म्हणून जग फसतं!-12
©®राधिका कुलकर्णी.
©®राधिका कुलकर्णी.
रंग्याचे बोलून झाल्यावर चहाचा सिप मारता मारताच यमूने रंग्याला गूगली टाकली.
“ जो प्रश्न तुम्ही विचारलात तोच मी आता तुम्हाला विचारतेय, फक्त खरं खरं उत्तर द्यायचे. ”
रंग्याने होकारार्थी मान हलवताच यमूने विचारले.
“ माझे थोड्यावेळ बाजूला ठेवू, आता तुम्ही मला सांगा तुम्हाला पसंत आहे का मी किंवा मग हे लग्न? ”
“ मऽ……मीऽऽऽ? ”
रंग्याला तिच्याकडून असा प्रश्न अपेक्षितच नव्हता. अचानक झालेल्या ह्या वाराने तो भांबावला. काय उत्तर द्यावे त्याला सुचेना. मग आवंढा गिळत तो म्हणाला,
“ खरं बोलू की तुला आनंद होईल असे बोलू? ”
“ खरं उत्तर दिलात तरच मला आनंद होईल. मला आनंद व्हावा असे उत्तर दिले तरी ते खरे नसणार नाऽऽ, मग मला आनंद कसा होईल. तुम्ही खरेच बोला. ”
तिच्या युक्तिवादावर रंग्याही फिदा झाला. पोरगी भलतीच हुशार आणि डोकेबाज आहे. इतर मुलींप्रमाणे शब्दांच्या घोळात अडकणारी नाहीये. आपल्या विचारांवर ठाम आहे.. जे खरंय तेच बोलू मग जे होईल ते होवो.
आपल्या मनातील स्वगत पूर्ण करत रंग्या म्हणाला,
आपल्या मनातील स्वगत पूर्ण करत रंग्या म्हणाला,
“ मी मस्करी केली. मी खरंतर इकडे स्पष्टपणे एकमेकांची मते जाणून घ्यायलाच आलोय. त्यामुळे माझं खरं आणि तुला आनंद होईल अशी दोन्हीही उत्तरे सारखीच आहेत..
जर मला विचारशील तर मला तर अपेक्षाच नव्हती की माझ्यासारख्या निवडूंगाच्या पदरी तुझ्यासारखे इतके सुंदर, मोहक गुलाबाचे फूल पडेल.
आज खोटं बोलणार नाही. खूप स्पष्टच सांगतो कॉलेजमध्ये असतानाची तू आणि आत्ताची तू ह्यात जमीन अस्मानाचा फरक झालाय. तेव्हा आम्ही तुझ्यासारख्या मुलींना काकूबाई किंवा बहेनजी चिडवायचो. अशा मुलीशी लग्नाचा विचार सुद्धा कधी करू शकलो नसतो पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हेच खरे.
काल दाखवायचा कार्यक्रम होईपर्यंत मला कल्पना नव्हती की मी कुणाला बघायला चाललोय. आणि ती अचानक तू निघालीस. मला प्रचंड धक्का बसला तुला समोर बघून. पण अफकोर्स हा सुखद धक्का होता. मला बाबांच्या मित्राची मुलगी म्हणजे अशीच कोणीतरी काळी सावळी, खेडवळ, दहावी/बारावी नापास किंवा ढकलपास होऊन शिक्षण सोडलेली, जेमतेम मला शोभेल अशी कोणीतरी असेल असे वाटले होते. पण टू माय सरप्राईज तू विलक्षण देखणी,शिकलेली, हुशार आणि आपल्या पायावर उभी अशी मुलगी माझ्या समोर उभी होती. खरं सांगू तर मी तर त्या म्हणीप्रमाणे *पाॅंचो उंगलीयाॅं घी मे और सर कढाई मे* अशा अवस्थेत होतो.

त्यामुळे मी तर तुला नकार देण्याचे एकही कारण माझ्याजवळ नव्हते. पण तुझ्या जागी बसून विचार केला तेव्हा मात्र खूप हादरलो. अस्वस्थ झालो.
वाटलं की तूला तुझ्या योग्यतेचा नवरा मिळावा असेच तुला वाटत असेल, पण फक्त तू एक स्त्री आहेस म्हणून आई वडीलांच्या इच्छेला मान देऊन *हो* म्हणणे हे किती अन्याय्य असू शकते तुझ्यासाठी? म्हणून मी आजची ही भेट घ्यायचे ठरवले. मला तर माझ्या लायकीपेक्षा खूप जास्त मिळत आहे पण तुझं काय???
तुला तर मन मारत संसार करावा लागेल आयुष्यभर तेही एका अशा व्यक्तीसोबत जो तुझ्या कधी कल्पनेतही नव्हता. त्यामुळेच तुझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न होऊ नये म्हणून तुझी भेट घ्यायला आणि त्या योगे तुझे माझ्याविषयीचे खरे मतं आणि ह्या लग्नाबाबतचे विचार जाणून घ्यायला ही भेट आवश्यक झाली.
थोडक्यात हे की - होऽऽऽ, मला तू पसंत आहेस आणि हे लग्नही मान्य आहे पणऽ….. पण तुझ्या इच्छेविरुद्ध नाही. ”

“ हम्मऽऽऽ! ”
“ हम्म काऽऽय?? नुसते *हम्म* ऐकायला इथवर नाही आलोय मी. मला उत्तर हवंय तेही स्पष्ट आणि सडेतोड. लवकर काय ते बोल. मला परतीला जायला फक्त एकच शेवटची बस असते. ती चुकली तर इकडे मुक्काम करावा लागेल आणि बाबांना कळले नाऽ तर मग माझी काही खैर नाही. ”
यमूना शेवटच्या वाक्यावर गालातच हसली. एवढ्या वयालाही हा आपल्या वडिलांना इतकं घाबरतो हे त्याच्या शरीरयष्टीकडे पाहून सांगूनही कुणाचा विश्वास बसेल का?!
तिला हसताना पाहून रंग्याची पण थोडी सटकली. इकडे आपण इतकं सिरीयस काहीतरी बोलतोय आणि ही माझ्यावर काहीतरी विनोद झाल्यागत हसतेय खुशाल!
रंग्याने आवाज चढवत तिला विचारले,
रंग्याने आवाज चढवत तिला विचारले,
“ आता मी शेवटचं विचारतोय. उत्तर दिलेस तर ठीक नाहीतर जे होईल त्याला मी जबाबदार नाही. येतो मी. ”
एकुण वातावरण गंभीर स्वरूप धारण करतेय पाहून ती लगेच त्याला थांबवत म्हणाली,
“ सॉरी सॉरीऽऽ! मी तुमच्यावर नव्हते हसत. तुम्ही शेवटी बोललात ना की *मग माझी काही खैर नाही* त्या वाक्याचे हसू आले. तुमच्या सारख्या इतक्या बॉडीबिल्डर माणसालाही कुणाची भीती वाटत असेल हे ऐकून खरे वाटत नाही. त्यामुळे तो विचार करून आपसूक हसू आले. ॲम सॉरी. ”
“ ते सॉरी राहू दे बाजूला आधी मला सांग तुझे मत काय आहे?? ”
“ रंगराव, तुम्ही आज मुक्काम कराच. कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला फक्त *हो* किंवा *नाही* मध्ये देणे शक्य नाही होणार. वेळ लागेल खूप. आणि गाडी तर शेवटची अशीही गेली आता. ”
“ काऽऽऽय ??? असं कसं होईल. मी तिकडं शेवटच्या गाडीची वेळ बघून आलोय. अजून तासभराने सुटते
शेवटची बस. ”
त्याने आपल्या मनगटी घड्याळावर नजर फिरवत उत्तर दिले. त्यावर यमूही गंभीर चेहरा करत म्हणाली,
शेवटची बस. ”
त्याने आपल्या मनगटी घड्याळावर नजर फिरवत उत्तर दिले. त्यावर यमूही गंभीर चेहरा करत म्हणाली,
“ होऽऽऽ पण माझं बोलणं अजून व्हायचंय. ते ऐकून जाईपर्यंत गाडी तर गेलेली असणार नाऽऽऽ! ”
रंग्या नि:शब्द. त्याला गप्प झालेलं बघून यमूला त्याची कीव आली. आपण उगाच त्याची इतकी खेचतोय हे पाहून आता ती थोडी गंभीर मुद्रा धारण करत बोलली.
“ ठीक आहे, तुम्हाला उत्तर हवेय ना तेही *हो* की *नाही* मध्ये? मग दिले उत्तर… जा,माझा होकार आहे ह्या लग्नाला. आता तर खूष? आणि आता लवकर निघा, नाहीतर शेवटची बस सुटली तर तुमची काही खैर नाही. जा,जाऽ,जा.लवकर निघा. ”
रंग्या इकडे पुन्हा स्तब्ध पुतळा झालेला. ती खरं बोलतेय की खोटं बोलतेय की मस्करी करतेय , काहीच कळत नव्हते. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता तरी कसाबसा धीर एकवटून त्याने विचारले
रंग्या इकडे पुन्हा स्तब्ध पुतळा झालेला. ती खरं बोलतेय की खोटं बोलतेय की मस्करी करतेय , काहीच कळत नव्हते. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता तरी कसाबसा धीर एकवटून त्याने विचारले
“ काऽऽऽय? तू शुद्धीत आहेस ना? परत सांग, माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये. ”
“ हो रंगराव मी अगदी शुद्धीत आणि योग्य तेच बोलतेय. माझा होकार आहे. ”
“ काय कारण? मला कळू शकेल? ही दया का माझ्यावर? ”
“ बघा हं, सविस्तर कारण देत बसले तर तुमची गाडी मिस होईल, चालेल?? ”
“ हो, चालेल.पण आता उत्तर ऐकल्याखेरीज मला चैन पडणार नाही. काय असेल ते सगळं खरं खरं सांग. एक पण शब्द खोटा नकोय मला. घरी उशीरा पोहोचलो म्हणून अगदी बाबांनी पोकळाने मारले तरी चालेल पण आता कारण तर कळायलाच हवे. ”
“ एक काम करते. माझ्या डेस्कवरचे जरा पेपर्स सगळे फाईलला लावून सगळे बंद करून येते. आज तसाही माझा हाफ डे लागलाच आहे तर इथून बाहेर पडू आणि मग दुसरीकडे कुठेतरी निवांत बोलू, चालेल ना? ”
रंग्याने नाईलाजाने होकारार्थी मान डोलावली. तो तिथेच बाकावर बसला आणि ती थोड्या वेळातच आवरून बाहेर आली. तिच्या स्कूटीवरून डबल सीट बसत दोघं एका पार्कमध्ये आले. एक कोपऱ्याचा बाक बघून ते शांत जागी बसले. सुरवात कुठून करावी हेच यमूला समजत नव्हते.पण शेवटी तिने प्रयत्न करत बोलायला सुरुवात केली.
“ रंगराव, तुम्ही ऐकताय नाऽऽ. आता मी सगळे अगदी मनापासून खरे बोलणार आहे. फक्त मला एक वचन हवेय, मी जे काही बोलेन त्याचा तुम्ही राग करायचा नाही, कबूल? ”
“ कबूल कबूल.. आता बोल गं बये. नमनाला किती ते तेल.. आणि अगोदर ते *रंगराव रंगराव* बोलणं बंद कर. इतक्या अदबीने नाव ऐकायची ह्या कानांना सवय नाही. असं वाटतं की कोण्या तिऱ्हाईताशी बोलतेय तू. मी कसं पहिल्याच वाक्यात अरेतूरे वर आलो की नाही? मग तू ही *रंग्या* च म्हण. आपण आपल्या औकातीत राहीलेले बरे. इतका मान सन्मान दिला की शिवी दिल्यासारखे वाटते. आपलं रंग्याच म्हण, बरं वाटेल मला आणि आता लवकर चटचट बोल. ”
—----------------------------------------------------------
क्रमशः -12
क्रमशः -12
यमू काय बोलतेय हे ऐकायला रंग्या जितका उत्सूक आहे तितकेच तुम्हीही आहात ना?
मग पुढील भाग नक्की वाचा.
आजचा भाग कसा वाटला हे लाईक कमेंटद्वारे नक्की कळवा.
धन्यवाद
@राधिका.
मग पुढील भाग नक्की वाचा.
आजचा भाग कसा वाटला हे लाईक कमेंटद्वारे नक्की कळवा.
धन्यवाद
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा