मी काट्यांतुन चालून थकले... भाग 1

सविता एक गृहिणी, आपल्यासारखीच, स्वैपाक घरकामात खूप हुशार, वागायला खूप चांगली, सगळ्यांना सांभाळून घेणारी, छंद असे फार नाही तिचे, नेहमी दुसर्‍याच्या कलाने घेणारी, शिवणकामाची खूप आवड होती तिला


मी काट्यांतुन चालून थकले... भाग 1

आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, कोणीही थांबवू शकत नाही मला आता, फार झालं ....

©️®️शिल्पा सुतार
.........

सविता सतीश त्यांची मुलगी मनु, सतीश ची आई सुलभा ताई अस चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंब,

सविता एक गृहिणी, आपल्यासारखीच, स्वैपाक घरकामात खूप हुशार, वागायला खूप चांगली, सगळ्यांना सांभाळून घेणारी, छंद असे फार नाही तिचे, नेहमी दुसर्‍याच्या कलाने घेणारी, शिवणकामाची खूप आवड होती तिला , एक से एक डिझाईन जमतात तिला ब्लाऊजचे, ड्रेसचे, पर्स शिवते , पण नवरा नाही म्हणतो म्हणून फक्त स्वतःचे मुलीचे कपडे शिवते, कधी शेजारी मैत्रिणींनी आग्रह केला तर त्यांचे एखादे दोन ब्लाऊज शिवून देत असे ती, स्वयंपाकात ही सुगरण, जो पदार्थ खावून बघितला तो लगेच करणार अगदी जसाच्या तसा, शिकलेली, पूर्वी नौकरी केली लग्नाआधी, ती शाळेत टीचर होती, लग्नानंतर लगेच मनुचा जन्म झाला, मग जो गॅप पडला परत नोकरी केली नाही सविताने,

अशी छान हुशार सविता पण तिची हुशारी तिच्या नवर्‍याला सतीशला कधी दिसली नाही ,तिची प्रत्येक गोष्टी त्याला चुकीची वाटत होती, तू अशी का राहतेस साधी , स्वैपाक नीट करत जा, नीट वागत बोलत जा, तुला नवीन गॅझेट वापरायला फारस जमत नाही, तुला पार्टीला न्यायची लाज वाटत, हे अस सुरू असायचा त्याच, तुझी माझी बरोबरी नाही नेहमी घालून पाडून बोलायचा सतीश तिला, सविताच प्रेम होत सतीश वर, ती त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करायची, म्हणून हे नात टिकून होत, ती गप्प होती याचा अर्थ ती चुकीची आहे असा समज सतीश ने करून घेतला होता, मुलगी मनु घ्यायची तिची नेहेमी बाजू, पण तरी सतीश पुरून उरायचा त्या दोघींना, घरात प्रेम शांती अशी नव्हतीच, सासुबाई तिच्या बाजूने होत्या हीच एक काय ती जमेची बाजू होती,

आज बर्‍याच दिवसांनी संध्याकाळी सविता अशी निवांत होती, थोड्या वेळा पूर्वी सतीश चा फोन आला होता तो आज नाही जेवायला, तिघींचा स्वैपाक होता, सविता छान तयार झाली, मस्त कॉटन चा ड्रेस घातला, साधी वेणी, फ्रेश दिसत होती ती, मुळातच सुंदर होती सविता, ती आणि सासुबाई सुलभा ताई बाहेर मस्त फिरून आल्या, रस्त्यात मैत्रिणी भेटल्या, छान वेळ गेला, दुसर्‍या दिवसासाठी भाजी फळ घेवून आल्या, मनु आली तेवढ्यात क्लास हुन

"आई आज बाहेर गेली होतीस का, छान, काय आहे आज जेवायला",..... मनु

"आपली आवडती कढी खिचडी केली आहे, आपण तिघी आहोत जेवायला आज ",..... सविता

"अरे वा, तरीच कढी खिचडी चा बेत आहे, बाबा का उशीर येणार आहेत",...... मनु

"ऑफिस मध्ये मोठी मीटिंग आहे त्यांच्या, त्या नंतर डिनर, उशीर होईल त्यांना " ,..... सविता

"अच्छा, नाही तरी बाबांना आपल्या सोबत आवडत नाही, नेहमी बाहेर असतात ते जेवायला",...... मनु

" मनु असू बोलू नये, गप्प बस",..... सविता

" आई तू मला जरी गप्प बसवल तरी परिस्थिती बदलणार नाही ग आपली, स्पेशली तुझी, तुला किती त्रास आहे ",..... मनु

मनु यंदा दहावीत होती, तिला कळत होत आता सगळ, आपले बाबा कसे वागतात घरात ते ती बघत होती, ते तिला त्यांच वागण अजिबात आवडत नव्हत, आपल्या हुशार आईच अजिबात काही चुकत नाही तरी तिला खूप त्रास आहे, बाबा सदोदित आई ला बोलत असतात, त्यामुळे मनु नाराज असायची, ती नेहमी आईच्या बाजूने बोलायची

सासुबाई सुलभा ताई खूप चांगल्या होत्या, त्या छान सांभाळून घ्यायच्या सविताला, त्यांना ही सतीशच वागण अजिबात आवडत नव्हत, त्या घरात होत्या म्हणून थोडी तरी शांती होती, नाही तर सतीशने सविताला त्रास द्यायची एक ही संधी सोडली नसती

मोकळ्या वातावरणात तिघींच जेवण झाल, टीव्ही वर आवडता प्रोग्राम सुरु होता, सविता ताट उचलत होती

"राहू दे ग सविता, आवरू जरा वेळाने, बस जरा वेळ",..... सुलभा ताई बोलल्या

"आई आवरते मी पसारा मग बसू बोलत", .......सविता मनुने पटापट आवरल, आरामात बसल्या त्या तिघी

"आई अस शांत घर किती छान वाटत ना ग ",..... मनु

जरा वेळाने डोअर बेल वाजली, मनु ने जावून दार उघडल, सतीश आला होता

" बाबा आज उशीर झाला ",..... मनु

"हो बेटा मीटिंग होती, नंतर डिनर, आई झोपली नाही का अजून, आराम करा जा" ,....... सतीश

सुलभा ताई, मनु रूम मध्ये गेल्या.....

सविता कडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष करून सतीश ही आवरायला आत गेला, सविता सवयी प्रमाणे मागे गेली,

"सविता हीटर का नाही लावला, मला रोज गरम पाणी लागत हे लक्षात कस रहात नाही तुझ्या, लक्ष कुठे असत तुझ, आणि हे काय रूम मध्ये सगळीकडे काय तुझे शिवणाचे कपडे पडलेले आहेत , मला पसारा आवडत नाही, आवर हे आधी",...... सतीश

" अहो लग्नाचा सीजन आहे म्हणून खूप काम आहे मला, पाणी गरम आहे, हीटर आता बंद केला तुम्ही आंघोळ करून घ्या",....... सविता

सविता ने शिवण कामाच सामान आवरल, टॉवेल कपडे शोधून ती तयार होती, सतीश आंघोळ करून आला

"सविता हे शिवण काम बंद कर ग आता , किती वेळा सांगितलं समजत नाही का, काही स्टँडर्ड नाही या कामात, थोडे पैसे दिले की बाहेर छान ड्रेसेस मिळतात ते वापरत जा, एखाद्या मैत्रिणीचा सल्ला घे हव तर",...... सतीश

" अहो पण मला आवड आहे शिवणाची, आणि घरी शिवलेले ड्रेस ब्लाऊज छान बसतात आणि माझ्या शिवण कामा मुळे कोणाच काही काम अडत नाही, फावल्या वेळात करते मी हे काम, एवढा एक विरंगुळा आहे मला",........ सविता

" काम अडत नाही म्हणजे काय, काय करतेस ग तू रोज, आपल कसतरी आवरायच, म्हणे माझ काम छान आहे, त्या पेक्षा चार कामाच्या गोष्टी शिक सविता ",....... सतीश सवयीचा भाग असल्या सारखं सविताला ओरडत होता, सविताला सुद्धा आता याची सवय झाली होती

" अहो जाऊ द्या ना आता हा विषय, तुम्ही आराम करा",.... सविता सतीश च्या जवळ येवून बसली, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला

" सविता प्लीज झोपू दे मला, सकाळी लवकर उठायचं आहे ,आणि जरा संध्याकाळी चांगली रहात जा, म्हणजे मला तुझ्या जवळ यावस वाटेल, या घरात मला कधी शांतता मिळणार आहे मला काय माहिती, घरात पाय ठेवला की चीड चीड होते माझी ",..... रागाने सतीश बाजूला तोंड करून झोपला, सविता ही बाजूला झोपली, आजकाल नेहमीच होत सतीशच जेव्हा सविता ला वाटायचं छान सोबत वेळ घालवावा तेव्हा सतीश नेहमी तिला दूर लोटायचं आणि तिची इच्छा नसली तरी तिला त्याची साथ द्यावी लागायची, म्हणजे माझ्या इच्छेला काही अर्थ नाही का, डोळ्यात पाणी होत तिच्या, जाऊ दे थकले असतिल ते, विचार करून तिने तिच मनाच समाधान करुन घेतल, मानसिक आणि शारिरीक ही समाधान नव्हत तिला सतीश सोबत

आज लग्नाला 17 वर्ष झाले हे अस सुरू आहे, गावातील साधी सविता, अतिशय सुंदर साधी, अभ्यासात अतिशय हुशार वर्गात नेहमी पहिला नंबर, घरातली लाडकी ताई, आई बाबा दादा सगळ तिला विचारून करत होते, शिकून त्याच शाळेत टीचर म्हणून जॉईन झाली, सविताच्या घरचे साधे लोक खूप प्रेमळ सगळे, छान वातावरणात वाढलेली सविता , आई बाबांच्या शब्दा बाहेर नव्हती , कधीच कोणाला उलटून बोलण तिला माहिती नव्हत,

थोड्या दिवसात सविताला सतीशच स्थळ आल, सतीशला सविता पसंत नव्हती , त्याला त्याच्या ऑफिस मधल्या मॉडर्न मुली आवडत होत्या, हुशारी नको होती, त्याला बाहेरील दिखावा आवडत होता , मॉडर्न लूक महत्त्वाचा होता, गावातील सविता म्हणजे तिला काही समजत नाही, मठ्ठ आहे ती असा समज सतीश ने करून घेतला,

सतीशच्या आई बाबांना सविता आवडली होती, त्यांना समजल होत तिच्यातील गुण, बाबानी हट्ट केला, धमकी दिली, सतीशचा नाईलाज झाला, दोघांच लग्न झालं, दोघ शहरात आले, सुरुवाती पासून सतीश ने सविता ला स्विकारल नाही, संसार सुरू होता तसाच, लगेच एका वर्षात मनु झाली, त्या नंतर काही कारणाने दुसर मुल झाल नाही, सतीश ने याचा सगळा दोष सविताला दिला, त्याला मुलगा हवा होता,

घरातील सगळ लक्ष सतीश ने काढून घेतल, मात्र सविता बाबतीतले सगळे निर्णय तो स्वतः घेत होता, तिला काय कळत अस कायम वाटत होत त्याला, मी म्हणेन तेच व्हायला हव घरी अस सुरू होत,

बर्‍याच वेळा माहेरी कार्यक्रम असले की सविता ला जायला मिळायच नाही कारण एकमेव सतीश होता, तो पाठवायचा नाही तिला, ती बंड करून गेली की आल्यावर काही खरं नसायच तीच त्या नंतर चे आठ पंधरा दिवस तिचा खूप छळ व्हायचा, माहेरचे लोक बाबा भाऊ घरी आले तरी सतीश त्यांच्या शी बोलायचा नाही, ते लोक जरा वेळ बसायचे सविता मनु ला भेटायचे आणि वापस जायचे, करतील तरी काय ते वाईट वाटायचं त्यांना, होईल नीट एक दिवस अशी आशा होती,

सासरे होते तो पर्यंत सगळ ठीक होत , नंतर सतीश ला रान मोकळ झाल, आई ला ही तो जुमानत नसे, तो रोज सविता वर राग काढायचा , तिच्यातील गुण हुशारी चांगुलपणा कधीच दिसला नाही त्याला, फक्त मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हत हेच आठवत रहायचा त्याला ,

सासुबाई सगळ बघत होत्या त्यांच्या हातात काही नव्हत सतीश त्यांच ऐकत नव्हता,

सविताला ही आता या गोष्टीची सवय होऊन गेली होती, कधी माझ्या आयुष्यात शांती प्रेम येणार आहे याची ती वाट बघत होती, तिला आशा होती एक दिवस सगळ ठीक होईल ....
...........

सकाळच्या गार वार्‍याने सविताची झोप उघडली, ती बाल्कनीत येवून ती उभी राहिली, कुंडीतल्या फुलझाडांना  तिने पाणी दिल, सुरेख पक्ष्यांचे किलबिल ऐकु येत होती, तिची आवडती पक्ष्यांची जोडी येवून बसली समोरच्या झाडावर, तिने पक्षांना प्यायला पाणी त्यांच्या नेहमीच्या वाटीत टाकल, दोघ पक्षी एकमेकांची छान काळजी घेत होते, मन कस प्रसन्न झाल आज तीच , हा सकाळचा वेळ तिच्या आवडीचा होता, अस सुरेख जिवन असत तर किती छान झाल असत, काही टेंशन नाही, फक्त आनंदी आनंद सगळीकडे, सतीश झोपला होता त्याच्या कडे प्रेमाने एक कटाक्ष टाकून ती आत आली

चला आवराव लागेल उशीर केला तर मनुची शाळा आहे, यांना ही जायच आहे ऑफिसला, दोघांचे डब्बे, चहा नाश्ता खूप काम आहे, आंघोळ करून सविताने देवपूजा करुन घेतली, लगेच एका बाजूला भाजी टाकली, कणीक मळून पोळ्या करायला घेतल्या,

सुलभा ताई उठल्या,.... "सविता अग चहा झाला का",..

"आणते आई", .... सविता

सविता ने सुलभा ताईंना चहा दिला,

"तू पण घे ना सविता चहा माझ्या सोबत" ,..... दोघींनी सोबत चहा घेतला

मनू उठली तेवढ्यात,..... "आज काय आहे भाजी आई डब्याला",

"भेंडी ची भाजी ",..... सविता

"तु मुद्दाम मला नाही आवडत त्या भाज्या करतेस ना ",.... मनु वैतागली होती

"सगळं खायला पाहिजे मनु, आता तू काही लहान नाही",....... सुलभाताई रागवल्या

"आजी तू नेहमी आईची बाजू घेते",..... मनु

"घेऊ दे की मला सविता ची बाजू ",...... सुलभा ताई

" हो, नाही तरी माझ्या बाजूने कधी कोण असत",..... सविता

" आई थोडं लिंबाचं लोणचं दे डब्यात, माझ्या मैत्रिणींना खूप आवडतं तुझ्या हातच लोणच",..... मनु

आनंदाने सविता घर काम आवरत होती,

तिचा हा आनंद असा टिकेल का, की सतीश आज ही तिचा अपमान करेल, तिला बोल लावेल, काय होईल...., कितपत योग्य आहे सतीश च वागण? सविता काय करेल पुढे? , की आहे हे अस सहन करत राहील....

............

बघु पुढच्या भागात काय होत ते,

🎭 Series Post

View all