मी कशाला आरशात पाहू ग भाग 3

श्रीधर चे प्रेम कमल स्वीकारेल का?

मी कशाला आरशात पाहू ग (प्रशांत कुंजीर) भाग 3

मागील भागात आपण पाहिले कमलवर हात टाकणाऱ्याला लक्षीने धडा शिकवला. श्रीधरला औषध दिल्यावर एक नाते निर्माण होऊ लागले. आता पाहूया पुढे.


उन्हाळ्याच्या सुट्टीत कमल आप्पा आणि आजीला भेटून आली.

"कमल,जपून रहा. पोरीची जात त्यात एकटीच." आजी काळजीने सांगत होती.

कमल परत आली. पावसाळा सुरू झाला होता. ती एक दिवस शाळेला गेली. शाळा सुटली आणि प्रचंड पाऊस सुरू झाला.


कमल पटापट पावले उचलत निघाली. पातळ भिजून अंगाला चिकटले होते. शक्य तेवढे लवकर खोलीवर जायचे म्हणून ती भरभर चालत होती.

इतक्यात समोर दत्ता उभा राहिला,"त्या दिवशी लक्षी आली म्हणून वाचली तू."


त्याने कमलवर झडप घातली. कमल कबड्डी खेळाडू होती. तिने झडप चुकवली आणि जोरात पळत सुटली.

दत्ता आणि त्याचे मित्र कमलचा पाठलाग करत होते. संपूर्ण साडी चिखलाने भरली होती. अचानक कमलचा पाय घसरला आणि ती खाली पडली.

दत्ताने तिच्या पदराला हात घातला. तेवढ्यात दत्ताच्या कंबरेत एक लाथ बसली.

तालुक्याच्या गावावरून येणारा श्रीधर कमलच्या मदतीला धावला.

दत्ता आणि त्याचे मित्र धावून आले,"सायेब, आवो वाटून खाऊ. उगा कशाला तरास."

श्रीधर संतापला आणि त्याने कमरेचे पिस्तूल काढले,"खबरदार पुढे आला तर."


दत्ता तरीही पुढे येऊ लागला आणि श्रीधरने पायावर गोळी झाडली. त्याबरोबर बाकीचे सगळे पळून गेले.



श्रीधरने पाहिले तर कमल बेशुद्ध होती. त्याने कमलला उचलले. गाडीवर स्वतः च्या कंबरेला तिचा पदर बांधला आणि खोलीवर आला. कमल पावसात भिजल्याने शरीर थंड पडले होते. श्वास मंद लागत होता.

घरात शेकोटीला ठेवलेली लाकडे भिजली होती. श्रीधर आता संभ्रमात पडला. परंतु ऊब भेटली नाही तर कमल वाचणार नव्हती.

त्याने स्वतः च्या अंगावरची वस्त्रे उतरवली आणि तिला मिठीत घेतले. तिचे अंग पुरेसे गरम झाल्याचे पाहून स्वतः वर ताबा ठेवत श्रीधर दूर झाला.


कमलची ओली कपडे त्याने आत नेऊन टाकली. सकाळी कमल जागी झाली. अंग प्रचंड ठणकत होते. अंगावर एकही वस्त्र नव्हते.


ती प्रचंड घाबरली. अंगाभोवती चादर लपेटली.


तेवढ्यात श्रीधर चहा घेऊन आला,"तुमचा जीव वाचवण्यासाठी हे करावे लागले. पण विश्वास ठेवा मी काहीही वावगे केले नाही."


कमल शांत होती. तिने चहा घेतला. ओलेती साडी गुंडाळली आणि तशीच बाहेर पडली. घरी आल्यावर तिचा बांध फुटला.


"आप्पा,आता माझी मलाच लाज वाटते. स्वतः ला आरशात पाहू शकत नाही." ओक्साबोक्शी कमल रडत होती.


अचानक श्रीधर आत आला,"कमल,उभ्या रहा. माझ्या डोळ्यात बघा. पाप आहे का?"


कमल पहिल्यांदा त्याला शुद्धीत इतक्या जवळून पहात होती. त्याच्या नितळ काळ्याभोर डोळ्यात कुठेही वासना नव्हती. होते केवळ प्रेम.

"श्रीधर,तुम्ही जा. मी तुमच्या लायक नाही." कमल हात जोडून म्हणाली.


त्यानंतर कमल श्रीधरला टाळू लागली. तिचे एक मन म्हणायचे,"कमल प्रेम झिडकारू नकोस. श्रीधर तुला आनंदी ठेवेल."

दुसरे मन सांगे,"तू अशी नवऱ्याने टाकलेली. तो इतका देखणा रुबाबदार. त्यात जात वेगळी. आगीशी खेळ नको."


श्रीधरला कमल प्रचंड आवडली होती. त्याने कमलची संपूर्ण माहिती काढली. तिच्या पहिल्या लग्नाची चौकशी केली. त्यानंतर त्याला कमल आणखी आवडू लागली.


तरीही घरी सांगणे अवघड होते. त्याच्या घरी त्याची आई होती. वडीलांच्या मागे एवढा मोठा कारभार सांभाळत तिने श्रीधरला वाढवले होते.

श्रीधर सुट्टीत घरी आला. नेहमी हसणारा,सगळीकडे फिरणारा श्रीधर आता गप्प होता.

दोन दिवसांनी आई म्हणाली,"श्री,आज म्या घालते आंघुळ. चांगली घासून."

श्रीधर लाजला,"काहीही काय आई? मी लहान आहे का?"

आईने ऐकले नाहीच,"लेकरा,कोण हाय तुझ्या मनात. मला बी सांगणार नाय व्हय र?"

श्रीधर लाजला,"आई,तू सगळे कसे ओळखतेस?"

आई हसली,"म्या जलम दिला हाय तुला. कदी जायचं लगीन ठरावाया."


श्रीधर गप्प झाला. थोडा वेळ थांबून त्याने आईला सगळे सांगितले.

आई काहीच बोलली नाही. दोन दिवसांनी श्रीधर परत निघाला तरी आई काहीच बोलली नाही.

श्रीधरच्या आईला सगळे मान्य होईल का? कमल आणि श्रीधर यांचे काय होईल?
पाहूया अंतिम भागात.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all