©®राधिका कुलकर्णी.
“ ते रंग्या म्हणणं काही मला फार प्रशस्त वाटत नाही बूवा, मी तुला रंगू म्हणू का? ”
“ अगं आईऽऽ गं !
कसलं गोऽऽड गं ते!
असं वाटतंय कानात कोणीतरी मिश्री घोळलीय.
नकोऽऽ गं नकोऽऽ..! कृपा कर, हवं तर पाया पडतो तुझ्या पण ह्या गरीबावर हे असले घातकी अत्याचार नको करूस गंऽऽ.
मला ना सहन नाही होणार. हार्ट ॲटॅक येईल.
आणि तुझ्या तोंडून ते रंगूऽऽऽ इतकं गोऽऽऽड, मधाळ आहे की कानाला मुंग्या लागतील. त्यापेक्षा तू सरळ सरळ *रंगराव* च म्हण. ते परवडेल मला. ”

“ मग नक्की नाऽऽ, रंगराव चालेल नाऽऽ? ”
“ होऽऽऽ चालेल नाही धावेल. पण आता मुद्द्यावर ये. ”
पुन्हा एक गंभीर शांतता. यमूनाने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि बोलू लागली…
रंगराव, आता मी जे सांगतेय ते१०१ टक्के खरं बोलणार आहे.
जेव्हा मी कॉलेजात होते तेव्हा तुम्ही सर्वच मुलींची कट्ट्यावर बसून छेड काढायचे. प्रत्येकीच्या दिसण्यावरून त्यांच्या चिडा पाडायच्या. मला माहित होते की माझी पण तुम्ही चीड पाडलीय ते. मला तर तुमची खूप म्हणजे खूपच भीती वाटायची. त्यामुळे सतत मी कुणाला न कुणाला चिकटून कळपात रहायची. भलेही मला त्या जवळची मानू नको देत पण मी त्यांच्या सोबती सोबतीने रहायचे. मुद्दाम असा कळकट, मेणचट अवतार करून वावरायचे म्हणजे कुणाची माझ्यावर वाईट नजर पडूच नये. कारण तुम्ही नेहमी सुंदर आणि फॅशनेबल राहणाऱ्या मुलींनाच जास्त त्रास देत असत. तुमच्या गूंडगिरीला घाबरून कोणीच तुमची तक्रार करत नसत. मी एकदा प्रयत्न केला पण तितक्यात सरांशी तुमचाच एक टवाळ मित्र हसून गप्पा मारताना पाहून पुन्हा मागे फिरले. कसं बसं कॉलेज संपलं आणि लगेच एम्प्लॉयमेंट मधून ह्या नोकरीचा कॉल आला. लगेच जॉईन झाले. मी नोकरीला लागले आणि वर्षाने आई गेली. मग घरचं सगळं आवरून ऑफीस संभाळणे, बाबांचं मन संभाळणे अशा गोष्टी चालू होत्या. आणि मधल्या काळात स्थळं खूप आली पण मी खूप साधी राहते त्यात हूंड्याची मागणी आम्ही पूरी करू शकत नाही म्हणून माझं लग्न लांबत चालले होते. बाबा वरवर काही बोलत नसले तरी ते आतून माझ्या काळजीने पोखरून निघत होते.
आणि अचानक एक दिवस तुझ्या वडिलांचा बाबांना फोन आला. त्यांनी त्यांच्या शब्दाची मित्राला आठवण करून दिली आणि इतके दिवस हा प्रस्ताव का आणला नाही त्याचे खरे कारणही बाबांना सांगितले. ह्या उपरही तू मुलगी द्यायला तयार असलास तरच मी मुलाला दाखवायला घेऊन येतो. मला फक्त मुलगी आणि नारळ दे. बाकी देव कृपेने माझ्याकडे सगळे काही आहे.
तुझ्या वडिलांनी सांगितले ते सगळे बाबांनी मला सांगितले. ते सांगत असतानाचा त्यांचा प्रफुल्लित चेहरा बघून मी ठरवून टाकले ह्या स्थळाला हो म्हणायचे. कारण त्या होकारात बाबांचा आनंद दडलेला होता. नाहीतरी कोणीतरी म्हणलेलेच आहे लग्न म्हणजे एक जूगार आहे. आणि मी तो खेळायचा ठरवला. आपल्या नशिबात जर चांगले घडणे लिहीलेले असेल तर सगळे ठीक होईल आणि नाहीच पटले आपले तरी मी बाबांसाठी तरी संसार नेटाने करायचा हे ठरवले होते. मला सरकारी नोकरी आहे ही पण माझी जमेची बाजू होतीच. उद्या काही झाले तरी मला तुमच्यापूढे पैशांसाठी हात पसरावे लागणार नव्हते. मी खूप विचारांती ह्या लग्नाला होकार दिला. मला तुम्ही पसंत नव्हतात तरीही मी हो म्हणाले हे सत्य आहे.
पण आज आत्ता मगाशी जो होकार दिला ना तो बाबांसाठीचा नव्हता. तर तो फक्त तुमच्यासाठी होता.

कॉलेजात असताना ज्या मवाली छिछोऱ्या मुलाला मी ओळखत होते त्याच्या अत्यंत विपरीत अतिशय नम्र, मृदूभाषी आणि स्वतःपेक्षा इतरांच्या भावनांचा विचार करणारा एक संवेदनशील विचारी पुरुष मला तुमच्यात दिसला. तुम्ही स्वतःबद्दल कुठलीही गोष्ट लपवून ठेवली नाही. अगदी स्वच्छ पारदर्शी स्वभावाचे दर्शन त्यातून मला घडले. दिसणं ह्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही मनानी खूप चांगले आहात हेच मला तुमच्या आजच्या भेटीतून कळले. तुम्ही अचानक इथे भेटायला आलात तेव्हाही मी मनातून खूप घाबरले होते. आता लग्न ठरलेय ह्या बेसीसवर बायकोवर कोणताही अधिकार गाजवू शकत होतात तुम्ही.आणि मी नकार पण देऊ शकले नसते. पण तुमचे येण्यामागचे कारण जसजसे उलगडत गेले तसतसा माझा तुमच्याबद्दलचा आदर अधिकच वाढत गेला. ह्या बाहेरील राकट माणसाच्या आतील अतिशय सत्शील ऋदयाचे दर्शन घडत गेले तसतशी मी त्या आतल्या प्रेमळ ऋदयाच्या प्रेमात पडत गेले. आणि म्हणून माझा शेवटचा होकार त्या सॠदयी सत्पुरुषाला होता. ”
तिचे बोलणे झाले तसे तिने मान वर केली तर इकडे रंग्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिला काहीच समजेना वरून कणखर वाटणारा हा प्राणी असा रडतोय का?
तिने आपला रूमाल देऊन त्याला विचारले,
” अहो , असं रडताय का? काय झाले? माझं काही चुकलंय का?
ॲम रीअली सॉरी! प्लीज तुम्ही रडणे थांबवा आधी. कोणी पाहिले तर म्हणेल ह्या बाईने काय केले ह्याला की हा असा रडत आहे !”
तिने केलेल्या मस्करीवर तो किंचित हसला तसे तिला जरा हायसे वाटले. मग त्याने स्वतःला सावरले. तिनेही त्याला तो वेळ दिला. मग विचारले,
“ काय झाले? डोळ्यातून पाणी का काढलेत असे? ”

जरा वेळ शांततेत गेल्यावर तो बोलता झाला.
“ तुझं बोलणं ऐकून थोडा भावूक झालो. आजवर कोणत्याही मुलीने इतक्या चांगल्या भाषेत माझे कौतुक केलेले नाही. *कौतुक किस चिडीया का नाम है हमे पता ही नही*. आजपर्यंत फक्त तक्रारी शिव्याशाप आणि मुक्ताफळेच ऐकायला मिळालीएत लोकांकडून.
मुलींच्या नजरेत फक्त टूक्कार वाया गेलेला मुलगा म्हणून जी नजर असते तीच विखारी नजर मला बघायला मिळाली.
मी आता कितीही सुधारलो असलो तरी माझा भूतकाळ माझ्या वर्तमानावर नेहमीच वरचढ होत राहीला. कोणीच मला आदराने वागवत नाही. त्यामुळे आयुष्यात खूप कमी लोक आहेत जे मला खरं प्रेम करतात. बाकी सगळे संशयित नजरेने बघतात. आज तू जे जे बोललीस त्याने मन भरून आले. चला कोणाला तरी माझा खरा चेहरा कळला. तुला तरी मी खरा काय आहे हे पटले. आता मला जगाची फिकर नाही. यमू, आत्ता ह्या क्षणापासून तुला वचन देतो, मी तुला कधीच दु:ख देणार नाही. आपण आपल्या मुलांनाही खूप चांगले संस्कार देऊ. तुझ्याशी खूप चांगला संसार करून जगाला मला दाखवून द्यायचेय की वाल्याचा वाल्मिकी झाला हे एकच उदाहरण नाहीये जगात, मी पण त्याचेच आधुनिक उदाहरण आहे.
यमू, मी तुला खूप खूप प्रेम करेल. तुला त्रास होईल असे मी कधीच काहीच वागणार नाही आणि तू घेतलेल्या निर्णयावर पश्चात्ताप करायची वेळ मी तुझ्यावर कधीही येऊ देणार नाही, हे आज ह्या सायंकाळच्या सूर्याला साक्षी ठेवून मी वचन देतो. ”

आता तर यमूच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागले. दोघेही हातात हात घेऊन एकमेकांना आधार देत होते…
समज गैरसमजांचे सगळे मळभ दूर होऊन स्वच्छ सुंदर भविष्याचा सुंदर इंद्रधनू दोघांच्या मनावर आकार घेत होता.
एकमेकांशी बोलता बोलता अंधार पडला होता एव्हाना आणि अचानक त्याला जाणवले
आता पुढे काय?
कुठे जाणार?
इकडे तर यमूचे घर सोडून कोणीच ओळखीचे नाही. रात्र कुठे काढायची?
त्याने मनाशी काहीतरी विचार केला आणि म्हणाला,

“ खूप उशीर झालाय. काका वाट पाहत असतील. त्यांना कळले तर अनर्थ होईल कारण ते लगेच बाबांना कळवतील आणि मग बाबांचा पण माझ्यावरचा विश्वास ढळेल. सो आता तू् लवकर घरी जा. ”
“ अरे पण एवढ्या रात्री तू कुठे जाशील?
ते काही नाही मी तुला सोडून एकटी घरी जाणार नाही. तुला घरी यावेच लागेल. "

“अगंऽ प…ण काकाऽऽ? ”
“ त्यांची चिंता तू नको करूस, मी सांगेन बाबांना. तू फक्त घरी चल. असेही मगाशी पण *जेवून आलोय* सांगून तू डबा पण खाल्ला नाहीस. आता मस्त स्वैपाक करते. माझ्या हाताला चव आहे असं बाबा नेहमी म्हणतात आता बघू नवरोबांना आवडतेय की नाही ! ”
“ तुझ्या लक्षात आले का यमूऽऽ ! ”
“ काऽऽय? ”
“ हेच की बोलता बोलता तू मला एकेरीत बोललीस तुझ्याही नकळत. ”
त्याने सांगितल्यावर तिलाही जाणीव झाली आणि तिने दाताखाली जीभ चावली.
“ एऽऽ, पण आता खरंच मला अरे तूरे च कर. मला आवडेल तुझ्या तोंडून *रंऽऽऽगू* ऐकायला.
आईशप्पथ ऋदय इतकं जोरजोरात धडधडायला लागलं की वाटलं आत्ता बाहेर येते की काऽऽय!”

“ चल चावट कुठचा! मला वाटलं होतं तू सुधारलाएस पण ते नाटक होते तर सगळे मला इम्प्रेस करायचे,हो ना! ”
“ नाटकं?? ते तर आपल्याला बापजन्मी जमलं नाही. मागील काळातला कॉलेजचा गूंडही खरा होता आणि आज बदललेला रंग्या पण एकदम २४कॅरेट सोन्याइतका खरा आहे.
हा आता तुला जे बोल्लो ते फ्लर्ट असेल तर घाबरतो की काय कुणाच्या बापाला, आपल्या हक्काच्या बायकोला बोलतोय आपण..”

हसत हसत दोघेही घराकडे निघाले…….
—---------------------------------------------------------
क्रमशः -13
क्रमशः -13
अशाप्रकारे रंग्या आणि यमूनाने एकमेकांना मनानें वरले.. आता पुढे काय होतेय ते पुढील भागात पाहू.
कशी वाटली रंग्या यमूची लव्हस्ट़ोरी हे लाईक कमेंट द्वारे नक्की कळवा.
धन्यवाद
@राधिका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा