मी आत्मनिर्भर (भाग-७)

Importance of self sufficiency.

मी आत्मनिर्भर (भाग-७)

© प्रतिक्षा माजगावकर

          मयुरी सकाळी सकाळीच खूप थकलेली जाणवत असते! अगदी व्यवस्थित तयारी करून आलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट पणे दिसत असतो! ती प्रसन्न आणि टवटवीत असल्यासारखं भासवत असली तरी डोळ्यांखालची काळी वर्तुळं, थोडासा पडलेला चेहरा आणि मधेच येणाऱ्या जांभया तिचा थकवा दर्शवत होते..... हे योगिताच्या नजरेतून सुटत नाही.....
योगिता:- मयुरी खरं सांग, सगळं तूच करून आली आहेस ना? घरी तुला कोणीही मदत नाही केली ना?
मयुरी:- हम्म!
योगिता:- अगं नुसतं हम्म काय? किती दमलेली दिसतेयेस तू..... अश्याने आजारी पडशील.....
मयुरी:- कळतंय ग मला! पण काय करू मी.... काल मी दोघांना खूप बोलून समजवायचा प्रयत्न केला पण, दोघं हि ऐकतील तर शप्पत! रमेश म्हणाले; तुला जर जमणार नसेल तर घरातच बस काहीही कुठे जायची गरज नाही... आता तूच सांग यावर मी काय बोलू..... जर एखाद्याला आपलं म्हणणं समजूनच घ्यायचं नसेल तर कितीही डोके फोड केली तरी मनस्ताप आपल्यालाच होणार..... म्हणून मी विषयच सोडून दिला!
योगिता:- थांब आपण करू काहीतरी.... हे त्या दोघांच्याच भल्याच आहे हे पटवून द्यावं लागेल त्यांना.....
काहीतरी विचार करत योगिता बोलून गेली..... बोलता बोलता त्या स्टेशन वर पोहोचल्या सुद्धा.... मयुरीची अवस्था निधी ला सुद्धा समजली पण, काम आणि इतर लोकांसमोर नको उगाच काही विचारायला म्हणून ती काही बोलली नाही.....
         सगळे तिथेच असलेल्या NGO च्या आधीच्या ऑफिस मध्ये जातात..... ते ऑफिस NGO ने सामान ठेवण्यासाठी किंवा काही विशेष काम करण्यासाठी रिकामे ठेवलेले असते..... इम्युनिटी बूस्टर चे औषध काल संध्याकाळच्या सुमारासच तिथे आलेले असते! आज फक्त ते लहान लहान बॉक्स मध्ये पॅक करायचे होते जेणेकरून एरिया नुसार वाटताना सोपं जाईल.....
सगळी सोय अगदी व्यवस्थित केलेली होती... आत जायच्या आधी प्रत्येकाने सॅनिटायझर लावायचा आणि मगच आत जायचं! चप्पल काढून ठेवायला बाहेरच स्टँड ठेवला होता... सोशल डिस्टनसिंग च सुद्धा पालन होईल याची काळजी घेतली होती..... तिथे गेल्यावर प्रत्येकाला ग्लोव्हज देण्यात आले.... काम करता करता प्रत्येक जण एकमेकांची ओळख करून घेत होतं! कोणी गृहिणी, कोणी शिपाई तर कोणी कॉलेज स्टुडंट होतं.... सगळ्यांचा फक्त एकच ध्यास होता, आपल्या देशाला आपली गरज आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण समाजसेवा करायचीच!
           ओळख झाल्यावर सगळे जण काल रेशन किट्स वाटताना आलेले अनुभव सांगत होते..... नंतर म्युसिक च्या तालावर सगळ्यांनी काम केलं! या सगळ्यात कधी दुपार झाली समजलंच नाही! निधी ने announce केलं; "चला आता सगळे जण एक एक करून हात धुवून या आणि डबे खाऊन घ्या.... अजून आपलं बरंच काम बाकी आहे..... उद्या आपल्याला ही औषधंच वाटायला जायचं आहे त्यामुळे आजच पॅकिंग संपवायचं आहे! आणि हो तुम्ही जिथे बसला आहात तिथेच बसायचं कोणीही डबे शेअर करायचे नाहीयेत.... आपल्याला सोशल डिस्टनसिंग पाळायचे आहे!" सगळेजण सुचनांचं तंतोतंत पालन करून जेवण करतात.... गप्पा गोष्टी करत सगळ्यांची जेवणं होतात..... आपण कुठे बाहेर आलो आहोत याची त्यांना जाणीव नसतेच! सगळे कसे एकाच कुटुंबातले आहेत असे आपुलकीने वागत होते......
*****************************
          दुसरीकडे योगिताच्या घरी सुद्धा यश आणि चिनू छान एकमेकांना मदत करत सगळं करत होते...... सकाळी योगिताने थोडी फार तयारी करून दिली होती..... यश ची आज नेमकी ११.३० वाजताच मीटिंग होती म्हणून मग पहिल्यांदा एकट्या चिन्मय ने दुपारच्या जेवणाची तयारी केली होती..... नाही म्हणलं तरी त्याची थोडी कसरतच झाली! पण, सगळं सावकाश का होईना त्यानं आवरलं! पोळी, बटाट्याची भाजी, भात आणि आमटी असा साधाच बेत होता.... यश ची मीटिंग संपता संपता एक वाजला...... तोवर चिन्मय ने सगळं केलं होतं..... दोघांनी मस्त पोट भर खाल्लं.....
यश:- छान जमलं हा चिनू तुला सगळं..... जा आता तू मी बाकी आवरतो.....
असं म्हणून तो स्वतः सगळं करायला लागला....
चिन्मय:- बाबा.... आपण आईला एकदा फोन करूया ना.... ती जेवली आहे का विचारुया...
यश:- नको काळजी करुस.... पण, ठीक आहे तुझ्या समाधानासाठी कर एकदा फोन....
चिन्मय योगिताला फोन लावतो.... बऱ्याच रिंग वाजल्यानंतर योगिता फोन उचलते; "हा बाळा बोल...."
चिन्मय:- आई तू जेवलीस का? आणि कधी येतेयस?
योगिता:- हो झालं माझं जेवण.... बाबांची मीटिंग झाली का? जेवलात का दोघं?
चिन्मय:- हो! आत्ताच.... पण, तुला किती वेळ लागेल अजून?
योगिता:- अजून काम आहे रे... माहित नाही किती वेळ लागेल.... तुम्ही दोघं काही काळजी करू नका..... येईन मी काम झालं की.....
चिन्मय:- ओके... तिथून निघालीस कि फोन कर.... बाय....
चिनू फोन ठेवतो आणि यश ला सांगतो; "बाबा आईलाच माहित नाहीये तिला किती वेळ लागेल ते.... मी तिला फोन करायला सांगितला आहे निघाल्यावर.... मग तिचा फोन आला की आपण संध्याकाळी आई साठी काहीतरी खायला करूया......"
यश:- हो..... चालेल....
**************************
          योगिता आता पुन्हा मन लावून काम करत असते..... चिन्मय चा फोन येऊन गेल्यामुळे तिला कसलीच काळजी नसते.... याउलट मयुरीची अवस्था असते..... तिच्या घरून साधा आम्ही जेवलो आहोत तू काळजी करू नकोस एवढं सांगायला सुद्धा फोन आलेला नसतो..... सकाळी तिला इथे यायचं होतं तरी लवकर उठून तिने सगळं केलं होतं.... याची काहीही जाणीव त्या दोघांना नसते..... संध्याकाळचे ४ वाजतात..... सगळं पॅकिंग च काम पूर्ण होतं.... सगळे जण आपापल्या घरी जायला निघतात..... शेवटी आता निधी, योगिता आणि मयुरी तिघीच राहतात.....
निधी:- मयुरी मॅडम, योगिता मॅडम जरा थांबता का मला तुमच्याशी बोलायचं आहे.....
मयुरी:- हा बोला ना....
निधी:- सकाळी तुम्ही आलात तेव्हाच मला जाणवलं, तुम्ही खूप दमलेल्या आहात.... काय झालं? तुमच्या मुलाने आणि मिस्टरांनी काम करायला नकार दिला ना?
मयुरी:- हम्म....
निधी:- मला योगिता मॅडम म्हणाल्या तुम्ही काही वर्ष आधी नर्स म्हणून काम केलं आहे...
मयुरी:- हो! पण, रमेश ना मी काम केलेलं आवडत नव्हतं म्हणून मी सोडलं.... आणि हे फक्त माझ्या काही जुन्या मित्र मैत्रिणी आणि योगितालाच माहित होतं!
निधी:- येस, राईट... आता आपण याचाच फायदा घ्यायचा.... आज तुम्ही तुमच्या घरी न जाता इथे जवळच माझ्या एका मैत्रिणीचं घर आहे तिथे जा... ती इथे राहत नाही आणि घरच्या चाव्या माझ्याकडेच आहेत! सगळी व्यवस्था मी स्वतः करते....आणि मी स्वतः तुमच्या मिस्टरांना कॉल करून सांगते की, आमच्या रेकॉर्डस् नुसार त्याच फक्त नर्स आहेत आणि सध्या एका हॉस्पिटल मध्ये emergency आली म्हणून त्यांना NGO तर्फे तिथे पाठवण्यात आलं आहे... किती दिवस लागतील सांगता येत नाही...
योगिता:- मयुरी मला निधी मॅडम च म्हणणं पटतंय.... तू नसलीस तरच त्यांना तुझी आणि स्वावलंबनाची किंमत कळेल....
मयुरी:- हो गं! पण, मला काळजी वाटतेय... तुला आमच्या ह्यांचा स्वभाव माहितेय ना किती तापट आहे.... काही वेगळंच झालं तर...
निधी:- नका काळजी करू... तुम्हाला आठवतंय जेव्हा आम्ही तुमच्या कडून फॉर्म भरून घेतले होते तेव्हा त्यात लिहिलेलं होतं; "आम्ही NGO जे काम सांगेल ते करायला तयार आहोत"... हाच फॉर्म मी त्यांना दाखवेन आणि हवंतर असं सांगते, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही... ते कोरोना हॉस्पिटल नाहीये.... या महामारी मुळे बाकी पेशंट कडे लक्ष द्यायला त्रास होतोय स्टाफ कमी पडतोय म्हणून तिथे त्यांना पाठवलं आहे....
मयुरी:- बरं... तुम्ही म्हणाल तसं!
        सगळं प्लॅन प्रमाणे होतं..... निधी मयुरीच्या समोरच तिच्या घरी फोन लावून बोलते.... आधी रमेश नाही नाही च करत असतो आणि रागाने फोन कट करून मयुरीच्या मोबाईल वर फोन करतो..... आणि तिला खूप बोलतो.... पण, यावेळी मयुरी अजिबात ऐकणार नसते... ती म्हणते; "इतकी वर्ष तुमच्या मनाप्रमाणे केलं ना मी सगळं! आता देशाला माझी गरज आहे.... थोड्या दिवसंचाच प्रश्न आहे...." तिचा निश्चय आणि ठाम पणे बोलण्यामुळे रमेश च काहीही चालत नाही.... निधी च्या प्लॅन चा पहिला टप्पा तर सफल होतो... आता निधी मयुरी ला घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घराकडे जाते.... आणि योगिताला उद्या येताना मयुरीची चार दिवसांची बॅग घेऊन यायला सांगते......
*****************************
योगिता निघते तेव्हा घरी कॉल करते.... ती घरी पोहोचल्यावर तिला छान सरप्राईज मिळतं; यश ने तिच्यासाठी कॉफी आणि उपमा केलेला असतो.... गरमा गरम उपमा आणि त्याच्यावर मस्त पैकी शेव आणि कोथिंबिरीने सजावट केलेली असते.... सगळे मिळून खाऊन घेतात... योगिता आज जे काही घडलं ते सगळं सांगते आणि चिन्मय ला म्हणते; "सूरज ला कॉल करून फक्त बॅग भरून ठेवायला सांग! उद्या सकाळी जाताना मी घेऊन जाईन.."
योगिताने सांगितल्या प्रमाणे चिनू करतो! सूरज सुद्धा जास्त काही न बोलता फक्त ओके बोलून फोन ठेवतो....
*****************************
मयुरीच्या घरी आज रमेश आणि सुरज ला काही सुचत च नसतं! दिवसभर दोघांनी खूप पसारा घालून ठेवलेला असतो शिवाय सकाळ पासूनची भांडी सुद्धा पडलेली असतात.... आता मयुरी चार दिवस काही येणार नाही म्हणून रमेश कोणी मोलकरीण मिळते का बघायला बरेच फोन करतो, पण या काळात आता आपल्यालाच सगळं करावं लागणार हे त्याला पाच फोन करून झाल्यावर जाणवतं! त्याला वाटतं हे काय हे सोपं काम आहे... जाऊदे आपण पटकन करूया.... पण, फक्त खोली आवरता आवरताच त्याच्या नाकी नऊ येतात आणि त्याला मयुरी किती राबायची हे दिसून येतं!
रमेश:- अरे सुरज तू पण कर कि मदत काय नुसता बसलायस.... रात्री जेवायचं आहे ना.... तुझ्या त्या मित्राला फोन करून विचार एखादी रेसिपी...
सुरज चिन्मय ला फोन लावतो..... पण, त्या दोघांना सुद्धा चिन्मय काय सांगत असतो हे कळत नाही..... पहिल्याच दिवशी दोघांची फुल हवा टाईट झालेली असते! शेवटी सुरज म्हणतो; "मी तुला उद्या व्हिडिओ कॉल करतो तेव्हा आम्हा दोघांना सगळं सांग... आत्ता आई ने घरात खाऊ करून ठेवला आहे तोच खाऊ आम्ही...." असं म्हणून फोन च ठेवतो.....
**************************
      चिन्मय योगिताला सगळा प्रकार सांगतो!
योगिता:- आता कळेल दोघांना आत्मनिर्भर का असावं ते..... तू उद्या सगळं नीट सांग हा दोघांना...
चिन्मय सुद्धा हसतो आणि हो आई म्हणतो... तिघं मिळून सगळी कामं करतात.... आणि शांत पणे झोपून जातात......
दुसरीकडे सूरज आणि रमेश मयुरी ने जो काही सुका खाऊ केलेला असतो तो खाऊन आणि दुपारचं राहिलेलं जेवण खाऊन तसेच पसाऱ्यात झोपतात.... दोघांनी मिळून फक्त कशी बशी भांडी घासलेली असतात आणि तेही अस्वच्छच!
मयुरीला सुद्धा काळजी पोटी नीट झोप लागत नसते पण यात त्या दोघांचंच भलं आहे असं मनाला पटवून देत ती सुद्धा झोपते.....
क्रमशः.....
****************************

आता सूरज आणि रमेश ला कामं जमतील का?त्या दोघांना सुद्धा आत्मनिर्भरतेचं महत्व पटेल का? आणि ते दोघं सुद्धा मयुरीला, योगिताच्या घरचे करतात तशी मदत करतील का? पाहूया पुढच्या भागात..... तोपर्यंत तुम्हाला हि कथा कशी वाटतेय हे नक्की सांगा.....

🎭 Series Post

View all