मी काट्यांतुन चालून थकले... भाग 8
आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....
©️®️शिल्पा सुतार
.............
.............
सतीश चा फोन ठेवल्या नंतर सविताला आता रडायला येत होत, सुलभा ताईंनी तिचा हात घट्ट धरला, जणू काही मी तुझ्या सोबत आहे अस त्या सांगत होत्या,
"आई मला माफ करा अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोलली मी यांच्याशी, पण आता माझ्या पुढे काहीही ईलाज नाही आणि मी तुम्हाला आता सांगून देते की मी सतीश पासून घटस्फोट घेणार आहे, पोलिस केस होवू शकते, पण मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, तुम्ही कायम माझ्यासोबत राहणार, तुम्हीच माझा आणि मनु चा आधार आहात, मला माफ करा",... सविता
" बरोबर करते आहेस तू सविता, तुला होणारा त्रास मी बघितला आहे, रोजचे भांडण, मार, किती दिवस सहन करणार, काहीही काळजी करू नकोस, तो जरी माझा मुलगा असला तरी चुकीच्या गोष्टीला माझा पाठींबा नाही, तुला जो निर्णय घ्यायचा तो तू घेऊ शकते आणि मी तुझ्या सोबतच राहणार आहे, एक मुलगी करणार नाही तेवढं तू माझं करतेस, सासू-सुनेचं नात आपल्यात नव्हतंच कधी, माझं नशीब चांगलं कि मला अशी चांगली सून मिळाली, मला माफ कर सविता माझ्या संस्कारात काहीतरी खोट राहिली सतीश असा निघाला ",... सुलभा ताई
" नाही आई तुमचे संस्कार खूप चांगले आहेत, हेच असे का वागतात सगळ्यांशी काय माहिती? , तुम्ही स्वतःला दोष देऊ नका आणि या संस्काराचा प्रश्नच येत नाही, जो तो आपल्या कर्माने चांगल वाईट वागतो",.. सविता
" हो ग पण किती त्रास देतो सतीश तुला, आता मनुला ही सोडल नाही त्याने ",.. सुलभा ताई
" जाऊ द्या आई त्रास नका करून घेवू, सोडा तो विषय ",.. सविता
मनू सगळं ऐकत होती..
...........
...........
सतीश पुढे मोठा प्रश्न होता आता काय करायचं? , त्या तिघी कुठे रहातात ते ही माहिती नव्हत, एकटा जातो आता डिनर ला, सांगून देवू आईला बर नव्हत अस, आणि मी सविता ला चांगलाच धडा शिकवणार आहे, माझ्याशी उलट बोलते का, खूप माज आला आहे, तिला सतीश तयारीला लागला
......
......
तिघी हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या, बाबा होते.. रमेश दादा होता बाहेर,
" कश्या आहात सुलभा ताई तुम्ही" ,.. बाबा
सुलभा ताईंनी हात जोडले,.. " मी ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे आमच्या कडे काय झालं ते, मी माफी मागते तुमची , तुमच्या मुलीला खूप त्रास होता आमच्याकडे, सतीशच्या वागण कस होत हे माहिती आहे तुम्हाला" ,
" ताई काय हे, का हात जोडताय? तुमचा एवढा भक्कम आधार असतांना माझ्या मुलीला कसली चिंता करायची गरजच नाही, आता आम्ही आहोत सोबत वाईट वाटून घ्यायचं नाही ",.. बाबा
" खरच खूप चांगली आहे सविता, ती माझी खूप काळजी घेते, पण माझा मुलगाच का असा निघाला मला समजत नाही?",.. सुलभा ताई
" काही काही गोष्टी नसतात आपल्या हातात, तुम्ही काळजी करू नका ताई",.. बाबा
आज सविताच्या आईची तब्येत चांगली होती, त्यांना आयसीयु मधुन जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केल होत, सविता सुलभा ताई मनु यांना भेटून त्यांना चांगल वाटल,
" कशी आहे तुमची तब्येत",.. सुलभाताई
"मी ठिक आहे, तुम्ही कश्या आहात? आता तुम्ही सविता आणि मनु ची काळजी घ्यायची आहे ,.. आई
" हो तुम्ही आता लवकर बर्या व्हा, खूप गप्पा मारायच्या आहेत आपल्याला",.. सुलभा ताई
रमेश दादा बाहेर उभा होता, सविता जावून त्याला भेटली,.." ताई आता घरी चल, उद्या सुट्टी आहे शाळेला, आई एकदम ठीक आहे आता, आईला दोन दिवसानी घरी सोडतील , आपण दोघ उद्या जावून घराच फिक्स करून टाकू, तो पर्यंत तुझ्या सासुबाई मनु ला घरी राहू दे, सगळ सामान शिफ्ट केल की जा तुम्ही घरी, उगीच तिथे गोडाऊन मध्ये तुमची गैरसोय नको ",.. रमेश दादा
" त्यात काय आली गैरसोय, ठीक आहोत आम्ही तिकडे ",.. सविता
" नाही म्हटलं ना मी, आज घरी चल",.. रमेश दादा
" ठीक आहे दादा, तू ऐकणार नाहीस",.. सविता
सविता ने मनु सुलभा ताईंना पुढचा प्लॅन सांगितला,.. " दादा ऐकत नाही, आपण जाऊ या का घरी तिकडे आई ",..
" ठीक आहे जाऊ या तुझ्या माहेरी",.. सुलभा ताईंनी होकार दिला
" चालेल आई आपण जाऊ आजोबांकडे, पण जाता जाता मला माझी स्कूल बॅग घेता येईल का? , म्हणजे माझा अभ्यास होईल",.. मनु
"हो जाऊ या घरी, तुझे पुस्तक, आमचे कपडे सोबत घेवू",.. सविता
बाबा आई जवळ थांबले होते, सविता घरी येते आहे हे ऐकून बाबांना समाधान वाटले,
"मी येतो बाबा डब्बा घेवून ",.. रमेश
" आम्ही जातो पुढे बाबा तुम्ही या लवकर",.. सविता
" हो तुझ्या आईच जेवण झाल की येतो आम्ही रात्री, इथे रात्री कोणाला थांबू देत नाही",.. बाबा
रमेश दादाच्या कार ने सगळे निघाले, आधी सविताच्या रूम वर आले, मनु सविताने जावून पुस्तक कपडे घेतले, पैसे पर्स घेतले सोबत, नीट कुलूप लावल, सगळे घरी आले, आज कितीतरी दिवसांनी अशी निवांत ती माहेरी आली होती, इतर वेळी एक तर सतीश तिला पाठवायच नाही माहेरी, दर वेळी भांडण करायचा, तिला नेहमी परत जायची घाई असायची, सतीश चा धाक असायचा, आज मनसोप्त राहणार आहे मी इथे,
छान बंगला होता बाबांचा, पाच सहा खोल्यांचा, घरात आई बाबा रमेश दादा वहिनी त्यांचा मुलगा सोहम एवढे लोक होते,
गाडी थांबली सोहम आत्याला बघून पळत आला, वहिनी आली बाहेर, वाहिनीला बघून सविताच्या डोळ्यात पाणी होत
"आता काळजी करायची नाही ताई, आम्ही आहोत ना, होईल सगळ चांगल, अस रडायच नाही" ,.. वहिनी
मनु, सुलभा ताई ही हळव्या झाल्या होत्या..
"चला मनु सोहम पटापट सांगा कोणत आईसक्रीम हव तुम्हाला, आम्ही जावून येतो ग मुलांना खाऊ घेवून येतो, तुझा स्वयंपाक झाला का?, डब्बा न्यायचा आहे" ,.. रमेश
"हो झाला आहे, मी डब्बा भरते तो पर्यंत",.. वहिनी
सविता सुलभा ताई आत गेल्या, वहिनी ने चहा केला, रमेश दादा आला तो पर्यंत, तो हॉस्पिटल मध्ये डब्बा घेवून गेला, वहिनी सविता बोलत बसल्या, मनु सोहम अभ्यासाला बसले, सुलभा ताई आतल्या खोलीत गेल्या,.." मी पडते थोडी सविता ",.
" हो आई, मनु आजी ला उशी दे ग",.. सविता
"ताई खरच या जगात असे वाईट वागणारे लोक असतात? ",.. वहिनी
"हो आमच्या कडे येवून बघ वहिनी, पण खरच बोलते कोणालाचा असा त्रास होवु नये " ,.. सविता
"काय मिळाल अस वागून सतीश भाऊजींना, आता बसतील एकटेच घरात, प्रेमाने वागले असते, थोड समजून घेतल असत बायकोला, काय बिघडलं असतं ",.. वहिनी
" त्यांना माहिती का असे करतात? , त्यांना मी आवडत नव्हते, माझी कुठलीच गोष्ट आवडत नव्हती, काय करणार ग वहिनी, तरी मी बरच समजून घेतल, उगीच चीड चीड करायचे ते, भांडण रोजच होत, दोन तास ही नीट जात नव्हते तिकडे",.. सविता
"कठिण आहे अश्या परिस्थितीत रहाण",.. वहिनी
"हो मग काय ",.. सविता
" जाऊ द्या आता तो विषय, मी पोळ्या करुन घेते ",.. वहिनी
" चल वहिनी मी पण येते, पटापट आवरून घेवू ",.. सविता
........
........
रमेश दादा हॉस्पिटल मध्ये पोहोचला, आईच जेवण झाल, ते दोघे घरी यायला निघाले,
" बाबा मी उद्या ताई सोबत जावून घर फिक्स करून टाकतो",.. रमेश
" मला काय वाटतं रमेश आपण ताईला एखादा फ्लॅट विकत घेऊन दिला तर?, भाड्याच्या घरात दर वर्षी घर बदला, बरीच झंझट असते ",.. बाबा
"हो माझ्या मनात तेच होत, पण लगेच ते होणार नाही, एखादा महिना लागेल, त्या पेक्षा आधी भाड्याने घर बघु, मग स्वतः च घेवू,, उगीच त्या तिघी तिथे गोडाऊन मध्ये नको रहायला ",.. रमेश
चालेल..
" माझे आहेत दोन तीन मित्र ओळखीचे, त्यांना सांगून ठेवतो मी ",.. रमेश
"माझ्याकडे आहेत पैसे, मी देईन ",.. बाबा
" तो प्रश्न नाही बाबा, पैसे आहेत",.. रमेश
" तुझे असू दे मी देईन ",.. बाबा
" ठीक आहे बाबा",.. रमेश
" उद्या घर पसंत केल की लगेच डिपाॅझीट दे आणि त्यांना सांग घरभाडे आम्ही देवू, सविता कडून एक ही पैसा घ्यायचा नाही ",.. बाबा
हो बाबा..
बाबा घरी आले, सगळे जेवायला बसले, छान केला होता स्वयंपाक वहिनी ने, जेवण झाल, सुलभा ताई मनु सोहम रूम मध्ये गेल्या, सविता बाबांशी बोलत बसली, रमेश दादा वहिनी ही होते तिथे
" सविता तुझा पुढचा निर्णय काय आहे आता? , काय ठरवल तू पुढे? ",.. बाबा
"बाबा मला नाही जायचं आता वापस घरी, माझ ठरल आहे, त्यांना माझ्याविषयी मनु विषयी अजिबात प्रेम नाही, दर पंधरा दिवसांनी ते घरा बाहेर काढतात मला, खूप हात पाय पडले की घरात घेतात, कधी कधी तर हात उचलतात माझ्या वर मनू वर, काय सांगू आता ",.. सविता
" तू आधी का नाही घेतला हा निर्णय?, कशाला त्रास सहन करत राहिली ",.. रमेश दादा
" दादा मी मनु साठी तिथे रहात होते, तिला वडिलांचा सुख मिळायला हव म्हणून, पण यांना मनु नको आहे, मी नको आहे त्यांची आई नको, मग आता तिथे रहाण्यात काही अर्थ नाही ",.. सविता
"मग वकिलाला सांगायचं का? की घेते तू थोडा वेळ आणखी ",.. रमेश दादा
" नाही दादा माझा निर्णय झाला आहे, तू सांग सागर ला, आपण केस सुरू करू ",.. सविता
बाबाच्या डोळ्यात पाणी होत..." तुझ खूप नुकसान झाल सविता, आमची एवढी हुशार ताई त्या सतीश ने नुसते हाल हाल केले तुझे, चांगला धडा शिकवला पाहिजे त्या सतीश ला",..
सविता ही रडत होती, वहिनी येवून जवळ बसली
" ताई आता सारख डोळ्यातून पाणी काढायचा नाही, बरेच वर्ष झाले तुम्ही सहन केल, जाऊ द्या आता नवीन सुरुवात करा, त्रास करून घेवु नका ",.. वहिनी
....
....
सतीश तयारी करून सचिन साहेबांकडे जेवायला गेला
" काय रे सतीश एकटाच आलास का? सविता वहिनी मनु काकू कुठे आहेत?",..सचिन
" त्यांचं नाही जमणार यायला, आईची तब्येत जरा खराब आहे",..सतीश आत येऊन बसला ,घरात बघितलं तर कसलीही जेवणाची तयारी झाली नव्हती, सगळीकडे अंधार होता, रुपा मॅडम ही घरी नव्हत्या बहुतेक, सतीश विचार करत होता आपल्याला जेवायला तर बोलवलं आहे पण यांची काहीच तयारी नाही
" सतीश तुला काय वाटत आहे मला काही माहिती नाही तुमच्या बद्दल",.. सचिन
"का काय झालं आहे साहेब ?",.. सतीश
"सविता वहिनी मनु आणि काकू कुठे आहेत? काय झालं आहे?",.. सचिन
"हे बघा सचिन साहेब तो आमचा पर्सनल मॅटर आहे, आपण नको बोलू या त्या विषयावर" ,.. सतीश
"काय झालय काय पण नक्की?, एवढी वेळ का आली की वहिनी घर सोडून गेल्या ",.. सचिन
" काय सांगणार आता मी आमच्या फॅमिली बद्दल, सगळे विचित्र आहेत, सविता नीट वागत नाही, मनूचा उद्धटपणा आणि आई नेहेमी त्या दोघींची बाजू घ्यायची, आमचे भांडण झाले आणि त्या घर सोडून निघून गेल्या ",.. सतीश
" हे इतका सहजासहजी झाला आहे का? सतीश तू खोटं बोलतो आहेस, खरं काय झाला आहे ते मला सगळं माहिती आहे ",.. सचिन
" आपण हेच बोलायला इथे आलो आहोत का साहेब?, सविताने फोन करून सगळा चोंबडेपणा केलेला दिसतो आहे",.. सतीश
" नाही मी हे बोलायला तुला बोलावलं नाही, मी हे जाणून घ्यायला बोलवल आहे एवढं झालं काय? तिघींना तू असं घराबाहेर का काढलं? का नेहमी तू त्यांना पाण्यात बघतोस? तुला काय वाटत आहे सतीश की तुझं वागणं चुकीचं नाही, स्वतःला घरचा कर्ता धरता पुरुष समजतो ना तू, मग घरच्यांना सांभाळून घेणे व्यवस्थित वागणं, मुलीला आईला बायकोला काय हवं ते बघण हे कर्तव्य नाही का तुझं? फक्त त्यांच्यावर जोर चालवणार त्यांना मारण हेच करतोस का तू एक पुरुष म्हणून ",.. सचिन
" हे बघा सचिन सर तुम्हाला काहीही माहिती नाही आमच्या घरी काय होतं ते, खूप त्रास दिलाय मला या दोघींनी ",.. सतीश
" काकूंनी काय केल होत? त्या का नाही तुझ्या सोबत? ",.. सतीश
सतीश काही बोलला नाही..
"काय आहे तूच मला नीट सांग? एवढी हुशार आहे तुझी बायको, मुलगी एवढी गुणी आहे, आईच वय झालं आहे, आता या वयात त्यांना आधार नाही, काय करतोस तू सतीश? ",.. सचिन
" चला सचिन साहेब मी निघतो, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही, जर तुम्हाला हेच सगळं बोलायचं होतं तर ते ऑफिसमध्ये का नाही सांगितलं, कश्याला इथे बोलावलं मला ",.. सतीश
" ऑफिस मध्ये हव का तुला हा विषय? , चालेल उद्या बोलू पूर्ण ऑफिस समोर, सतीश तुला जर व्यवस्थित वागता येत नसेल तर तुला तुझ्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल, माझ्या ऑफिस मध्ये अशा खराब लोकांना अजिबात जागा नाही, जे दुसऱ्याला त्रास देतात, व्यवस्थित वागत नाहीत, कलंक आहेत असे लोक, त्यांच्या पासून लांब राहिलेले बर ",.. सचिन
"काय बोलताय तुम्ही साहेब, एवढा वाईट आहे का मी? , आणि माझ्या कामाचा आणि आमच्या घरच्या घटनेचा काय संबंध? तुम्ही मला असं कमी करू शकत नाही कामावरुन, मी वर पर्यन्त तक्रार करेन तुमची ",.. सतीश
" तू काय तक्रार करशील माझी? , मी तुझ्या विरुद्ध तक्रार वर पर्यंत केली आहे आधीच, आणि मी मला जे हवं ते करू शकतो , मला कोणीही थांबवू शकत नाही, समजलं का सतीश आणि शहाणपणा अजिबात नको आहे माझ्या समोर, स्वतः व्यवस्थित वागायचं नाही दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि मोठ्या आवाजात बोलायचं, तुला जसं बोलता येतं ना त्याच्या चारपट मला भांडता येतं, पण मी विचार करतो की जाऊ देत, जर तू उद्यापर्यंत सविता वहिनी, आई आणि मनुची माफी मागितली नाही तर तुझी नोकरी गेली समज, आणि हा शेवटचा चान्स ही मी तुला त्या तिघीं मुळे देत आहे, त्या आता काय तुझ्यासोबत राहणार नाहीत पण निदान माफी मागून माणुसकी तर दाखव, उद्या सकाळी अकरापर्यंत तुला वेळ आहे आणि तू येऊ शकतोस आता ",.. सचिन
सतीश तिथून निघाला, त्याला समजत नव्हतं काय करावं, खूप अपमान झाला होता या सविता मनु मुळे माझा, काय करू आता, कुठे शोधु सविता आणि मनूला, त्यांच्याकडुन माफी पत्र लिहून घेतो आणि ऑफिसमध्ये सबमिट करतो म्हणजे एकदाच झालं काम, हे नक्कीच सविताच काम आहे, तिच्याकडे आहे वाटतं रुपा मॅडमचा नंबर, ती बोलली होती की मी करेन रूपा मॅडमला फोन, सवितानेच गुण उधळलेले दिसतात हे..
सतीश ने सविताला फोन लावला, सविता बाबांशी बोलत बसली होती, तिने फोन कट केला, सतीश ने लगेच मनुला फोन लावला, तिनेही फोन कट केला, फोन सायलेंटवर टाकून दिला, नको उगीच बाबांचा फोन, आई ला त्रास होतो, सविताच्या फोनवर परत सतीशचा फोन आला, सविताने परत फोन कट केला, फोन बाजूला ठेवून दिला, सतीशने चार-पाच वेळा सविताला फोन केला, घरा जवळच्या हॉटेलमध्ये त्याने जेवुन घेतलं आणि तो घरी आला,
काय कटकट आहे काही समजत नाही, आता दुसरी नोकरी शोधावी लागेल, या दोघी जणी माझा फोन उचलत नाही, त्यांना माहिती असेल बहुतेक सचिन ने मला असं माफी मागायला सांगितली आहे, सचिन आणि सविता सोबत तर नसतील ना, शी काय अशी करते सविता, मनु वर काय संस्कार होणार आहेत काय माहिती?, सचिन काय एवढी सविताची बाजू घेतो आहे, नक्कीच काहीतरी असेल त्या दोघांमध्ये, सविता आता तिथे राहते की काय सचिन साहेबांबरोबर, शी काय बाई आहे ही, काय कराव? , पण सचिन साहेबांच्या घरी कोणी नव्हतं, कुठे असेल सविता?, तिच्या माहेरी तर नसेल, पण ती फोन उचलत नाही, काय कराव जावून बघु का तिकडे? , सविता तिथे असली तर तिच्या कडून माफी नामा लिहुन घेवू, बाकी काही देण घेण नाही मला तिच्याशी ,....
.......
सतीश कधीच सुधारणार नाही, काय होईल त्याची नौकरी जाईल का? सविता लिहून देईल का माफी नामा?.. काय होईल पुढे??...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा