Sep 22, 2020
कथामालिका

मी आत्मनिर्भर (भाग-८)

Read Later
मी आत्मनिर्भर (भाग-८)

मी आत्मनिर्भर (भाग-८)

© प्रतिक्षा माजगावकर

         दुसऱ्या दिवशी योगिताच्या सांगण्यावरून चिन्मय सुरज ला फोन लावतो... सुरज सकाळी उठतो ते याच्या फोन मुळेच! तो त्याला बॅगेची आठवण करून देतो.... रमेश ला माहित असतं, मयुरी emergency साठी चार दिवसांची बॅग भरून च ठेवते तीच तो सूरज कडे देऊन ठेवतो.....
सुरज:- सॉरी यार चिन्मय! मी तुला खूप चिडवलं पण, आता मला कळतंय या सगळ्या कामाचं महत्व....
चिन्मय:- अरे बस का! मैत्री मध्ये नो सॉरी नो थँक्यू.... बरं मला सांग तू चहा घेतलास का?
सुरज:- नाही यार! आत्ता तुझ्या फोन मुळेच आम्ही दोघं उठलो.... आणि आम्हाला चहा पण बनवता नाही येत...
चिन्मय:- ओके तू फ्रेश हो आणि मला कॉल कर मी सांगेन तुला.... डोन्ट वरी....
सूरज:- ओके....
चिन्मय फोन ठेवतो...... आणि योगिताला सूरज सगळं सांगतो....
योगिता:- अरे देवा! चहा पण येत नाही का दोघांना? कठीणच आहे..... तुम्हा दोघांना निदान तेवढं तरी जमत होतं! खरंच मयुरी कसं सांभाळत असेल एवढं तिलाच माहित..... असो! त्याचा कॉल आला की नीट सांग त्याला सगळं!
चिन्मय:- हो आई! नको काळजी करू.....
         एवढ्यात यश येतो.... चला चला गरमा गरम पोहे आणि चहा तयार आहे.... सगळे जण खाऊन घेतात..... योगिता पुढच्या तयारीला लागते..... तोपर्यंत सूरज चा फोन येतो... चिन्मय त्याला सगळं नीट सांगतो.... त्याप्रमाणे दोघांचा चहा तरी नीट होतो....
सुरज:- फायनली चहा तरी बनला.... चिन्मय मी तुला पुन्हा थोड्यावेळाने व्हिडिओ कॉल करतो... तू मला आणि बाबांना स्वयंपाक कसा करायचा ते सांग.... आता चहा झाला की आधी आम्ही घर आवरून घेतो....
चिन्मय:- हो चालेल.... सगळं नीट आवर.... घर आरश्यासारखं चमकलं पाहिजे.... आणि हा खाली ये आई निघाली आहे... तिच्याकडे काकूंची बॅग दे....
सुरज हो म्हणून फोन ठेवतो..... आता योगिता निघायची वेळ झालेली असते..... आज औषधं वाटायला वस्तींमध्ये जायचं होतं म्हणून दुपार पर्यंत ती घरी च येणार असते....
           योगिता खाली जाऊन सूरज कडून बॅग घेते.... त्याला अजून काही टिप्स देऊन ती जायला निघते..... यश आणि चिन्मय ला आता सवय झालेली असल्यामुळे त्या दोघांना कामाचं काहीही वाटत नाही..... मस्त एन्जॉय करत करत ते सगळं करत असतात..... यशची ९.३० ला मीटिंग असते, ती अटेंड करायला तो जातो.... चिनू पुढची थोडीफार तयारी करून ठेवतो... पण, सुरज आणि त्याच्या बाबांना कसलीच सवय नसल्यामुळे त्यांना फार त्रास होत असतो.... कसेबसे दोघं सगळा पसारा आवरतात.... त्यांचं आवरे पर्यंत ११ वाजून गेलेले असतात.....
******************************
        निधी ने आज दोन दोन जणांच्या टीम केलेल्या होत्या..... योगिता आणि मयुरी एकाच टीम मध्ये होते..... काम करता करता मधेच मयुरी बोलू लागली; "माझ्या घरी सगळं कसं सुरु आहे? मला फार काळजी वाटतेय गं! दोघं नीट राहत असतील ना...."
योगिता:- हो! सूरज चिन्मय ला फोन करून सगळं विचारून घेतो आणि करतोय... तू नको काळजी करुस.... त्यांना जाणीव होणं फार आवश्यक आहे.... दोन दिवसांनी बघ त्यांच्या अंगवळणी पडेल कामाची सवय आणि तुला सुद्धा मदत होईल.....
मयुरी:- हम्म! त्यांच्याच चांगल्याचं आहे म्हणून मी सुद्धा कसंबसं माझ्या मनाला तयार केलं.... काल रात्री झोप सुद्धा लागत नव्हती पण, स्वतःलाच समजावत कशीबशी झोपले....
योगिता:- समजू शकते मी.... पण, अजून दोन च दिवस...
मयुरीला योगीताशी बोलून फार बरं वाटत होतं... आता त्या दोघी मस्त कामात मग्न झाल्या होत्या..... घरचे विचार केव्हाच मागे पडले होते.....
***************************
        इथे घरी सूरज चिन्मयला व्हिडिओ कॉल करतो.... चिन्मय काही बोलायच्या आधीच सूरज त्याला सगळं घर दाखवतो...... पहिल्यांदाच स्वतःहून आवरलेलं घर पाहून त्याला फार कौतुक वाटत असतं! चिन्मय सुद्धा योगिता ने सुरुवातीला जशी त्यांची स्तुती केली होती आणि उत्साह वाढवला होता तसंच करतो.... आता त्याचा मोर्चा वळतो किचन कडे..... सूरज त्याला सगळं किचन दाखवतो.... चिन्मय ला भांडी अस्वच्छ घासली आहेत ते दिसतं.....
चिन्मय:- अरे सुरज भांडी नीट घासून घे आधी... अशी भांडी वापरलीस तर आजरी पडाल तुम्ही दोघं.... मी सांगतो तसं कर...
असं म्हणून चिन्मय सुरजला भांडी घासायला शिकवतो...... सुरज आणि रमेश मिळून भांडी पुन्हा स्वच्छ घासतात.... 
या सगळ्यात ११.३० वाजून गेलेले असतात.... यश ची सुद्धा मीटिंग आणि प्रेसेंटशन झालेलं असतं तो सुद्धा चिन्मयच्या मदतीला येतो... आता खरी कसोटी असते..... सूरज आणि रमेश ची तर कोणत्या डाळीला काय म्हणतात इथपासून ची तयारी असते.... चिन्मय आणि यश दोघं मिळून स्वतःच्या घरात करता करता त्या दोघांना शिकवत असतात.....
           फायनली कसंबसं सगळं १ पर्यंत तयार होतं.... सूरज आणि रमेश सगळे पदार्थ चाखून बघतात, पहिल्या प्रयत्नांच्या मानाने छानच असतं! दोघं यश आणि चिनू ला थँक्स बोलतात.... आणि फोन ठेवतात.... इतक्यात दारावरची बेल वाजते..... योगिता आलेली असते...... सगळे जण मस्त जेवून घेतात..... जेवता जेवता योगिताला सगळा प्रकार समजतो.....
रमेश आणि सूरज सुद्धा जेवायला बसलेले असतात....
सूरज:- बाबा आईची फार आठवण येतेय ओ... कितीवेळा तिने आपल्याला सांगितलं जास्त नको पण थोडी मदत करा पण आपण ऐकलं नाही...
रमेश:- हो ना! आपल्याला नेहमी हे सगळं सोपं वाटत होतं.... पण, आज स्वतःवर येऊन पडलं तेव्हा समजलं तिला किती त्रास होत असेल.... आता या पुढे आपण तिला मदत करायचीच! अगदी यश आणि चिन्मय सारखी.....
सुरज:- हो! आई जरी हॉस्पिटल मध्ये गेली असली तरी तिला इथली काळजी नक्की वाटत असेल.... मी तिला फोटो पाठवतो.... आपण केलेल्या पहिल्या स्वयंपाकाचे..... तिला पण बरं वाटेल....
रमेश:- हो पाठव लवकर....
       सुरज मयुरी ला फोटो पाठवतो... सोबत आवरलेल्या घराचे सुद्धा फोटो पाठवतो आणि सोबतच सॉरी चा मेसेज सुद्धा करतो..... मयुरी सुद्धा फोटो बघते..... तिचं टेन्शन आता खूप कमी झालेलं असतं! ती लगेच घरी फोन लावते... मयुरी चा फोन बघून रमेश सुरजला फोन स्पीकर वर ठेवायला सांगतो....
मयुरी:- अरे वा! पहिला प्रयत्न खूप मस्त आहे..
सूरज:- हम्म... पण, खूप त्रास झाला गं आई...
रमेश:- हो.... आम्ही आधीच तुझं ऐकलं असतं तर ही वेळ नसती आली....
मयुरी:- आता जे गेलं ते गेलं.... तुम्ही दोघं छान जेवा मी पण जेवते.... लंच ब्रेक संपत आला आहे नंतर पुन्हा फोन करते संध्याकाळी.....
असं म्हणून फोन ठेवते.... ती जरी हॉस्पिटल मध्ये नसली तरी मुद्दाम खोटं बोलणं तिला भाग असतं.....
सगळं सुरळीत आहे हे बघून तिला पण छान वाटत असतं..... संध्याकाळी मयुरी फोन करून चौकशी करते... त्या दोघांच्या बोलण्यावरून आता त्यांना चांगलंच कामाचं महत्व समजलं आहे हे जाणवत असतं! सूरज तिचा फोन येऊन गेल्यावर तिला एक व्हिडिओ सेंड करतो... त्यात रमेश चहा करत असतो आणि सोबत खायला सँडविच बनवलेलं असतं! व्हिडिओ पाहून तिला पण फार बरं वाटतं.....
          रात्री मुगाच्या डाळीच्या खिचडीचा बेत बनतो..... दिवसभर दोघं बाप लेक पार दमून गेलेले असतात म्हणूनच साधा खिचडी, कढी चा बेत असतो! सूरज चा तसा चिन्मयला व्हिडिओ कॉल येतो..... चिन्मय निवांत बसलेला असतो, कारण आत्ता रात्रीची सगळी जबाबदारी योगिताने घेतलेली असते..... तो त्याला सगळं नीट सांगतो..... त्याप्रमाणे दोघं बाप लेक खिचडी, कढी बनवतात..... आज सुरजच्या सुद्धा व्हाट्सअप स्टोरी ला त्याने केलेल्या स्वयंपाकाचे फोटो असतात.... चिन्मय ला सुद्धा बरं वाटतं... कसं का होईना या सूरज ला जरा तरी स्वावलंबनाच महत्व कळलं.....
              दुसऱ्या दिवशी योगिता आणि मयुरी जेव्हा भेटतात तेव्हा, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून योगिताला फार बरं वाटतं..... मयुरी सुद्धा सूरज ने केलेल्या फोन बद्दल आणि सॉरी च्या मेसेज बद्दल योगिताला सांगते!
योगिता:- बघ... झाला ना आता प्रॉब्लेम सॉल्व्ह... आता कसलंच टेन्शन नको घेऊ.... निधी मॅडम ना आज हे सगळं सांग.... शेवटी त्यांच्या मुळेच हे शक्य झालं....
मयुरी:- हो!... त्यांनी जर हि आयडिया काढली नसती तर या दोघा बाप लेकाला आत्मनिर्भरतेचं महत्व कळलंच नसतं! आता आपलं काम झालं की त्यांच्याशीच आधी जाऊन बोलते....
असं म्हणून दोघी पुन्हा कामात व्यस्त होतात.... काम झाल्यावर निघायच्या आधी मयुरी निधी ला सगळं सांगते आणि थँक्स बोलते....
निधी:- अहो थँक्स काय त्यात.... पण, इतक्यात घरी जायची घाई करू नका... अजून दोन दिवस जाऊदे....
मयुरी:- हो... तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे... घाई केली तर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न व्हायचे.....
दोघी हसतात..... मयुरी निधी ने जिथे तिची सोय केलेली असते तिथे जाते....
          असेच अजून दोन दिवस जातात...... रमेश च्या वागण्यात सुद्धा आधी पेक्षा आता जरा नरमाई आलेली असते..... तो सुद्धा मयुरी ला सॉरी बोलतो.... तिसऱ्या दिवशी मयुरी घरी येते.... ती घरी आल्यावर चक्क दोघं सुद्धा तिला फक्त बसवून ठेवतात आणि सगळं स्वतः करतात..... हे पाहून तिला पण खूप छान वाटतं... आयत सगळं मिळालेलं असतं... आणि शिवाय दोघांकडून प्रॉमिस सुद्धा; "आम्ही दोघं तुला आता नेहमी मदत करू.... स्वतःची कामं स्वतः करू...."
हि बातमी मयुरी योगिताला सुद्धा सांगते.... सूरज सुद्धा यश ला बोलला असतो, मी आणि बाबांनी आई ला आता सगळ्या कामात नेहमी मदत करायचं प्रॉमिस केलं म्हणून..... शेवटी सगळं छान होतं..... एरवी हि कामं स्त्रियांची आहेत बोलणारा रमेश स्वतः व्हाट्सअप स्टोरी ला पोस्ट करतो; "Cooking and cleaning is not a gender based activity it's a basic life skill".....
समाप्त.....
****************************
काय मग कशी वाटली कथा? प्रत्येकाला स्वतःच्या जगण्या पुरतं तरी घरकाम आलंच पाहिजे हा संदेश देण्यासाठी चा हा छोटासा प्रयत्न..... तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा....

Circle Image

Pratiksha Majgaonkar

Student

I like reading stories and poems... Also like to writting ... I have my small side business of handcraft. I make moti (pearl) toran, rangoli, paper earrings, cotton bags, artificial jewellery etc.