Feb 24, 2024
ऐतिहासिक

महाराज

Read Later
महाराज
महाराज. मुजरा.

पत्रास कारण की...

आज इतक्या वर्षांनी तुमच्याशी बोलण्याच धाडस करतोय या चुकीसाठी तुम्ही जी शिक्षा द्याल ती आजही शिरसावंध्य.. तुम्ही अचानक रित्या आमच्याशी अबोला धरलात तो कायमचा ...महाराज खरं तर जो येणार तो एक ना एक दिवस नक्की जाणार हे या दैवताच चक्रचं.. पण महाराज दैवताचं चक्र देवतालाचं कस काय लागू झालं..? हा आज पर्यंत मला पडलेला गूढ प्रश्न.. त्याच उत्तर मी आजही या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात शोधतोय.. तुम्ही डोळे मिटून घेतले आणि आम्हाला हे स्वराज्य घडतांना पाहण्यासाठी डोळे देऊन गेलात... पण महाराज तुम्ही असतांना आमचा जो मान सन्मान होता.. तुम्ही असतांना जो आमच्यात लढाऊ बाणा होता.. आम्हांला यशाची उंची आणि स्वर्गाची जागा होती ती आज कुठे तरी • ढासळत चाललीये.. तुम्ही आयुष्य वेचून बांधलेल्या आणि दिवसागणिक थोडा थोडा ढासळणाऱ्या बुरुजसारखी.. तुमचा अभेद्य पणा दिवखाव्यापुरता राहिला आणि आम्हांला मिरवण्यापूरत मर्यादित ठेवलं. आजही बदलत चाललेल्या मावळ्यांचा पूर तुमच्या चरणी लोटांगण घालण्यासाठी येतो पण त्यातला नक्की खरा कोणता आणि बरा कोणता हे आज ओळखणं कठीण झालं आहे.. असो या विषयावर मी पुन्हा तुमच्याशी बोलेनचं.
महाराज कोणाच्या वाट्याला तुम्ही किती आलात याची गणित मी मांडणार नाही.. पण वाट्याला येण्याच्या बाबतीत माझ्या पेक्ष्या राजगड थोडा सरस ठरला या बद्दल मनात कुठे तरी शल्य राहत.. पण माझ्या वाट्याला जे काही तुम्ही आलात तो क्षण आणि ते आयुष्य मी पुरत जगुन घेतलं.. राजगडावर तुम्ही स्वराज्याची आखणी करतांना विश्राम घेतलात आणि माझं भाग्य की दुर्भाग्य माझ्या जवळ... माझ्या कुशीत ...माझ्या मांडीवर तुम्ही कायमचं आरामासाठी डोकं टेकवलंत आणि मला स्वर्गाउपरी स्थान
नादात 'गारद' ऐकण्याची.
अजून खूप वाट पाहायला लावू नका महाराज...
मिळवून दिलंत... "खरं तर तुम्ही फक्त देहाने गेलात.." आणि आम्हांला पोरकं नाही तर जगण्यासाठी- लढण्यासाठी पक्कं करून गेलात.. महाराज तुमच्याकडून वचन घेण्याइतका मी मोठा नाही पण तरीही तुमच्या चरणांकडे पाहत एक मागणं मागतो पुन्हा जेव्हा कधीही तुम्ही . जन्म घ्याल तेव्हा याच सह्याद्रीच्या दगड धोंड्यांमध्ये याल आणि आमच्या आयुष्याचं सोनं कराल....कराल ना महाराज ..? आणि हो अजून एक... वाट पाहतोय तुम्ही सदरेत चालत येण्याची... ढोल-नगाडे - तुतारीच्या आसमंतात घुमणाऱ्या

तुमचाच. रायगड...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vivek Devale

//