, सासुबाई, मनुची जबाबदारी आहे माझ्यावर, तसा दादाचा पुर्ण सपोर्ट आहे मला, पण मला माहेरच्यांवर अवलंबून राहायच नाही ",.. सविता

" एकदम बरोबर बोलतेस तू सविता जेवढ्या लवकर तू बिझी होशील तेवढ चांगल आहे तुझ्या साठी, मन दुसरीकडे रमेल, आपण एक-दोन दिवसात भेटू दोघीजणी आणि मग सविस्तर बोलू आणि लगेच काम सुरू करू ",.. रूपा

" आणि मला अजूनही बोलायच आहे रूपा, आज आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो सतीशची कंप्लेंट करायला, तिथे सतीशने माझे सचिन साहेबांची संबंध आहेत असा आरोप लावला, खूप बोलला तो मला, मी घर सोडल्या पासून सचिन साहेबांसोबत रहाते आहे अस तो बोलला, मला माफ कर रुपा, अतिशय घाणेरडे विचार आहेत सतीशचे ",.. सविता

" ओ माय गॉड, काय बोलते आहेस तु सविता, किती घाण प्रकार आहे हा? आपण एकमेकाला ओळखत ही नाही? एकदाच भेटलो आहोत ना आपण? , मग ते असा आरोप कसा काय करू शकतात, आणि तू का माफी मागतेस, मला आता खूप राग येतो आहे सतिशचा",.. रूपा

" हो ना, पण बघ ना रूपा आता मी काय करू खूपच संशयी आहे सतीश, त्याला माझ्यात इतर काही दुर्गुण दिसत नाहीत म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अस आहे, त्यात सचिन साहेबांनी सतीशला बिहेवियर सर्टिफिकेट मागितलं नाही म्हणून तो चिडला आहे ",.. सविता

"अतिशय घाण मनुष्य आहे सतीश ",.. रूपा

" मी मुद्दामच तुला हे सांगितलं कारण उद्या उगाच इकडून तिकडून कळालं तर रूपा तुला वाईट वाटेल",.. सविता

" काहीही प्रॉब्लेम नाही माझे विचार एवढे काही हलके नाहीत, जाऊ देत आपण सतीशच्या विषयावर नको बोलायला, मला जेव्हा वेळ आहे तेव्हा मी एक दोन दिवसात फोन करते तुला, मग आपण दोघी भेटू, प्लॅनिंग करू आपलं, लगेच काम सुरू करून आणि तू सविता कोणी काही बोलतय म्हणून माझ्यासोबत काम करायचा विचार सोडू नको ",.. रूपा

" नाही रूपा मला पण हेच बुटीक जेवढ्या लवकरात लवकर सुरू होईल तेवढ हव आहे ",.. सविता

" गुड बी पॉझिटिव अजिबातच कुठल्या फालतू गोष्टीचा विचार करू नको, अशा बोलणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यात काहीच महत्त्व द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे, त्यांना आपल्यातले कुठले चांगले गुण दिसत नाही, ते नेहमी आपले पाय मागे खेचायला टपलेले असतात ",.. रूपा

" हो ग रूपा मी करते आहे प्रयत्न आता, मला त्रास होतो आहे पण मी लवकरच यातून बाहेर पडेल",.. सविता

" सुलभा काकू आणि मनू कशा आहेत",.. रूपा

" ठीक आहे त्या, उलट खुश आहेत माझ्यासोबत मी नवीन घरी राहायला गेल्यावर तुम्हाला माझा पत्ता देईन मग तुम्ही घरी या",.. सविता

" हो नक्की येईन मी घरी आणि सचिनही येईल घरी, कोणी काही बोलु दे आपण भेटायचं थांबू शकत नाही",.. रूपा

" हो बरोबर बोलत आहेस तू, तुम्ही जरूर या माझ्याकडे",.. सविता ने फोन ठेवला..
.....

" कोणाचा फोन होता रुपा ",.. सचिन

" सविता चा",.. रूपा

" काय म्हटली ती? कुठे आहे ती मनु, सुलभा काकू?, काय विचित्र आहे तो सतीश आज तर खूप रागावलो मी त्याला, त्याचा रीपोर्ट वरती पाठवणार आहे मी, चांगला धडा शिकवला पाहिजे त्याला ",.. सचिन साहेब रागात होते

"सध्या तिच्या आईकडे आहेत त्या तिघी, एक फ्लॅट घेतला आहे भाड्याने, उद्या जातील बहुतेक तिकडे रहायला,
आणि मग पुढे काय झालं? सबमिट केलं का सतीश ने बिहेवियर सर्टिफिकेट ",.. रूपा

" नाही अजून कसल काय ",.. सचिन

" तुला माहिती आहे का सचिन? त्या सतीश ने तुझ आणि सविताच नाव सोबत जोडल ",.. रूपा

" म्हणजे? काय? ओह माय गॉड ",.. सचिन

" तुझ्यात आणि सविता मध्ये काही तरी सुरू आहे अस त्याने सविता वर आरोप लावले आणि जेव्हा पासून सविता ने घर सोडल तेव्हा पासून ती दोन दिवस तुझ्यासोबत होती, अस बोलतो आहे तो सतीश ",.. रूपा

" अगदी घाणेरडा, अशक्य माणूस आहे सतीश, सविताला किती त्रास झाला असेल या गोष्टीचा, एकदम साधी आहे ती, म्हणून सतीशच फावत ",.. सतीश

" हो ना मी सांगितल तिला कोणी काहीही बोलाल तरी आपण सोबत काम करू आणि सगळ्यांनी एकमेकांना भेटायच ही ",.. रूपा

" हो बरोबर आहे अश्या घाणेरड्या लोकांसाठी आपण का चांगल्या लोकांना सोडायचा, आणि मी आता त्या सतीश ला अजिबात माफ करणार नाही ",.. सचिन

" हो ना ते बुटीकच काम लवकर सुरू करणार आहे आम्ही",.. रूपा

"हो करा मस्त, सविता हुशार आहे तिच्या डिझाईन छान आहेत",.. सचिन

सचिन ने सतीश ला फोन लावला, सतीश नुकताच पोलीस स्टेशन घरी आला होता, तो चहाच करत होता

" बोला सचिन साहेब, नाही आहे माझ्याकडे बिहेवियर सर्टीफिकीट",.. सतीश

" त्याची आता काही गरजच लागणार नाही सतीश ",..सचिन

"का साहेब काय झालं साहेब? मला कामावर कंटिन्यू करत आहात का तुम्ही लोक? ",. सतिश

" नाही तुला कायमची सुट्टी देत आहोत",.. सचिन

" काय झालं आहे निदान मला नोटीस पिरेड पूर्ण करू द्या",.. सतीश

"नोटिस पिरेड अशा लोकांनसाठी असते जो स्वताहून नोकरी सोडत असतो, अशांसाठी नाही ज्यांना काढून टाकलेले असते आणि मी तुझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत आहे, तुझी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार आहे उद्या, तुझ्याविरुद्ध कोर्टात केस सुरु होईल",.. सचिन

" काय झालं आहे सर? ही केस ऑफिस तर्फे आहे का माझ्यावर? ",.. सतीश

" नाही माझी पर्सनल आहे ",.. सचिन

" काय झालं? काय कारण? ",.. सतीश

" जसं तुला काही माहितीच नाही तर ",... सचिन

" नाही मला खरंच आयडिया येत नाही, काय म्हणताय तुम्ही ",.. सतीश

" आज पोलीस स्टेशन मध्ये तू काय बोललास? सविताचे आणि माझे संबंध आहेत, ती दोन दिवस माझ्या घरी होती, माझ्या सोबत, माझ तीच काही तरी आहे म्हणून मी तुझ्यावर राग व्यक्त करतो आहे तू चांगला वागायला असून तुला ऑफिस मधून काढतो आहे, अस वाटत ना तुला सतीश? बरोबर बोलत आहे ना मी सतीश? हेच बोलला आहेस ना तू पोलीस स्टेशन मध्ये, सगळेच साक्षीदार आहेत माझ्याकडे ",.. सचिन

" साहेब तुम्ही हे कुठच्या कुठे नेत आहात, मी ते असच रागाच्या भरात सविताला बोललो होतो",.. सतीश

" एकदा दोनदा नाही ना बऱ्याच वेळा झाला आहे हे, तुला समजतंय का कसं काय बोलतो आहेस ते, हे मला अजिबात आवडलेल नाही, मुळात माझी आणि सविताची ओळखच नाही, ओळख असली तरी सविता एक अतिशय चांगली व्यक्ती आहे, तिला असं माझ्यापाठी लपण्याची गरज नाही आणि माझं एक सुखी कुटुंब आहे माझी बायको मुल आहेत तिचा जर काही गैरसमज झाला तर काय करणार आहे मी? दुसर्‍यावर आरोप लावताना दोन वेळा विचार करायला पाहिजे होतं तू, आता तुला माफी नाही, तुझ्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा करत आहे, माझ जाऊ दे आणि तुला तुझ्या एवढ्या चांगल्या बायकोवर वाटेल तसे आरोप करतांना लाज नाही वाटत का ",.. सचिन

" सर ऐका एक मिनिट ",.. सतीश

"नाही सतीश तू आता माझ्याशी काहीच बोलू नको, नाही तर तू अजून संकटात येशील, चल मी ठेवतो फोन मला माझ्या वकीलाला फोन करायचा आहे",.. सचिन

सर... सर... ऐका तरी...

सचिन ने फोन ठेवून दिला त्याने लगेच त्याच्या वकीलाला फोन लावला पूर्ण केस सांगितली काय आहे ते उद्या सकाळी सतीश बद्दल ते कम्प्लेंट करणार होते

रूपाचा स्वयंपाक झाला होता,.." चल जेवायला सचिन, काय करतो आहेस? ",..

" मी सतीश वर अब्रुनुकसानीचा दावा करतो आहे, वकिलांशी बोलत होतो मी, त्याला असा सोडणार नाही मी",.. सचिन

"बरोबर करतो आहेस तु सचिन, अशा लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे, त्याच्या अश्या बोलण्याने काहीही होवु शकत, आपल्या संसाराला धोका आहे असा, आणि कोणी काहीही आरोप नाही करू शकत तुझ्यावर, एक पुरुष आहे म्हणून तुला कोणी काहीही बोलू शकत नाही तुझी ही इज्जत महत्वाची आहे, बर झाल तु आवाज उठवला ",.. रूपा

" त्याला नाही मी माफी मागायला लावली तर बघ रुपा, मी त्याला जाम करून टाकेन, त्याच ते घाणेरड तोंड कायमच बंद होईल, सविताचे आणि माझे पाय धरले पाहिजे त्याने, परत तो सवितावर कुठलाही आरोप लावताना शंभर वेळा विचार करेल असं करायचं आहे मला, कायमचा पत्ता कट करायचा आहे त्या सतीश चा ",.. सचिन साहेब चिडले होते
.............

फोन वर बोलून सविता खाली आली

"आम्ही निघतो आता घरी जायला दादा मनुची शाळा आहे उद्या, आवराव लागेल " ,.. सविता

"ताई जेवून जा आता",.. वहिनी

"नको वहिनी रात्र होईल",.. सविता

"तिकडे आहे का सगळ सामान",.. वहिनी

" हो अगदी गॅस पासून सगळ घेतल आहे आज, माझा आता नवा संसार सुरू झाला वहिनी" ,.. सविताच्या डोळ्यात पाणी आलं.

" ताई आम्ही आहोत कायम तुमच्या सोबत, स्वतःला अजिबात एकट समजू नका ",.. वहिनी

"तू खूप लकी आहेस वहिनी, असेच छान रहा, गॉड ब्लेस यू, दोघांपैकी एक जरी नीट वागत नसेल तरी संसारात खूप त्रास होतो, खूप सोसलं ग, आता मी खुश राहणार आहे ",.. सविता

"हो ताई ऐकवत नाही तुमची कहाणी, पण आता जुन सगळ सोडून द्या, मनु सुलभा काकू आहेत सोबत, आम्ही आहोत, नवीन सुरुवात छान होवो तुमच ",.. वहिनी

" चल मी तुम्हाला घरी सोडतो ",.. रमेश दादा

" नको दादा आम्ही जाऊ टॅक्सीने, तुझी दिवसभर धावपळ होते आहे खूप",.. सविता

"अग हॉस्पिटलला जाव लागेल डब्बा घेवुन, बाबा येतील सोबत घरी आणि इतक्या रात्रीच्या एकट्या नका जाऊ, मी आलोच थांब ",.. रमेश दादा

सविता मनु सुलभा ताईंना रमेश दादा ने घरी सोडल, नवीन घर खूप आवडल मनु सुलभा ताईंना.

" आई खरच हे आपल घर आहे का? एवढ छान",.. मनू नुसती इकडून तिकडे करत होती,

" हो मामाने पसंत केल",... सविता

सुलभा ताईंनीही सगळीकडे फिरून घर बघितल,..." खूप छान झाल ग घराच काम, घरभाडे खूप असेल पण? सामान किराणा भरला का सगळा? गॅस कोणाचा आहे?",..

"आई आज घेतल सगळ सामान, इकडे आलो सामान रचल, रमेश दादाची खूपच मदत झाली",.. सविता

" हो ग किती करतो तो सगळ्यांसाठी, आपल्यासाठी तुझ्या आई बाबांसाठी",.. सुलभा ताई

हो ना

" आई फर्निचर कोणंच आहे, आणि हा टीव्ही ही ",.. मनु

" फर्निष्ड फ्लॅट आहे बेटा, आधी पासून होत हे सामान इथे",.. सविता

" हे घर तर आपल्या आधीच्या घरापेक्षा छान आहे आई",.. मनु खुश होती

सुलभा ताई मनु एका रूम मध्ये जात होत्या

" आई आता आपण दोघी एका रूम मध्ये राहू, मनु तू अभ्यास करत जा त्या रूम मध्ये, वाटल तर झोपायला येत जा आमच्यात",.. सविता

" हो अस करु ती रूम स्टडी रूम ही रूम बेड रूम, आई मी तुझ्या जवळ झोपेने ",.. मनु

बेडरूम मोठी आणि प्रशस्त होती, सुलभा ताई साठी सेपरेट बेड छान व्यवस्था होती, मोठ्या बेड वर सविता मनु झोपणार होते, तिघी समाधानी होत्या काय होईल कस होईल हे जे वाटत होत ते आता थांबल होत आता मी माझ काम लगेच सुरू करेन, सतीश चा विचार बंद आता, सविता आवरायला आत गेली...

................

सचिन साहेब चांगलाच धडा शिकवतील सतीशला, एक ना एक दिवस आपल्यापेक्षा वरचढ मनुष्य आपल्याला भेटतोच, त्यामुळे विचार करून वागायला पाहिजे...


🎭 Series Post

View all