मी काट्यांतुन चालून थकले... भाग 7
आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....
©️®️शिल्पा सुतार
.............
.............
सविताने बाहेरुन आणलेली भाजी पोळी व्यवस्थित ताटामध्ये मध्ये वाढली, तिला वाईट वाटत होते की फक्त पोळी भाजी आहे , काय करणार पण आज बिझी होते मी .."आई आजच्या दिवस ऍडजेस्ट करा, उद्यापासून करेल मी सगळा व्यवस्थित स्वयंपाक, तुम्ही दूध पोळी घेता का थोडी ",.
"सविता मला का समजत नाही का, हे बघ यापुढे पोळी भाजी करत जा, जास्त काळजी करू नको, मला नको बाकीचे पदार्थ" ,.. सुलभा ताई
मनु, सुलभाताई, सविता यांचे छान जेवण झालं, जेवताना सविताने मनू आणि सुलभा ताईंना दिवसभर काय काय झालं ते सांगितलं.
" आता ठीक आहे ना आजी, बाबा कसे आहेत ",.. मनु
" हो बेटा आता ठीक आहे आई, माझा भाऊ रमेश येणार आहे दोन-तीन दिवसांनी, तेव्हा इथे जवळच फ्लॅट बघू भाड्याने, तिथे आपण राहू, मनुची शाळा पण याच एरियात आहे, माझा पण बुटीक याच एरियात आहे, चालेल ना, आई, मनु",... सविता
हो..
" तू सांगितलंस का ग रमेश ला सगळं",.. सुलभा ताई
" हो आई त्यानेच ओळखलं की काहीतरी झालेले दिसत, इतर वेळी हे पाठवत नव्हते ना मला माहेरी, मग आज कशी काय आलीस, अस झालं ते, मला सांगावं लागलं सगळ ",.. सविता
"बरं केलंस रमेशला सांगितल सविता, नाहीतरी सतीश बरा वागत नव्हता तुझ्याशी मनु शी, काय माहिती कोणावर पडला आहे तो, आमचे हे तर इतके की चांगले होते वागायला, माझे सासू-सासरे पण चांगले होते ",... सासुबाई जुन्या आठवणीत रमल्या
" आई यांना मीच आवडत नाही , बाकी यांचा काही प्रॉब्लेम नाही , तुम्ही बघायच्या ना ते सारखा माझा राग राग करायचे",.. सविता
" आई फक्त तूच नाही तर मी पण नाही आवडत बाबांना ",.. मनु
" जाऊ द्या आता तो विषय, आपलं काय ठरलं आहे आनंदी राहायचं आणि मनू तू अभ्यासाकडे लक्ष दे, तुला शिकून खूप मोठे व्हायचं आहे, तुला मला.. आजीला सांभाळायच आहे, या पुढे फक्त अभ्यासाचा विचार ",.. सविता
"हो आई मी आता खूप अभ्यास करणार आहे",.. मनु
" सकाळी शाळा आहे का ग तुझी मनु",... सविता
"हो आई",... मनु
" उद्या सकाळी डब्याला काही देता नाही येणार कॅन्टीन मध्ये खाऊन घे उद्याच्या दिवस, चहा वगैरे करेन मी पण स्वयंपाक पुरता गॅस नाही त्यात , मी नंतर भरून आणेन",... सविता
..........
..........
सविता लवकर उठली, आवरल, जावून इडली चटणी घेवून आली, ब्रेड होता घरात, तिघीं साठी चहा केला, चहा ब्रेड इडली चटणी तिघींनी खाल्ली, मनुच आवरुन झालं, सविता ने आवरलं, मनु ला पैसे दिले, हा घे डब्बा,
" काय आहे डब्यात आई ",... मनु
" ब्रेड जॅम आहे, शॉर्ट ब्रेक ला खा, मोठ्या ब्रेक ला कॅन्टीन मध्ये जा पोळी भाजी वगैरे खा आणि ऐक मनु शाळेत बाबा वगैरे आले तर वाद घालून नको त्यांच्याशी",.. सविता
"आई पण ते कशाला येतील मला भेटायला, त्यांना आधीच मी आवडत नाही",.... मनु
" नाही ग पण सांगून ठेवलं तुला मी मनु, माहिती असलेलं बरं तुला",.. सविता
" हो आई मी लक्ष ठेवेल",.. मनु
...
...
" आई मी आधी बुटीक मध्ये जाते, जरा वेळाने येते पोळीभाजी घेऊन, दुपारून मी हॉस्पिटल मध्ये जाणार आहे आजही ",.. सविता
" मी येऊ का आज तुझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये, मलाही भेटायच आहे ताईंना",.. सुलभा ताई
" हो चालेल आई, तुम्ही तयारी करून ठेवा, आपण जेवण झालं की लगेच निघू ",... सविता
" आई मी पण येऊ का हॉस्पिटल मध्ये? माझी शाळा सुटली की जावु, तुम्ही दोघी थांबा माझ्यासाठी, मलाही आजीला भेटायचं आहे ",... मनु
" हो चालेल, जावू आपण सोबत ",... सविता
सविता बुटीक मध्ये गेली, कालच राहिलेलं कामही पूर्ण केलं, नवीन ऑर्डर होत्या त्याचं काम करायला घेतलं, बारा वाजले, तिने हाफ डे घेतला, घरी यायला निघाली
" कशी आहे ग तुझी आई सविता? तब्येत ठीक आहे ना त्यांची ",... मॅडम
" ठीक आहे मॅडम, मी थोडे दिवस जस जमेल तस येत जाईल बुटीक मध्ये, प्लीज अँडजेस्ट करा मॅडम, मी कोणत ही काम अपूर्ण ठेवणार नाही पण",... सविता
"ठीक आहे सविता काही प्रॉब्लेम नाही, काम होतय ना नीट , मग कश्याला काळजी करतेस, कशी आहे खोली, काही अडचण आली तर सांग बरका तिकडे ",.. मॅडम
" हो मॅडम, ठीक आहे खोली, बहुतेक पुढच्या आठवड्यात आम्ही दुसरीकडे रहायला जाऊ, जवळच एक फ्लॅट बघतो आहोत रेंट ने",.. सविता
" ठीक आहे पण तुला लागतं तेवढे दिवस राहा तिथे",.. मॅडम
हो मॅडम..
..............
..............
सतीश सुद्धा आवरून ऑफिसमध्ये पोहोचला, आज चहा नाही की नाश्ता नाही, दूध आणायच लक्ष्यात राहील नाही त्याच्या, तो आला आहे हे बघताच सचिन साहेबांनी सतीशला आत बोलावलं, त्यांनी सतीश अस दाखवलं नाही की ते काल सविताला भेटले होते , आणि त्यांना सगळ माहिती आहे, सतीश कसा वागतो ते त्यांना बघायच होत , सतीश ला धडा शिकवायचा होता, स्त्रियांशी किंवा कोणाशी ही अस वाईट वागलेल मला चालणार नाही, अश्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात.. ऑफिस मध्ये जागा नाही,
गुड मॉर्निंग सर...
"गुड मॉर्निंग सतीश, हे बघ सतीश उद्या सुट्टी आहे तर आज तू तुझ्या फॅमिलीला घेऊन आमच्याकडे ये मस्त, संध्याकाळी डिनर सोबत करू, जरा वेळ बोलू बसू, आज रात्री उशिरा झोपल तरी काही हरकत नाही, उद्या सुट्टीच आहे आपल्याला, तेवढीच आई ची ओळख होईल काकूंशी",.. सचिन
सतीश विचारता पडला काय करता येईल?, नवीन संकट आहे हे आता, काय करावं,... "ठीक आहे चालेल साहेब, मी येतो आज संध्याकाळी घरी",..
" नुसता तू येऊन उपयोग नाही सतीश.. सविता वहिनी, आई, मनु सगळ्यांना घेऊन ये, नाही तर तुला एंट्री नाही घरात" ,.. सचिन
"मनु ला लवकर क्लास असतो सकाळी, ती नाही येऊ शकत, सविताला हि तिच सगळ आवरायचं असत",.. सतीश
सचिन बघत होता की सतीश किती खोटं बोलतो आहे ते, बायका-मुले घरी नाहीत, त्यानेच हाकलून दिल आहे त्यांना, घराबाहेर काढल आहे, किती वाईट वागणूक दिली आहे आणि आता किती साळसूद सारखा आव आणतो आहे हा, असा राग येतो ना, पण बघू पुढे काय करता येईल ते,
" काही प्रॉब्लेम नाही सतीश मी लवकर स्वयंपाक करायला सांगतो घरी, तुम्ही लोक लवकर घरी जा",... सचिन
आता मात्र सतीश पूर्ण फसला होता, काय करावं काही समजत नव्हत, सचिनचा आग्रह मोडवत नव्हता, ऑफिसचा बॉस होता तो, त्याच्याकडे जर आज गेलो नाही तर बराच प्रॉब्लेम होईल, काय करावं सविताला फोन करुन बघावा का?
सतीश बाहेर आला, त्याने सविताला फोन लावला, सविता ने बघितल सतीशचा फोन आहे, तिने कट केला, फोन पर्स मध्ये ठेवून दिला, माझ्याशी काहीतरी काम असेल म्हणून केला असेल फोन, दर वेळी प्रमाणे माझा वापर करून घेणार, पण मला अजिबात इंट्रेस्ट नाही या माणसात, आणि त्याच्या येणार्या फोनमध्ये ही, अजिबात बोलावसं वाटत नाही त्याच्यांशी,
आता सतीश खूप वैतागला होता, काय कराव समजत नव्हत, सचिन ही काय असा करतो? कश्याला हवी फॅमिली नेहमी सोबत, काय विशेष आहे त्या सविता, मनुत, त्या का आल्या पाहिजे सचिनला? , बरोबर आहे त्या दिवशी सविता किती प्रेमाने बोलत होती या सचिनशी म्हणून एवढा तिचा पुळका आला असेल तिचा , वैताग आला आहे, आता काय करू?.
सविताने येता-येता तीघीं साठी पोळीभाजी आणली, ती घरी आली, सुलभा ताई रेडी होत्या, जरा वेळाने मनु आली शाळेतुन, तिघींनी जेवण केलं, रिक्षा पकडून तिघी हॉस्पिटलमध्ये चालल्या होत्या
परत सतीश चा फोन आला, परत फोन सविता ने कट केला,
"कोणाचा फोन येतो आहे आई",. मनु
बाबांचा...
"का आता",. मनु
"माहिती नाही, मला बोलायची इच्छा नाही",.. सविता
मनुच्या फोनवर सतीशचा फोन आला, मनु ने उचलला,.. "बोला बाबा",.
"आई कुठे आहे तुझी",.. सतीश
"माझ्या सोबत आहे आई, काही काम आहे का?",.. मनु
"हो मला जरा बोलायचं होत तिच्याशी, दे जरा फोन तिला",.. सतीश
सविताने फोन घेतला,.." बोला काय काम होत? कश्याला सारख फोन करताय मला?",..
सतीशला प्रचंड राग आला होता सविताचा, पण त्याच काम अडल होत, उगीच आता आपण तिला बोललो तर ती सचिन साहेबांकडे यायला नकार देईन, म्हणुन तो शांत होता,
" आज संध्याकाळी आपल्याला सचिन साहेबांकडे जेवायला जायच आहे, घरी ये आज मनु आईला सोबत आण, जेवायला जाऊ आपण त्यांच्या कडे, मग परत तुम्हाला वापस जायचं असेल तर जा, माझी काही हरकत नाही ",.. सतीश
सविताला खूप राग आला, म्हणजे यांना आमची काही काळजी नाही, फक्त स्वतः च काम व्हायला पाहिजे, मग तू परत जा जिथे राहतेस तिथे, किती अप्पलपोटी आहेत हे, म्हटले असते बस झाल सविता ये आता घरी, पण नाही त्यांना नको आहे आम्ही त्यांच्या आयुष्यात, आज काम आहे म्हणून फोन केला आहे, मला बोलायचं नाही आणि तिकडे जायचं ही नाही,.." मला जमणार नाही यायला ",..
" जमणार नाही म्हणजे काय?, मी काही माझ्या सोबत रहायला बोलवत नाही तुम्हाला, डिनरला या आणि मग जिथे जायच तिथे जा" ,... सतीश
"जमणार नाही आमच",.. सविता
"जास्त झाल का सविता तुला, मी चांगल बोलतो आहे तुझ्याशी याचा तू फायदा घेते आहेस, तू माझी बायको आहेस, माझ्या सोबत सचिन साहेबांकडे तू यायला नकार का देते आहेस ",... सतीश
" तुम्ही काहीही बोला हो, मी आता तुम्हाला सहकार्य करणार नाही मी, तुम्हाला कुठे जायचं तिथे जा एकटे, आम्हाला या पुढे त्रास देवू नका, झाल असेल बोलून तर फोन ठेवा ",.. सविता
" सविता तुला माहिती आहे का तुझ्या या अश्या वागण्याच्या काय परिणाम होवू शकतो, तुला आपल्या घराचे दार मी कायम साठी बंद करत आहे आणि मला घटस्फोट हवा आहे ",.. सतीशला वाटलं होतं की आपण धमकी दिली घटस्फोटाची म्हणजे सविता खूप घाबरून जाईल, सुरळीत घरी येईल आणि मला मदत करेल, पण तसं काही झालं नाही
" तुम्हाला जे करायचं ते करा, मी नाही घाबरत, लवकरात लवकर पाठवून द्या घटस्फोटाची नोटीस, मला आता तुमचा अति कंटाळा आला आहे, मी फोन ठेवते आहे आता",... सविता
सतीश दचकलाच, त्याला अपेक्षा नव्हती सविता अशी बोलेल, त्याला वाटल सविता माझा आवाज ऐकुन कोलमडून जाईल, लगेच घरी येईल, आम्ही डिनर ला जाऊ, मग घरी आल्यावर मी तिला परत घराबाहेर काढेल, ती हाता पाया पडेल की मला राहू द्या इथे, मी काहीही बोलणार नाही तुम्हाला, आम्ही काल पासुन जेवलेलो नाही, पण अस काही झालं नाही, अजिबातच घाबरत नाही आहे आता सविता मला, काय करू?.
"सविता एक मिनिट ऐक, त्या रुपा मॅडमच ब्लाऊज तू शिवले का? त्यांनी ऑर्डर दिली होती ना? ती तरी द्यायला ये",... सतीश
"मी करेन त्यांना फोन नंतर, तुम्ही नका मध्ये पडू आमच्यात, आम्ही बघू ते ऑर्डरच, नाहीतरी तुम्हाला शिवण कामाचा तिटकारा आहे ना",.. सविता
"सविता साहेबांनी तुला, मनु, आई ला बोलवलं, म्हणून एवढ बोलतो आहे मी, नाही तरी तुमचे खायचे हाल असतिल, आज तुम्हाला चांगल जेवण मिळेल, आणि रुपा मॅडम ला अजिबात फोन करायचा नाही सांगून ठेवतो, माझ्याहून कोणी वाईट नाही ",.. सतीश
" शी.. किती घाण विचार आहेत तुमचे आणि आमचे हाल होत असो की काही आम्ही आमच बघून घेवू, काहीही झाल तरी तुमच्या दारात येणार नाही आम्ही, परत इकडे फोन करू नका ",.. सविता
सविता ने फोन ठेवून दिला,
........
सतीश चा स्वभाव बदलेल का?... कसा वागतोय अजून ही सतीश, सविता करेल का त्याला मदत?... काय होईल पुढे...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा