मी आहे तुमच्यासाठी.. भाग 4 अंतिम

सगळे छान गप्पा मारत बसले होते, दुसऱ्या दिवशी अनघा निघाली, नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यात अश्रू होते



मी आहे तुमच्यासाठी.. भाग 4 अंतिम 

©️®️शिल्पा सुतार
.........

जलद कथालेखन स्पर्धा
विषय.. माहेरवाशीण

बाबा समजावत होते, पहिल्यांदा आई विचार करत होत्या,.. "अहो नाही चालणार मला ते दोघ दूर गेले तर, मी नाही राहू शकत समीर शिवाय",

"मुला पेक्षा सुनेला जप मग",.. बाबा.

" पण वैदेहीच काम चुकत म्हणून चिडचिड होते माझी ",.. आई.

" तू खूप परफेक्ट आहे का? , मी सांगतो वैदेहीला काम राहू दे तूच करत जा सगळं, तिने तिच्या मनाने काम केलं तरच तिला तिच्या चुका समजतील, नंतर परफेक्ट होईल ना ती, यासाठी प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर तिचा अपमान करणे घालून पाडून बोलणे एकदम चुकीच आहे, तुझ्या अश्या वागण्याने वैदेही पण या घरात एकदम घाबरलेली असते, तिचा मूड नसतो त्यामुळे आपला मुलगा पण खुश नसतो, तुला समजत नाही का या गोष्टी ",.. बाबा.

लांबून अनघा हे सगळं ऐकत होती,.." आई बाबा बोलता आहेत ते एकदम बरोबर आहे, तुझी वागणूक एकदम चुकते आहे, तू माझी आई असली तरी सुद्धा मला हे पटत नाही, काय असं करतेस वैदेहीला, तु किती चांगली आहेस, तुझ प्रेम दे तिला, तुझ्या अनुभवाचा फायदा होवु दे तिला, किती लहान आहे ती, तूच तिला समजून घ्यायला पाहिजे, चुकी झाली तर समजून सांगायला पाहिजे, असा सासुरवास करू नको तिला, तू दुसऱ्यांना त्रास दिला तर तो त्रास तुझ्या मुलांना होईल",..

" बरोबर बोलते आहे तू यापुढे मी जरा समजून वागेल, वैदेहीला काही बोलणार नाही, तिला समजून घेईन",.. आई.

" नुसतं बोलून उपयोग नाही आई तुझ्या वागणूकीतुन पण ते दिसलं पाहिजे, आई तु गोड आहेस छान आहे, मला तु खुप आवडते, अस प्रेम तुझ्या बाबतीत वैदेहीला वाटलं पाहिजे, तिने तुम्हाला सोडून जायचा विचार सुद्धा करायला नको इतकं व्यवस्थित वागायला पाहिजे तु आणि घर काम स्वयंपाक या दुय्यम गोष्टी आहेत जरा तिच्याकडे एक माणूस म्हणून बघ, दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आली आहे म्हणून कसही वागून चालत नाही, तीच उपयोगाला येणार आहे तुला",.. अनघा.

" बरोबर बोलते आहेस तू मी लक्ष्यात ठेवेन अनघा, पण जावईबापू पण किती चिडले आहे तुझ्यावर, त्याचं काय करायचं",.. आई.

" नाही चिडले आहे परेश माझ्यावर, आमचं व्यवस्थित सुरू आहे, तु हे असं वागते आहे ते मला समीरने बऱ्याच वेळा सांगितलं, त्यालाही पटत नाही आहे हे, तुला तुझ्या चुकीची जाणीव व्हावी, मुलीला त्रास झाला की कस वाटत हे कळव म्हणून मी परेशला तुझा फोन आल्यावर वाकडं तिकडं बोलायला सांगितलं, कस वाटल तुला परेश असे बोलले तर ",.. अनघा.

" नाही आवडल ",.. आई.

" हो ना, तु अस दिवस रात्र वैदेहीला बोलत असते, कस वाटत असेल तिला, तिच्या घरच्यांना, विचार कर ",.. अनघा.

" चुक झाली माझी ",.. आई.

समीर आला तेवढ्यात बाहेरून,.." काय चाललं आहे हे? ",

"काही नाही आम्ही सगळे छान बोलत बसलो आहे",.. अनघा.

तो पण सगळ्यांमध्ये येऊन बसला तो डोळ्यांनी विचारत होता काय झालं अनघा?

तिने सांगितल मी बोलली ठीक आहे आईशी आता सगळं व्यवस्थित आहे आणि खरोखर त्या दिवसानंतर आईची वागणूक जरा सॉफ्ट झाली वैदेही बाबतीत, काही चुकलं तर त्या शांतपणे समजून सांगायच्या नाहीतर स्वतः करायला घ्यायच्या, दोघींनी मिळून केलेला काम पटकन व्हायचं आणि त्यांचा अनुभव मधून वैदेही आणि अनघालाही भरपूर शिकायला मिळालं.

सात आठ दिवसांनी परेश गावाला आले, आल्या आल्या त्यांनी आईची माफी मागितली,.. "माझं चुकलं मी तुमच्याशी उलट सुलट बोललो, माझ्या मनात अस काही नाही ",

" माझी चूक मला समजली आहे तुमच्या वागण्यामुळे, तुमचं काही चुकलं नाही परेश राव",.. आई.

परेश अनघाकडे बघत होते, तूच खरी माहेरवाशिण आहे, जीला नुसता आराम करायला किंवा काही घ्यायला माहेरी यायचं नाही तर तिथल्या सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि नीट व्हायला हव्या हे समजतं, काही लागलं तर माहेरी मदत करायला ती तयार असते, तिकडची ही परिस्थिती सुखी आणि आनंदी बनवता येते तिला,

अनघा आता खुश होती, माहेरी छान वातावरण झालं होतं पूर्वीसारखं, आई मधला बदल छान झाला होता, चांगल वाटतं होत, समीर आणि वैदेही खूप खुश होते.

"आम्ही उद्या निघतो आता घरी जायला, बरेच दिवस राहिलो इकडे",.. अनघा.

सगळे टेरेसवर बसून आईस्क्रीम खात होते, समीर आणि वैदेही अनघाच्या आजूबाजूलाच होते,.. "ताई खूप खूप थँक्यू तुमच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम नीट झाला, आम्हाला आईंना काही बोलायचं नव्हतं बरं झालं तुम्ही आल्या आणि सगळं नीट केलं ते",

" सगळं ठीक आहे आता काळजी करायची नाही, तुम्ही दोघ आमच्याकडे या आपण छान तिकडनं ट्रीप ला जाऊ मस्त",.. अनघा.

सगळे छान गप्पा मारत बसले होते, दुसऱ्या दिवशी अनघा निघाली, नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यात अश्रू होते, आई तिच्या मागे मागेच होती, कारमध्ये बसल्यावर नंतर सुद्धा आईचा हात तिच्या हातात होता,.." आई येते ग मी, काही कमी जास्त बोलली असेल तर माफ कर",

" नाही ग बाळा उलट तू मला छान सल्ला दिला, मी तू म्हणते तस करेल, इकडची काळजी करू नकोस, सुखी रहा, परेश राव या परत",.. आई

चौघ निघाले.

"आई दरवेळी आजी कडून निघताना रडायलाच पाहिजे का?",.. मुलं विचारात होते.

अनघा डोळे पुसत हसत होती, परेश तिच्या कडे लक्ष देवून होते, तुमचे लग्न झाले की समजेल तुम्हाला मुलांनो, दूर जाईपर्यंत ती आईच्या घराकडे बघत होती.

🎭 Series Post

View all