Jan 29, 2022
कथामालिका

मी काट्यांतुन चालून थकले... भाग 5

Read Later
मी काट्यांतुन चालून थकले... भाग 5मी काट्यांतुन चालून थकले... भाग 5

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............


सविता, मनु, सुलभा ताई घरातून निघाल्या, सविता एकदम कोलमडून गेली होती, डोळ्यातून आसू थांबत नव्हते तिच्या, याच दिवसासाठी इतके दिवस खस्ता खाल्ल्या मी, सगळ संपल आता,

"आई तू ठीक आहेस ना?, काही त्रास होतो का?, मला सोड नाही तर तू मामाकडे, मी राहीन तिकडे तू जा बाबांकडे वापस",... मनु

"नाही मनु, आता निघालो घरातून परत कधीच मी वापस जाणार नाही आता तिकडे, मनु मी तुझ्याशिवाय राहु शकत नाही, मी तुला कधीच अंतर देणार नाही, माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्व तुला आहे माझ बाळ, थोडा त्रास होणार मला शेवटी घर सोडून जातो आहोत आपण ",.. सविता

"सविता अग सांभाळ स्वतःला",... सुलभा ताई ही भाऊक झाल्या होत्या

" हो आई मी ठीक आहे, चला ",.. तिघी निघाल्या

" आपण निघालो तर आहोत सविता, पण आता जायचं कुठे? ",... सुलभा ताई काळजीत होत्या

" होईल काहीतरी आई, करू काहीतरी व्यवस्था, तुम्ही काळजी करू नका, माझ्यावर सोडा, आजच्या दिवस आपण माझ्या माहेरी जाऊ, तुम्हाला तिथे सोडते दोघींना आणि मी दवाखान्यात जाऊन येते, आईला कधी भेटू अस झाल आहे मला, मग मी संध्याकाळी आली की आपण ठरवू काय करायचं आहे पुढे ते",.. सविता ,

" चालेल आई",.. मनु सविता ची खूप काळजी घेत होती

"जाता जाता बुटीक मध्ये जाऊ, त्यांना सांगून देऊ माझी आजची सुट्टी आहे ते" ,... सविता

हो चालेल...

" मनु तू ठीक आहेस ना ",.. सविता

" हो आई ",.. मनु

" खूप लागलय तुला ",.. सविता

" ठीक आहे मी आई ",.. मनु

तिघी बुटीक मध्ये गेल्या, मॅडम आलेल्या होत्या, तिघींना बसायला खुर्च्या दिल्या, चहा मागवला त्यांच्यासाठी

" काय झाला आहे सविता, आज सकाळी तू इकडे कशी, बॅग घेऊन कुठे निघालीस " ,.. मॅडम

सविताने त्या मॅडमला सगळी कहाणी सांगितली,.." आम्ही तिघेही आता बेघर आहोत, माझ्या माहेरी जातो आहोत आता, आजच्या दिवस सुट्टी द्या मॅडम , मला माहिती आहे माझ्या जॉबचा हा दुसराच दिवस आहे, पण माझा नाईलाज आहे, आईला बघायला हॉस्पिटल मध्ये ही जायचं आहे",..

" बापरे कठिण आहे ही परिस्थिती, मी एक गोष्ट सुचवू का? माझी स्वतःची एक खोली आहे, बाजूच्या गल्लीत, लहान आहे जागा, गोडावून म्हणून आम्ही वापरत होतो ती, आता रिकामीच आहे, तिथे राहतात का तुम्ही थोडे दिवस, इथून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे, मग मी तुम्हाला दुसरी चांगली जागा मिळवून देते, थोडी भांडी गॅस वगैरे आहे तिकडे ",... मॅडम

सुलभा ताई, मनु, सविताला आनंद झाला

"हो चालेल मॅडम, किती आहे त्या खोलीचं भाडे ",... सविता

"नाही मी तुमच्याकडून या खोलीचे भाडे घेऊ शकत नाही, जितके दिवस हवे तितके दिवस राहा, फक्त लागल तर थोड सामान ठेवाव लागेल एखाद्या वेळी ",... मॅडम

" चालेल, पण आम्हाला लगेचच नवीन रूम घेता येणार नाही, थोडे दिवस राहावे लागेल तिथे ",.. सविता

" काहीच हरकत नाही, हवे तेवढे दिवस रहा",.. मॅडम

" जर तुम्हाला गोडाऊनचा वापर करायचा असेल तर आम्हाला सांगा",.. सविता

" हो तू काहीच काळजी करू नको सविता, आरामात रहा",.. मॅडम

" तुमची खूप मदत झाली मॅडम, मी लक्ष्यात ठेवन ",... सविता

" अग काहीही काय, काही लागल तर सांग, पैसे वगैरे आहेत ना ",.. मॅडम

"हो मॅडम आहेत पैसे ",... सविता

सुलभाताई, मनूला खूप आनंद झाला होता , तिघीजणी रूमवर आल्या, एकच खोली होती आणि बाजूला छोट किचन होतं, मनू आणि सविताने मिळून खोली साफ केली, सविताला खूप भरून आलं होत, परत सुरुवात होत होती नवीन आयुष्याची, एकटा प्रवास, सतीशची साथ सुटली, आता हा संसार सासुबाई आणि मनु साठी, मी तुम्हा दोघींना कधीच एकट सोडणार नाही, नेहमी साथ देईन तुमची आई.. मनु.

"आपल्याकडे आज काहीच नाही , थोडं सामान आणव लागेल, मी आता तुमच्या दोघींसाठी खाण्याचे पदार्थ घेऊन येते आणि हॉस्पिटलला जाऊन येते, मग संध्याकाळी आपण थोडसा सामान आणून स्वयंपाक करू",.. सविता

"हो चालेल आई पण पैशाच काय?",.. मनु

"आहेत माझ्याकडे, माझे इतक्या वर्षाचे शिवणाचे पैसे मी बाजूला टाकले होते, ते वापरता येतील आपल्याला आणि माझं थोडं स्त्रीधन ही आहे ",.. सविता

" नाही सविता दागिने मोडू नकोस पुरतील पैसे आपल्याला",.. सुलभा ताई

सुलभा ताईंनी एक पर्स सविता ला दिली,.." सविता हे घे",.

" काय आहे आई यात ",.. सविता

सविताने पर्स उघडली, त्यात दागिने आणि भरपूर पैसे होते

" आई एवढे पैसे ",.. सविता

" हो माझे आहेत हे पैसे आणि ते दागिने माझे आहेत, अजून बँकेत असतील पैसे, हे घे पासबुक, शिवाय गावाकडे घर जमीन आहे आपली, माझ्या नावावर आहे शेत, घर भाड्याने दिल ना आपल त्याचे पैसे इकडे जमा होतात ",.. सुलभा ताई

"हो आहे तोच एक आधार आहे आपल्याला, आई मला लागले तर मी मागेन पैसे, पण सध्या हे पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा आपल्याला अडीअडचणीला कामा येतील, नंतर द्या माझ्याकडे माझ्या लॉकर मध्ये ठेवते तुमची पर्स, अशी घरात ठेवू नका ",.. सविता

" हो चालेल आता लागले तर घे यातून पैसे",.. सुलभा ताई

हो आई..

" आता जर तुला एखादा फ्लॅट भाड्याने घ्यायचा असेल तर या पैशाने तु डिपॉझिट भरू शकते",.. सुलभा ताई

" थोडे दिवस राहू आपणा इथे, ही खोली छोटी आहे पण आपलं घर भाडं वाचेल नंतर मी बघतेस काय करायचं ते आणि आपण पैसे आता जपून वापरायला पाहिजे, मनुच शिक्षण महत्त्वाचा आहे तुमची ट्रीटमेंट आणि दवाखाना ही महत्वाची आहे ",... सविता

सुलभा ताईंच्या महिन्याच्या गोळ्या होत्या, बाकी काही त्यांना त्रास नव्हता, दोन तीन महिन्यातून एकदा डॉक्टर कडे जाव लागायच

"थोडे दिवस करू आपण ऍडजेस्ट, खाऊ कसंतरी करून आई, या वर्षाची मनुची फी भरली आहे पण पुढच्या वर्षापासून कॉलेजला फी जास्त असेल तर त्याचीही यावर्षी सोय करावी लागेल",.. सविता

"हो करू आपण",.. सुलभा ताई

सविता आवरत होती

"मी एक बोलू का सविता, मलाही थोडं बुटीक मध्ये काम मिळवून देशील का? मलाही शिवणाची आवड आहे पूर्वीपासून, तुझ्या इतका छान शिवता येणार नाहीत मला कपडे, पण हात शिलाई करणे, लेस लावणे, हुक लुक करणे असे काम मला जमतात",... सुलभा ताई

" ठीक आहे आई मी बघते तिकडे काही काम आहे का तुमच्यासाठी, पण सध्या तरी तुम्ही आमच्यासोबत आहात हेच खूप आहे आमच्या दोघींसाठी, तुम्ही फक्त घराकडे आणि मनू कडे लक्ष द्या, मी तुम्हाला आणून देईल थोडं काम ",... सविता

जरा वेळाने सविताची मैत्रीण रिमा आली भेटायला, ती बुटीक मध्ये होती कामाला सविता सोबत, बिल्डिंग मध्ये रहायची

" काय होऊन बसलं हे सविता, तू मॅडम शी बोलत होती तेव्हा ऐकल मी सगळ ",... रिमा

" कधी ना कधी होणारच होत हे",... सविता

" अगं पण तुझ्या बुटीकच्या कमाईवर कसं होणार तुमच्या तिघींच",.. रिमा

"जसं व्हायच तसं होईल, आम्ही खुश तर राहु तिघी सोबत",.. सविता

"सासुबाईना का आणल सोबत? राहु द्यायचं त्यांना तिकडे त्यांच्या मुलाकडे",... रिमा

"अग त्या ऐकतील ना, काय बोलतेस असं तू रिमा, सासु बाई माझा सगळ्यात मोठा आधार आहेत, किती करतात त्या माझ्यासाठी, नेहमी सांभाळून घेतात मला त्या आणि त्यांनाही त्रास होतच की तिकडे, हा त्यांचा निर्णय आहे, त्यांना माझ्याबरोबर यायचं होत, त्या आल्या, मी त्यांना कधीच अंतर देणार नाही, त्या आहेत म्हणून बर आहे ना, नाहीतर मनु आणि मी काय केलं असतं",.. सविता

रिमा जरावेळ बसुन गेली, सविता विचारात होती खरच काय होणार आहे आमच पुढे, बुटीकचे पैसे पुरतील का? काय भविष्य आहे आमच, काही समजायला मार्ग नाही, पण मी आई मनु ला अजिबात कसला त्रास होवु देणार नाही, जे होईल ते होईल आता, परत जायच नाही

सविताने मनु आणि सुलभा ताईंन साठी बाहेरून जेवण मागवुन ठेवलं, तिघींनी जेवण केल, सविता तयारी करून हॉस्पिटलला गेली, आईची तब्येत स्टेबल होती, लगेच ऑपरेशन करायला घेतलं, ऑपरेशन सक्सेसफुल झाल,

बाबा, भाऊ रमेश सगळे होते सोबत, रमेश ने लगेच ओळखलं काहीतरी झालं आहे, बाबा बाहेर जावुन बसले

"सविता ताई आज कशी काय सुटका झाली तुझी घरातून, मला वाटल तू येणार नाही, उगीच फोन केला तुला अस वाटल होत सकाळी, मला माहितीये तुला भाऊजी पाठवत नाही , आज कशी काय तू इकडे? , काय झालं काय नक्की? , चेहरा का असा दिसतोय तुझा? , लागल का तुला? , का मारल तुला भाऊजींनी? , काय माणूस आहे तो ",.. रमेश दादा च्या चेहर्‍यावर स्पष्ट चिंता होती सविता बद्दल

" काही झाल नाही दादा, मी आले घरच आवरुन",... सविता

" ताई खोट बोलतेस तू चेहर्‍यावर स्पष्ट दिसत, सांग बरं काय झालं नक्की तुला माझी शप्पथ ",.. दादा

आधी सविता गप्प होती पण प्रेमाने एवढी चौकशी केली तर तिला रडू आलं, सविताने घरी काय झालं ते सगळ रमेशला सांगितल, मनुला सारख पाण्यात बघतात हे, माझा तर छळ आहेच तिथे, मनुलाही खूप मारल आज यांनी, म्हणून मी घर सोडल

" बापरे काय झालं एवढ, एवढ्याशा मनुला मारायची काय गरज आहे पण, मूर्ख माणूस आहे तो, खूप आधी तू हा निर्णय घ्यायला पाहिजे होता",.. रमेश

"मनु सत्य बोलते आईची बाजू घेते म्हणून मारल, सगळ्यांनी ते बोलतील तेच ऐकल पाहिजे अस वाटत त्यांना, मारल म्हणजे धाक राहतो, घाणेरडे विचार आहेत त्यांचे , नाहीतरी त्यांना आधीपासून मनु आवडत नव्हती, त्यांना मुलगा हवा होता" ,... सविता

"तू खूप वर्ष झाले त्रास काढते आहे ताई, बर केल, आता तू एकटी नाहीस मी आहे तुझ्यासोबत ",.. रमेश

" हो रे वाटल होत होईल एक ना एक दिवस सगळ ठीक, तीच आशा होती, काय करणार आता, घेतला डिसिजन",.. सविता

" कुठे आहे आता मग तुझ्या सासुबाई आणि मनु",.. रमेश

"तिथेच बुटीक जवळ एक खोली मिळाली आहे आम्हाला राहायला, सध्या तरी आम्ही तिथेच आहोत",... सविता

" कशाला राहतेस तिकडे सगळं सामान घेऊन इकडे ये आपल्याकडे ",.. रमेश

" नाही भाऊ मला तुझ्याकडे येता येणार नाही, मनु ची शाळा तिकडे आहे, माझ बुटीक ही जवळ आहे तिकडे ठीक आहोत आम्ही, आणि मी अशी एकटी राहते हे घरात कोणाला सांगू नको, उगीच आईला समजलं तर तिला परत त्रास होईल ",... सविता

" हे जे आपल्या आई बाबांचा आहे घर शेत उत्पन्न ते माझ एकट्याच नाही, त्यात तुझाही वाटा आहे, सविता ताई तुझ्या वाटणीचा शेतीचे उत्पन्न तू कधीच घेतलं नाही, ते बाबांनी वेगळ अकाउंट काढून त्यात टाकल आहे, मी येतो दोन-तीन दिवसांनी आपण घर बघु, तुझं बँकेचा कार्ड घेऊन येतो, भरपूर पैसे आहेत त्यात, मनूच्या शिक्षणाचा प्रश्न त्याने मिटेल, आपण जवळपास एखादा छोटासा फ्लॅट बघून भाड्याने त्यात तुम्ही शिफ्ट व्हा ",... रमेश

नको रमेश

" हे बघ सविताताई आता हो नको करू नकोस, माझ्यासाठी नाही तर आईबाबांसाठी तरी घे आणि मनु साठी चांगल्या जागी रहा, लग्न झाल्यापासून काहीही मागितलं नाहीस तू, इतकी चांगली आहेस की नेहमी सगळ देतच आलीस, चान्स आहे तर मला करू दे तुझं, पण बरं झालं तू तुझा डिसीजन घेतला तू एकटी आहेस असं समजू नको मी आहे तुझ्यासाठी ",.. रमेश

" हो रमेश तू आहेस रे माझ्यासाठी आणि तू खूप चांगला आहेस, खरंच वहिनी खूप लकी आहे, तिला तुझ्यासारखा पती आहे, वाहिनीला कधी अंतर देवू नको, सतीशला माझी किंमत नाही, मनु आवडत नाही आणि आईची सुद्धा किंमत नाही, मी कशी रहात होते तिकडे माझ मला माहिती, मी आता तिकडे परत जाणार नाही, घटस्फोट साठी अर्ज करणार आहे मी",... सविता

" ताई मी तुझ्या सोबत आहे, आई हॉस्पिटल मधून घरी आली की आपण तुझ्या फ्लॅटच काम करु आणि तुला सागर माहिती आहे का माझा मित्र, तो वकील आहे, त्याला देवू ही केस, आता मागच्या आठवड्यात भेटलो मी त्याला तेव्हा तुझी आठवण काढत होता तो ",.. रमेश

" हो सागर खूप प्रसिद्ध वकील आहे, आमच्या वर्गात होता तो, अरे पण त्याची फी झेपेल का मला ",.. सविता

" न झेपायला काय झालं, आम्ही आहोत तुझ्या सोबत, मला सतीश चा खुप राग आला आहे, त्याला धडा शिकवायला पाहिजे, इतके दिवस तू तिकडे रहात होती माझे हात बांधले गेले होते, आता बघतो मी त्याच्या कडे, कर म्हणा चांगल्यातला चांगला वकील हिम्मत आहे तर, माझ्या बहिणीला त्रास देतो का? नाही त्याला उद्वस्त करून सोडलं तर नाव नाही सांगणार ",... रमेश
..............

कोणाच कोणा शिवाय अडत नाही, आपण घराबाहेर काढल तर हीच काय होईल, मीच करतो हीच सगळ, हा सतीशचा अभिमान चुकीचा आहे, तो सविता वर मालकी हक्क दाखवत होता, हव तस वागवत होता, सविता घराबाहेर पडली तिने तिचा निर्णय घेतला, होईल सगळ नीट.. आधी हिम्मत करावी लागते...


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now