Jan 29, 2022
कथामालिका

मी काट्यांतुन चालून थकले... भाग 11

Read Later
मी काट्यांतुन चालून थकले... भाग 11


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 11

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

सतीश पोलिस स्टेशन बाहेर उभा होता

"काय करता येईल या केसच हेमंत वकील",.. सतीश

"काय आहे तुमची केस तेव्हा घाईघाईत काही विचारलं नाही",.. वकील

सतीश ने हेमंत वकीलांना सगळी केस सांगितली

"तुम्ही आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा, तुमची केस मारहाणीची आहे, घरगुती हिंसाचाराची आहे, शिक्षा होऊ शकते",.. हेमंत वकील

"काय करायच नक्की? ",.. सतीश

" समोरची पार्टी आणि आपण एका जागी बसायचं आणि तुम्ही त्यांना घटस्पोट द्या, त्यांची माफी मागा, थोडी पोटगी तुम्हाला द्यावी लागेल, मुलगी लहान आहे, ती अठराची होईपर्यंत तिचा खर्च असेल , थोडेफार इकडेतिकडे होईल, जर हे तुम्हालाही नको असेल तर तुम्ही केस हरली तर तुम्हाला शिक्षा होवु शकते, पोलीस लोक लॉक अप मध्ये टाकू शकतात कारण मी जरी तुमचा वकील असलो तरी तुम्ही चुकला आहात, शिक्षा होऊ शकते तुम्हाला ",.. हेमंत वकील

" नको मग आपण आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करू, त्यांच्या वकिलांचा नंबर आहे का तुमच्याकडे? ",.. सतीश

"नाही आहे माझ्याकडे ते काय समोर उभे आहेत, मी बोलतो त्यांच्याशी एक मिनिटे ",.. हेमंत वकील

हेमंत सविता रमेश सागर उभा होते तिकडे आला,.." एक मिनिट मला बोलायच आहे तुमच्याशी जरा केस संदर्भात ",..

ते दोघ एका बाजूला गेले

" सतीश आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट ला तयार आहे, सामंजस्याने प्रश्न सोडवता आला तर बर होईल नाही ",..हेमंत वकील

" ते बघू पुढच्या पुढे, एवढी कसली घाई आहे ",.. सागर

" नाही म्हणजे केस पुढे जाण्या आधी ठरवल तर बर होईल",.. हेमंत वकील

बघु..

"घरगुती हिंसाचाराची केस आहे काही विशेष नाही",.. हेमंत वकील

"घरगुती हिंसाचार म्हणजे मोठा नाही का? काय बोलत आहेत वकील साहेब तुम्ही? , तुमचा किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स चा असा छळ झाला तर चालेल का तुम्हाला? , म्हणे विशेष नाही, जेव्हा स्वतः वर बितते तेव्हा समजत, तुम्ही प्लीज पुढच्या वेळी पासून उगाच अस फालतू गोष्टी बोलू नका, आम्ही तयार नाही आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंटला, कोर्टातच भेटू आता आपण, मला माहिती आहे सतीश दोषी आहे त्याला शिक्षा होईलच",.. सागर

" पण सतीश वर अजून गुन्हा सिद्ध झाला नाही ",.. हेमंत

" होईलच लवकर सिद्ध, मग कोर्टात मी त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल हा प्रयत्न करणार आहे",.. सागर

" ऐका असं करू नका मी तुम्हाला सतीश पासून लवकरात लवकर घटस्फोट मिळवून देतो, पोटगी मिळवून देईन, परत मुलीची जबाबदारी थोडे दिवस सतीश घेईन",.. वकील

" घ्यावीच लागेल जबाबदारी, काय विशेष नाही करणार ते, ठीक आहे बघू पुढे काय करायचं ते, मी अजून सविता रमेशशी बोललो नाही, मी त्यांना विचारतो आणि कळवतो तुम्हाला ",.. सागर

" तुम्ही तुमचा फोन नंबर द्या मला ",.. हेमंत वकील

" ठीक आहे पण तुम्ही यावर विचार करा आणि त्या सतीश ला जरा चारचौघात कमी बोलायला सांगा, तो किती बोलतो आहे तो सविताला, हे काही त्याच घर नाही वाटेल तस वागायला, आम्ही का ऐकुन घ्यायच?, आम्ही मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतो त्यांच्यावर ",.. सागर

" हो मी सांगतो त्यांना की अशा पद्धतीने पोलीस स्टेशन आणि कोर्टात बोलल तर शिक्षा होऊ शकते ",.. हेमंत सतीश कडे गेला

" काय झालं?, झालं का बोलणं?, ऐकल का त्यांनी? ", सतीश च्या चेहर्‍यावर ताण स्पष्ट दिसत होता

"हो मी बोललो आहे त्यांच्याशी , ते अजून हो म्हटलेले नाही, पण होतील नीट, आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि तुम्ही सविता ताई आणि रमेश साहेबांशी नीट व्यवस्थित भाषेत बोला जरा, तुम्हाला माहिती आहे का एवढी अरेरावीची भाषा तुम्ही केली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते, ते तयार होणार नाहीत सेटलमेंट साठी आणि आपली सगळी केस तुमच्यावर उलटेल, हे काही तुमचं घर नाही आहे वाटेल तस वागायला, तुम्ही जरा शांत रहा, तुम्हाला सुटायचा आहे ना या केस मधून?",.. हेमंत वकील

हो..

" मग जरा शांत व्हा यापुढे ते लोक दिसले की चिडचिड करू नका ",.. हेमंत

सतीश ला वाटल नव्हत गोष्टी अश्या पुढे येतील, त्याला वाटल दोन दिवस सविता माहेरी जाईल आणि येईल नंतर परत, पण आता ही सगळी केस अंगाशी आलेली आहे

सागर वापस आला,

" काय म्हणत होता तो वकील ",.. रमेश

" बोलला आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायची का? मी बोललो का आत्ताच केस सुरू झाली आहे नंतर बघू, एवढी घाई कशी आहे त्यांना? त्यांना माहिती आहे की ते हरतील ही केस, ते चुकीचे वागले आहेत",.. सागर

"तरीही त्यांचा आवाज किती मोठा आहे, ना ना आरोप लावता आहेत आपल्यावर ",.. रमेश

" असंच आहे त्यांचं कायम, नेहमी स्वतः चुका करतात आणि आम्हाला घराबाहेर काढतात आणि मोठ्या आवाजात बोलतात.. भांडतात, खूप दिवस टिकणार नाही त्यांची ही सवय, एकटे पडतील आयुष्यात, कोर्टात पितळ उघडे पडेल",.. सविता

" हो, नाही तरी अश्या विचित्र लोकांसोबत कोण राहणार",.. सागर

सागर ला एक फोन आला, तो फोनवर बोलत होता,.." चला मी निघतो आता मला थोडं काम आहे, आणि सविता केस संदर्भात काही लागलं तर मी तुला फोन करेन किंवा तेव्हा आपण भेटू ",..

" हो काही हरकत नाही ",.. सविता

"आणि अजिबातच काळजी करायची नाही कुठल्या गोष्टीची, ज्या गोष्टी पोलिस स्टेशन मध्ये आणि कोर्ट मध्ये ऐकल्या त्या गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायचा, त्या सोबत घेऊन जायच्या नाहीत, तरी तू मुड नीट कर सविता, मला नेक्स्ट टाईम तू हसतांना दिसली पाहिजे, एवढा ताण नको घेवूस",... सागर

" हो सागर तू काही काळजी करू नको, मी ठीक आहे आता",.. सविता

"चल रमेश मी निघतो कोर्टात एक केस सुरु आहे माझी",.. सागर

थँक्स सागर...

"अरे काय, उलट तुला थँक्स, माझी सविता ची बर्‍याच वर्षानी भेट झाली या निमित्ताने",.. सागर

सागर गेला सविता रमेशही निघाले कार, सविता रडायला लागली,

"काय झालं ताई? आता कश्याला हळवी होतेस, काय झालं?, मला वाटल होत तू त्रास करून घेशील ",.. रमेश

"एवढ्या वर्षाचा माझा संसार असा मोडतो आहे, मला काय आनंद वाटेल का? , तू बघितल तिकडे पोलिस स्टेशन मध्ये कसे बोलत होते सतीश माझ्याबद्दल, त्यांनी चक्क माझ्यावर संशय घेतला, मी दोन दिवस सचिन साहेब सोबत होती असे त्यांचे म्हणणे आहे, तो मनुष्य एकदम खराब आहे, मला नाही सहन होत आता हे, काहीही बोलतात ते ",.. सविता

" ताई तू शांत हो बर आधी, ते उगाच आपल्याला बोलायचं म्हणून बोलत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्षच केलेलं बरं, तू त्रास नको करून घेऊ, आपल्याला माहिती आहे ना सतीश किती खोटा आहे, त्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला त्रास व्हायला पाहिजे, मुद्दामून आपल्या बाजूने काही मुद्दे नाहीत म्हणून तुझं नाव ते घेत आहेत, तरी तू त्या माणसात जीव टाकते आहे, अजून डोळे उघडले नाही का तुझे ताई? , आता अजिबात रडू नकोस",.. रमेश

"नाही रे मी ठीक आहे, मला अजिबात त्यांच्यात इंट्रेस्ट नाही आता, फक्त वाईट वाटत आहे, याला काय अर्थ आहे आहे?, मला असं संशय घेतलेला आवडत नाही, फक्त दोन वेळा मी सचिन साहेबांना भेटली एकदा ते आमच्या घरी जेवायला आले होते तेव्हा आणि दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये भेटले, बाकी आमची पूर्वीपासून ओळख नव्हती ",.. सविता

" हो मला काही माहिती नाही का ताई ते, तू मला का सांगते आहेस अस इथे तू त्यांना ओळखते की नाही हा प्रश्न नाही, सतीश किती खराब आहे संशयी आहे हे माहिती आहे आपल्याला, उगीच तुझ्यावर राग काढता आहेत ते, दुर्लक्ष केलेल बर ",.. रमेश

" पण चार चौघात कस वाटत ते, यांना काही समजत नाही का? हे असं कसं बोलू शकतात माझ्याबद्दल?, माझ्या चारित्र्यावर संशय घेतात ते ",.. सविता

" मूर्ख मनुष्य आहे तो, त्यांना तुझी एवढी काळजी असती तर ही वेळ आली नसती, तू काळजी करू नकोस, आता प्रॅक्टिकल्स हो, मूळ मूळ वागू नकोस, कोर्टात खूपच आरोप-प्रत्यारोप होतील, तयार हो त्याला" ,.. रमेश

" नाही हे बघ पुसले डोळे मी आता स्ट्रॉंग होणार आहे",.. सविता

" आपण चहा घ्यायचा का दोघांनी सोबत, तुला बर वाटेल ",.. रमेश

" नको दादा आता आपण आधी हॉस्पिटल ला जाऊ, कधी आई ला भेटू अस झाल आहे ",... सविता

" ठीक आहे, बहुतेक आज आईला सोडू शकतात घरी विचारून बघू",.. रमेश

आई ठीक होती हॉस्पिटल मध्ये, डॉक्टरांनी डिस्चार्ज द्यायला नकार दिला, अजून चोवीस तास तरी हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल, बर्‍याच वेळ सविता आईशी छान बोलत होती, तिने आईच आवरुन दिल, आई फ्रेश दिसत होती.

" आई आज छान दिसते आहेस तू, लवकर ये ग घरी करमत नाही",.. रमेश

"हो मी आता ठीक आहे, उद्या जाऊ घरी",.. आई

"चल सविता ताई आपण चहा घेवू थोडा, बाबा चला",.. रमेश

"तुम्ही जा मी थांबतो इथे तुझ्या आई जवळ",.. बाबा

सविता रमेश दादा कॅन्टीन कडे निघाले..

"अहो सविता टेंशन फ्री दिसते आहे ना आज, जावई नाही आले का तिच्यासोबत ?" ,... आई

"जाऊ दे तू विचार करू नकोस, आपली मुलगी येते ना रोज मग झाल ",.. बाबा

"काही तरी नक्की झाल आहे, सांगा ना काय झालं",.. आई

"अग तु हॉस्पिटल मध्ये आहेस आराम कर, आणि काहीही झाल नाही",.. बाबा

" उलट मला सत्य समजल तर बर वाटेल, आता नाही होणार मला त्रास",.. आई

"अग तू तुझी तब्येत सांभाळ, आपण बोलू घरी गेलो की झोप बर तू जरा वेळ ",.. बाबा

" मला काहीही झालेलं नाही, मला तर असं वाटत आहे की काहीतरी झाला आहे, सविता माहेरी आली आहे का",.. आई

"हो सविता ने तीच घर सोडलं आहे , तुला तर माहितीच आहे तिला किती त्रास होता सासरी, आता नाही जाणार आहे ती वापस, आपण आहोत तिच्या सोबत आपण देवु तिला साथ" ,.. बाबा

" सुलभाताई मनु सविता तिच्या सोबत आहेत का",.. आई

हो..

" मग काहीच काळजीची गोष्ट नाही त्या ताई सविता आणि मनूला छान सांभाळून घेतील, काही लागलं तर आपण आहोतच, आपल्या घराच्या आसपास नंतर घर घेऊया",.. आई

" हो सध्या मनुची दहावी होईपर्यंत त्यांनी त्याच एरियात फ्लॅट भाड्याने घेतला आहे, तिथे तिची शाळा क्लास आहे ना, आज जावून ती आणि रमेश यांनी अ‍ॅडव्हान्स ही भरला, मस्त 2 bhk आहे आणि आपण तिच्यासाठी घर घेवून देवू स्वतः च नंतर",.. बाबा

" हो चालेल छान घ्या घर, बर झाल चांगला निर्णय घेतला सविता ने, किती दिवस त्रास सहन करणार ती असा त्रास ",.. आई

" तू ठीक आहेस ना ",.. बाबा

" हो उलट मला ती आता सासर सोडून आली तर बरं वाटत आहे, आधी तिच्या साठी जीव अर्धा व्हायचा, फोन वर किती घाबरत बोलायचो आपण तिच्याशी",.. आई

" जे होत ते चांगल्या साठी होत ",.. बाबा

" हो बरोबर आहे, देव बघतो आहे ",.. आई

सविता रमेशने चहा घेतला आता बर वाटत होत सविता ला, थोड्या वेळा पूर्वी डोक दुखत होत तीच सतीश मुळे

सविता जातांना आईला भेटायला गेली,

" इकडे ये सविता",.. आईने मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला,.." नीट रहा, तुझ्या सासुबाई चांगल्या आहेत, त्यांना सांभाळून घे, काही लागलं तर दादा आणि बाबा आहेत",.

"तुला समजलं का आई",.. सविता

"हो मी बाबांना विचारलं त्यांनी सांगितलं",.. आई

"आई तू काळजी करू नकोस होईल नीट सगळ" ,.. सविता

"नाही ग कसली चिंता? आता ठीक वाटत तू किती त्रासात होती तिकडे ",.. आई

हो आई...

" अग मग आम्हाला सांगायच ना, किती त्रास सहन केला एकटीने",.. आई

" आई तुला किती बरं नाही, आमचं नेहमीच आहे ग, काळजी घे आता मी मनु सासुबाई आम्ही सोबत आहोत",.. सविता

आई समाधानी दिसत होती,.." तुझा त्रास कमी झाला, हेच बर वाटतय बघ ",

" आता घरी आली की ये माझ्या कडे, खूप छान घर घेतल भाड्याने, आरामशीर रहा पंधरा दिवस",.. सविता

" हो येणार आहे मी बरेच वर्ष झाले तुझ्या सोबत रहायच आहे मला, खूप मजा करू आपण ",.. आई

हो आई..

"बाबा आम्ही निघतो, जरा वेळाने जाईन मी घरी ",.. सविता

" हो चालेल, मी येतो दोन दिवसानी तिकडे",.. बाबा

" मी येतो डब्बा घेवून ",.. रमेश

हो..

रमेश दादा सविता घरी आले,

वाहिनीने चहा केला.

सविता फोन घेवून बाहेर आली तिन्ही रूपा मॅडमला फोन लावला...... ती आता सतीश ला सोडणार नव्हती..
.....

कुठल्याही भांडणात स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवले जातात? एवढी सोपी गोष्ट वाटते का ही बाकीच्यांना? तिला काहीही बोला सोप आहे अस वाटत का? त्या स्त्रीचं काय होत असेल? तिच्या मनाला या गोष्टीने किती यातना होत असतील, या गोष्टीचा काही विचार केला आहे की नाही कोणी.....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now