Oct 28, 2020
सामाजिक

मी दुखावलेला शिवभक्त

Read Later
मी दुखावलेला शिवभक्त

               कित्येक दिवसांनी मी इंस्टाग्राम ओपन करून पोस्ट बघत होतो. तर तिथे मला एक मुलीचा फोटो होता आणि केप्शन लिहिलेला होता , की या मुलीचा काय करायला पाहिजे ??? आणि रागाचे इमोजी होते... खाली मी कॉमेंट्स बघत होतो. त्यात सगळ्यांनी शिवी दिलेले होते. ते पण अशे तशे नाही तर आई बहिणीवर शिवी देत होते. हद्द तर तेंव्हा झाली की कोणीतरी कमेंट केलेला होता की असल्या मुलींना वैश्य म्हणतात... मी बघून हापकलोच की असा काय केलंय या मुलीने???.. अजुन खाली कॉमेंट्स वाचत गेलो तर मला कळाल की त्या मुलीचं नाव ' अग्रिमा जोशुदा ' आहे. मग मला माहिती नव्हतं की नेमक काय झालेला आहे .. 

           तर मी यू ट्यूबवर तीच नाव सर्च केला तर खूप सारे व्हिडिओ आले . मी व्हिडिओ बघितला . तर मला कळाल की अग्रिमा जोशुदा ही एक स्टँड अप कॉमेडी करणारी आहे. तर तिच्या एका व्हिडिओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ती एक जोक केलेली होती . ज्या मध्ये ती छत्रपती शिवाजी महाराज न म्हणता फक्त ' शिवाजी ' म्हणाली होती.  त्यावरून शिवभक्त भडकले होते आणि काल पर्वा ती जिथे कॉमेडी केलेली होती तिथे जाऊन तोडफोड करून छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होते. 

           एक शिवभक्त म्हणून मला सुद्धा वाईट वाटलं होत की तशी ती का म्हणाली. पण मला ती नावाबद्दल नाही तर तिच्या जोकवरून मला चीड आलेली होती. तर माझं एक सवय आहे की कुठलाही घटना घडली तर त्या घटनेचा सगळे बाजू बघूनच आपले विचार मी मांडतो. तर ती तस का म्हणाली ??.. तिला ते जोक करताना माहिती नव्हत का की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते??? ... याच कारण मला वाटतं की तिला माहिती नसाव की ती कुणा विषयी बोलत आहे. महाराष्ट्र सोडून बाहेरच्या  लोकांना महाराजांचा इतिहास माहिती नाहीये... हे सत्य आहे ... का माहिती नाही आहे???.. तर स्वराज्य भारतामध्ये जितका पसरलेला होता तितका आपला इतिहास पसरलेला नाहीये. जर पसरलेला आहे तर उत्तर प्रदेश , बिहारचा हालत चांगले असले असते... त्यामुळे वरच्या राज्यांना आपला इतिहास माहिती नाही. 

      कॉलेजच्या बाहेरच्या गेटजवळ काही मुल असतात जे मुलींना बघून त्यांच्या शरीरावरून कमेंट मारत असतात . तेच मुल महाराजांच्या जयंतीला गुटखा खाऊन नाचत असतात. हे लोक इतिहास पसरवत नाहीत . तर आपले विचार , आपले चित्रपट , आपली संस्कृती बघून पसरत असतात. महराजांच शिकवण होत की मुलिबायांचे आदर करावे. ते तर बऱ्यापैकी दिसतच नाही... त्यांची शिकवण खूप उच्च आहेत.. त्यांच्यावरून कित्येक पुस्तक लिहिलेले आहेत. ते आपण वाचत नाही... तर इतिहास कसा पसरणार.. स्वराज्यमध्ये जातीवाद असा प्रश्न नव्हताच... ते आता कसा आहे हे मी माझ्या लेख ' कागदावरील अनुच्छेद १५' या मध्ये व्यक्त केलेला आहे. ते वाचा मग कळेल की काय आहे आपल्या राज्यात...

             स्टुडिओ मध्ये जाऊन काही लोक तोडफोड केले. मान्य आहे की तुमचे भावना दुखावले आहेत , माझे सुद्धा खूप भावना दुखावले आहेत.. पण हे तोडफोड करून बाकीचे लोक शिवभक्तांना नाव ठेवतात की हे फक्त तोडफोड करत असतात... हे ऐकुन मी जास्त दुखावतो... महाराजांचं हे शिकवण नव्हते.... काही व्हिडिओ मध्ये तर त्या मुलीला रेप चे सुद्धा धमकी येत आहेत.. तुम्हाला खोटं वाटेल पण आलेले आहेत... हे खरच महाराजांचं शिकवण नाहीये... 

     असल्या कृत्याने तुम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेण्यासाठी प्रवृत्त कराल पण ते नाव आदरानी नसून भितीनी घेतलेला असेल... ते एका शिवभक्ताला नकोय... मला इतिहास पसरवायला आवडेल. मला लोक भीतीने नव्हे तर आदराने महाराजांचं नाव घेतलेला आवडेल.... खरच मी आहे एक दुखावलेला शिवभक्त..... 
********************************
ऋषिकेश मठपती

Circle Image

Mathapati Rushikesh Irayya

Student

Writing and reading are my hobbies. Mathematics is in my blood.