मी काट्यांतुन चालून थकले... भाग 9

सविताने थोडक्यात सगळी जीवन कहाणी सांगितली,.. "आता मला घटस्फोट हवा आहे, तोही लवकरात लवकर, मला त्या माणसाशी काहीही संबंध ठेवायचा नाही, मला त्यांचे पैसे नको फक्त सुटका हवी आहे",.


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 9

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

सतीश घरातून निघाला, आज काहीही झाल तरी सविताला गाठायचं आहे, जर ती माहेरी नसेल तर समजून जाईल किती नक्की सचिन साहेबांसोबत आहे, सतीश सविताच्या माहेरी आला,

गप्पा मारून सविता नुकतीच आत मध्ये झोपायला गेली होती, रमेश दादा वहिनी ही रूम मध्ये होते, बाबा झोपायला गेले, दारावरची बेल वाजली, रमेश दादा बाहेर आले, त्याने बघितलं की सतीश आलेला आहे, बाबा ही बाहेरच्या रूम मध्ये आले, रमेश ने बाबांना इशारा केला दार उघडू नका.

आत मध्ये जाऊन सविताला सांगितलं,.. "बाहेर सतीश आला आहे काय करायचं?",..

"कशाला आला आहे तो आता इकडे",.. सविता

" काय माहिती बहुतेक काहीतरी काम असेल त्याचं ",.. रमेश

"दुपारी मला फोन आला होता सतीशचा सचिन साहेबांकडे जेवायला जायचं होतं, मी स्पष्ट नकार दिला, तिकडे बहुतेक काहीतरी झालं असेल, सचिन साहेब आपल्याला काल भेटले ना हॉस्पिटल मध्ये तेव्हाच ते सतीश वर चिडलेले होते",.. सविता

" काय करूया ताई मग आता",.. रमेश

" नको उघडायला दार, मला अजिबात इथे गोंधळ नको आहे, आधीच आई ला बर नाही तर बाबा टेंशन मध्ये आहेत, अजून आपल्या मुळे त्यांच्या त्रासात वाढ नको, सतीश चांगलाच भांडतो, त्याला काही वाटत नाही त्याच",.. सविता

" अग पण अस दार न उघडुन कसं चालेल? त्यापेक्षा तू आत थांब मी दार उघडतो आणि त्याला इथून जायला सांगतो",.. रमेश

" रमेश दादा सतीश खूप डेंजर आहे ह, जरा सावध रहा, एकदम गाफील होऊन त्याच्यासमोर जाऊ नको तो एकदम चाल करतो समोरून ",.. सविता

" करू दे ना त्याला काय चाल करायची ती, मला भेटायचं आहे त्याला, बघतो किती जोरा करतो, माझ्याशी गाठ आहे म्हणा ",.. रमेश

रमेश दादाने मी पुढे जाऊन दार उघडलं, सतीश दारात उभा होता, तो आत वाकून बघत होता सविता दिसते का ते,

"काय काम काढल सतीश, बर्‍याच वर्षांनी इकडे तुम्ही? ",.. रमेश

" मला सविताला भेटायच आहे म्हणजे सविता आली आहे का इकडे? ",.. सतीश

" इकडे कशाला येईल सविता? तुमच्याच घरी असेल ना सविता? तुम्ही पाठवतात का तिला माहेरी? इथे कशी असेल ती?, तुम्ही सांगा कुठे आहे सविता? तुमची जबाबदार आहे ना ती? , मलाच काय विचारता आहात? ",.. रमेश

"जस तुम्हाला माहिती नाही काय झाल ते? ",.. सतीश

" माहिती आहे, तेच विचारत आहे तुम्हाला, काय प्रकार आहे हा? काही वागायची बोलायची रीत नाही का तुम्हाला? अस काय केल माझ्या बहिणीने, मनु ने, तिला घराबाहेर काढल तुम्ही, मनु ला मारल, आता तुमचा आमचा काहीही संबध नाही, तुम्ही जाऊ शकता",.. रमेश

" मला माहिती आहे सविता इथेच आहे, तू तिला बाहेर बोलव रमेश, मला सविताशी काम आहे, बाकी काही वाद घालायचा नाही",.. सतीश

" वाद घालायचा नाही म्हणजे काय? तुम्हाला माहितीच आहे का इथे भांडण होणार आहे ते, तुम्ही तसे घाण वागणारे दिसता आहात, माझ्या बहिणीला बेघर केल, वर तोंड करून इथे आलात माझ्या घरी, निघायच आता समजल का सतीश",.. रमेश

सविता.... सविता... सतीश बाहेरून आवाज देत होता

सासुबाई आत मध्ये उठून बसल्या,.. "सतीश आला आहे का ग सविता ",.

" हो आई, ते बाहेर आले आहेत ",.. सविता

" का पण",.. सुलभा ताई

" असेल त्यांचं काही काम, आज ते सचिन साहेबांकडे गेले असतील जेवायला, तिथे काहीतरी झाले असेल, मी पुढे गेली की उगीच भांडण होईल, आणि मला त्यांना भेटायची इच्छा नाही आणि यापुढे त्यांना काही मदत ही मी करणार नाही",.. सविता

" हो बरोबर आहे तुझं, जाईल जरावेळ उभा राहून, उगीच वाद नको यांच्या घरी ",.. सुलभा ताई

" मला माहिती आहे सविता घरातच आहे, मी इथून जाणार नाही, माझं तिच्याशी फक्त दहा मिनिटाचे काम आहे, तेवढ झाले की मी चालला जाईल, मला बाकी तुमच्याशी काही घेण नाही, मी तुमच नाव घेणार नाही ",.. सतीश

" मी किती वेळा सांगितले की सविता नाही आहे इथे, रहायचं असेल तर उभा राहा रात्रभर, माझी काही आडकाठी नाही ",.. रमेश

सतीश जायला निघाला, त्याला सविताच्या चपला दिसल्या, हे काय सविताच्या चपला इथेच आहे, म्हणजे सविता घरात आहे

सविता... सविता...

सतीश आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करायला लागला, बाबा बाहेर आले,.." काय चालल आहे सतीश? ",...." रमेश त्यांना नीट आत येऊ दे",

सतीश येवून आत मध्ये बसला.. तो वाकून आत बघत होता

"बोला काय काम काढल इकडे?",.. बाबा

"मला सविताला भेटायचं आहे, माझं महत्त्वाचं काम आहे तिच्याकडे",.. सतीश

" आता काय काम आहे माझ्या मुलीकडे तुमच? , अगदी महत्व नाही सविताला तुमच्या आयुष्यात, मग आता काय एवढं अर्जंट आहे? तुम्ही तिला नीट सांभाळू शकले नाही, माझी मुलगी त्रासात होती तिकडे, तुम्ही कसेही वागत होते तिच्याशी, तिला घराबाहेर काढल, आता तुम्हाला काम पडल तर तिची आठवण काढता आहात, चालेल का अस? ,आहे ती घरात तरी सविता भेटणार नाही तुम्हाला, तिची तशी इच्छा नाही ",.. बाबा

"ती माझी बायको आहे",.. सतीश

"आत्ता आठवल का? ठीक आहे ना मग तुमची बायको आहे तर, अस नाही तरी नवरा म्हणून कुठले कर्तव्य तुम्ही निभावले, दर वेळेस तुम्ही चुका केल्या, तिला त्रास दिला, आता काम आहे तर बायको आठवते का?, नाही भेटणार सविता तुम्हाला, तिची इच्छा नाहिये,सांगितल ना एकदा, तुम्ही निघा ",.. बाबा

"मला हे सविताच्या तोंडून ऐकायचं आहे ",.. सतीश

" काही गरज नाही आहे त्याची, तुम्ही काही खूप चांगले वागत नाही आहे तिच्याशी, की तिला तुम्हाला भेटावसं वाटेल, समजलं आता सविताला भेटायचं नाही ते, निघा आता",.. सतीश

" मी खूप अडचणीत सापडलो आहे बाबा, मला एकदा सविताशी बोलू द्या, तिच्याकडून मला माफीनामा लिहून घ्यायचं आहे, तो मला ऑफिसमध्ये जमा करायचा आहे, माझी नोकरी जाईल नाही तर ",.. सतीश

" का माफीनामा हवाय? काय केल तुम्ही एवढ? ",... बाबा

सतीश काही बोलला नाही..

" आधी करायच मग निस्तरायच का?, नाही सविता ला तुम्हाला भेटायची इच्छा नाही, तुम्ही चुकला आहात त्याच तर काही वाटत नाही तुम्हाला, एवढ्या लहान मनुला तुम्ही सोडल नाही, असा तुमचा पुरुषार्थ, तुमचा आधार वाटत नाही कोणाला , वाटतो तो फक्त राग, माणूस म्हणून काय कमवल तुम्ही? स्वतः ची आई सोबत नाही तुमच्या , आम्ही तुम्हाला अस सहजासहजी सोडणार नाही, माझा राग काय आहे हे समजेल आता तुम्हाला ",.. बाबा

सतीश रागारागाने उठला,.."मी बघून घेईन तुम्हाला सगळ्यांना, जास्त झाल आहे, मी पण काही कमी नाही माहिती आहे काय गुण उधळते सविता ते, ती कुठे जाते कोणाला भेटते, सगळ माहिती आहे मला ",..

" जा रे खूप बघितले आहे असे बघणारे, तू तुझ बघ, आम्हाला नाव ठेवून उपयोग नाही",.. रमेश

"तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे ",.. सतीश

" हो का, आम्हाला जाणून घ्यायच नाही ",.. रमेश

" रमेश नको त्यांच्या नादी लागू, ते गेल्यावर दार लावून घे",.. बाबा

सतीश बाहेर गेला, रमेशने दार लावून घेतलं, लाईट बंद केले, खिडकीतुन बघितलं सतीश बराच वेळ बाहेर उभा होता, रमेश दादा सविताच्या रूम मध्ये आला, सुलभाताई सविता जाग्या होत्या,.. " सविता बाहेर ये एक मिनिट",

सविता बाहेर आली

" गेले का ते, काय म्हटले भांडत होते ना",.. सविता

"नाही गेले, बाहेर उभे आहेत, काहीतरी म्हणत होते की तुझ्याकडं माफीनामा लिहून घ्यायचं आहे नाहीतर नोकरी जाईल",.. रमेश

"बरं झालं असंच पाहिजे अशा लोकांना, नोकरी वर नाही ठेवायला पाहिजे ",.. सविता

" सविता तू आरामात झोप काळजी करू नको",... रमेश

" हो दादा आता मी कसली काळजी करणार नाही",.. सविता

" सतीशच काहीतरी कराव लागेल इथे पर्यंत आला तो तिकडे तुम्ही तिघी एकट्या असाल",.. रमेश दादा विचार करत होता
.....

दुसर्‍या दिवशी सकाळी नाश्ता करून रमेश दादा, सविता घरातून निघाले, आज बुटीकला सुट्टी होती, तिकडे रमेश दादाचा एक मित्र आला, त्याने बरेच घर दाखवले, दोन बेडरूम वाल घर रमेश दादा ने पसंत केल,

" अरे दादा एवढ मोठ घर काय गरज आहे ",.. सविता

"असू दे मनु लाअभ्यासाला एक रूम हवी आता" ,.. रमेश

नाही हो करता करता तो अतिशय छान प्रशस्त असा फर्निश्ड फ्लॅट भाड्याने घेतला, लगेच रमेश दादा ने डिपाॅझीट ही दिल, सांगितल घरभाड माझ्याकडून घ्यायच,

" दादा अरे तू का दिले पैसे? आहेत माझ्या कडे आणले आहेत मी सोबत ",.. सविता

" असू दे ग, अस तुझ माझ नको करू ",.. रमेश

"नाही अस नाही, माझा खर्च तू नको करूस, मी घेतलय ना निर्णय सेपरेट रहायचा, मग माझा खर्च माझ्याकडे, तुला तुझा संसार आहे ना",.. सविता

"नंतर दे तू असू दे आणि हे पैसे बाबांनी दिले आहेत ",.. रमेश

" असू दे बाबांना लागतात पैसे, आता हॉस्पिटल चा किती खर्च झाला",.. सविता

" तू त्यांना दे मला नको ",.. रमेश

दोघ जावून ते सामान घेऊन नवीन घरी ठेवून आले, दोन दिवसानी अ‍ॅग्रीमेंट होती, फ्लॅट रमेश दादाने स्वतः भाड्याने घेतो अस सांगितल, दर महिन्याला मीच रेंट देईन,

दोघ घरी यायला निघाले,.....

रमेश दादा ने गाडी पोलिस स्टेशनला वळवली,

" अरे दादा पोलीस स्टेशनला का आलो आहोत आपण",.. सविता

"आपल्याला सतीश बद्दल कंप्लेंट करायची आहे",.. रमेश

"आत्ताच करण गरजेचा आहे का कंप्लेंट?",.. सविता

"हो कंप्लेंट केली तरच केस उभी राहील, तुला हवा आहे ना घटस्फोट, आणि काल बघितल सतीश ने किती गोंधळ घातला घरी , जरा दणका द्यायला पाहिजे सतीशला, आपल्या घरी येतांना तो दोन दा विचार करेन या पुढे, तुमच नाव घेणार नाही अस करु ",.. रमेश

" हो ठीक आहे, आणि लवकरात लवकर हवा आहे घटस्फोट",.. सविता

" हो तस करू आपण ",.. रमेश दादाने तिथुन सागर ला फोन केला,

" सागर ला का बोलावलं आता इकडे दादा? ",.. सविता

" असू दे वकील सोबत जरा ",.. रमेश

तो येत होता पंधरा मिनिटात

" आधी आपण भेटू सागर ला, त्याच्याशी सविस्तर बोलू ",.. रमेश दादा

रमेश आणि सविता कॅन्टीनमध्ये गेले तिथे सागर येणार होता , जो वकील आहे, त्याच्याकडे सविता ची केस देणार होते ते, पाच मिनिटात सागर आलाच, सागर सविताचा वर्गमित्र होता, तो आला सविता रमेश उठून उभे राहिले

" अरे बसा मी काही कोणी अनोळखी आहे का? सविता कशी आहेस तू",.. सागर

"मी ठीक आहे सागर, तू कसा आहेस, अगदी शाळेत दिसायचा तसाच दिसतो आहे तू अजून, तुला अरे कारे केलं तर चालेल ना",.. सविता

"हो मग आपण वर्ग मित्र आहोत, फॉर्मॅलिटी कशाला? , सविता तू आधी इतकी सुंदर दिसते आहेस ह, एकदम फ्रेश ",.. सागर

" काहीतरी काय रे",.. सविता

वातावरण एकदम लाईट झालं होतं, सगळे खुश होते, काही काही माणस खूप छान असतात, त्यांच्या आजुबाजुला सुरेख वलय ते निर्माण करतात, स्वतः सोबत इतरांना ही खुश ठेवतात, सागर तसाच अतिशय मनमिळाऊ होता

रमेश दादा नी चहा मागवला

" काय आहे केस तुझी सविता",.. सागर

सविताने थोडक्यात सगळी जीवन कहाणी सांगितली,.. "आता मला घटस्फोट हवा आहे, तोही लवकरात लवकर, मला त्या माणसाशी काहीही संबंध ठेवायचा नाही, मला त्यांचे पैसे नको फक्त सुटका हवी आहे",.

"बघू आपण लवकरात लवकर ही केस सोडवू, तू काळजी करू नकोस, पोटगी ही मिळवून देतो तुला मी, का नको म्हणतेस? , किती कष्ट घेतले तू त्याच्या संसारासाठी, मुलगी अजून 18 वर्षाची नाही तुझी ",.. सागर

हो ना..

बर्‍याच वेळ ते बोलत होते,

" बर होईल अस झाल तर",.. रमेश दादा

" केस आपल्या बाजूने वळवतो मी बघ रमेश ",.. सागर

तिघे मिळून आत पोलिस स्टेशन ला गेले सतीश विषयी कम्प्लेंट केली, घरगुती हिंसा, मारहाण, शारीरिक मानसिक छळ, असे बरेच मुद्दे सागर सांगत होता,

"इन्स्पेक्टर साहेब सतीश अतिशय चालाख धूर्त आहे ह",.. रमेश

" असू द्या आपण काही कमी नाही, बघतो त्याची चलाखी, नाही त्याला जाम केला तर बघा, तुम्ही काळजी करू नका सविता ताई, रमेश ",.. इंस्पेक्टर,

त्यांनी सतीश चा पत्ता घेतला, कुठे नोकरीला आहे काय डेसिग्नेशन आहे सगळं लिहून घेतलं,

" त्या सतीश ला इकडे बोलवून घ्या फोन करून हवालदार काका", ........ इंस्पेक्टर

..............

सतीश चारी बाजूने अडकला , आता त्याची सुटका नाही, एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते, या साठी आधी पासून नीट रहाव.. वागाव....

🎭 Series Post

View all