म्हणून जग फसतं! -16
©®राधिका कुलकर्णी.
©®राधिका कुलकर्णी.
रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होती माला. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी रोजच्या वेळी जाग आली आणि उठताक्षणी तिने रघुपतीला फोन लावला.
रघुपतीने फोन उचलला.
“ हॅलो गुड मॉर्निंग आज्जी! एवढ्या सकाळी फोन? सगळे ठीक ना!”
माला वैतागूनच म्हणाली, “ अरे बाळा, तू रात्री फोन करणार होतास ना मलाऽ, शऱ्याच्या तब्येतीबद्दल, पण तू केलाच नाहीस फोन. मी किती काळजीत होते इकडे, आणि वर तू मलाच विचारतोय सगळे ठीक ना.. काय हा वेंधळेपणा तुझा!”
“ अहो आज्जी, सॉरी.. खरच सॉरी. काये नाऽऽ, काल सोसायटी ऑफीसात सगळ्या टूरच्या खर्चाचा हिशोब करणे चालू होते. खूप उशीर झाला त्यातच. मग एवढ्या रात्री कशाला कॉल करून डिस्टर्ब करा म्हणून फोन केला नाही. पुन्हा एकदा सॉरी !”
“अरे सॉरी ऐकायला फोन केलाय का मी? मला शरद कसाय आता ते सांग!.....
हॅलो… हॅलोऽऽऽऽ !
.
.
.
.
.
अरे आवाज येतोय का? ”
हॅलो… हॅलोऽऽऽऽ !
.
.
.
.
.
अरे आवाज येतोय का? ”
पलिकडून अचानक फोन कट झाला.
कालपासून असेच काहीसे घडत होते आणि संवाद मात्र राहून जात होता. रघुपतीचा फोन नंतर कितीही लावला तरी लागेचना. काय करावे तिला काहीच सुचेना. शेवटी डोक्यात एक विचार आला तसे ती झटकन अंथरूणातून उठून बाहेर आली.
तोंड धुवून सकाळचे आटोपून पायात चपला सरकवून ती बिल्डींगच्या खाली आली. एक नंबर फिरवला आणि तो उचलण्याची वाट पाहू लागली. सकाळचे फारतर सात सव्वा सात वाजले असतील. इतक्या सकाळी माला आज्जींचा फोन पाहून सिनू उर्फ श्रीनिवास गडबडला. त्याने घाईनेच फोन उचलला.

“ हॅलो आज्जी, इतक्या सकाळी फोन, सर्व काही ठीक आहे ना. मोठ्या आज्जी बऱ्याएत नाऽऽ! ”
सिनूने काळजीने चौकशी केली.
सिनूने काळजीने चौकशी केली.
“ तू कुठेस आत्ता? असशील तसा पाचव्या मिनिटाला बिल्डिंगखाली ये. मी तुझी वाट पाहतेय.”
“काय झालेय आज्जी, काही सिरीयस आहे का?”
“ तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आधी तू खाली ये लवकर.”
तोंडावर पाणी मारून श्रीनिवास कसाबसा आवरून धावतच लिफ्टजवळ गेला. असे काय एवढे अर्जंट काम असेल आज्जींचे? विचार करतच तो खाली आला.
तोंडावर पाणी मारून श्रीनिवास कसाबसा आवरून धावतच लिफ्टजवळ गेला. असे काय एवढे अर्जंट काम असेल आज्जींचे? विचार करतच तो खाली आला.
“ काय झाले आज्जी, इतक्या तातडीने बोलावून घेतलेत? ”
“ तुझी गाडी आहे नाऽऽ? ”
सिनूच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देता मालाने त्याला प्रतिप्रश्न केला.
सिनूच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देता मालाने त्याला प्रतिप्रश्न केला.
“ हो आहे की. काही काम आहे का, कुठे जायचेय का तुम्हाला अर्जटली?”
सिनूने पुन्हा प्रश्न केले. त्याला मालाच्या कुठल्याच कृतीचा अर्थ लागत नव्हता.
“ मग पटकन गाडी काढ, आपल्याला एक ठिकाणी जायचेय. ”
मालाने जवळजवळ ऑर्डरच सोडली त्याला. तो बिचारा असंमजसमध्ये फक्त मालाच्या ऑर्डर फॉलो करत आपली बाईक काढून मालासमोर येऊन थांबला. माला त्याच्या मागच्या सीटवर बसून म्हणाली, “आपल्याला "ए" विंगला जायचेय. ”
गाडी स्टार्ट करतच त्याने माहितीदाखल प्रश्न केला.,
“ ए विंग मध्ये कुणाकडे जायचेय आज्जी? ”
“ शऱ्याकडे जायचेय मला. ”
शऱ्याचे नाव ऐकताच सिनूने गाडी करकचून ब्रेक लावत थांबवली.
“ अरे मध्येच गाडी का थांबवली? काय झाले? ”
“ काय म्हणालात आज्जी, कुणाकडे जायचेय तुम्हाला? ”
“ अरे असे नवीन नाव ऐकल्यागत काय करतोएस, तुमच्या एस व्ही च्या घरी घेऊन चल मला. ”
“ अरे असे नवीन नाव ऐकल्यागत काय करतोएस, तुमच्या एस व्ही च्या घरी घेऊन चल मला. ”
त्यावर सिनू चूप. ना तो गाडी स्टार्ट करतोय ना मालाला कुठे घेऊन जात आहे. त्याच्या वागण्याने मालाही बुचकळ्यात पडली.
“ हा असा काय अचानक गप्प झाला? ”
“ अरे एऽ चल ना. मला शऱ्याला भेटायचेय. इथे काय थांबलाएस ?”
“आज्जी आपल्याला एसव्ही च्या घरी नाही जाता येणार.”
“ पण काऽऽ? ”
“ कारण तो घरी नाहीये.”
“ घरी नाहीये!! मग कुठे आहे? ”
आता मालाचा स्वर किंचित गंभीर झाला होता.
“ आज्जी एसव्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे कालपासून.”
“ अरे देवाऽ! पण रघुपती तर म्हणाला की तो घरी आराम करतोय. कालपासून कितीदा फोन केले, दरवेळी त्याने हेच सांगितले. नेमके झालेय तरी काय त्याला. कोणी मला कळू देणार आहे की नाही? ”
“ आज्जी काळजी करण्यासारखे काहीच नाहीये. तो बरा आहे पण ते हॉस्पीटल अगदी त्याच्या घरच्यासारखे असल्याने डॉक्टरांनी त्याला तिकडेच ठेऊन घेतले. आज मिळेल डिस्चार्ज बहुतेक. तुम्ही काळजी करू नका इतकी... तो ठीक आहे एकदम. ”
“ अरे तो बराय तर एकाही मेसेजला उत्तर का देत नाहीये कालपासून? ते काही नाही, आता मला सत्य कळलेच पाहिजे. खूप झाला लपाछपीचा खेळ. आता मला त्याला ह्या ह्या डोळ्यांनी धडधाकट बघितल्याखेरीज चैन पडणार नाही. तू गाडी त्या वरदला ने पाहू. ”
माला अगदी हट्टालाच पेटली जणू. सिनूला काय करावे कळेना. बरं तिच्यासमोर कुणाला फोन करायची पण चोरी. नाईलाजाने त्याने गाडी वरद हॉस्पिटलकडे वळवली तर खरी पण तो मालाला बोललाच
“ आज्जी तुम्ही आग्रह करताय म्हणून मी नेतोय पण एसव्हीला हे मुळीच आवडणार नाही की कोणी त्याला हॉस्पिटलला भेटायला यावे. त्याने तशी सक्त ताकीद दिली होती की कुणालाही तो हॉस्पिटलमध्ये आहे हे कळू नये. पण तुम्ही पार पिच्छाच पुरवलात. म्हणून नाईलाजाने सांगावे लागले. आता प्लीज तिकडे तरी त्याला भेटायला आल्या हे कळू देऊ नका. ”
“ अरे पण इतकं काय आहे ह्यात लपवून ठेवण्याजोगे? माणसं काय कधी आजारी पडत नाहीत का? उलट चार लोक भेटायला आले की पेशंटला बरं वाटतं. पण इकडे तर सगळी उलटीच गंगा वाहतेय. असोऽऽ, एकदा फक्त त्याला बघते म्हणजे मनावरचे दडपण जाईल माझे. कालपासून झोप नाही त्याचा विचार करकरून. निदान तो नीट आहे हे दिसले की मनाचे समाधान तरी होईल माझ्या. ”
“ चला उतरा आज्जी. आले हॉस्पीटल. आणि मी जे सांगितले ते लक्षात ठेवा हं. तिकडे हॉस्पिटलमध्येसुद्धा सिनियर सिटीझन्सना परवानगी नाही तरी तुम्ही आल्या आहात..जर डॉक्टर नाही म्हणाले तर मग परत घरी जायची तयारी ठेवून चला. ”
सिनूने सर्वतोपरी मालाच्या मनाची तयारी केली. पण मालाने त्याच्या सर्व सुचना फाट्यावर मारत म्हणाली,
“ तू चल रेऽऽ. बघू मला कोण अडवतेय ते. आणि तिथल्या गोळे बाई माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत. त्यांच्याकडून मिळवेन मी परवानगी. तू नको जास्त टेन्शन घेऊ. मला वर घेऊन चल फक्त. ”
हॉस्पिटलच्या पायऱ्या चढून दोघेही वर गेले. रिसेप्शन एरीयामध्ये समोरच रघुपती उभा. दोघांची एकमेकांशी नजरानजर झाली तसा मालाला तिकडे बघून रघुपती सटपटला. मालाने त्याच्यावर आपली विखारी नजर टाकली तसे रघुपतीने मान खाली घातली पण त्याचवेळी सिनूकडे त्याने त्याच खाऊ की गिळू नजरेने ताडले. *कुणालाही हॉस्पिटलमध्ये येऊ द्यायचे नाही हे ठरलेले असुनही ह्या म्हातारीला का इकडे घेऊन आला?* असा त्या नजरेचा अर्थ होता. सिनूला तो अर्थ कळूनही त्याने तिकडे दुर्लक्ष करून मालाला एका चेअरवर बसवले.
“आज्जी तुम्ही इथे बसा. मी व्हिजिटींग अवर्स कधी सुरू होतात ते विचारून येतो. ”
सिनू काउंटरवर चौकशीला गेला असता रघुपतीही त्याच्या मागोमाग तिकडे गेला.
दोघे एकमेकांशी हातवारे करून काहीतरी बोलत होते. बहुतेक मालाला इथे का आणले ह्याचा जाब विचारायला तो सिनूला प्रश्न करत असावा. सिनूही तावातावात हातवारे करून बोलताना दिसत होता. दोघांच्याही मुद्रा गंभीर होत्या त्यावरून दोघेही मालाच्या येण्यामूळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाविषयी चर्चा करत असावेत हे नक्की होते. पण सगळे जाणवत असुनही आपल्याला काहीच समजत नाहीये असा दिखावा करत माला तिथेच बसून राहिली.
शेवटी दोघेही एकमेकांना गळ्यात गळे घालून पाठ थपथपून हसून विलग झालेले मालाने बघितले.
सिनू झपझप पावले टाकत मालाकडे येत उत्तरला,

“ आज्जी व्हिजिटींग अवर्स अजून सुरू झाले नाहीएत. आपल्याला एक तर वाट पहावी लागेल किंवा मग आत्ता तुम्ही घरी जा. भेटायची वेळ झाली की मी स्वतः येऊन तुम्हाला घेऊन जाईल. ”
“ अरे पण तिथे तर स्वच्छ शब्दात लिहीलेय ना,
पेशंटना भेटीची वेळ सकाळी 8 ते 11 आणि रात्री 4ते 8. मग आता भेटू शकतो आपण. ”
पेशंटना भेटीची वेळ सकाळी 8 ते 11 आणि रात्री 4ते 8. मग आता भेटू शकतो आपण. ”
मालाच्या वाक्यावर सिनू गपगार झाला. त्याच्या लक्षातच आले नाही की मालाची चाणाक्ष नजर हे आधीच नोंद करेल ते. कसेतरी तिला इकडून कटवण्यासाठी त्याने थाप मारली होती पण आता ती ही उघडी पडली होती. त्याने स्वतःला सावरत लगेच म्हणाला,
“ अहो आज्जी, त्या नॉर्मल पेशंटना भेटण्याच्या वेळा आहेत. एसव्ही व्हिआयपी पेशंट आहे ना, त्यामुळे त्याला हे रूल लागत नाहीत. ”
“ अहो आज्जी, त्या नॉर्मल पेशंटना भेटण्याच्या वेळा आहेत. एसव्ही व्हिआयपी पेशंट आहे ना, त्यामुळे त्याला हे रूल लागत नाहीत. ”
सिनूने कशीबशी बाजू सावरली. पण मालाही काही कमी नव्हती. इतक्या लांब हॉस्पिटलपर्यंत आलोय तर शऱ्याला भेटल्याशिवाय परत जायचे नाही हे ठरवूनच ती आली होती.
“ व्हिआयपी म्हणजे अशा कोणत्या वॉर्डमधे ठेवलेय बघू तरी दे. कसा असतो व्हिआयपी वॉर्ड!! ”
“ अहो, व्हिआयपी म्हणजे आयसीसीयू वॉर्डमध्ये आहे आपला एसव्ही. तिकडे त्याला कुणालाही भेटायला परवानगी नाही. तुम्ही खूप हट्ट केला म्हणून मी इकडे घेऊन आलोय तुम्हाला पण डॉक्टरांनी निक्षून सांगितलेय कुणालाही त्याला भेटायला परवानगी नाही आणि सिनियर लोकांना तर नाहीच नाही. ”
“ काऽऽय !! आयसीयू? एवढे झालेय तरी काय शऱ्याला?? तुम्ही हळूहळू एक एक गोष्ट सांगताहात.. नेमके काय झालेय तेही सांगत नाही आहात. ते काही नाही, मी आता तुमचे कुणाचे काही ऐकणार नाहीये. शऱ्याला भेटल्याशिवाय मी इकडून कुठेही हलणार नाही. सरका बाजूला व्हा.जाऊद्या मला आयसीयू वॉर्डकडे..”
“ नाही आज्जी ,प्लीज असे काही करू नका. एसव्हीला आवडणार नाही अशा अवस्थेत त्याला कोणी बघितलेलं. आणि डॉक्टरांची पण परवानगी नाही. प्लीज ऐका.”
माला आणि सिनूमध्ये शाब्दिक चकमक चाललेली.
इतकं झालेय तरी काय!
हे लोक आपल्यापासून नेमके काय लपवताहेत??
हे लोक आपल्यापासून नेमके काय लपवताहेत??
मालाच्या मनात प्रश्नांनी थैमान घालायला सुरुवात केली.
—-------------------------------------------------------
क्रमशः - 16
—-------------------------------------------------------
क्रमशः - 16
सिनू आणि रघुपती नेमके काय लपवताहेत मालापासून?
ते मालाला का भेटू देत नाहीयेत शऱ्याला??
ह्या सगळ्या प्रश्नांची उकल शोधायला पुढील भाग नक्की वाचा.
हा भाग कसा वाटला हे लाईक कमेंटद्वारे नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.
ते मालाला का भेटू देत नाहीयेत शऱ्याला??
ह्या सगळ्या प्रश्नांची उकल शोधायला पुढील भाग नक्की वाचा.
हा भाग कसा वाटला हे लाईक कमेंटद्वारे नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा