म्हणून जग फसतं! - 6
©®राधिका कुलकर्णी.
" ए शऱ्या, कोणी आपल्याला एकत्र बघितले तर रे ? मला तर कोणी ओळखत नाही इकडे पण तुझ्या ओळखीचे कोणी पाहीले तर ? "
हे बघ, एक तर तुला इकडे कोणी ओळखत नाही आणि मला ओळखणाऱ्यातले कोणी बघितलेच तर ते हेच समजतील की माझ्या पत्नीच्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी कुठे तरी ड्रॉप करायला चाललोय आणि अनोळखी लोक समजतील नवरा बायको चालले असतील कुठेतरी… थोडक्यात काय ह्या वयात *प्रियकर प्रेयसी किंवा मित्र मैत्रिण एकत्र कुठेतरी भटकंतीला निघालेत* ह्या ॲंगलने कोणीही आपल्याला बघणार नाही, खरेय की नाही !
इसे कहते है वक्त का खेल!
एक काळ तो होता, तारूण्यकाळ- जेव्हा अगदी बहिणीला जरी डबलसीट कुठे नेत असलो तरी अनोळखी नजरा संशयाने बघत की कोण रोड रोमिओ फिरताहेत.. आणि आता खरच मनातल्या स्वप्न सुंदरीला घेऊन फिरतोय तरी बिशाद आहे कुणाची की शंका घेतील ! वक्त वक्त की बात है माला मॅडम.. !! ”
हिने नेमके काय ऐकलेय आपल्याबद्दल??
मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याहेतूने शरदनेच प्रश्न केला,
मला वेगळेच काहीतरी बोलायचेय, रादर कन्फेस करायचेय ज्यासाठी घर ही जागा योग्य नव्हती म्हणून कुठेतरी मोकळ्या जागी जिथे फक्त तू आणि मीच असूत, आणखी कोणाचाही डिस्टर्बन्स नसेल अशा जागी बोलायचे होते म्हणून इकडे आले. "
" का गं, काय बोलायचेय एवढे, आणि कन्फेशन वगैरे म्हणजे काय आता ह्या वयात प्रपोज बिपोज करणारेस की काय! "
तुझे तरूण मित्रमंडळ तर अगदी तू सांगितल्याबरोबर पाचव्या मिनिटाला मदतीला धावून आले. मी तर खूप घाबरले होते. काय करावे काहीच सुचत नव्हते. आईची ती अवस्था बघवत नव्हती. पण कूहू आणि त्या मुलांनी सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली.
तू सांगितलेल्या डॉक्टरीणबाईना पाहिले आणि खरं सांगते शऱ्या मला आधी त्यांच्या देहयष्टीवरून उगीचच वाटले की त्या चांगल्या डॉक्टर असतील की नाही, योग्य उपचार आईवर होईल की नाही ? पण त्या खूपच हुशार आणि लाघवी होत्या. आईला बोलण्यात गुंतवून इंजेक्शन पण दिले तरी आईला कळले देखील नाही, नाहीतर एरवी आमची आई डॉक्टर म्हणले की आधीच घाबरते त्यात इंजेक्शन म्हणले की जास्तच थयथयाट करते पण त्यांनी सगळी सिच्युएशन खूप नीट हाताळली. नंतर आईचे सगळे बॉडी चेक अपचा सल्ला दिला त्यांनी. तेव्हाही मला ही पैसे उकळायची पॉलिसी वाटली त्यांची. आणि आजकाल सर्रास आपण ऐकतो ना रे,त्यात आमची आई तशी धडधाकट बाई. आजवर तिला कधीही दवाखाना माहीत नाही. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी एखाद्या नॉर्मल फिजिशिअनने दिलेल्या औषधाने ती लगेच ओके व्हायची त्यामुळे तिला आता बॉडी चेकअपची काय गरज? असे माझ्या मनात येऊन गेले रे.
पण बरेच वर्षांत तिचे संपूर्ण चेक अप झालेच नव्हते म्हणून मी पण तयार झाले.आणि प्रत्येक टेस्टवेळी दिलेले बिलाचे आकडे पाहून माझे तर डोळेच पांढरे झाले. ही चक्क लूट चाललीय असाच फिल येत होता पण आता तक्रार तरी कुठे आणि काय करणार आपण? म्हणून नाईलाजाने सगळे फक्त उघड्या डोळ्यांनी बघत होते झालं. शेवटी बिल देताना डॉक्टरांना सुनवायचे असं मी ठरवलं होतं मनोमन पण घडले ते भलतेच. तुला सांगू त्यावेळी तर मला तुझाही प्रचंड राग आलेला. चुकीच्या हॉस्पिटलचा पत्ता दिला आणि उगीचच एवढ्या मोठ्या रकमेचा भुर्दंड सोसावा लागला म्हणून. तुझे फोन लागत नव्हते नाहीतर तेव्हाच तुला चार ऐकवून मोकळी होणार होते मी. पण बरं झालं तो फोन लागला नाही."
हेच सगळे मनमोकळेपणाने बोलायचे होते म्हणून खरं तर मला तुला बाहेर भेटायचे होते. "
खरंच मी स्वतच स्वतःच्या नजरेत उतरले होते. काही न जाणता समजता अनेकदा आपण किती गैरसमज करून घेतो ना. आज प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर मला कळतेय की दिसते तसे नसते म्हणून जग फसते.
आता त्याची परतफेड म्हणून मी तिथे डोनेशन तर दिले पण तू माझा जिवलग मित्र ज्याला माझ्या अंतरंगात काय काय वैचारिक घुसळण चाललीय ह्याची यत्किंचित कल्पनाही नाही त्याच्यासाठी पण काहीतरी करायला हवेच ना ! म्हणून आज ही फूल ना फुलाची पाकळी, छोटीशी ट्रीट फक्त तुझ्यासाठी. होप यू लाईक इट.! "
व्हेरी स्मार्ट मूव्ह हं… मानना पडेगा ! "
तिच्या मनातले विचार ती शरदपूढे व्यक्त करू शकेल का?
काय घडणार पूढे?
वाचायला पुढील भाग जरूर वाचा.
कसा वाटला आजचा भाग? हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. धन्यवाद
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा