©®राधिका कुलकर्णी.
*नशीब बरोबर तुम्हाला तिथेच आणून सोडते जिथं असण्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते.*
रंग्याने आपली स्टोरी पुढे कंटिन्यू केली………
माझ्याबाबतीत अगदी असेच घडले. समोर बाबांच्या मित्राची मुलगी म्हणून जी मुलगी उभी होती ती चक्क कॉलेजमध्ये जिला आम्ही चिपडी, पापडी,चपटी, बहेनजी म्हणून चिडवत असू तिच यमूना शिंदे साक्षात समोर उभी. तिची नजर झुकलेली होती जमिनीकडे पण मी मात्र तिला लगेच ओळखले. पण इथे मला एक सुखद धक्का मिळाला.
कॉलेजची चिपडी तिनपाट बहेनजी यमू आता एकदम नुकत्याच उमललेल्या टवटवीत गुलाबाच्या फुलाप्रमाणे सुंदर दिसत होती. दोन तेल थापलेल्या चिपचिपीत वेण्या जाऊन आता तिने छान लांबसडक एक वेणी घातलेली होती. त्यावर अबोलीच्या फुलांचा गजरा. अंगावर अबोली रंगाची साडी त्यावर स्लीव्ह्जलेस पांढरे ब्लाऊज. कानांत नाजूकसे डूल आणि ओठांवर अगदी पुसट गुलाबी शेडची लिपस्टीक लावलेली. कपाळावर साडीला मॅचिंग अबोली रंगाची टिकली आणि तशाच मॅचिंग पांढऱ्या अबोली रंगाच्या मिक्स बांगड्या एका हातात. तर दुसऱ्या मनगटात सोनेरी पट्टा असलेले लेडिज वॉच.
अगदी सिंपल बट स्वीट लूक असुनही ती खूप टवका दिसत होती. मीच तिच्यापुढे आडदांड राकट बैल दिसत होतो.
त्याक्षणी मी कुणालाच आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखतो हे कळू दिले नाही. मी पण संभावितपणे मान खाली घालून बसलो.
चहा फराळ देताना तिने हळूच एक नजर मला बघितलं आणि ती आत निघून गेली ते आम्ही जाईपर्यंत परत आलीच नाही.
मनातल्या मनात खूप चलबिचल चाललेली. तिच्यासारख्या शिकलेल्या, हुशार, सुंदर मुलीला माझ्याहून कित्येक पटींनी चांगला मुलगा नवरा म्हणून मिळू शकत असताना केवळ आमचे बाप एकमेकांना शब्द दिले म्हणून तिने माझ्याशी इच्छेविरुद्ध लग्न करावं हे मला मुळीच पटत नव्हतं. बरं बाबांशी बोलायची सोय नव्हती. त्यांनी तर लग्न ठरल्याचा बिगूल कधीच वाजवून टाकला होता. काल लगेच शकून म्हणून सूपारी पण फोडून झाली होती. मला *लंगूर के मुंह हे अंगूर* ह्या म्हणीप्रमाणे सुंदर बायको मिळणार होती लायकी नसताना, पण तिचे काय??
तिच्या तर लग्नाविषयी, आपल्या भावी सहचाऱ्याविषयी किती कल्पना असतील, काही नाही तर निदान तो तिला शोभेसा असावा इतकी माफक अपेक्षा तर असणारच ना ! पण तिला मिळाला कोण? तर माझ्यासारखा आडदांड काळाकलूटा पहेलवान. तिच्या मनाचा विचार करकरून मी हैराण झालो. मला एकदा तरी तिला एकट्यात भेटून तिचे मन जाणून घ्यावे वाटत होते पण आमच्या घरचे रिवाज- लग्नाआधी नवरा नवरी एकमेकांशी भेटत बोलत नाहीत त्यामुळे तिर्थरूपांना विचारल्यावर त्यांनी माझा विचार सपशेल धुडकावून लावला..
"आता काय भेटा बोलायचेय ते डोक्यावर अक्षता पडल्यावरच बोला"
असा फर्मान सुटल्यावर उघडपणे तिला भेटण्याचे मार्ग तर बंद झाले. पण मला तर तिला भेटायचेच होते. मग मी माझ्या तालुका महाविद्यालयीन स्पोर्ट्स टूर्नामेंटचा जज म्हणून मला जावे लागेल असे कारण सांगून शाळेत एक दिवसाची रजा टाकून तिच्या गावी गेलो. तेव्हा ती म्युनिसिपल कार्पोरेशन मध्ये अकाऊंट्स डिपार्टमेंटला नोकरीला होती. तिच संधी साधून मी तिच्या ऑफिसला गेलो.
चौकशी करून तिच्या डेस्कपाशी पोहोचलो. ती रजिस्टरमध्ये डोकं खुपसून काहीतरी लिहीत होती. मी टेबलवर थाप मारून आवाज केला तसे तिने मान वर करून बघितले. मला बघताच घाबरून ती खुर्चीवरून उठून उभी राहिली. चेहऱ्यावर भेदरलेले भाव. मी इकडे कोणतीही सुचना न देता कशाकरता आलो असेल? हा प्रश्न मे बी तिला सतावत असणार.
मी तिला सरळ बोललो,

“ थोडं बोलायचं होतं,बोलू शकतो का आपण? ”
माझ्या विनम्र प्रश्नाने ती थोडी सहज झाली असावी. पण मंद स्मित करत ती लगेच म्हणाली,
“ लंच ब्रेक मध्ये बोलू, अर्ध्या तासात. तोपर्यंत तिकडे पलिकडे बाकावर बसू शकता का आपण? ”
तिने जरा घाबरत घाबरतच मला विनंती केली.
मी निमुटपणे बाकावर जाऊन बसलो. तिला जरी मी दिसत नसलो तरी मला तिचा डेस्क तिथून स्वच्छ दिसत होता. मी दुरून तिचेच निरीक्षण करत होतो. मला ती मनापासून आवडली होती. पण आपल्या आवडीसाठी दुसऱ्यांच्या आवडींची राखरांगोळी करू नये इतका विचार करण्याइतपत सभ्य आणि सुशील मी एव्हाना झालो होतो. मला तिच्यावर अन्याय होतोय का ? हीच खात्री करून घ्यायची होती.
बराचवेळ मी तिचे निरीक्षण करत होतो. तिचे रजिस्टर मध्ये नोंदी करण्याचे काम वेगाने चालू होते. मधेच कोणी काही विचारायला चौकशीला आले तर प्रसन्न मुद्रेने ती त्यांना उत्तर देत पुन्हा आपल्या कामात व्यग्र होत होती.मधेच तिचा लांब केसांचा शेपटा समोर येऊन पडायचा त्याला हाताच्या हासड्याने मागे सरकवताना होणारी तिची लयबद्ध हालचाल माझ्या मनाला मंत्रमुग्ध करत होती.
अखेरीस अर्ध्या तासाने लंच ब्रेक झाला तशी ती एक पिशवी हातात घेऊन माझ्या पुढ्यात उभी राहिली.

“ सॉरी हं तुम्हाला वाट बघत ताटकळत बसावे लागले. पण आमच्या साहेबांना कामाच्या वेळी गप्पा मारलेले चालत नाही. ते लगेच आमचा "हाफ-डे" मार्क लावतात. चला तिकडे समोर कॅन्टीनमधे बसून बोलू. पण तुमचे जेवण?? झाले की व्हायचेय? ”
“ मी सकाळी जेऊनच निघतो त्यामुळे मला ह्यावेळी भूक लागत नाही. तुम्ही सावकाश जेवा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही , मला फक्त थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ”
“ बोला ना, काय बोलायचेय? ”
पिशवीतून आपला लंच बॉक्स बाहेर काढता काढता ती अतिशय सौम्य आवाजात बोलली.
मग मी तिला इतके दिवस माझ्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला…

“ मला ओळखलेस का तू? ”
मी डायरेक्ट एकरीवर आलो आणि धाडकन विचारून मोकळा झालो.
मगाइतक्याच सौम्य पण ठाम स्वरात तिचे उत्तर आले.

“ होऽ. ”
“ मग तरीही तू ह्या लग्नाला होकार का दिलाय? ”
“ कारण बाबांची तशी इच्छा आहे. ”
“ पण तुझी काय इच्छा आहे, तुला पसंत आहे हे लग्न?”
“ जी बाबांची इच्छा तिच माझी इच्छा आणि बाबांना जर तुम्ही पसंत असाल तर मग त्यांची इच्छा हीच माझी इच्छा. ”
“ लग्न बाबांशी नाही तुझ्याशी होणार आहे ना. मग तुझी माझी पसंती जुळली पाहिजेऽऽ कळतेय का? ”
“ जर बाबांना माझ्यासाठी तुम्ही योग्य *वर* वाटत असाल तर त्यांच्या इच्छेविरुद्ध जायची चूक मी करणार नाही. ह्या वयात त्यांना कुठल्याही यातना द्याव्यात असे मला वाटत नाही. म्हणून मी लग्नाला तयार आहे. ”
रंग्याला ह्यावर काय बोलावे कळत नव्हते. शेवटी हिय्या करून त्याने त्याच्या मनात काय आहे ते बोलायचे ठरवले..
“ हे बघ यमूना, कॉलेजमध्ये मी किती वाया गेलेला मुलगा होतो हे तुला चांगलेच माहितीय. आता जरी मी ते सगळे मार्ग सोडून एक सभ्य गृहस्थ झालो असलो तरी तुझ्या माझ्या वयात खूप अंतर आहे. कारण मी दरवर्षी फेल व्हायचो आणि तू इतकी हुशार दिसायला इतकी सुंदर,त्यात तुला सरकारी नोकरी आहे, माझ्याहून कितीतरी सुंदर देखणे मुलं तुला सहज पसंत करतील. तू माझ्यासारख्या मुलाला मुळीच डिझर्व्ह करत नाहीस. तू कैकपटीने माझ्याहून हर बाबतीत सरस आहेस.
माझं ऐक, वडिलांच्या इच्छेकरता स्वतःच्या सुंदर भविष्याचा होम करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. तू फक्त खरं खरं सांग. जर तुला खरंच मी पसंत नसेल ना तर सांग. तुझ्यावर यत्किंचितही डाग न लागू देता मीच माझ्या बाबांना सांगतो आणि हे लग्न मोडतो. तुझ्यावर काहीच येणार नाही. मी तुझ्यासाठी सुयोग्य स्थळ निवडून आणतो. किंवा तुझी जर काही पसंती असेल तर तसेही सांग मी मदत करीन तुला तुझ्या मनासारख्या जोडीदाराशी विवाह लावून देण्यात. फक्त आता तरी स्पष्ट आणि मोकळेपणाने जे मनात असेल ते बोल.
आमच्या कडे लग्नाआधी नवरा नवरी एकमेकांशी भेटत बोलत नाहीत त्यामुळे तिर्थरूपांना न सांगता मी खोटं कारण सांगून इकडे तुला भेटायला आलोय. परत परत भेटायला येणे मला शक्य होणार नाही कदाचित. सो प्लिज आताच काय ते बोल. एकदाच सोक्षमोक्ष लावून टाकू. म्हणजे माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. तुला पाहिल्यापासून माझं मन मला खातेय की मी तुझ्या लायक नसतांनाही केवळ आपल्या आई वडिलांच्या इच्छेकरता हे लग्न तुझ्यावर बळजबरीने थोपले जातेय जे अयोग्य आहे. "
रंग्याने एका दमात सगळे बोलून तिच्या चेहऱ्यावरील हावभाव निरीक्षण करू लागला. तिचा चेहरा निर्विकार होता. ती शांतपणे तिचा डबा संपवत रंग्याला म्हणाली,

“ झालं तुमचं सगळं बोलून,की अजून काही बाकीय? ”
“ नाही.. झालं.आता तू बोल. ”
यमूनाने शांतपणे आपला डबा पिशवीत भरला. हात धुतले. पाणी प्यायली आणि रूमालाला हात पुसतच तिथल्या मुलाला दोन चहाची ऑर्डर देत रंग्याकडे रोखून पाहिले.
तिच्या त्या शांत स्तब्ध हालचाली बघून रंग्याला कळतच नव्हते की आपल्या बोलण्याचा हिच्यावर काही परीणाम झालाय की नाही. ती काय बोलतेय ह्याकडे आता रंग्याचे कान टवकारले होते……….

—---------------------------------------------------------
क्रमशः -11
क्रमशः -11
रंग्याच्या इतक्या मोठ्या भाषणानंतरही यमूना मात्र निर्विकार आहे. ती नक्की काय बोलेल रंग्याला ?
पुढे त्यांचे लग्न होते आणि कसे?
ह्याची कहाणी जाणून घ्यायला वाचत रहा
*म्हणून जग फसतं!"
कथा आवडल्यास लाईक कमेंट नक्की कळवा.
धन्यवाद
@राधिका.
पुढे त्यांचे लग्न होते आणि कसे?
ह्याची कहाणी जाणून घ्यायला वाचत रहा
*म्हणून जग फसतं!"
कथा आवडल्यास लाईक कमेंट नक्की कळवा.
धन्यवाद
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा