म्हणून जग फसते! -5
©® राधिका कुलकर्णी.
©® राधिका कुलकर्णी.
“ या, या माला मॅडम. बसा. ”
गोळे बाईंनी स्मितवदनाने मालाचे केबिनमध्ये स्वागत केले. माला समोरच्या खुर्चीत स्थानबद्ध होताच गोळे बाईंनी आज्जींच्या पेपर्सवर नजर टाकली. सगळे रीपोर्ट्स बारकाईने वाचून झाल्यावर त्या बोलल्या,
" काही नाही, रीपोर्ट्स ओके आहेत आज्जींचे. एक रक्त पातळ होण्याची गोळी मी देतेय ती महीनाभर घेऊन मग आपण पुन्हा एकदा टेस्ट्स घेऊ आणि बघू. त्यांना कॉलेस्ट्रॉलची पण एक टॅबलेट सुरू करतोय आपण. ही त्यांना काही महिने घ्यावी लागेल. बाकी सगळं ओके आहे. काही काळजीचे कारण नाही. बीपीची गोळी मात्र मी बदलून देतेय. ती आता आजपासून लगेच सुरू करा.
सगळे रीपोर्ट्स मालाच्या हाती देत गोळे बाई उठून निघायला लागल्या तसा मालाच्या पोटात तोच प्रश्नांकीत भितीचा गोळा उभा राहिला. बरं मालाला समजेना अजूनही बिलाची रक्कम पे करण्याबाबत बाई काहीच बोलत नव्हती. शेवटी हिंमत करून तिने विचारले,
" मॅडम बिलाचे पेमेंट? "
" तिकडे रीस्पेशनवर विचारा. "
" तिकडे रीस्पेशनवर विचारा. "
माला पुन्हा काउंटरवर आली आणि बिलाची चौकशी केली. त्याबरोबर तिथल्या मुलीने सगळे पेपर्स एकत्रितपणे एका मोठ्या एन्व्हलपमधे घुसवून तिच्या अकाऊंटची टोटल पुन्हा चेक केली. आता सगळे फायनल बिल सांगणार इतक्यात तिला एक फोन आला.
आणि रीसेप्शनिस्ट लगेच म्हणाली,
आणि रीसेप्शनिस्ट लगेच म्हणाली,
" मॅडम तुमच्याकडून बिल घ्यायचे नाही असे सांगितले गेलेय सो युअर अकाऊंट इज नील. यु कॅन गो, थॅंक्यू."
मालाला आता तर चक्करच यायची बाकी राहिली.
" अहो,पण बिल का घेत नाही? कोणी सांगितले? नक्की ती व्यक्ती मीच आहे ना की काही घोटाळा होतोय, प्लिज चेक. "
तेवढ्यात गोळे बाईच तिथे पुन्हा प्रकट झाल्या.
" सॉरी माला मॅडम, मगाशी मी एका पेशंटना घाईने भेटायला जात होते म्हणून तुम्हाला रीसेप्शनवर जा सांगितले पण नंतर मला आठवले तुम्ही मिस्टर शरद वर्तकांच्या ओळखीतून आले आहात ना. त्यांच्या ओळखीतून आलेल्या पेशंटचे आम्ही शुल्क आकारत नाही. "
" पण म्ह..ण..जे असं का? "
" अहो आमचे त्यांच्याशी अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या सासऱ्यांनी आणि वडिलांनी ह्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी भरपूर मदत केलीय. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. सो त्यांच्या ओळखीतून आलेल्या पेशंट्सना इकडे विनामूल्य उपचार मिळतो. हाऽऽ, आता तुम्हाला चॅरीटीच करायची असेल तर आम्ही गरीब गरजूंकरता फ्री कॅम्प घेत असतो महिन्याच्या शेवटच्या रविवारी तर त्यासाठी जे यथाशक्ती तुम्हाला दान करावे वाटेल ते करा. इकडे समोरच्या काउंटरवर तुम्हाला एक फॉर्म मिळेल.तो फिलअप करून द्या आणि तुम्हाला यथाशक्ती जितकी वाटेल तितकी रक्कम लिहून तिकडे जमा करा. अर्थात ही फक्त माहिती म्हणून सांगतेय. ही सर्वस्वी तुमची इच्छा आहे.अजिबात कोणतीही बळजबरी नाही. आणि हो तुम्हाला ह्या चॅरीटीतून इन्कमटॅक्स मधे बेनिफिट पण मिळेल. बाकी बिल तर तुमचे माफ आहे. "
मालाने मनातल्या मनात विचार केला. जर खरच ह्यांना फसवणूक करायचीच असती तर आपल्याला हे इतके मोठे बिल भरायला सांगितले असते तर आपण भरलेच असते ना. आपल्याला कळलेही नसते न सांगता की शरदच्या पेशंट्सना इकडे बिल भरायला लागत नाही हे. आपण खरंच किती चुकीचा विचार करत होतो ह्या हॉस्पिटलबद्दल. पण प्रत्यक्षात गोष्ट किती वेगळी आहे. ही मलाच एक शिकवण आहे. मी जरूर गरीबांच्या चॅरिटेबल ट्रस्टकरता डोनेट करेन. विचारांना अंमलात आणत त्यातले १०,०००/- मालाने लगेच चॅरिटेबल ट्रस्ट करता दान केले आणि एका वेगळ्याच समाधान आणि आनंदाच्या लहरींवर स्वार होत ती हॅस्पीटलबाहेर पडली.
एव्हाना शऱ्याविषयीचा राग निवळून ती जागा आदराने घेतली होती मालाच्या मनात. आता तिला स्वतःवरच चीड येत होती. आपण काही न जाणून घेता उगीचच त्या डॉक्टरवर आणि शऱ्यावर पण आगपाखड केली. वास्तविक पाहता त्या बाई खूप हुशार आणि चटपटीत होत्या त्यांच्या कामाबाबतीत. मी उगीचच त्यांच्या देहबोलीवरून त्यांच्या शिक्षणाची किंमत केली. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं हेच खरेय..
विचारांच्या ओघात माला घरी आली. आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आज्जींची नविन औषधे आजपासूनच सुरू झाली. त्यांची तब्येतही आता ओके होती त्यामुळे सगळेच निवांत झाले. इकडे गावात असल्याने शऱ्याच्या फोनला क्वचितच रेंज मिळायची त्यामुळे त्याचेही मालाशी बोलणं झालं नव्हतं.
मालाला शरदला काहीतरी छान ट्रिट द्यावी असे मनात होते पण हे करायचे कसे?
आता ह्या वयात असे वागणे बरे दिसेल का?
शऱ्याला आवडेल का हा प्रस्ताव?
तो येईल की नाही?
असे प्रश्न मालाच्या मनात घर करू लागले.पण काहीही होवो आपला मनसुबा त्याला सांगयचाच असे मालाने मनोमन ठरवले आणि शरदच्या लग्नाहून परत येण्याची वाट पाहू लागली.
—--------------------------------
" हॅलो शऱ्या, अरे आलास की नाही गावाहून परत? "

" अगं हो, कालच रात्री आलो. "
" मग सांगणार कधी? मी विचारल्यावर का? "
" बापरे ऽऽ, मैत्रीण रागावली की काय? "
"मग काय, कुठे गेलास, कधी गेलास, सांगून पण गेला नाहीस, आणि वर आता परत आल्याचेही कळवले नाहीस. मी आपली वाट पहातेय आज येशील उद्या येशील? मी आज सहज फोन केला म्हणून कळले तरी नाहीतर तू तर काही कळवले नसते स्वतःहून. "
" अगं काय मालेऽऽ, किती ते आरोप गरीबावर. तिकडे गावी इतका पाऊस त्यात ते लग्न.रेंजचा पत्ता नसायचा आणि कामाची सगळी भिस्त माझ्यावर त्यामुळे फोनकडे बघायला फुरसत नव्हती. काल निघतानाच इतका पावसाने धिंगाणा सुरू केला वाटले जायला तरी मिळते की नाही पण कशी बशी बस मिळाली म्हणून रात्री उशिरा घरी पोहोचलो. अजून बिछाना सोडलाही नाही की तुझा फोन.. किती बरं गरीबावर अन्याय करणं ते! "
मालाला इकडे मनातल्या मनात हसू फुटत होतं पण ते आवरत लटक्या रागानेच ती बोलली,
मालाला इकडे मनातल्या मनात हसू फुटत होतं पण ते आवरत लटक्या रागानेच ती बोलली,
" ह बघ शऱ्या, तू कितीही काहीही संपादनी केलीस तरी तुझा गुन्हा सिद्ध झालाय मालाबाईंच्या कोर्टात तेव्हा आता शिक्षेला सिद्ध व्हा."
" आलिया भोगासी.. असावे सादर.. बरं बाई बोला आता काय आहे आमची शिक्षा. "
" आज 9:30 ला इराणी चाय दूकानावर ये. तिकडेच बाकीची शिक्षा सुनावणी होईल. "
" अरे बापरेऽऽ! साडेनऊ? हे जरा अशक्य वाटतेय इतक्या सकाळी. "
" का साडेनऊला काय प्रॉब्लेम आहे तुला? "
" अगं साडेनऊला मला घरातच काम असते ते टाकून कसे येणार ना.. एकदा आपण भेटलो की मग वेळेचे भान उरत नाही आपल्याला..तर सगळे आवरून येतो मी म्हणजे मग गप्पांत अडथळा नाही येणार,काय पटतेय का? "
" किती वाजता जमेल तुला मग? "
" हम्मऽऽ, अस करू नीट नीट १०:३० ला भेटू. म्हणजे सगळं निवांत झालेले असेल. "
" बापरे ऽऽऽ, अजून अर्धा पाऊण तासाने तर माझी जेवणाची वेळ होते शऱ्या. बरं ठीक आहे,भेटू आपण १०:३० ला. पण हे बघ वेळ पाळ हं, जास्त उशीर करू नकोस. "
" ओके मॅडम डन. साडेदहा शार्प मी पोहोचतो इराणी कॅफेला. "
" अरे एऽऽ, पोहोचतो काय, मला पिक करायला नाही येणार का? मी एकटी येऊ की काय ? ते काही नाही. तू मला घ्यायला ये. माझ्याजवळ गाडी नाहीये आणि असती तरी मी आज नसते आले माझ्या व्हेईकलने. मित्राची गाडी असताना एकाच ठिकाणी दोन लोकांचे पेट्रोल कशाला खर्च करायचे, आहे ना लॉजिक? "
" इतके लॉजिक बिजिकचे पाठ द्यायची काही गरज नाहीये मी येतो तुला घ्यायला. १०:३० वाजता तयार रहा. "
मालाने हसतच फोन ठेवला आणि आवरायला घेतले. आज तिला उगीचच कॉलेज गोईंग कन्येचा फिल येत होता. आपल्याच एका कॉलेज मित्रासोबत डेटवर जाण्याचा तो फिल जाम भारी वाटत होता. तिने पटापट सर्व उरकले. छानसा पिस्ता ग्रीन कलर टॉप घातला. त्यावर पिंक सलवार आणि तशीच ओढणी घेऊन ती छान तयार झाली. कुहू आज्जींकडे बघायला होतीच त्यामुळे ती निश्चिंत मनाने घराबाहेर जायला तयार झाली. आज गेल्या कित्येक दिवसांनी ती एकटीच कुठेतरी भटकंतीला बाहेर पडत होती त्यात शऱ्यासारखी खळाळत्या झऱ्यासारख्या प्रसन्न व्यक्तीची साथ. आजचा दिवस खूप छान जाणार ह्यात शंकाच नव्हती.
साधारण दहा पंचवीस झाले आणि मालाचा फोन खणखणला. अर्थात शऱ्याचाच होता. तो तिच्या बिल्डिंगच्या खाली येऊन थांबला होता. तिने लगबगीने स्वतःला एकदा नीट आरशात निरखून पाहिले आणि स्वतःच स्वतःला एक स्माईल देत ती लिफ्टमध्ये शिरली.
ग्राउंड फ्लोअरवर उतरून गेटपाशी गेली जिथे शरद आपल्या नेहमीच्या टकाटक अवतारात एक पाय गाडीच्या ॲक्स्लेटरवर आणि एक जमिनीला टेकलेल्या अवस्थेत मालाची वाट पाहत होता. त्याचे ते दिलखेचक रूप बघून मालाला लाजायला झाले क्षणभर. स्वतःला आवरत सावरत ती गाडीच्या मागच्या सीटवर बसली. ती नीट बसलीय खात्री पटताच शऱ्याने गाडी स्टार्ट करून पुढच्याच क्षणी ते रस्त्याला लागले. मधेच आलेल्या खड्ड्यांमुळे गाडी आचके खात होती आणि थोडी खबरदारीने बसलेली माला शऱ्यावर जाऊन आदळताना पुसटसा स्पर्श होत होता. तिला जरा वरमल्यागत होत होते. काय वाटेल शऱ्याला ?आपण मुद्दाम तर त्याच्यावर रेलत नाही आहोत ना?
मनात विचार येताच तिने त्याची आपल्या परीने सफाई देण्याचा प्रयत्न केला.

" किती खड्डे आहेत ना रस्त्यात, शऱ्या गाडी जरा हळू चालव रे, नाहीतर मी पडायची रस्त्यातच. "
" अगं हा थोडा पॅच असाच खराब आहे. काळजी करू नकोस मी हळूच चालवतोय पण तू घट्ट पकडून बस मला म्हणजे पडणार नाहीस. झालं थोड्या वेळात पोहोचूच आपण. हे समोरचे सर्कल वळून डाव्या हाताला गेले की आपण आपल्या डेस्टीनेशनला पोहोचलोच समज. "
मालाच्या मनात उगाच एक कल्पना आली आणि तिला हसायला आले मनातच. तिने घसा खाकरला आणि खोडसाळ आवाजात म्हणाली, ………..
मालाच्या मनात उगाच एक कल्पना आली आणि तिला हसायला आले मनातच. तिने घसा खाकरला आणि खोडसाळ आवाजात म्हणाली, ………..
—--------------------------------------------------------
क्रमशः भाग - 5
क्रमशः भाग - 5
दोघेही रोमिओ ज्युलिएट सारखे मस्त टू्व्हिलरवर डबलसीट इराणी कॅफेला निघालेत. मालाचा नेमका काय उद्देश असेल शरदला असे बाहेर भेटण्यामागे.? माला आता नेमके काय बरं विचारणार आहे शरदला!!! एनी गेसेस!!!
हेच सगळे जाणून घेण्यासाठी वाचत रहा
हेच सगळे जाणून घेण्यासाठी वाचत रहा
"म्हणून जग फसते!"
कथा आवडत असेल तर कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा