Jan 29, 2022
कथामालिका

मी काट्यांतुन चालून थकले... भाग 10

Read Later
मी काट्यांतुन चालून थकले... भाग 10मी काट्यांतुन चालून थकले... भाग 10

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

सतीश घरी आला, त्याला झोपच लागत नव्हती, तिकडे सविता आई मनु घरातच होत्या, तरी त्या कोणालाच मला भेटावसं वाटलं नाही, सविता चे वडील आणि रमेश किती घाण वागले माझ्याशी, मला घरातून घालवल, माझी तर नोकरी जवळजवळ गेल्यातच जमा आहे, सचिन सरांना का हवा आहे माझा माफीपत्र ? , आमच्या घरच्या भांडणाशी त्यांचा काय संबंध? मी त्यांच्यावर केस करु का? होईल का त्याने काही फायदा? काय कटकट आहे ही? विचार करता करता सतीशला झोप लागली..

सकाळी नऊच्या सुमारास सतीश ला जाग आली, सतीश ने उठून चहा केला, त्याने सचिन सरांना फोन लावला,.. "साहेब तुम्हाला खरच ते माफीपत्र हव आहे का?",..

"हो त्याशिवाय तुला ऑफिसला येता येणार नाही, नऊ वाजले आहेत आता, अकरा वाजेपर्यंत वेळ आहे",.. सचिन

" साहेब मी गेलो होतो काल सविताच्या माहेरी, ती भेटली नाही मला, त्याला मी काही करू शकत नाही?",.. सतीश

" खराब वागतांना हा विचार करायचा होता, आज तू माफीपत्र लिहून नाही आणला तर उद्यापासून ऑफिसला जायची गरज नाही, मी तुला नोकरीवरून कमी केल्याच पत्र घरी पाठवून देईन ",.. सचिन

"साहेब ऐका एक मिनिट माझ्या कामात काही कमी आहे का?, ऑफिस कामाचा घरच्या भांडणाच काय संबध, तुम्ही अस का करता आहात? ",.. सतीश

" तू अस का केल ते सांग आधी? तू स्वतःला बाकीच्यांपेक्षा चांगल समजतो का? घरचा मेन माणूस म्हणून सगळ्यांना सांभाळायचं सोडून तू मनु सविता वहिनींचा खूप छळ केला, सगळं तुझ्या मालकीचा आहे असं तु वारंवार बोलत होता, एवढा गर्व बरा नाही, कोणाचंच कोणासाठी अडत नाही, तू त्यांना घरात राहूनही दिलं नाही, आता त्या चालल्या गेल्या तुझ्या घरातुन, त्या तिकडे त्यांच्या त्यांच्या सुखात आहेत, पण आता तुझा नंबर आहे, तुला त्रास होणार, ठीक आहे राहा तू एकटाच घरी तुझ्या, तू माणूस म्हणूनच फेल गेला आहेस सतीश, अजून यापेक्षा वाईट काय असेल,
ऑफिस काम तर ट्रेनिंग दिल की काय कोणीही करू शकत, अशी खराब माणसं मला ऑफिस मध्ये नको आहेत, मुळातच दुसऱ्याला त्रास देण त्यांच्याशी व्यवस्थित न वागणं मला अजिबात आवडत नाही, त्यात तर तू एका स्त्रीला त्रास दिला आहेस, हे तर अजिबातच एक्सेपटेबल नाही, माझा विरोध आहे या गोष्टीला, तुला आपल्या ऑफिस मध्ये काम करता येणार नाही, तुला जी ॲक्शन घ्यायची ती घेऊ शकतो या ऑफिस विरोधात",.. सचिन

" मी वरपर्यंत कंप्लेंट करेन",.. सतीश

" चालेल ना काही हरकत नाही तुझं बिहेवियर सर्टीफिकीट आणून दे, तुझं बिहेवियर चांगलं नाही, हे वर पर्यंत समजलं तर तुला काढायला ते अजिबात उशीर करणार नाही, मला विचारतील मॅनेजमेंट तुझ्या बद्दल , मी देईन तेव्हा तुझा रीपोर्ट, केव्हाही करू शकतो तु कंप्लेन माझी",.. सचिन

सचिन साहेब जे बोलत होते त्यावर सतीश विचार करत होता, आता तो चांगलाच घाबरला होता, उगीच बोललो यांना काही, आता काय करावं.

" साहेब यातून काही मार्ग निघणार नाही का? मी सविता मनुला त्रास देणार नाही, यापुढे मी नीट वागेन ",.. सतीश चांगलाच घाबरला होता

"नीट वागणार म्हणजे काय? उपकार करतो आहेस का आमच्यावर? म्हणे त्रास देणार नाही, मला ते काही माहिती नाही, माझा वेळ घालवु नकोस" ,.. सचिन साहेबांनी फोन ठेवून दिला

सतीश ने सविता ला फोन लावला, तिने फोन उचलला नाही, काय करू जावून बघू का तिच्या माहेरी? , नको सारख सारख, जाऊ दे भेटणार नाही ती, दुसरी नौकरी बघावी लागेल, सगळ्या बाजूने घेरल आहे सगळ्यानी मला, ठीक आहे ही वेळ ही जाईन.

सतीशच दुपारच जेवण झाल, काय कराव तो विचार करत होता, जॉब तर गेल्यात जमा आहे, पोलिस स्टेशन हून फोन आला

"तूम्हाला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावे लागेल, तुमच्याविरुद्ध सविता आणि रमेश यांनी कम्प्लेंट केली आहे, तरी तुम्ही लगेच हजर व्हा",..

सतीश दचकला त्याला अपेक्षा नव्हती की सविता त्याची पोलीस कंप्लेंट करेन, काय करावं? त्याला सुचत नव्हतं, त्याच्या ओळखीच्या एका वकिलाला त्याने फोन केला,.. "तुम्ही येता का आता माझ्यासोबत पोलीस स्टेशनला?" ,

दोघं मिळून पोलीस स्टेशनला आले, सविता रमेश आणि सागर तिथे बसलेले होते, सतीश आल्यानंतर तो सविता कडे रागाने बघत होता,

"तुमच्याविरुद्ध कंप्लेन आहे सतीश, शारीरिक मानसिक छळ याची कम्प्लेंट केली आहे, या सविता मॅडम आणि त्यांची लहान मुलगी मनु यांना तुम्ही मारलं आणि वर्षोनुवर्षे यांचा छळ होत होता तुमच्याकडे, आता त्या छळाला कंटाळून माहेरी गेल्या तिथे तुम्ही जावून गोंधळ घालता आहात, तुम्हाला काही बोलायच आहे का यावर ", ... इंस्पेक्टर

" सगळ्यांच्या घरात होतात भांडण, आमच्या ही घरी झाल, यात सविता ने इश्यू केला, एवढ काही झाल नव्हत, तीच माहेरी निघून गेली, मुलीला माझ्या आईला घेवून गेली, आणि हे आहेतच तिच्या माहेरचे लोक तिला चुकीच्या गोष्टीत सपोर्ट करतात, त्या पेक्षा तिच्या कानाखाली मारून यांनी तिला माझ्या घरी आणून सोडायच, मी सविता सोबत रहायला तयार आहे ",.. सतीश

" एवढाच झाल आहे का सतीश, खूपच चांगले दिसता आहात तुम्ही , आमच्या कडे तुमच्या विरूद्ध पुरावा आहे ह, विचार करून बोला, तोंड सांभाळा नाही तर तुम्हाला माहिती आहे कोणाला मिळेल कानाखाली ",.. इंस्पेक्टर

सतीश थोडा घाबरला होता, तो वकिलांकडे बघत होता

" तुम्ही सतीश साहेबांशी अश्या भाषेत बोलु शकत नाही, ते सविता मॅडमला सांभाळायला रेडी आहेत ",.. वकील

" या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात हो, सगळे या केस मध्ये असेच बोलतात, आम्ही सांभाळायला तयार आहोत वगैरे, पण एकदा केस बंद झाली की त्या मुलीचा परत त्रास तसाच सुरू होतो, बऱ्याच केसेस बघितल्या आहेत आम्ही अश्या, एवढे जर ते सांभाळायला तयार आहेत तर आधीच का नाही नीट वागले? एवढा पोलीस स्टेशन पर्यंत यायची वेळ आली असती? का खोटं बोलत आहात तुम्ही सतीश? आम्ही काही उगीच बसलो नाहीत या खुर्ची वर, काय हो सविता ताई तुमच काय म्हणण आहे ",.. इंस्पेक्टर

" खोट बोलता आहेत सतीश, दोन दिवसापासुन पन्नास वेळा ते बोलले मला तुझ्याशी काही देण घेण नाही, तू हव तिथे जा, त्यांनी मला घराबाहेर काढल, कायमच ते अस बोलत आले की हे घर माझं आहे तुला जर नसेल पटत तर निघायचं माहेरी, या पुढे मला काहीही बोलायचं नाही, मी किती ही बोलले तरी हे उलट बोलतील, मला आता कंटाळा आला आहे यांच्या वागणूकीचा, माझ्या कडे पुरावा आहे, माझी मुलगी सासुबाई साक्षीदार आहेत, शेजारचे आणि यांच्या ऑफिस चे बॉस साक्षीदार आहे ",.. सविता

" बरोबर आहे एकदम इंस्पेक्टर साहेब माझा बॉस सचिन कसा काय मदत करतो आहे हिला ते विचारा, गुपचूप भेटते ही त्याला, माहिती नाही काय सांगून ठेवल तिकडे?, ते आता मला कामावरून कमी करता आहेत ",.. सतीश च्या जिभेवरचा परत ताबा सुटला

रमेश दादा, सागर जागेवरून उठले, दोघ सतीश जवळ आले,.." सतीश तोंड सांभाळून बोल",.. रमेश दादा चिडला

" काय मूर्ख माणूस आहे हा, सांगा यांना जरा काय बोलता आहेत हे ",.. सागर सतीश च्या वकिलांना सांगत होता

" खरं ऐकुन त्रास झाला का रमेश? तुला माहिती नाही तुझी बहीण दोन दिवस तिकडे होती सचिन साहेबांकडे",.. सतीश

"माझी बहीण दोन दिवस कुठे होती आणि कोणासोबत होती याच्याशी तुम्हाला आता काही देण घेण नाही आता, आमच्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत, तुम्ही जरा तुमच घाण बोलणं बंद करा",.. रमेश

"सतीश तुम्ही शांत बसा, उगीच वाटेल तसं बोलू नका, असं काहीही झालेलं नाही, रमेश माहिती आहे ना आपल्याला ते खोट बोलतात ते, इथे अस होत, आरोप प्रत्यारोप होतात, एवढ मनाला नाही लावायचा, कोर्टात बघा अजून काय होईल, तुम्हाला माहिती नसलेले तुमचे गुण तुम्हाला समजतील" ,.. इंस्पेक्टर

" किती वाईट पद्धत आहे पण ही दुसऱ्याला त्रास द्यायची, जरा तरी विचार करून बोलायचं ना ",.. रमेश

" असच असतं इथे पोलीस स्टेशनला आणि कोर्टात, आपल्या मनाचं काही होत नसला की लोक दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होतात, सविताच्या बाजूने एकही दुर्गुण नाही ना म्हणून मग तिचं सचिन साहेबांसोबत नाव जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न सतीश करत आहे, काय हो बरोबर आहे नाही हे",.. इंस्पेक्टर

" खरंच खूप घाणेरडा मनुष्य आहे हा, सविता तु कशी राहिली यांच्यासोबत इतके वर्ष काय माहिती",.. सागर

" काय पुरावे आहेत तुमच्याकडे माझ्याविरुद्ध, माझी आई मुलगी तेच बोलेल जे सविता सांगेल, शेवटी धमकावले असेल त्यांना हिने, मला समजला आहे हिचा प्लॅन",.. सतीश अजूनही सविता ला च दोष देत होता

" हे बघा सतीश पोलिस स्टेशन मध्ये हळू आवाजात बोलायच, इथे फक्त आमचा आवाज चालेल हा तुमचा घरघुती मॅटर आता कोर्टात जात आहे तिकडे सांगा काय सांगायच ते, इथे सही करा ",.. इंस्पेक्टर

सतीश त्याचे वकील बाहेर आले,.." केस काही विशेष नाही आहे घरगुती हिंसाचाराची केस आहे, सोडवू आपण सतीश काळजी करू नका",..

सविताने पेपर वर सह्या केल्या, सविता रमेश सागर तिघे बाहेर आले

" किती घाण आहे सतीश, कुठे भेटला हा असा माणूस तुम्हाला, आपल्या एवढ्या चांगल्या सविताचा किती मोठ आयुष्य वाया गेलं याच्या मूळे, काय ते विचार अजिबात बोलण्याची पद्धती नाही ",.. सागर

" हो ना काय सांगणार आता, नशीब आमच असंच म्हणाव लागेल",.. रमेश

सविता काहीच बोलत नव्हती, ती एकदम गप्प झाली होती, अशा गोष्टींची.. आरोप-प्रत्यारोपांची तिला सवय नव्हती, सचिन सारख्या चांगल्या मनुष्या सोबत तीच नाव सतीशने जोडल होत, म्हणजे हे जरा अतिच झालं आहे, तरी पूर्ण आयुष्यात मी कुठे गेली नाही, लग्नानंतर नोकरीही केली नाही, माझा कुठलाही पुरुषाशी संबंध नाही, फक्त घरात राहिले कायम, तरी माझ्यावर हे असे आरोप होत आहेत, जर मी नोकरी केली असती तर काय केलं असतं सतीश ने, सामंजस्याने आम्हाला वेगळं नाही होता येणार का? काहीतरी बोलायलाच पाहिजे का सतीशने? तेसुद्धा इतक्या खालच्या दर्जाच, त्याला पूर्वीपासून माहिती आहे की मी कशी आहे, तरी असं बोलायला जीभ कशी रेटते, थोडाफार सारासार विचार करायला हवा, की राग आला म्हणून काहीही बोलत सुटायचं, नाही तरी पूर्वीपासून त्यांनी कधी विचार केला आहे मला बोलतांना, जे मनात आलं ते बोलायचं, मनात आलं तसं वागायचं, हीच पुढे काय होईल याचा अजिबात विचार नाही, की हिला काय वाटेल याचा विचार नाही, फक्त स्वतःचा राग व्यक्त करणे आणि वाटेल तसे वागणे आणि बोलणे एवढंच येतं यांना, अगदी नको झालं आहे मला आता, दर्जाहीन वागणं आहे हे,
मी संध्याकाळी रूपा मॅडमला फोन करणार आहे, त्यांना हे समजायलाच पाहिजे की सतीश ने माझं आणि सचिन सरांचे नाव सोबत जोडलं आहे आणि त्या म्हणत होत्या ना बुटीकच काम सोबत सुरू करू, त्याविषयी पण बोलून घेते, आता सतीश विचार करणं बंद केलं पाहिजे, स्वतःच्या कामाचा विचार करायला पाहिजे, पण मी सतीश ला कधीच माफ करणार नाही, माझ्या नजरेतुन तो सतीश पूर्ण उतरला आहे, त्याला त्याला आता मी सोडणार नाही

रमेश दादा इन्स्पेक्टर साहेबांशी बोलत होता, सागर बाजूला उभे राहून सविता कडे बघत होता, तो सविता च्या जवळ येऊन बसला,

"सविता मला माहिती आहे तू आत्ता काय विचार करते आहेस, सोडून द्यायचं हे सगळं, मी वकील आहे अशा हजारो केसेस मी रोज बघतो, आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, अत्यंत खालच्या दर्जाचा वागतात लोक, तु तोच विचार करत बसली तर तुझं कसं होणार? सोडून दे ग, इथे प्रत्येकाला कळलं ना सतीश काय लायकीचा मनुष्य आहे, बरं झालं तू लवकरच हा निर्णय घेतला, आता सगळं नीट होईल बघ तुझं,
मी शक्यतो ही केस कोर्टात जाऊ देणार नाही आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करू आपण, मुद्दामच मी आत्ता काही बोललो नाही, यापुढे शक्यतो तुझी आणि सतीश ची भेट होणार नाही असं आपण बघू, काही लागलं तर आपण त्यांच्या वकीलाला तर्फे बोलत जाऊ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, मी आहे ना सोबत रमेश आहे, होईल नीट सगळ ",.. सागर

"सागर खरच तू किती समजूतदार आहेस, मला तर अगदी आता गळून गेल्यासारखं झालं होतं, किती भयानक प्रकार आहे हा, पूर्वीही होता मला सतीश चा त्रास, पण आता त्यांनी जे आरोप केले आहेत ना माझ्यावर अगदी सहन होण्यासारखे नाहीत ते" ,.. सविता

"हो मला ते समजलं आहे तुझ्या चेहऱ्याकडे बघून, खूपच त्रास होतो आहे तुला, सोडून दे ग, थोडा काळ आहे हा, एकदा का या केस पासून तिची सुटका झाली की काहीही प्रॉब्लेम नाही" ,... सागर

"किती छान समजावून सांगतोस तू सागर, मला खरंच आता बरं वाटत आहे" ,.. सविता

"हो ना, चल मग आता मूड बदल, हस बर, की मी एक जोक सांगू, लहानपणी सांगायचो तस, तुला लक्ष्यात आहे ना ",.. सागर

" काहीही काय सागर",.. सविता खरच मनापासून हसत होती
..............

काही काही नाती खरंच बर्डन बनुन जातात, त्यातून शक्यतो लवकर सुटका झाली की बरं असतं......ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now