मी आहे तुमच्यासाठी.. भाग 1

आपल्या घरी मला त्रास होता तेव्हा कसं वाटत होतं, तू माझी साथ दिली, आपण सेपरेट रहायला आलो, आता किती खुश आहे मी,मी आहे तुमच्यासाठी.. भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.........

जलद कथालेखन स्पर्धा
विषय माहेरवाशीण

दर वर्षी वार्षिक परीक्षा संपल्यावर आईकडे जायची खूप उत्सुकता असायची अनघाला. या वर्षी शांतता होती घरात,

मुलांनी दोन-तीनदा विचारल,.. "आई कधी जायचं आजीकडे?",.

अनघा काही म्हटली नाही.

परेशने दोन तिनदा विचारल,.. "काय झालं या वर्षी काही तुझा हट्ट नाही, गावाला जायच की नाही, चक्क तु माहेरी जात नाहीस म्हणजे काय?, खरेदी नाही, आवरण नाही या वर्षी? काय झालं?" ,

" तुला कंटाळा आला आहे का परेश मी इथे आहे तर",.. अनघा

" नाही कशाला कंटाळा येईल अनघा, मी काही म्हटलो का तुला, उगाच तू माझ्यावर चिडचिड करू नको, मला अस वाटत होतं की लवकर जाऊन लवकर या गावाहून म्हणजे मग नंतर इकडे पुढची शाळेची तयारी असते, वह्य़ा पुस्तक घ्यायचे असतात, ट्युशन क्लास लावायचे असतात मुलांना बरेच काम असतात, आता तू इथे राहशील आणि शाळा भरायच्या वेळी गावाला जाशील तर धावपळ होईल म्हणून म्हटलं मी, नसेल जायचं तुला तर माझा काही आग्रह नाही मला तर उलट छान आहे, बायको कुठे जायला नाही म्हणते म्हणजे खूपच प्रेम दिसत आहे तुझं माझ्यावर ",.. परेश त्याचा त्याचा जोरजोरात हसत होता.

अनघा शांत होती,

परेश ही गप्प बसला, नक्की काहीतरी झाल आहे? तो तिच्या जवळ येवून बसला,

" काही जायच नाही मला आईकडे परेश ",.. अनघा.

" काय झालं? कोणी काही बोललं का तुला? ",.. परेश.

"कोणी कशाला काही बोलणार आहे मला",.. अनघा.

"मग काय प्रोब्लेम आहे",.. परेश.

समीरचं नवीनच लग्न झालेल आहे.

"म्हणजे आता वहिनी आल्यामुळे फरक पडला का तिकडे, इतके वर्ष त्याच लग्न नव्हतं झालं तेव्हा तू आनंदात माहेरी जात होती. नवीन वहिनीशी जमत नाही का तुझ? ",.. परेश

" तू जरा थांबणार आहे का परेश, मला बोलू तर दे ",.. अनघा

" आई सदोदित वैदेही वहिनीशी भांडत असते , तिला बोलत असते, मला नाही आवडत अस, कंटाळा येतो, खूप निगेटिव्ह वातावरण असत तिकडे, फोनवरही आई वहिनी बद्दल सांगत राहते, चांगली आहे वैदेही काहीही प्रॉब्लेम नाही तिचा, आई का असं करते ते समजत नाही ",.. अनघा.

" अगं मग तू समजावुन सांग ना त्यांना ",.. परेश.

" झालं समजावुन बऱ्याच वेळा, मी आणि समीरने सुद्धा समजावून सांगितलं, कीती वेळा फोन केला, तरी आई वैदेहीशी वाकड्यात शिरते, मला कंटाळा आला आहे, कसं तरी वाटतं वैदेही कडे बघून, शांत आहे ती, कधी उलट बोलत नाही, सहन करते सगळ, समीर ही कंटाळला आहे आता आईच्या वागण्याला" ,.. अनघा.

"हो बरोबर आहे",.. परेश.

" आपल्या घरी मला त्रास होता तेव्हा कसं वाटत होतं, तू माझी साथ दिली, आपण सेपरेट रहायला आलो, आता किती खुश आहे मी, तसं वैदेहीच आयुष्य का नाही? ती माझी वहिनी असली तरी मला असं वाटतं की तिलाही खुश रहायचं अधिकार आहे, आई चुकते आहे ",.. अनघा.

"काय करू शकतो आपण तिच्यासाठी, तू गावाला न जाऊन वगैरे काही उपयोग होणार नाही, वर्षांनुवर्षे तेच चालू राहील त्यांचं, त्यापेक्षा या सुट्टीत तू तिकडे जा तिला मदत कर, आईंना समजावून सांग",.. परेश.

" ठीक आहे मी गावी जाते आणि तिकडे आईला सांगते की तू माझ्याशी रोज भांडतो आणि मला इथे रागाने पाठवून दिल आहे, आता हल्ली तुझ्या घरच्यांच ऐकुन तु मला खुप त्रास देतो",.. अनघा.

परेश आश्चर्याने तिच्याकडे बघत होता.

" सॉरी परेश असं सांगू का मी? मला बघायचं आहे आई काय म्हणते ते, मला सासरी त्रास होतो तर बघु कस वाटत आईला , यातुन तीला तिची चुक समजली तर बर आहे ",.. अनघा.

"चालेल काही हरकत नाही पण सगळं नीट झाल्यावर सांग की मी चांगला आहे, नाहीतर मला त्या कधीच तिकडे येऊ देणार नाहीत आणि माझा सासुरवास सुरू व्हायचा",.. परेश त्याचा त्याचा जोरात हसत होता.

अनघा विचार करत होती की असंच करावं नक्की, तिने त्यासाठी समीरला फोन लावला,

"बोल ताई कधी येते आहे? येऊ का मी घ्यायला ",.. समीर.

"नको येऊ गाडी आणि ड्रायव्हर पाठवून दे, मी येते आहे, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, आई आणि वैदेही बद्दल" ,.. अनघा.

"हो त्या दोघींचं दोन मिनिटं सुद्धा पटत नाही, म्हणजे आई बोलते अर्थात वैदेहीला, ती काही बोलत नाही",.. समीर.

" तेच तर आपण हे नीट करायचं काय या सुट्टीत ",.. अनघा.

" काय प्लॅन आहे? ",.. समीर.

अनघा समीरला सांगत होती सगळ,.." अस करु या का? ",

" ठीक आहे तू ये घरी मग बघू आपण",.. समीर.

अनघा तिच्या दोन मुलांना घेऊन माहेरी पोहोचली, आई बाबा खूप खुश होते, सकाळीच फोन केल्यामुळे वैदेहीने छान स्वयंपाक करून ठेवला होता, सगळे जेवायला बसले, अनघा व्यवस्थित जेवत नव्हती,

"काय झालं ग अनघा ग तुझा चेहरा असा उतरल्या सारखा दिसतो आहे ",.. आई.

" काही नाही आई",.. अनघा.

"काय झालं आहे अनघा ताई",.. वैदेही पण विचारत होती.

🎭 Series Post

View all