मी काट्यांतुन चालून थकले... भाग 6
आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....
©️®️शिल्पा सुतार
.............
.............
रमेश दादा शी बोलून सविता आता निश्चिंत झाली होती, सकाळी जस वाटत होत सगळ संपल, काय करू मी आता, कुठे जाऊ, आता आशा होती की मी ही काही तरी करू शकते, बर झाल थोडी हिम्मत केली, किती त्रास सहन करणार..
"चल कॅन्टीन मध्ये जाऊ आपण, जेवणाची वेळ झाली आहे " ,... रमेश
दोघ उठले तर बाबा मागे उभे राहून सगळं ऐकत होते, सविताला रमेशला धक्का बसला, बाबांच्या डोळ्यात पाणी होतं,
"बाबा तुम्ही ठीक आहात ना?",.. रमेश दादा ने बाबांना प्यायला पाणी दिल,
"हो मी ठीक आहे",.. बाबा
त्यांनी सविताला जवळ घेतलं,.." किती सहन केलस पोरी तू, मी मागे पण तुला बोललो होतो इकडे निघून ये, तू नको बोलत होतीस, पण आता नाही, यापुढे हा तुझा बाप जिवंत आहे, मी बघतो तो सतीश आता कसा सुखाने राहतो ते, मला तर बरेच वर्ष झाले त्याचा राग आला होता , पण मी विचार करायचो तू तिकडे त्याच्यासोबत राहते, मी परत काही बोललो तर तुझ्यात त्रासात वाढ व्हायची, पण मी आता सतीश ला सोडणार नाही, आपण चांगल्यातला चांगला वकील करू, चल आपण तुझं सामान घेऊन येऊ",..
" बाबा ऐका ना, मी त्याच एरियात राहणार आहे, तिथे मनुची शाळा ही जवळ आहे तिचा क्लासही जवळ आहे माझं बुटीकही तिथे जवळ आहे, मी तिथे सध्या काम धरलं आहे आणि मी शनिवार रविवारी येईल ना घरी, हे मनुच महत्वाचं वर्ष आहे, शाळेजवळच घर असलेलं बरं, पुढच्या वर्षी कुठे कॉलेज मिळतं ते बघू आणि तसं येईल मी आपल्या घराजवळच रहायला",.. सविता
" हो चालेल बेटा, पण आता तू तुझ्या निर्णयावर ठाम आहे ना ",... बाबा
" हो बाबा माझा निर्णय झाला आहे ",..सविता
" आता जर तू परत गेली तिकडे तर तुझी सुटका नाही",.. बाबा
" नाही बाबा मी आता परत चुकीचा निर्णय घेणार नाही, त्या घरात मला, मनूला, सासूबाईंना कोणालाच सुख नाही आणि ते घर सतीशच आहे, माझं घर नाही ते, आता एकदा पुढे पाऊल टाकल्यावर मी मागे फिरणार नाही, तुम्ही माझी काळजी अजिबातच करू नका, उलट मी आता बाहेर पडल्यावर जास्त सुखी आहे, माझ्यावर आता कोणाचं बंधन नाही, मी आता फक्त मनुकडे आणि सासुबाईं कडे लक्ष देणार आहे ",.. सविता
तिघे कॅन्टीनला गेले जेवणाची वेळ होती, रमेश दादा जाऊन जेवणाची ऑर्डर देऊन आला, बाबा आणि सविता बोलत होते
बाजूच्या टेबलवर सतीशचा बॉस सचिन बसलेले होते
" अरे वहिनी तुम्ही इथे काय करताय? कोणाला बर नाहिये? ",.. सचिन
सविता उठली तिने सचिन ची बाबांशी ओळख करून दिली,.. "माझ्या आईला आज हार्ट अटॅक आला, तिचं ऑपरेशन होतं म्हणून मी आली आहे इथे, तुम्ही कोणाला बघायला आले आहात",..
"आम्ही रुटीन चेकअप साठी आलो आहोत, ही माझी आई आहे ",.. सचिन ने आईशी ओळख करून दिली
" सतीश कुठे आहे तो नाही आला का",.. सचिन
" नाही त्यांना काम होत ऑफिस मध्ये महत्वाच, ते नाही आले ",.. सविता
" एवढं काहीही महत्वाचे सुरू नाही ऑफिस मध्ये, सतीश अति करतो",.. सचिन
" जाऊ द्या भाऊजी",.. सविता
रमेश दादा आला ताट घेऊन, सविता ने त्यांची ओळख करून दिली, बर्याच वेळ दोघ बोलत होते, किती चांगले आहेत हे सचिन साहेब, मोकळ्या मनाचे छान
" सतीश भाऊजी ऑफिस मध्ये असे वागतात का? भांडकुदळ एकदम, खराब स्वभाव आहे त्यांचा",... रमेश
सविता ने एकदम रमेश दादा ला गप्प केल...
" काय झालं वहिनी? तुम्ही काहीतरी बोलत होते रमेश.. सतीश बद्दल ",.. सचिन
"नाही काही नाही ",.. सविता
"काही झाल का वहिनी",.. सचिन
रमेश दादा ने पुढे होवुन सतीशच मनु सविताशी वागण त्यांचा कसा छळ होतो ते सांगितल आणि आज तर सतीश ने मनु ला खूप मारल, या सगळ्यांना आई सकट घराबाहेर काढल,
सचिन ऐकत राहिला, त्याने हे सगळ ऐकुन त्याने खाली बसुन घेतल
" बापरे काय भयानक आहे हे सगळ, असे लोक असतात या जगात?, कठीण आहे, मी बघतो काय करता येईल ते , सतीश एवढ खराब वागतो घरात, त्याला चांगला धडा शिकवेन मी" ,.. सचिन
" भाऊजी मला आता त्या घरी वापस जायच नाही कारण सतीश कधीच सुधारणार नाही, उगीच अजून भांडण होतील आमचे आणि आता हल्ली ते मारतात आम्हाला, मला काहीही संबंध ठेवायचे नाही त्यांच्याशी",..सविता
" वहिनी तुम्ही पोलिसात का नाही तक्रार केली सतीश ची",.. सचिन
" आम्ही करणार आहोत तक्रार ",...रमेश
"दादा नको रे तक्रार वगैरे ",...सविता
"ताई आता तू माझ ऐकणार आहेस ,सतीशची बाजू घेण बंद कर आता ",.. रमेश
"हो वहिनी बिनधास्त व्हा आता, तक्रार केली पाहिजे, आपल्या मनु ला मारल म्हणजे काय, तुम्हाला ही किती त्रास आहे, त्या दिवशी का नाही बोललात तुम्ही, चांगली कान उघडणी केली असती त्याची ",.. सचिन
"भाऊजी मला आता त्यांच्या विषयी काही वाटत नाही, तक्रार ही नको त्यांच्या तोंड बघण नको",.. सविता
"कोर्टात तर भेटाव लागेल त्यांना",.. रमेश दादा
" तो वेगळा भाग झाला, तेव्हा केस लढणार आहे मी, मला सुटका हवी आहे लवकर ",.. सविता
" अस चालणार नाही वहिनी हिम्मत वाढवा, ठीक आहे वहिनी हा घ्या माझा नंबर, मी तुमच्या बाजूने आहे, तुमची हरकत नसेल तर मी करतो तुम्हाला उद्या फोन, रुपा शी बोलून घ्या तुम्ही, आणि तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही म्हणाल तर रुपा तुम्हाला मदत करू शकते, म्हणजे आमच फायनान्स तुमचे डिझाईन, पार्टनरशिप मध्ये करू काही तरी सुरू, बुटिक वगैरे",... सचिन ,
" छान आयडिया आहे भाऊजी, मी नक्की वाट बघते तुमच्या फोनची",.. सविता
आतून बोलवण आल सचिन आई बरोबर डॉक्टर कडे गेला
सविताला खूप आनंद झाला होता , आज घर सोडल तर सगळ चांगल होत आहे, हे सचिन सर रुपा मॅडम माझ्या सोबत असतिल तर बुटीक ही सुरू होईल लवकर ,
रमेश दादा समोर उभा होता, सविता तिकडे गेली
"दादा तू कश्याला सांगत बसला त्या सरांना सगळं सतीश बद्दल, त्यांना त्रास होईल या गोष्टींचा",... सविता
"होवू दे त्रास व्हायचा तर, तुला किती त्रास दिला त्याने, आणि आता मी त्या सतीशला सोडणार नाही पंधरा वर्ष खूप त्रास दिला त्याने सगळ्यांना, तुला आता त्याचा पुळका का? , तू सतीशचा विचार करण बंद कर ताई ",.. रमेश
सविता विचार करत होती बरोबर बोलतो आहे दादा, आता सतीशचा विचार डोक्यातुन काढून टाकायला पाहिजे, नाहीतरी परत आपल्याला तिकडे जायचं नाही, आता जर परत गेलो तर तिथून सुटका नाही, सतीश मला सोडणार नाही, मनूला त्रास देईन, आता बाहेर पडलो आहे, आता स्वतःचा रस्ता स्वतः शोधायचा, यापुढे सतीशचा विचारही मनात आणायचा नाही
.....
.....
आईला अतिदक्षता विभागातुन बाहेर आणलं होतं, सविता रमेश जाऊन आईला भेटले, बाबा थांबणार होते रात्री पर्यंत
"मला आता घरी जावे लागेल, आई आणि मनू एकट्या असतील",.. सविता
"चल मी तुला पटकन सोडून येतो घरी",.. रमेश
"नको दादा तू इथे थांब काही लागल तर मेडिसिन वगैरे आणावे लागतील तर थांब तू",.. सविता
"ठीक आहे, आता पुरतं तिथे रहा ताई, आईला बर वाटल का मी येतो तिकडे, मग आपण बघू फ्लॅटच काय करायचं ते, तोपर्यंत तू काळजी घे ,.. रमेश
"हो आणि माझी खूप काळजी करू नकोस मी ठीक आहे ",.. सविता
बाबा बाहेर पर्यंत सविताला सोडवायला आले ,..." आपण बघू तुझ्यासाठी चांगलं घर, तू अजिबात कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस सविता, तुझी मनुची आणि सुलभा ताईंची काळजी घे",.
बाबांनी सविताला स्पेशल रिक्षा करून दिली वरून पैसेही दिले
" बाबा नको पैसे आहेत माझ्याकडे",..सविता
" मला माहिती आहे तुझ्याकडे आहे पैसे, पण माझ्या समाधानासाठी हे घे",.. , बाबांनी पैशाचे पाकीट सविताच्या पर्समध्ये ठेवलं..
सविता घरी आली, घरात काहीच सामान नव्हतं, मनू अभ्यास करत होती, सुलभाताई बसून पोथी वाचत होत्या, गोडाउन मध्ये थोडं सामान होतं, खुर्च्या गाद्या वगैरे, ते सविता वापरणार होती,
" आजच्या दिवस बाहेरून जेवण मागवू आपण, उद्या बघू काय करायचं ते, मी जाऊन थोडा किराणा घेऊन येते, गोडाउन मध्ये चहा करण्यासाठी छोटा गॅस होता तो वापरता येईल आपल्याला दोन चार दिवस, मग बघू काय करायचं ते",.. सविता
जवळच्या दुकानात जाऊन सविताने सगळं स्वयंपाकाचं सामान घेतलं, भाजी घेतली,
" ताई एवढं सामान तुम्ही कसं नेणार, तुमचा पत्ता द्या मी सामान पोहचवतो एका तासात",..
सविताने त्यांना पत्ता दिला, जवळच्या पोळीभाजी केंद्रातुन रात्री साठी जेवण घेतलं, सगळं सामान घेऊन ती घरी आली, जरा वेळाने किराणा सामान आलच, त्याला पैसे देण्यासाठी सविताने पर्स मधला पाकीट बघितलं, त्यात भरपूर पैसे होते, किराणाचे पैसे दिले,
सविताने बाबांना फोन लावला,... "बाबा तुम्ही किती पैसे दिले आहेत मला?, अहो आईच्या ट्रीटमेंट साठी दवाखान्यात लागतील ना पैसे, माझ्याकडे आहेत सध्या पैसे",...
" तुझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी आहेत माझ्याकडे पैसे, तू तुला किराणा वगैरे भरून घे, भाजी आणून घे मी, येईन दोन-चार दिवसांनी तिकडे",.. बाबा
" ठीक आहे बाबा तुम्ही काळजी घ्या, आई ठीक आहे ना",.. सविता
" हो ठीक आहे ती, आता डॉक्टर येवून गेले",.. बाबा
" मी येते उद्या तिकडे ",.. सविता
ठीक आहे..
बाबा पण ऐकत नाहीत, एवढे पैसे काय दिले मला , उद्या हॉस्पिटलमध्ये गेली की त्यांना परत करीन मी ते पैसे, सविताने ते पैसे नीट ठेवून दिले
थोडं फार सामान लावून, त्यांनी तिघींनी जेवून घेतलं, गाद्या घालून झोपल्या त्या, अजिबात झोप येत नव्हती तिघींना , जागा बदलली होती, रूम छोटी होती, पण काय करणार काही इलाज नव्हता
सविता विचार करत होती, सगळे बोलत आहे की सतीश वर पोलीस केस कर, मला समजत नाही काय करू ते, घटस्फोटच्या केस साठी सुद्धा मला सतीश ला भेटायची इच्छा नाही, आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करता आल तर बरं होईल, पण मला असं घाबरून कसं चालेल, सतीश ला तोंड द्यावाच लागेल, या पुढच्या आयुष्यात असे बरेच संकट येतील, मला एकटीनेच उभे राहायचं आहे आता, कणखर व्हाव लागेल, पोलीस केस तर एकदम शुल्लक गोष्ट आहे, पण आता रमेश दादा जे बोलेल ते मी ऐकणार आहे, सतीश ला थोडासा हिसका दाखवायलाच पाहिजे, मला त्रास होताच इतके दिवस पण मनूला मारायची हिम्मत कशी झाली, त्यानंतरच रोजच झालं असतं हे , बर झालं आपण निर्णय घेतला, आधी वाटायचं घराबाहेर पडलो तर कस होईल, मी करू शकेल का नीट सगळ, पण होत सगळ नीट, दादा बाबा आहेत सपोर्ट ला, मी बुटीकच काम लवकर सुरू करणार आहे, स्वतः च्या पायावर लवकर उभ रहायला पाहिजे,
........
........
सतीश ऑफिसमधून आला, घरात कोणीच नव्हतं, खूपच कंटाळवाणं वाटत होतं घरात, त्याला वाटलं नव्हतं सविता लगेच अशी तडकाफडकी निघून जाईल, बरं झालं पण निघून गेली ती , आता जरा डोक्याला शांतता आहे, सदोदित आपला रडका सूर तिचा, अजिबात काही येत नाही तिला, पण आईने का जायचं तिच्यासोबत, ती माझी आई आहे ना, तरी ती सविताला साथ देते, तिघी मिळून सदोदित माझ्या विरुद्ध उभ्या रहातात,
आता चहा पण मला करावा लागेल, संध्याकाळच्या स्वयंपाकाचा पण स्वतः बघावा लागेल, बघूया एक छान कुक लावून घेऊ, या जगात चांगला स्वयंपाक करणाऱ्यांची काही कमी नाही, नाही तरी सविता जो स्वयंपाक करायची तो मला आवडत नव्हता, सविता माझ तुझ्या शिवाय काहीही अडलेलं नाहीये, नाहीतरी काही येत होतं सविताला, नुसत आपल बरं-वाईट आवरण आणि तिची आगाऊ कार्टी मनु, बाहेर जेव्हा हाल हाल होतील ना तेव्हा समजेल, येतील मग माझ्या पाया पडत, चांगलीच अद्दल घडवणार आहे तेव्हा मी त्या दोघींना, फक्त आईलाच घरात घेईन मी, दोघींना हुसकून लावेल, किती दिवस बाहेर राहणार आहेत त्या बघु ते , त्यांना कोणाचा आधार आहे नाहीतरी , काय आहे तिच्याकडे, मूर्ख बाई, नाही तरी तिच्या माहेरी सुद्धा दोन दिवस सांभाळतील की नाही तिला काय माहिती, कसले कंजुस लोक आहेत ते, तो रमेश तर काही कामाचा नाही सदोदित आई बाबा म्हणतील ते ऐकतो, सगळे कंटाळा करतील सविता चा तिकडे , येतील मग आपच इकडे,
स्वतःवरच खुश होत सतीश ने ठरवलं आता बाहेर जाऊन मस्त जेवून येऊ, या पुढे सविताचा विचार करायचा नाही
........
........
बघु पुढे काय होतय ते.....
किती तो स्वतः बद्दल अभिमान सतीश ला, मी करतो सगळ, माझ्याशिवाय कस होईल सविताच? हाच विचार सुरू आहे सतीशचा, उलट सविता मस्त खुशीत आहे, बर झाल तिने निर्णय घेतला...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा