मी काट्यांतुन चालून थकले... भाग 3

पगार चांगला होता परत इन्सेंटिव्ह ही होता, कस्टमर ला कशी ऑर्डर हवी हे सविता ला छान माहिती होत, थोडा अनुभव ही होता ऑर्डर चा, त्यामुळे लगेच काम झाल .....

मी काट्यांतुन चालून थकले... भाग 3

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.............

पाहुणे येणार म्हणून सविता रेडी होती, मनू आणि सासुबाईंनी ही तयारी केली छान, जरा वेळाने सतीश आला, आवरलेलं घर बघून जरा खुश होता तो, घरात स्वयंपाकाचा छान वास येत होता,

"क्रॉकरी चांगली बाहेर काढली ना सविता, पाण्यासाठी काचेचे ग्लास वापर ",.. सतीश जातीने लक्ष देत होता, साहेबांवर इम्प्रेशन पडायला पाहिजे,

हो...

सविता मुद्दाम सतीश समोर गेली तिला वाटल तो बोलेल तिच्याशी, छान दिसतेस सविता अस म्हणेन, पाहुणे येणार आहेत म्हणून किती व्यवस्थित आवरल सगळ अस बोलेल, पण सतीश अजून रागात होता, त्याच लक्ष नव्हत, त्याला फक्त स्वयंपाक रेडी आहे आणि घर आवरलेल आहे हेच महत्वाचं होत, त्याने बॅग मधून खूप सुंदर साडी बाहेर काढली,

सविता ला वाटल सकाळी भांडण झाल, मला मारल म्हणून प्रेमाने ही भेट आणली की काय, सविता खुश होती, हीच ती साडी त्या दिवशी मला आवडली होती यांना लक्ष्यात होत

"सविता ही साडी रुपा मॅडम साठी आणली आहे, त्यांना दे गिफ्ट",.. सतीश

हो...

सविता चा भ्रम तुटला.... पण तिने लगेच मनाला सावरल

"किती सुंदर साडी आहे ही आई, बाबा आईला का नाही आणली साडी, दोन आणायच्या ना",... मनु

"हो पाहू नंतर",... सतीश आत गेला

"आई अशी साडी आपण बघितली होती ना त्या दिवशी दुकानात, तुला आवडली होती ना पण महाग होती म्हणून बाबानी नाही घेतली आणि आज लगेच आणली गिफ्ट देण्यासाठी, का असे करतात ग बाबा, म्हणजे तुझी आवड तुला जे हव त्याला काही किम्मत नाही का",.. मनु

" जाऊ दे ना मनु, मला आता काहीही वाटत नाही, आता मला टेंशन येत आहे ह मनु, तू प्लीज शांत रहा ",.. सविता

दहा मिनिटाने बॉस आणि त्यांची बायको आले

सगळे पुढच्या खोलीत बसले होते,... " आई यांना ओळखल का? आमच्या बरोबर शाळेत होते हे , एक बॅच सीनियर.. सचिन, आता आमच्या ऑफिस मध्ये बॉस म्हणून जॉईन झाले आहेत आणि ह्या आहेत रूपा मॅडम या पण आमच्या सोबत होत्या शिकायला, आत्ताच आले आहेत ते या शहरात बदली होवुन , सामान ही लावल नाही अजून त्यांनी , म्हणून मी म्हंटल की आज आमच्या कडे या जेवायला",... सतीश

" छान केलत तुम्ही आलात, आणि आपली ओळख ही होईल ",... सुलभा ताई

सगळे छान गप्पा मारत होते

सविता ची ओळख तर सतीश नी करूनच दिली नाही, त्याला त्याची गरजच वाटली नाही,

सचिन स्वतः होऊन सविता, मनु शी बोलायला आला,.." नमस्कार वहिनी, सतीश ने आपली ओळख करून दिली नाही",..

हो ना,..

" काही हरकत नाही आपण करून घेवू ओळख",.... ते बर्‍याच वेळ बोलत होते

मनु ला खूप आवडला त्यांच्या स्वभाव, सविता तर त्यांच्याशी भरपूर विषयावर बोलत होती, किती मोकळा होता त्यांच्या स्वभाव, त्यांनी सविता मनु ला खूप कंफर्टेबल केल,.." वहिनी तुमच्या बाल्कनी त खूप झाड दिसता आहेत, मला दाखवा ना ",

बाल्कनी त उभ राहून सचिन सविता खूप छान गप्पा मारत होते, सतीश च पूर्ण लक्ष त्या दोघां कडे होत, सतीश रुपा गप्पा मारत होते, सविता सचिन आत आले,

" सतीश किती छान आहे वहिनींचा स्वभाव, खूप हुशार आहात सविता वहिनी तुम्ही, मुळात ज्याना शिवण वगैरे येत क्रिएटिव्ह काम येत त्यांच्या बद्दल मला खूप आदर आहे",.. सचिन

"थँक्स यू भावजी",.. सविता

हे सतीश ला काही विशेष आवडलं नाही, सविता उगाच अघळपघळ बोलते आहे आज अस त्याला वाटल, तो जरा चिडलेला होता

"सविता वेळ होतो आहे तु ताट करायला घे",.... सतीश ने आवाज दिला

" कशाला ताट वगैरे, मला नाही आवडत वाढून देण वगैरे, आपण सगळे सोबतच बसू ना, ज्याला जे हवं ते वाढून घेता येईल",.. सचिन मध्ये बोलला, त्याने या ही वेळी सविताची बाजू घेतली होती

"नको असं स्वतः वाढून घ्यायचं म्हणजे तुमच जेवण नीट होणार नाही, यापेक्षा सविता तू आम्हाला तिघांना आधी वाढून दे आणि मग तुम्ही बसा ",... सतीश

हो नाही म्हणायची वाट बघण्याचा आधीच सतीश बोलला,.. "जाते ना तू पुढे, जा ताट कर",

सविता आत गेली, रुपा होती सोबत, सचिनला हे काही आवडल नाही सतीश च वागण, ते त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होत

स्वयंपाक खूपच छान झाला होता, सचिन रूपा आवडीने जेवत होते, रुपा ने सगळ्या पदार्थांची रेसीपी विचारून घेतली,.. "खरच वहिनी काय चव आहे तुमच्या हाताला",

सासुबाई जेवायला बसल्या, मनूला आग्रह करत होते ते, पण मनु जेवायला बसली नाही ती आईसाठी थांबली

"वहिनी खूप छान झाला ह बेत, हे बघ रुपा असा स्वयंपाक जमला पाहिजे, आज बर्‍याच दिवसांनी मी एवढं छान जेवलो आहे, वहिनी आम्हाला दोघांना शिकवणार का स्वयंपाक " ,... सचिन

"हो ना आमच्या कडे कुक आहे, असा घरचा स्वयंपाक नेहमी करायला जमत नाही मला",... रूपा

"रुपा मॅडम किती बिझी असतात, कमवतात खूप, हे अस आवडत मला, स्वयंपाक कोणी करू शकत, काय विशेष त्यात ",... सतीश

"नाही ह स्वयंपाक ही एक कला आहे, सगळ्यांना नाही जमत, आणि त्या साठी आपल्या माणसांवर प्रेम ही हव, अगदी वाहून घ्यायला पाहिजे असत स्वतःला संसारात, मलाही शिकायला आवडेल, छान आहे सगळे पदार्थ ",... सचिन

"सविता मी येईन तुझ्या कडे एक दोन पदार्थ शिकेन ह, स्पेशली दही वडे एकदम हलके छान झाले ",... रूपा

"केव्हा ही ये रुपा",.. सविता ने रुपा ला साडी गिफ्ट दिली, त्यांनी ही मनु सविता साठी गिफ्ट आणले होते

" सविता तु खूप हुशार आहेस, काय कला आहे तुझ्यात एक एक, घर किती छान ठेवल आहेस तू, मला तुझे शिवलेले ब्लाऊज दाखव ना ",... रूपा

सविता ने रुपा ला तिने केलेल्या डिझाईन दाखवल्या

रुपा ने दोन तीन ब्लाऊज ची ऑर्डर दिली

ते लोक निघाले,... "वहिनी, मनु, आई, सतीश आमच्या कडे यायच ह आता तुम्ही, आम्ही आमच सामान लावल गेल की कळवतो तुम्हाला ",..

" हो नक्की",.. सविता

सतीश त्यांना सोडायला खाली गेला, घरात सविता आणि मनुने जेवायला घेतलं, खूप आनंदी वातावरण झालं होतं, सकाळ च टेंशन कमी झाल सविता खुश होती

" आज खूप छान झाला होता बरं का स्वयपाक सविता, अगदी तिखट मीठ काही घ्याव लागल नाही वरुन",.. सासूबाईंनी लगेच शाबासकी दिली

" आई दही वडे अगदी परफेक्ट",... मनु

सविताला खूप छान वाटत होतं, सचिन रुपा यांच्या स्वभाव किती छान आहे ना, किती कौतुक केल त्यांनी माझ, बहुतेक पाहिल्यांदा कोणी तरी बाहेरच्यांनी माझ्या कला गुणांच अस कौतुक केल असेल, आज सकाळी सतीश नाराज होऊन ऑफिसला गेल्यापासून सविता ला वाटत होतं की सतीश च्या आवडीचं काहीतरी बनवाव संध्याकाळी, म्हणजे त्याचा राग जाईल, बर झालं ते पाहुणे जेवायला आले म्हणजे छान झाला स्वयंपाक, तिची अपेक्षा होती की आल्यावर सतीश म्हणेल किती छान झाला होता स्वयंपाक, भांडण विसरून जाईल, तिला प्रेमाने जवळ घेईल, पण असं काही झालं नाही सतीश खालून आला आणि खोलीत निघून गेला तो एक शब्दही सविता आणि मनु शी बोलला नाही, त्या जेवत असतांना त्यांच्या सोबत थांबला नाही

जेवण झालं आवरून झालं सासुबाई मनु त्यांच्या खोलीत गेल्या, सविता ही आवरून खोलीत आली, तिने ड्रेस बदलला येऊन ती सतीश जवळ बसली

" छान झालं ना आजचा कार्यक्रम, आवडला का स्वयंपाक तुम्हाला?",... भीत भीत सविता ने विचारल

" नेहमीप्रमाणेच होता, सतीश नीट बोलत नव्हता आणि तुला काय गरज होती ग सचिनशी एवढ्या गप्पा मारायची आणि तुझ्याशी शिवणाचं काय सांगत बसलीस त्याला, आणि त्या रुपा मॅडम ला काय तू अरे कारे करत होती, वागण्या बोलण्याच्या काही पद्धती आहेत की नाही",.... सतीश

"अहो रुपा बोलली मला की मला फक्त रुपा बोल, सचिन सर स्वतः विचारत होते आवड निवड, किती छान वागले माझ्याशी, बोलले आपण मित्र आहोत अहो जाओ नको, त्यांनीच मला माझे छंद विचारले म्हणून मी सांगितलं, आता मी कोणाशी काय बोलायचं हे तुम्हीच ठरवणार का?, कोणी आल की मला अजिबात मोकळ राहू देत नाही तुम्ही ",... सविता

सविता बोलून तर गेली आता ती घाबरली होती,

" सचिन माझा बॉस आहे त्याच्या समोर तू मला शिवणाची आवड आहे स्वयंपाकाची आवड आहे असं सांगायला नको होतं ",... सतीश

" अहो पण शिवण करणे स्वयंपाक करणे हे काय कमीपणाचे लक्षण आहे का? मी स्वयंपाक छान करते आणि शिवणकाम ही मला येत",... सविता

" स्वयंपाक छान करते म्हणे, बाकीच्यांनी म्हणायला पाहिजे ना सविता, स्वतः स्वतःला काय म्हणते आहेस तू, त्या सचिनची बायको रूपा आमच्या एवढा पगार कमावते किती छान राहते ती, किती सुंदर दिसते, तुझा काही मॅच आहे का तिच्या बरोबर",... सतीश

" पण मला त्यांची बरोबरी करायचीच नाही, मी जशी आहे तशी खुश आहे, मला जे येतं ते मी त्यांच्यासमोर सांगितलं, असं असेल तर यापुढे कोणालाही घरी बोलवत जाऊ नका, मी माझं काम बाजूला ठेवून तुमच्यासाठी स्वयंपाक केला आणि परत परत तुम्ही वरून मलाच बोलता आहात ",.. सविता

"काय काम असतं तुला एवढं महत्त्वाचं, तुझ्या कामावर घर चालणार आहे का आपलं, असे दाखवते जसे कलेक्टर आहेस आणि ह्या असल्या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही मी आधीच सांगून ठेवतो, स्वयंपाक कर बोलले की स्वयंपाक करायचा, उगीच शहाणपणा नको मला , नसेल पटत तर वेगळी सोय बघायची आपली, समजल का हे घर माझ आहे मी बोलेल तेच होईल इथे, सकाळचा प्रसाद कमी झाला का, तू अशी ऐकणार नाही, सध्या तुझी हिम्मत वाढली आहे, त्या कार्टी ने शिकवलेले दिसत तुला हे सगळ उलट उत्तर द्यायच ,त्याने सविता ला हात धरून बेडरूम बाहेर काढल ",... सतीश ने दार लावून घेतल,

सविता उठली ती प्रचंड नाराज होती, यांच्या साठी काहीही केल तरी शेवटी मलाच बोल बसणार आहेत, काही उपयोग नाही, आपल काम करा, तिला घेतलेल्या ऑर्डर ची आठवण झाली, ब्लाऊज उद्या पर्यंत रेडी हवे, शिवलेल ब्लाउज बाहेर काढलं त्याला हूक लावायला घेतले

" काय करते आहेस सविता, आणि इथे पुढच्या खोलीत का बसलीस ग",... सुलभा ताई पाणी प्यायला आल्या होत्या

" माझं थोडं काम बाकी आहे ते करते मी पंधरा मिनिटात आणि लाईट बंद करते झोपते, तुम्ही करा आराम",... सविता

"आज पुढच्या रूम मध्ये झोपणार का?",.. सुलभा ताई

"हो काय करू मग आता, नशीब घरा बाहेर नाही काढल फक्त रूम बाहेर काढल आज मला",... सविता

"आमच्या रुम मधे चल, काही खरं नाही ग सतीश च, असा कसा स्वभाव घाण झाला आहे त्याच्या काय माहिती, तुला म्हणजे ऊठता लात बसता बुक्की आहे, तू काही तरी कर बाई याच ",.... सुलभा ताई

सविता सुलभा ताई सोबत बेडरूम मध्ये गेली

सकाळी आवरुन कोणाशी न बोलता सतीश ऑफिस ला निघून गेला, मनु शाळेत गेली

वरच्या भाभी ब्लाऊज घ्यायला आल्या, त्यांची ऑर्डर तयार होती, खूप आवडल त्यांना डिझाईन खूप खुश होत्या त्या

" शिलाई किती झाली",... भाभी

सविता ने सांगितलेल्या पैसे पेक्षा जास्तीचे पैसे देऊन त्या गेल्या,

"तुम्ही खूप कमी शिलाई घेतात तुम्ही पैसे वाढवा, माझ्या मैत्रिणीचे बुटीक आहे तिला आहे गरज शिवण काम करणार्‍यांची तुमच नाव सांगू का मी",... भाभी

"हो चालेल सांगा ताई ",..... सविता

दुपारनंतर फोन आला बुटीक मधून त्यांनी भेटायला बोलवलं होत ,.....

सविता तिचे डिझाईन घेवून तिथे पोहोचली, त्यांना खूप आवडल सविता च काम,.. " रोज दुपारी चार तास याल का तुम्ही इकडे",......

"हो चालेल",.... सविता

पगार चांगला होता परत इन्सेंटिव्ह ही होता, कस्टमर ला कशी ऑर्डर हवी हे सविता ला छान माहिती होत, थोडा अनुभव ही होता ऑर्डर चा, त्यामुळे लगेच काम झाल .....

सविता आनंदाने घरी आली, मनु आली होती घरी, तिने सासुबाईंना मनु ला आनंदाची बातमी दिली, दोघींना खूप आनंद झाला,

"मला जमेल ना पण रोज जायला",....... सविता

" का नाही कर ग तू हे काम, आई मागे फिरू नकोस ",.....मनु

"हो सविता अग पड थोडी घरा बाहेर काही लागल तर मी आहे ना",..... सुलभा ताईंनी सपोर्ट केला

आज सविता खूप खुश होती, मस्त पैकी ती आणि सुलभा ताई फिरायला निघाल्या,

" घरी गेल्यावर उद्याची तयारी कर सविता",... सुलभा ताई

हो आई......

.........

सविता ने डिसीजन घेतला होता, बुटीक मध्ये काम करण्याचा, सतीश परवानगी देईल का?, सविता स्टँड घेईल का स्वतः साठी, की नेहमी प्रमाणे सतीश पुढे हार मानेल, पुढे काय वाढून ठेवलं आहे? पुढे काय होईल ?.

🎭 Series Post

View all